"राशीनिहाय संक्षिप्त राशीभविष्य"
१ नोव्हेंबर'१९ ते ३१ डिसेंबर २०२०:
"नशिबाची गटवारी":
येथे प्रथम ग्रहबदलानुसार राशीनिहाय अनुकूल गुण कोष्टक देत आहे. त्यानुसार प्रत्येक राशीसाठी आगामी कालखंड कसकसे चढ वा उतार करणारे असतील ते दिले आहेत. आपणच आपले पुढील दिवस कशा प्रकारे असतील ह्याची स्वानुभव ताडून कल्पना करू शकाल.
आगामी १४ महिन्यांच्या कालखंडात वरील महत्वाच्या ग्रहांच्या विविध राशीप्रवेशानुसार ह्या नियमांचे आधारे ते किती दिवस शुभ आहेत, ते आजमावून माहवार शुभदिवस अर्थात अनुकूल गुण देऊन, त्याप्रमाणे राशीनिहाय अनुकूल गुण कोष्टक पुढे दिलेले आहे. तशीच एकूण संपूर्ण कालखंडातील गुणांच्या बेरजेवरून पुढील पाच सुलभ गटात त्यांची विभागणी केली आहे:
१.उत्तम पहिला गट: व्रुश्चिक, मीन व सिंह राशी.
२.उजवा दुसरा गट: कुंभ, मेष राशी.
३.मध्यम तिसरा गट: व्रुषभ व मकर मिथून राशी.
४.डावा चौथा गट: कन्या तूळ राशी
५.त्रासदायक पाचवा गट: कर्क व धनु राशी
"राशीनिहाय संक्षिप्त राशीभविष्य":
मागील व यंदाच्या एकूण अनुकूल गुणांचा विचार करता, राशीनिहाय नशिबाचा चढ उतार हा असा असेल:
१मेष रास: मागील वर्षीच्या ११व्या क्रमांकावरून प्रगती करत ५ वा क्रमांक मिळवून उजव्या गटात प्रवेश केला आहे.
२.व्रुषभ राशीने थोडीशी घसरत ५व्या स्थानावरून ६ व्या क्रमांक मिळवून समतोल साधेल.
३.मिथून राशीच्या नशिबी मागील ७ व्या स्थानावरुन थोडे कमी होत ८ व्या क्रमांक आहे.
४. कर्क राशीचे नशीब बिघडून मागच्या दुसर्या स्थानावरून चक्क तळाच्या गटात ११ व्या क्रमांकावर राहील.
५ सिंह मंडळी नशीबवान असून मागच्या ९ क्रमांकावरून ते ३ क्रमांक अशी भाग्यवान उडी घेतील.
६ कन्या रास दहाव्या स्थानावरून किंचीत पुढे सरकत आता ९ स्थानी जाईल.
७ तुळा राशीने मागच्या वर्षी विक्रमी गुण मिळवून पहिला क्रमांक पटकावला होता. पण आता फेरे उलटे होउन ते १० व्या क्रमांकावर ढकलले जातील.
८ व्रुश्चिक रास अक्षरश: कमाल करून मागच्या बाराव्या स्थानावरुन चक्क नशिब फळफळवत १ ल्या सर्वोत्तम स्थानी विराजमान होई.
९ धनु राशीच्या गुणांमध्ये खूप घसरण झाल्यामुळे आता ५व्या क्रमांकावरुन कटकटी वाढविणार्या तळाच्या १२ व्या स्थानी फेकली जाईल.
१० मकर राशीचे नशीब ठीक नसेल कारण मागच्या सुखदायी ४ थे स्थान सोडावे लागून ७ क्रमांक मिळवेल.
११ कुंभ राशीच्या नशीबात थोडी घसरण आहे, तिसर्या स्थानावरुन चौथ्या क्रमांक आहे.
१२ मीन रास खरोखर नशीबवान आहे मागच्या सहाव्या स्थानावरुन पहिल्या गटात दुसरा क्रमांक मिळवेल.
वाचकांना अधिक सोयीचे व उपयुक्त असेल, ह्याद्रुष्टिने, मी हे वर्ष व मागील वर्ष ह्यांची तुलना राशीनिहाय एकूण गुण व क्रमांकानुसार मांडणारे कोष्टक सोबत देत आहे. त्याप्रमाणे प्रयत्न व अपेआह सांगड घालून जीवन अधिक समजूतीने जगत समाधान मिळवा.
----------------------------
१ नोव्हेंबर'१९ ते ३१ डिसेंबर'२०:
कालखंडातील प्रमुख ग्रह बदल:
1 नोव्हेंबर 2019 रोजी सर्व ग्रह असे होते:
रवी-तुळा,मंगळ-कन्या,
बुध, गुरु व शुक्र-वृश्चिक
तर शनि केतु धनुमध्ये. राहू-मिथुन. हर्षल-मेष नेपच्युन-कुंभ प्लुटो-धनु.
त्यानंतर प्रत्येक ग्रहाचे राशि प्रवेश याप्रमाणे आहेत:
१. रवी:
१६ नोव्हेंबर-व्रुश्चिक, १६ डिसेंबर-धनु
१४ जानेवारी-मकर १३ फेब्रुवारी-कुंभ
१४ मार्च-मीन, 13 एप्रिल मेष १४ मे वृषभ,
14 जून, मिथुन, 16 जुलै-कर्क,
16 ऑगस्ट-सिंह, 16 सप्टेंबर-कन्या,
17 ऑक्टोबर-तुळा
16 नोव्हेंबर-वृश्चिक आणि 15-डिसेंबर-धनु.
२. मंगळ:
१० नोव्हेंबर तुळा, २५ डिसेंबर व्रुश्चिक.
७ फेब्रुवारी-धनु, २२ मार्च-मकर, ४ मे-कुंभ,
18 जून-मीन, 16 ऑगस्ट-मेष,
4 ऑक्टोबर-मीनमध्ये वक्री, 24 डिसेंबर-मेष.
३. बुध:
७ नोव्हेंबर-तुळा, ५ डिसेंबर-व्रुश्चिक,
२५ डिसेंबर-धनु १३ जानेवारी-मकर,
३० जानेवारी-कुंभ, ७ एप्रिल-मीन 24 एप्रिल-मेष, वृषभ 24-मे, मिथून-१ ऑगस्ट, कर्क-17 ऑगस्ट,
सिंह-2 सप्टेंबर, कन्या-22 सप्टेंबर,
तुळ -28 नोव्हेंबर, वृश्चिक-17 डिसेंबर,
४. गुरू:
४ नोव्हेंबर-धनु, नंतर तो धनु राशीतून
29 मार्च रोजी मकर राशीत, पुन्हा 29 जून रोजी वक्री होऊन धनु राशीत आणि 20 नोव्हेंबरला मकर राशीत जाईल.
५. शुक्र:
१६ नोव्हेंबर-व्रुश्चिक, १५ डिसेंबर-मकर
८ जानेवारी'२०-कुंभ, २ फेब्रुवारी-मीन
२८ फेब्रुवारी-मेष, 22 मार्च-वृषभ, जुलै-मिथुन
31 ऑगस्ट-कर्क, 27 सप्टेंबर-सिंह,
23 ऑक्टोबर-कन्या, 16 नोव्हेंबर,
16 डिसेंबर'२०-वृश्चिक
६. शनि:
२४ जानेवारी-मकर, नंतर तो संपूर्ण वर्ष मकर राशीत.
८. राहू: 19 सप्टेंबर-वृषभ.
९. केतु: १९ सप्टेंबर-वृश्चिक.
१०. हर्षल: संपूर्ण वर्षभर मेष राशीत.
११. नेपच्यून: संपूर्ण वर्षभर कुंभ राशीत
१२. प्लुटो: 15 जून वक्री-धनुमध्ये.
नंतर ७ मार्च'२१-मकर
--------------------------
विरंगुळा व जिज्ञासा ह्यासाठी.....
आपल्या राशीचे संपूर्ण वार्षिक राशीभविष्य
व राहू केतूच्या राश्यंतराचे परिणाम जाणण्यासाठी.......
You tube वर जा. सर्चमध्ये लिहा:
माझ्या चँनेलचे नांव:
moonsun grandsun
आणि विडीओज् पहा:
चँनेल subscribe करा......
शंभराहून अधिक वाचनीय लेखांसाठी माझ्या ब्लॉगची
ही लिंक उघडा......
wapp grp वर शेअरही करा......
http//moonsungrandson.blogspot.com
धन्यवाद
सुधाकर नातू
'

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा