"अर्धवट, अर्थवत् (?) कथा!":
आतापर्यंत आपण दीर्घकथा लघुकथा आणि अगदी छोट्या असलेल्या अणुकथा वाचल्या असतील.
पण मला आज एक कल्पना सुचली, अशा कल्पना, मला नेहमीच पहाटे सुचतात. कल्पना अर्धवट कथेची आहे. ती अर्थवत् कशी बनवायची ते, मी तुमच्यावर सोडतो.
पहिली अर्धवट कथा अशी:
एक विवाहित मुलगी नाट्यगृहाच्या इथे गेलेली असते. ती, तिथून आपल्या वडिलांशी फोनवर बोलते:
ती: 'बाबा मी अमुक अमुक नाटकाचे तिकीटं काढायला आली आहे'.
बाबा: हो कां? मग असं कर, आमचीही दोघांची तिकीटं काढ, मात्र पहिल्या पाच रांगेत असली तरच. तिकिटाचे पैसे आपण भेटल्यावर, आम्ही देऊ किंवा असं समज की, आपल्या आईबाबांसाठी तू तिकीटं काढलीस!'
आता भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ कल्पून ती घटना घडली असेल, तेव्हां मुलीचे उत्तर काय असेल, ते तुम्ही प्रतिसादात देऊन
ही कथा पूर्ण करा.
बघा जमतंय कां? माझं उत्तर याच जागी, याच वेळी, उद्या.
धन्यवाद
सुदिना
ता.क. हाच जर मुलगा असेल, तर...?
त्याचे काय उत्तर?!!.....
----------------------------
" कालच्या अर्धवट अर्थवत् कथेचा उत्तरार्ध":
ती विवाहित मुलगी बाबांना काय उत्तर देईल, याची माझ्या दृष्टीने कल्पना मी पुढे मांडत आहे.
अर्थात् "पसंद अपनी अपनी, खयाल अपने अपने" याप्रमाणे प्रत्येकाचे मत वेगळे असेल. फक्त मी इथे माझ्या दृष्टिकोनातून जे काही होऊ शकेल ते मांडून, ही कथा अर्थवत् करण्याचा प्रयत्न केला आहे.
कोणत्याही प्रसंगात त्यावेळचा काळ सामाजिक स्थिती आणि जीवनशैली यांचे प्रतिबिंब पडत असते, हे दर्शविणारी ही अर्धवट कथा, तिची उत्तरे मिळाल्यावर माझ्या कल्पनेप्रमाणे अर्थवत् होऊ शकते.
प्रत्येकाच्या अपेक्षा, एकमेकांकडून पूर्ण होणाऱ्या इच्छा या काळाप्रमाणे आणि इतरही सामाजिक वैयक्तिक जीवनशैली आणि वातावरण जसजसे बदलत जाईल, तसे बदलत जाते. हेच या कथेचे सार आहे. तसे आपआपल्या मनांतील उत्तरांवरून ती अर्थवत् होईल अशी मला आशा आहे.
'भूतकाळ':
या काळात मुलगी मुळात तिकीट काढायला जाणार नाही. गेलं कोणी, तर तिचे यजमान म्हणजे जावई जातील आणि ते असा काही फोन सासर्यांना करण्याची शक्यता नाही. त्यातून जर मुलगी गेली तिकीट काढायला,
तर ती उत्तर देईल: "बाबा मी माझ्या यजमानांना किंवा ह्यांना विचारून कळवते."
"वर्तमान काळ":
आजच्या काळात मुलगी असे उत्तर देऊ शकते: "बाबा आपण भेटू, तेव्हा पैसे दिले तरी चालतील". जर फटकळ मुलगी असेल,
तर ती म्हणू शकेल: "बाबा पाच रांगातच तिकीटं कशाला?"
"भविष्यकाळ"
कदाचित ही मुलगी असा काही फोनच करणार नाही आणि फोन जर झालाच,
तर ती सांगू शकेल "बाबा, आमच्या दोघांमध्ये तुम्हाला यायलाच कशाला हवं? घरीच बसा !"
किंवा तिने तिकीट जर काढलंच,
तर ती सांगू शकेल: "बाबा, ऑनलाइन पैसे पाठवून द्या!
शतकानुशतके उंबरठ्याच्या आंत असलेली स्त्री, अनेक थोर समाजसुधारकांच्या अथक् प्रयत्नांमुळे आता बाहेरच्या जगात, खरोखर स्वसामर्थ्याने प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत प्रबळ होत, प्रभाव पाडत चालली आहे, हे खरोखर अभिमानास्पद लक्षण आहे.
अशा तर्हेचा कल्पक अर्धवट कथेचा उपक्रम, मला असाच जमेल तेव्हा चालू ठेवता येईल. आता तुमची उत्तरे व प्रतिकार प्रतिसाद येऊ शकतील. याचीही मला कल्पना आहे.
धन्यवाद
सुधाकर नातू
वर्तमानकाळातली मुलगी सहज काढेल तिकिटं. पैशाचा प्रश्नच नाही.चिंधीपैशाचा हिशोब ती करणार नाही.पहिल्या पाच मधली तिकिटं काढायची तिला सवय असणार!बापाची लेक ती ! पण एक ...ती दोन्ही जोड्या अगदी लांब बसतील अशी योजना करेल.
उत्तर द्याहटवा----- वसुंधरा घाणेकर
सहमत
हटवा