शनिवार, १४ मार्च, २०२०

"नियतीचा संकेत": "कोरोना?": 'डरो ना': "यह पढो ना!":


"नियतीचा संकेत":
"कोरोना?": 'डरो ना': "यह पढो ना!":

सध्या "कोरोना" सारख्या महाघातक संसर्गरोगाने सगळीकडे हाहा:कार माजला आहे. हे असे संकट येण्यामागचे कारण, ज्योतिष अभ्यासातून शोधण्याचा प्रयत्न मी येथे केला आहे.

२७ जानेवारी २०२० रोजी मी सोशल मिडीयावर हा संदेश लिहीला होता:

"नियतीचा संकेत":
गेल्या वर्षी, 23 मार्च 2019 ला राहू-केतूचे राश्यंतर झाल्यापासून आपण अनेक अनपेक्षित आणि खळबळजनक अशा घटनांचे पडसाद पाहिले आहेत. कधी कदाचित घडणारच नाहीत अशा अनेक चित्र विचित्र घटना घडून गेल्याचे आपण साक्षीदार ठरलो आहोत.....

आता 24 जानेवारी 2020 ला मौनी
अमावस्येच्या दिवशी, शनी स्वगृही मकर राशीत गेल्यावर, तो मिथुनेतील राहूला षडाष्टकात तर शनीच्या व्ययात धनु राशिमधला केतू अशी अनिष्ट परिस्थिती ह्यापुढे राहू-केतूचे पुनश्च राश्यंतर होईपर्यंत, म्हणजे 19 सप्टेंबर 2020 पर्यंत राहणार आहे......

सहाजिकच अजून काही खळबळजनक व अनपेक्षित निश्‍चिततेला आणि संकटांच्या वादळ वाऱ्यांना, आपल्याला कदाचित सामोरे जाऊ लागू शकते.........."

बहुधा, साधारण ह्या संदेशानंतरच, चीनमध्ये कोरोनाचा जो काही वेगाने प्रचार प्रसार होत गेला, त्याच्या बातम्या एकामागोमाग येत राहिल्या आणि आता तर तो आपल्या देशात आणि आपल्या राज्यात येऊन थडकला आहे. त्यामुळे सहाजिकच आपण त्याचा सर्वशक्तीनिशी मुकाबला करण्यासाठी कटिबद्ध होऊन प्रयत्नांची पराकाष्टा करणार आहोत. या पार्श्वभूमीवर हे भस्मासूरासमान संकट का बरे यावे, ह्याची मीमांसा ज्योतिषातील ग्रहांच्या योगांवरून करावी असे मनात आले आणि तोच प्रयत्न इथे आहे.

नजिकच्या काळात जे महत्त्वाचे ग्रह बदल झाले, त्यात ४ नोव्हेंबर'१९ ला गुरु धनु राशीत गेला हा होय. त्यामुळे गुरु आणि केतू हे धनु राशीमध्ये येणे, याच बरोबर मंगळाने तिथे ७ फेब्रुवारी२०२०ला धनु राशीत प्रवेश करणे, हे असू शकतात. मंगळ, गुरु आणि राहू यांच्या युतीला चांडाळ योग असे म्हणतात, हे तर आपल्याला माहित आहे. केतु, जो जणु राहूचा भाऊ आल्यामुळे, हा जणु तसाच चांडाळ योग आपण म्हणू शकतो. त्यानंतर आता या तीनही ग्रहांच्या धनु राशीमध्ये ह्यापैकी कोणकोणत्या ग्रहांच्या युत्या केव्हा झाल्या ते पाहू:
ते तपासले असतात थोडीशी या संकटाच्या वाटचालीची कल्पना येऊ शकते.

७ फेब्रुवारीला मंगळाचा धनु राशीत प्रवेश,
8 जानेवारीला गुरू केतू युती.
25 फेब्रुवारीला धनु राशी मध्ये असलेल्या मंगळाची केतू बरोबर युती.
त्यानंतर 20 मार्चला मंगळ आणि गुरू ची युती.

हे ग्रह बदल कोरोनाची झपाट्याने वाढ आणि नंतरची संभाव्य परिस्थिती यावर प्रकाश टाकू शकतात.
आणि ह्यानंतर अखेरीस 22 मार्चला मंगळ मकरेत जाणे महत्वाचे ठरू शकते.

22 मार्चनंतर मंगळ धनु मधून, पुढे मकरेत गेल्यामुळे कदाचित त्यानंतर कोरोनाची जी काही वाढ आहे, ती नियंत्रणात येऊ शकेल असं निदान आपण करू शकतो. त्यानंतर गुरु देखील धनु राशीतून काही दिवस कां होईना, २९ मार्च ते २९ जून ह्या कालखंडात मकरेत जाईल. तेव्हा कदाचित आणखीन त्यामधून सौम्यता निर्माण होऊ शकेल असे वाटते. तो अखेर २० नोव्हेंबर २०२० रोजी धनु राशीचा रामराम घेऊन मकरेत जाणार आहे. कर्मधर्मसंयोगाने राहू आणि केतू यांचे 19 सप्टेंबर 20 रोजी राश्यंतर होऊन ते
वृषभेत आणि वृश्चिक अनुक्रम प्रवेश करत असल्यामुळे यानंतर चांडाळ योग सदृश्य परिस्थिती संपेल. सांप्रतच्या जणु सगळ्यांना जखडून ठेवत, मानसिक शारीरिक त्रासाची व आर्थिक र्हासाच्या संकटाची दाहकता नियंत्रणात येऊ शकेल, अशी आपण आशा करू या.

अर्थात हे केवळ आडाखे आहेत. त्याचप्रमाणे होईल की नाही हे काळच ठरवेल. शेवटी आपण आपल्या शक्तीनुसार कोरोनाचा योग्य तो मुकाबला विविध उपायांनी करतच आहोत आणि म्हणूनच आम्ही म्हणतो कोरोना?: 'डरोना'!
त्यात आपल्याला यश यावेच यावे, ही सदिच्छा.

सुधाकर नातू
१५/३/२०२०

ता.क.:

हा लेख लिहून झाल्यावर, माझ्या लक्षात आलं की शनी मंगळ आणि गुरू हे तीनही आता मकर राशीत २९ मार्चनंतर असतील. मिथुन राशीतील राहू याचा षडाष्टक योग होऊ शकतो. त्यामुळे आगामी कालखंडात काय ग्रह बदल होतात त्याचा मी पुन्हा आढावा घेतला:

# मंगळ २२ मार्च मकरेत, तर ४ मे कुंभेत,
# शनी मकरेतच.
# गुरु २९ मार्चनंतर मकरेत, पुढे १४ मे रोजी वक्री होऊन २९ जूनला पुन्हा धनु राशीमध्ये.

या ग्रहबदलांमुळे, आता कोणाची युती आणि कोणाचा षडाष्टक योग होतो ते पाहिले:

# ३१ मार्चला मंगळ व शनी यांची युती आहे, हा अतिशय त्रासदायक रोग आहे. कारण दोन्ही ग्रह एकमेकांचे शत्रू आहेत. त्यामुळे सांप्रत संकट आहे, ते इतक्या सहजासहजी जाणार नाही असं वाटू शकतं. आपल्याला सर्वांना कठोर नियम व संयम राखत सामुहिक तारतम्य, सहकार्य व शहाणपण वाढवत ठेवावे लागेल.

# त्यानंतर ३ एप्रिलला मंगळ आणि राहू यांचा अंशात्मक षडाष्टक योग होत आहे. असा योग पापग्रहांमध्ये होत असल्यामुळे, तोही अनिष्ट फळे देणारा आहे.

# गुरू मात्र सहाय्यकारी न ठरता, एकला चालोरे, असा नीचीचा मकरेत प्रवास करत वक्री होत पुन्हा २९ जूनला धनु राशीत जाईल....

पुराणामध्ये भस्मासुर, ज्याला ज्याला स्पर्श करायचा त्याचे भस्म होऊन जायचे. आता कोरोनाच्या रूपाने आधुनिक जगातला भस्मासुर संपर्कात येईल तर.......
'को'न 'को'नको 'रो'ना आएगा, ये समझेगाभी नही!
ह्या भस्मासूराला नष्ट करण्यासाठी प्रिव्हेंटिव्ह लशीच्या रूपातील.......
'मोहिनी' आता कधी अवतार घेणार?

सामाजिक भान आणि उत्तरदायित्व यो
ग्य तर्‍हेने संभाळत वैयक्तिक आरोग्याचा यथातथ्य पाठपुरावा करत यंत्रणेला आपले काम आपल्या पद्धतीने करू देणे शक्य करत आपण शिस्तीने आणि मनोबला ने या संकटाचा सामना करू शकू असा आत्मविश्वास आपण ठेवूया ही आपली परीक्षा आहे आणि त्या परीक्षेला आपल्याला पास होण्यावाचून गत्यंतर नाही हेही लक्षात ठेवायला हवे .....

सावध रहा, अनावश्यक प्रवास व गर्दी कटाक्षाने टाळा, स्वच्छता राखा, स्वच्छ रहा आणि स्वस्थ बना......

तेव्हा शुभस्य शीघ्रम आणि शुभेच्छा.

धन्यवाद.
सुधाकर नातू
१९/३/२०२०

1 टिप्पणी: