"ह्रदयसंवाद-१३":
"जीभेवर साखर अन् डोके ठेवा शांत":
"कोरोना' सारख्या संकटामुळे आता घरीच बसण्याची वेळ पुष्कळांवर आली आहे. सर्वजण घरी असल्यामुळे आता सलोख्या ऐवजी वाद-विवाद होण्याची शक्यता अधिक आहे आणि घरातील शांतता त्यामुळे बिघडू शकते. काल मला माझा एक मित्र एक बातमी सांगत होता की, 'कुठल्यातरी देशात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्यावर, जेव्हा लॉक डाऊन दूर करण्यात आला, त्यानंतर घटस्फोटांचे प्रमाण खूप वाढले !' ह्या गोष्टीचा आपण आत्ताच गांभीर्याने विचार करायला हवा.
मुळातच मी तसा घरकोंबडा, आपले घर बरे, आपण बरे अशी माझी व्रुत्ती आहे. त्यामुळे निवृत्त झाल्यावर शक्यतोवर घरातच बसण्याची वेळ मला जड गेली नाही. माझी जे काही छंद असतील त्यात आपले आपण गुंतत, माझा मी वेळ मी आपल्याच मस्तीत काढू शकत होतो. सहाजिकच, सध्याच्या "कोरोना" संकटापायी, मला असे आता घरात सक्तीने राहण्याचे एवढे काहीच वाटत नाही, उलट सध्याचे संकट ही एक संधीच आहे, असे मी मानतो.........
आजची सकाळ मी हा लेख लिहीण्यात व सादर करण्यात वापरतो आहे.......
"जीभेवर साखर अन् डोके ठेवा शांत":
पुष्कळदा, गोष्टी आपल्या मनाविरुद्ध घडतात, त्याला कारण आपल्या वागण्याचे असू शकते किंवा इतरांकडून आपल्या अपेक्षा पूर्ण न होण्याचे असू शकते. आता इथे इतर म्हणजे, व्यक्ती असू शकतात अथवा एखादी घटना वा सार्वजनिक व अपेक्षित अशीच सेवा असू शकते. त्यामुळे आपला राग संताप अनावर होतो आणि त्याचा परिणाम अतिशय अनिष्ट होतो. आपण रागाच्या भरात इतके काही बोलून जातो की, त्यामुळे परस्पर संबंधातही वितुष्ट येते, आपली मनःशांती ढळून जाते. नंतर आपल्याला कळतं, की असं वागायला नको होतं.
असे उद्वेगजनक अनुभव जेव्हा जेव्हा निर्माण होतात, तेव्हां मन अस्वस्थ होऊन खळबळ निर्माण होते. ती खळबळ टाळण्यासाठी काय करायला हवे, याचे वस्तुनिष्ठ विश्लेषण करणे गरजेचे आहे. आपल्या अपेक्षांप्रमाणे गोष्टी नेहमी घडत असतातच असे नाही, हे प्रथम ध्यानात ठेवायला हवे. प्रतिकूल तेच घडू शकते ही जाणीव ठेवावी. आपण जे काही निर्णय घेतो, क्रुती करतो, त्यांचे आपल्याला योग्य तसे परिणाम मिळतातच असे नाही. आपण नेहमी आपल्या कम्फर्ट झोनमध्ये गोष्टी घडाव्यात ही अपेक्षा करतो, ते बरोबर नाही. कारण अनेक घटना विपरीत होऊ शकतात. दुसरे असे की, आपण योग्य ते नियोजन करत नाही वा कोणत्या वेळी काय बोलावे, अपेक्षित प्रतिसाद मिळण्यासाठी खरोखर वागावे हे आपण समजू शकत नाही.
आश्चर्य हे आहे की, हे सारं समजूनही आपण पुन्हा त्याच त्याच चुका करत राहतो आणि अशा तऱ्हेचे उद्वेगाचे, रागाचे प्रसंग अजून मधून येतात. त्यापायी आपल्याला नैराश्य किंवा अतिरेकी संताप निर्माण होऊ शकतो. हे आपल्या प्रक्रुतीलाही योग्य नसते, शांत राहणे हे खरे गरजेचे असते. त्याकरता आपल्या अपेक्षांनुरुप योग्य ते नियोजन वेळेत करावे. इतरांचे स्वभाव व अपेक्षा आणि वागणे आपल्या हातात नसते. स्वतः होऊन कुणी आपल्यात सहसा बदल करत नाही, या सत्याचा जर आपण स्वीकार केलात तर बऱ्याच गोष्टी तसेच समस्या दूर होतील. आहे ती परिस्थिती जशीच्या तशी स्वीकारणे हे ज्याला जमते, तोच आनंदी आणि शांत राहू शकतो.
थोडक्यात जे आपल्याकडे आहे, पण इतरांकडे नाही, त्याचा विचार न करता, आपण नेहमी अशी व्यथा फक्त करत असतो, की दुसऱ्याकडे जे आहे ते माझ्याकडे का नाही! हीच आपली महान चूक असते.
"Accept, Adjust and Adopt"
हा मंत्र प्रत्यक्षात आणणे,आज प्रकर्षाने आवश्यक असे शहाणपण होय.
ह्या नंतरच्या कदाचित अनिश्चित काळापर्यंत बहुतेकांना घरीच बसण्याची वेळ अपरिहार्य व रास्त होणार असल्याने, माझे हे विचार उपयोगी पडावेत, अशी मला आशा आहे.
---------------------------
"सुसंगती सदा घडो":
"आजोबांच्या बटव्या"तील कालची कहाणी 'चांगुलपणाची साखळी' ही सर्वांना खरोखर आवडली. आज त्या गोष्टीचा विचार करताना असे वाटते की ही "चांगुलपणाची साखळी" नुसती हरवलेलीच नाही, तर कदाचित नामशेष झाली की काय, अशी परिस्थिती व आसमंतातील माहोल सध्या आहे. नैतिकता, वैश्विक मूल्ये म्हणून काही उरलेली नाहीत आणि सर्वस्तरांवरील गुन्हेगारी, अधमपणा स्वार्थ, अशा नकारात्मक गोष्टींचा अक्षरशः या कलियुगात धुमाकूळ चालला आहे.
अशामुळे कदाचित जे दुखावले जातात, फसवले, विविध प्रकारच्या नुकसानीत जातात, त्यांच्या मनातील उद्विग्नतेतून, प्रखर नकारात्मक
विचारलहरी निर्माण होत असतील. त्यामुळे नैसर्गिक पर्यावरण व वातावरण बिघडून कदाचित कोरोनासारखे काही व्हायरस निर्माण होत असू शकत असतील कां? सर्वंकष जागतिक अपराधांची शिक्षा म्हणून, जणु सर्वांनाच आप आपल्या घरांमध्ये नजरकैदेत म्हणूनच बंदीवान व्हायची वेळ आली नाही ना? ह्याबद्दल सखोल शास्रीय संशोधन होणे जरुरीचे आहे.
आपल्या इथे "दृष्ट लागणे" हा जो प्रकार आहे, त्यामागे देखील हे असे नकारात्मक विचारलहरींचे अनिष्ट व वाईट परिणाम असतात, ही संकल्पना असू शकेल कां?
अशावेळी सहाजिकच आमच्या लहानपणीच्या प्रार्थनेतील या ओळी आठवतात:
"सुसंगती सदा घडो,
सुजनवाक्य कानी पडो,
कलंक मतीचा झडो,
विषय सर्वथा नावडो."
--------------------------
धन्यवाद
सुधाकर नातू
२२/३/२०२०
सकाळी १०-३०

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा