सोमवार, २ मार्च, २०२०

"रंगांची दुनिया-११": "शारदोत्सव-५":

"रंगांची दुनिया-११": "शारदोत्सव-५":

२७ फेब्रुवारी २०२० ह्या मराठी भाषा दिनी Whatsapp वर आमच्याकडे आलेले, एक परिक्षा पहाणारे कोडे:

"मित्र-मैत्रिणींनो नमस्कार,
आज एक खऱ्या अर्थाने मेंदूला छान खुराक देणारे कोडे तयार केलेले आहे. खाली दिलेल्या शब्दांची दोन उत्तरे द्यायची आहेत. दोन्ही उत्तरे ३ अक्षरी आहेत. पहिल्या उत्तराचे शेवटचे (तिसरे) अक्षर बदलून त्याजागी चपखल अक्षर घातले की दुसरा शब्द आपोआप मिळेल. आणि ही कोड्याची अटही आहे.
उदा: धष्टपुष्ट / बिनवासाचे फूल
उत्तर आहे : *तगडा /तगर* (दोघांमध्ये पहिली २ अक्षरे समान आहेत.)

०१ प्रीत /ओंकार
०२ सहाय्य /अनंग
०३ खटाटोप /प्रस्थान
०४ जुळे /एक शब्दालंकार
०५ इंद्रदेव /हाव
०६ बैठकीची खोली/ दिव्यांचा सण
०७ श्रीफळ /एक मुनी
०८ आंदोलन/ वसुधा
०९ चंदेरी /परीट
१० अरण्य/ न हलणारे
११ साधारण /वस्तू
१२ थारा /मठ
१३ सरसरीत /वाईट कृत्य
१४ अपप्रचार, विष /नड
१५ संकोच /एक ऋतू
१६ बनावट/अपऱ्या नाकाची
१७ कावीळ/ इच्छा
१८ वपन /शीर्ष
१९ कसब /ठोकायचे साधन
२० सर्व /जाण
२१ चिखल/ देेवकेळी
२२ सहाय्य /जीभ
२३ ललाट /काढून टाकणे
२४ आड /मुलामुलीची सासू
२५ भागाचा उपभाग /वदंता
२६ हा प्राण्यांचा असतो/ माथा
२७ सोटा /पुजारी
२८ भयंकर/ सौदा
२९ असमान / म्लान
३० दानशूर / खिन्न

*प्रत्येक योग्य ओळखलेल्या शब्दाला १ गुण. असे एकूण ६० शब्द ओळखायचे आहेत.*
*अधिक गुण मिळण्याची _एकच_ संधी : कोड्यातील एकूण विचारलेल्या ३० प्रश्नांमध्ये तशाच प्रकारच्या आणखी एका प्रश्नाची (उत्तरासह) भर घातल्यास त्यासाठी अधिकचे ५ गुण मिळतील.*
*_कोड्याचे एकूण गुण ६५._*

मिळालेल्या गुणांच्या आधारे खालीलप्रमाणे शेरा मिळेल

*०० ते ०५ - मराठीचा अभ्यास नितांत गरजेचा.*
*०६ ते १२ - अतिसामान्य.*
*१३ ते २१ - सामान्य.*
*२२ ते ४० - बरा*
*४१ ते ५४ - उत्तम*
*५५ ते ६५ - प्रज्ञावंत*

*तर मग लावा आपला उजवा मेंदू कामाला... आणि जास्तीत जास्त गुण मिळविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा. खूप खूप शुभेच्छा.....*

त्याचे आमचे उत्तर:

बुद्धीला चालना देणारे कोडे पाठवल्यबद्दल आभार.
२५ व २७ आले नाही.
०१ प्रीत /ओंकार प्रणय/ प्रणव
०२ सहाय्य /अनंग मदत/ मदन
०३ खटाटोप /प्रस्थान प्रयास/प्रयाण
०४ जुळे /एक शब्दालंकार यमल/यमक
०५ इंद्रदेव /हाव वासक/वासना
०६ बैठकीची खोली/ दिव्यांचा सण
दिवाण/दिवाळी
०७ श्रीफळ /एक मुनी नारळ/ नारद
०८ आंदोलन/ वसुधा धरणे/धरती
०९ चंदेरी /परीट रजत/रजक
१० अरण्य/ न हलणारे जंगल/जंगम
११ साधारण /वस्तू सामान्य/सामान
१२ थारा /मठ आश्रय/आश्रम
१३ सरसरीत /वाईट कृत्य पातळ/पातक
१४ अपप्रचार, विष /नड गरळ/गरज
१५ संकोच /एक ऋतू शरम/शरद
१६ बनावट/अपऱ्या नाकाची नकली/नकटी
१७ कावीळ/ इच्छा कामला/कामना
१८ वपन /शीर्ष कपात/कपाळ
१९ कसब /ठोकायचे साधन हातोटी/हातोडा
२० सर्व /जाण समस्त/समज
२१ चिखल/ देेवकेळी कर्दम/कर्दळ
२२ सहाय्य /जीभ रसद/रसना
२३ ललाट /काढून टाकणे कपाळ/कपात
२४ आड /मुलामुलीची सासू विहीर/विहीण
२५ भागाचा उपभाग /वदंता प्रभाग/प्रभाव??
२६ हा प्राण्यांचा असतो/ माथा कळप/कळस
२७ सोटा /पुजारी ?? /भटजी
२८ भयंकर/ सौदा कराल/करार
२९ असमान / म्लान विषम/विषण्ण
३० दानशूर / खिन्न उदार/उदास

बुद्धीला चालना दिली तर एकच कां असे अनेक शब्द मांडता येतात...
ओळखा:
३१ सोपे/कापसाचं बी सरल/सरकी
३२ प्रगती/अर्थव्यवहाराचे माध्यम चलती/चलन
३३ काक/हंडा कावळा/कावड
३४ बावळट/विहीर बावळा/बावडी
३५ पवित्र/एक कडधान्य पावन/पावटा
--------------------------
मराठी भाषेचे शब्दभांडार ह्या कोड्यामध्ये लक्ष केंद्रीत केल्याने विस्तारेल अशी आशा आहे.
ज्या कोणा अभ्यासू व्यक्तीने हे परिश्रमपूर्वक रचले, त्याचे कौतुक व अभिनंदन करावे तितके थोडेच आहे.

अकराव्या लेखानंतर "रंगांची दुनिया" हा साहित्य, नाटक, चित्रपट आणि मालिका अशा करमणूक प्रधान मनोरंजक माध्यमांत वरील लेखसंग्रह आपल्याला आवडला असेल अशी मला आशा आहे. अशी अभिनव संकल्पना प्रत्यक्षात आणताना मला देखील खुपच समाधान लाभले.

"नाटक, चित्रपट साहित्य व अंतर्मुख करणारे ह्रदयसंवाद ह्यांवर....
एकसे बढकर एक लेख वाचण्यासाठी.....

log on to my blog:

http//moonsungrandson.blogspot.com

Save and
Share this link on
your whatsapp grps..."

------------------------
"संपूर्ण वार्षिक राशीभविष्य",
"समाधान मिळविण्याचे सात सोपे उपाय"......
"राहू व केतुच्या राश्यंतराचे राशींवर परिणाम"....
"निराशेच्या अंध:कारातून चैतन्याच्या प्रकाशाकडे"...
"पुणे तिथे काय उणे"....
"मनांतले जनात, आयुष्याचा जमाखर्च"......
"परस्परसंबंध सुधारण्यासाठी वागायचे कसे?.....
असे एकाहून एक सरस...
तीसाहून अधिक......
विडीओज पहाण्यासाठी....
You tube वर
search करा माझा चँनेल....

moonsun grandson

हा चँनेल subscribe
ही करा......

-------------------------
धन्यवाद
सुधाकर नातू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा