"आजोबांचा बटवा":
"चांगुलपणाची साखळी":
"कोरोना' सारख्या संकटामुळे आता घरीच बसण्याची वेळ पुष्कळांवर आली आहे. त्यामुळे वेळ कसा घालवायचा हा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यातून आता करायचे काय, हा यक्षप्रश्न सगळ्यांच्याच मनात निर्माण होणार आहे.........
मी तरी हे समजतो की, आता आलेले संकट ही एक संधीच आहे. आता मला माझ्या ब्लॉगवर दररोज नवनवे विचार व अनुभव मांडणारे लेख लिहीता जसे येतील, माझ्या चँनेलवरील विडीओज लोकांपुढे अधिकाधिक आणता येतील. ते लेख वाचण्यासाठी व विडीओज् पहाण्यासाठी कितीतरी जास्त संख्येने वाचक व प्रेक्षक उपलब्ध होतील....
तुम्हीही असेच आपल्यातील उपजत गुण व त्यापासून काही उपयुक्त योगदान देऊ शकता. छंद जोपासू शकता. कुटुंबातील मंडळींना अधिक वेळ देत परस्परांशी चांगले संबंध वाढवू शकता. ही वेळ कसोटीची आहे खरी, परंतु त्यातूनच आपला कस लागणार आहे. निराश होऊ नका आशावादी बना.
ह्या पार्श्वभूमीवर मला माझ्या "ट्रेझर बुक"मध्ये- आताच ह्या अनमोल खजिन्याला "आजोबांचा बटवा" असे समर्पक शीर्षक सुचले ! त्यात ही अनमोल नोंद आढळली. ती तुम्हाला निश्चितच नवी द्रुष्टी व प्रेरणा देईल, अशी आशा आहे:
"चांगुलपणाची साखळी":
अचानक आपण कधी मधी, अडचणीत सापडतो. प्रवासात तर अशी वेळ खूप वेळा येते किंवा दररोजच्या जीवन संघर्षाच्या रहाटगाडग्यात निराश होतो, काय करावे ते सुचत नाही. अशा वेळी, आपला मार्ग सुलभ व्हावा म्हणून, अवचितपणे कुणीतरी ना कुणी उभा रहातो, न मागता व काहीही परतफेडीची अपेक्षा न ठेवता मदत करतो व आपली अडचण व संकट व दररोजचा आटापिटा कमी होतो. यालाच चांगुलपणा म्हणतात. आपल्या जीवनात अशाच प्रकारची चांगुलपणाची साखळी असते. हे मांडणारा हा एक लेख माझ्या नुकताच वाचनात आला.
मग माझ्या मनात विचार आला की, असे चांगुलपणाचे अवतार मला वाटतं प्रत्येकाच्याच जीवनात कधी ना कधी येतच असतील. मी देखील माझ्या अनुभवांकडे वळून बघितलं आणि काही आठवणी जाग्या झाल्या, त्याही अशाच चांगुलपणाच्या:
# बालपणी शाळेत जाताना मला अधून मधून जवळ रहाणारे एक डॉक्टर, त्यांच्या काळ्या हिल्मन गाडीतून न चुकता, मला व त्यांच्या मुलाला शाळेत सोडत असत.
# पुढे एसएससीला असताना आमच्या इथल्या एका शिक्षकांनी मला विनामूल्य इंग्रजी शिकवले आणि कॉलेजमध्ये गेल्यावर दोन गुणवंत प्रोफेसरांनी मला गणित आणि कठीण विषय असलेला मशीन ड्रॉइंग शिकवला, तोही विनामूल्य, तेही स्वतः पुढाकार घेऊन ! माझे त्यामुळे भले झाले.
# मी नोकरी-व्यवसायात असताना मला एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आमच्या क्षेत्रातील असोसिएशनच्या मासिक मुखपत्राच्या सल्लागार कमिटीवर माझं नाव सुचवलं आणि तिथे गेल्यावर तिथल्या संपादकांनी मला चांगलं प्रोत्साहन दिलं. माझ्या कल्पना उचलून धरत मला तीन प्रदीर्घ लेखमाला मुखपत्रात लिहायला उद्युक्त केलं. त्यामुळे माझ्यातील लेखक हळूहळू विकसित होत गेला.
# माझी शिकवायची आवड, व्यवस्थापन शास्त्रातील माझे ज्ञान आणि माझा कार्पोरेट क्षेत्रातील अनुभव ध्यानात घेऊन औद्योगिक प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेमधील एका अधिकाऱ्याने देखील माझ्या गुणांची पारख करून मला विविध ठिकाणी प्रशिक्षणाची देण्याची संधी दिली. हे सुध्दा चांगुलपणाचे उदाहरण होईल.
# तेव्हां मी विविध मराठी नियतकालिकांमध्ये, नियमित अनेक विषयांवर लिहित असे. ते बघून एका वरिष्ठ पत्रकाराने मला प्रोत्साहन देऊन, व्यवस्थापन शास्त्रावर मराठीमध्ये सोप्या भाषेत लिहायला आणि माझे निवडक लेख एकत्रित करून एक पुस्तक बनवायला प्रेरणा दिली. एधढेच नव्हे, तर पाठपुरावा करून अक्षरशः एखादा शिक्षक विद्यार्थ्याकडून जसा धडा पूर्ण करून घेतो, तसं पुस्तक लिहून घेतलं. त्या माझ्या पुस्तकाचं प्रकाशनही करण्याची त्यांनी व्यवस्था केली. ते पुस्तक म्हणजे "प्रगतीची क्षितिजे" आणि त्या पुस्तकाला त्या वर्षाचा महाराष्ट्र सरकारचा सर्वोत्कृष्ट पुस्तक म्हणून शिक्षण विभागातील पुरस्कार मिळाला.
अशा तऱ्हेने अनेक जणांनी चांगुलपणाची मला सावली दिली. त्याबद्दल मी ह्या सगळ्यांचे आभार मानतो आणि त्यांचा मी आयुष्यभर ऋणी राहीन.
# फार कशाला, प्रत्येकाच्या घरी, ग्रुहिणी दररोज न चुकता जे काही त्यांच कर्तव्य आहे, ते न चुकता न बोलता सहजतेने व आपुलकीने प्रेमाने करत उपजत चांगुलपणाने, आपआपला संसार समर्थपणे सांभाळत असतात.
आपणही आता ही चांगुलपणाची सावली व साखळी अशीच पुढे वृद्धिंगत करत नेऊया, एकमेका सहाय्य करत राहूया आणि सांप्रतच्या संकटावर यशस्वीपणे मात करू या.
ही सारी माणसंही चांगुलपणाच्या साखळीतील एक एक दुवाच नव्हेत कां? अशी सेवाभावी माणसं, आपल्या जीवनात येणं हा मोठा भाग्याचा योग असतो. अशा तर्हेची चांगुलपणाची उदाहरणं, मला वाटतं प्रत्येकच माणसाच्या जीवनात येत असतात. फक्त आपण तसे बघत नाही व त्यांची आठवणही ठेवत नाही, एवढेच.
तुम्ही विचार करा आणि आपल्याला आपण आता जिथे आहोत, तिथे येण्यासाठी, किती तरी ओळखीच्या वा अनोळखी माणसांनी कुठली ना कुठली मदत न मागता विनामूल्य दिली असेलच असेल हा. हीच ती चांगुलपणाची साखळी. माणसाचं हेच वैशिष्ट्य आहे की, त्याच्या जीवनात काही ना काहीतरी अनपेक्षित अशा चांगल्या घटनाही घडत असतात आणि त्यामागे ह्या चांगुलपणाच्या साखळीचा फार मोठा हात असतो.
----------------------------
"सुविचार":
# उत्साही माणसाला जगात काहीच कमी पडत नाही. ध्येयाचा ध्यास लागला म्हणजे कामाचा त्रास जाणवत नाही. जीवनेच्छा इच्छाशक्ती प्रबळ असेल तर, संकटांचे अडचणींचे डोंगर पार होऊ शकतात.
# मणभर चर्चेपेक्षा कणभर कृती श्रेष्ठ. अहंकार हा प्रगतीला अडसर होय.
# नशीब म्हणजेच आपण केलेल्या कष्टाला मिळालेली पावतीच होय.
# संकल्प नुसते करू नयेत, तर ते पूर्ण करण्याचा ध्यास घ्यावा.
-------------------------
"मुक्तांगण":
# वाट पाहू नका, जे जेव्हा घडायचे असेल, तेथे तेव्हा घडू द्या. जे जेव्हा घडेल तेव्हा ते खुल्या दिलाने जसेच्या तसे स्वीकारा. ना खंत ना खेद अशी वृत्ती असू द्या.
,# वेळेच्या घड्याळाच्या काट्यावर पासून पूर्ण मुक्त व्हायचा प्रयत्न करा, पुष्कळदा ताणतणाव आणि अपेक्षांचे ओझे त्यामुळे दूर होईल
-------------------------
"विचार कसे?":
# मनात कमीत-कमी विचार यावेत. जे विचार मनात येतील ते सर्व बोलून दाखवू नयेत. तारतम्याने निवड करून मगच त्यावर बोलावे. आपण जे बोलतो, त्या बोलण्याचा इतरांवर काय परिणाम होईल, याचा विचार करूनच बोलावे. जर अपायकारक असेल, तर बोलू नये.
# शक्यतो सकारात्मक नवनिर्मितीच्या मार्गाने जाणारे विचारच करावेत त्याचप्रमाणे कृती व्हावी.
--------------------------
आजचा चांगुलपणाचा धडा इथेच पुरे! उद्या असाच नवा नवा.....
आपणही असे अनेक लेख
आवर्जून वाचण्यासाठी....
ही लिंक उघडा..
आपल्या wapp group मध्ये शेअरही करा:
http//moonsungrandson.blogspot.com
धन्यवाद
सुधाकर नातू
१९/३/२०२०

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा