"आजोबांचा बटवा-२":
"जन्मगाठ":
जीवनामध्ये जन्म गाठी स्वर्गात बांधल्या जातात असा एक समज आहे. त्यासंदर्भात मी सहज काही वाचायला मिळते कां, ते पाहत असताना माझ्या ट्रेझर बुक मध्ये ही नोंद आढळली:
"शक्यतोवर जोडीदारांचे जमणे दुर्मिळ असते, हे नेहमी ध्यानात ठेवावे. कारण प्रत्येकजण वेगळ्या स्वभावाचा असतो. शक्यतो आपल्या वाट्याला जो माणूस किंवा जोडीदारा आला आहे, त्याच्या स्वभावाशी मिळतेजुळते घेण्याचा ज्याने-त्याने आवर्जून प्रयत्न केला, तर उत्तम विवाहसौख्य मिळण्याची शक्यता असते. विवाह ही स्त्री पुरुषांची एक अपरिहार्य गरज आहे, शारीरिक गरजेपासून सुरू झालेले सहजीवन भावनिक मानसिक व सांस्कृतिक गरजांमुळेही हवेहवेसे वाटत असते. विवाहासाठी म्हणूनच वयाचे बंधन नाही, ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे. सर्वसाधारण कोणत्याही नियमांत विवाह जोडीदाराची निवड, या गोष्टीला बसवता येत नाही. मूल होणं वा न होणं, हे ज्याचं त्याचं प्राक्तन असतं. एखादं मूल दत्तक घ्यावं की नये हे ज्याचं त्याने ठरवावं. आपल्या जवळच्या नात्यातील एखाद्या मुलाला दत्तक किंवा मुलीला दत्तक घेणंही चांगला. प्रेम ही आंतरिक उमाळ्याची बाब ठेवा, ती दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर घाला घालावा इतकी असोशी गाठते, तेव्हा ती त्या जोडीदाराची कसोटी ठरते. माणसांनी शक्यतो रिस्पान्सिव्ह असावे, रिएक्टिव असू नये. मैत्री ही मनमोकळी निर्मळ व निरपेक्ष मैत्री असावी, त्यात अपेक्षांच्या अटींची शक्यतो असू नये अर्थात अशी निखळ मैत्री विरळाच आणि कठीणच."
--------------------------
"सुविचार":
# कोणाच्यातरी मागे धावण्यापेक्षा स्वतःच्या पायावर उभे राहावे.
# केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे.
# आपल्या सुखाचे निर्माते आपणच असतो.
# सतत नाविन्याचा ध्यास घ्यावा, सतत काही नवे शिकण्याची आत्मसात करण्याची किमया साधावी.
# फक्त ध्येय व उद्दिष्ट उराशी बाळगून चालत नाही, त्यासाठी अविरत कष्ट हवेत.
# आपली दुर्बलता हाच आपल्या आयुष्यातील मोठा दोष आहे.
# कोणतेही कार्य सिद्धीस जाण्यासाठी जिभेवर मध व डोक्यावर बर्फ हवा.
# दुसऱ्याचे वाईट चिंतून, आपले कधीही बरे होत नाही.
# "भावनांचे सामर्थ्य":
जाणून घ्या, भावना एक अदृश्य शक्ती आहे. माणसाच्या जीवनाचा सुखदुःखाचा मार्ग भावनांच्या खेळामुळे ठरतो.
--------------------------
"अवधान एकले दीजे":
महाराष्ट्र टाईम्स: सगुण-निर्गुण
लेखिका-डॉक्टर मंगला वैष्णव
"लक्ष असणं महत्त्वाचं आहे. ज्ञानेश्वरांनी त्यांच्या माध्यमातून आजही आपणास सर्वांना सहज अवधानाचे महात्म्य सांगितलं आहे.
आपल्या जीवनात जे साध्य करावयाचे असेल, त्यासाठी अवधान देणे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक व्यक्तीचं स्वभावाप्रमाणे स्थान अपेक्षेपेक्षा वेगळं असतं. पण कोणत्याही ध्येयासाठी, लक्ष देणे फार आवश्यक आहे. महाभारतातील अर्जुनाचा एक प्रसंग तुम्हाला माहिती आहे. त्या पक्षाचा डोळा, फोडावयाचा होता. द्रोणाचार्यांनी सर्व शिष्यांना काय दिसत आहे हे विचारले, प्रत्येकाने वेगळे उत्तर दिले, केवळ अर्जुन म्हणाला "मला फक्त पक्षाचा डोळा दिसत आहे" ही अवधानाची परिसीमा.
साधी गोष्ट आहे, शाळेत शिक्षक शिकवत असताना त्यांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला, त्यावेळी ज्या विद्यार्थ्यांचे लक्ष वर्गाबाहेर होते, तो गडबडला. शिक्षक म्हणाले ''कुठे लक्ष आहे तुझं?' याचा अर्थ आहे की, प्रत्येक ठिकाणी लक्ष असणे आवश्यक आहे. म्हणजे त्या गोष्टीचं आकलन होतं. पशुपक्षी एकावधानी असतात, पण मानव अष्टावधानी असतो. अष्टावधानी म्हणजे असा अर्थ अभिप्रेत असतो, की तो एका वेळी अनेक कामांकडे लक्ष देतो. अभ्यास करताना लक्ष नसेल, तर अभ्यास लक्षात राहत नाही. रस्त्यावर लक्ष विचलीत झालं तर अपघाताची भीती.
अध्यात्मामध्ये तर अवधान फार महत्वाचे. जप तप साधना करीत असताना, मन एकाग्र झालं नाही, तर समजून घ्यावं की लक्ष विचलित झाले आहे. विश्वामित्राची घोर तपश्चर्या मेनकेच्या न्रुत्यामुळे विचलित झाली. त्यांचं तपश्चर्येवरील अवधान डळमळलं आणि ते तिच्या मोहात पडले.
अवधानाचे महत्व सर्वकालिक आहे, याची जाणीव ठेवून प्रत्येक व्यक्तीने कार्य करावे. ते कार्य लहान आहे की मोठं आहे, हा प्रश्न गौण आहे. अवधान आणि कार्य समांतर असेल तर कार्य परिपूर्ण केलं जात असते. साध्या गोष्टीतून अवधानाचे महत्त्व आणि अर्थ कळला की ज्ञानेश्वरांच्या ओळीचा अर्थ लक्षात येईल, तो अर्थ जीवनाशी ताडूनही बघता येईल.
-------------------^-----
"सुविचार":
"यशाची मूलभूत सूत्रे"
श्री यशवंत भोगले (निर्लेप उद्योग)
# "कार्यमग्नता आणि जबाबदारीने काम करणे.
# दूरदृष्टी आणि चिकाटी दक्षता नीटनेटकेपणा आणि वेळेची किंमत बोलण्यापेक्षा प्रात्यक्षिक अधिक परिणामकारक लोकव्यासंग वाढवणे.
# स्पर्धा म्हणजे अविरत गुणवत्ता विकास
# व्यवसायातील फायद्यापेक्षा ग्राहकांचे समाधान व खात्री अधिक श्रेष्ठ.
# सचोटी पारदर्शक व्यवहार हवा.
# प्रश्न असा की, यापैकी किती आपण आत्मसात केले आहे व प्रत्यक्षात आणले आहेत हे पाहायला हवे.
----------------------------
असेच एकसे बढकर एक शंभराहून अधिक लेख..... वाचण्यासाठी.......
ही लिंक उघडा.......
आपल्या wapp group मध्ये शेअरही करा:
http//moonsungrandson.blogspot.com
धन्यवाद
सुधाकर नातू
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा