वाचा, फुला आणि फुलवा-६" आणि माझे 'ट्रेझर बुक":
वाचा, फुला आणि फुलवा-६"
आणि माझे 'ट्रेझर बुक":
"प्रास्ताविक":
कोरोना'सारख्या संकटामुळे आता घरीच बसण्याची वेळ पुष्कळांवर आली आहे. त्यामुळे वेळ कसा घालवायचा हा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यातून आता काही काळासाठी, विविध चित्रीकरण थांबवण्याची सुरुवात होणार. जर टीव्हीही मनाजोगता बघायला मिळणार नसेल, तर करायचे काय, हा यक्षप्रश्न सगळ्यांच्याच मनात निर्माण होणार आहे.........
हे विचार चालले असताना, मला मी पाच वर्षांपूर्वी एक संकल्पना अमलात आणली होती तिची मला आठवण झाली. तेव्हा मी मालिका बघणे कंटाळवाणे वाटल्यामुळे तो वेळ, जे जे काही चांगलं वाचलं जाई, त्याची कात्रणे बनवण्याची सुरुवात करून, ती कात्रणे एका ड्रॉईंग बुक मध्ये चिकटवण्याचे काम मी करत असे.... ....
थोड्याच दिवसात ५० पानी बहुमोल असे वाचनीय विचारधन असणारी पुस्तिका किंवा ट्रेझर बुक तयार झाले, वेळेचा सदुपयोग केल्याचा आनंद, विलक्षण आत्मसमाधान मला मिळून गेले......
आपणही आता विरंगुळा म्हणून असंच काही जरूर करण्यास सुरूवात करा....
त्याच ट्रेझर बुकमधील संस्मरणीय असे साहित्य
वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगवर, "वाचा, फुला आणि फुलवा"
हे सदर लिहीताना मला उपयुक्त ठरत आहे......
"मनाला भावणारे सगेसोयरे":
श्रद्धा बेलसरे-खारकर
महाराष्ट्र टाईम्स २६ ऑक्टोबर'१४:
"ज्यांच्यांशी भावबंध जुळले त्या त्या व्यक्तींची स्वभाववैशिष्ट्ये. त्यांचे गुण निरखता आले, अशांच्या सहवासातल्या रम्य सुखद आठवणींना उजाळा देणारे छोटेखानी पुस्तक म्हणजे "सोयरे". जो आपली सोय जाणतो तो 'सोयरा' ज्यांचे आपले ऋणानुबंध अससात ते आपल्या वागणुकीतून आपल्यावर काहीतरी होऊन सोडून जातात ते आपले सोयरे, खऱ्या अर्थाने! मनोगतात व्यक्त झालेल्या लेखिकेच्या या मताशी वाचक सहमत होतील. प्रस्तुत पुस्तक वाचण्यास प्रेरित होईल.....प्रत्येक व्यक्तीची जडणघडण सभोवतालच्या माणसांच्या सहवासातून होणाऱ्या संस्कारांमुळे होत असते. आपलं भावजीवन समृद्ध आणि श्रीमंत होण्यासाठी आपल्याला सहाजिकच त्यांचा हातभार लागलेला असतो, अशांना आपण विसरू शकत नाही""
---------------------------
"काही मजेशीर व्याख्या"
चौफेर दैनिक २७ ऑक्टोबर'१४:
अनुभव: सभ्य शब्दात मांडलेल्या चुका.
मोह: जो आवरला असता, माणूस सुखी राहतो. पण आवरला नाही तर अजून सुखी होतो!
शेजारी: तुमच्या स्वतःपेक्षा ज्याला तुमच्या आयुष्याची खडानखडा माहिती असते, तो.
सुखवस्तू: वस्तुस्थितीत सुख मानणारा.
वक्तृत्व: मिनिटा दोन मिनिटात सांगून संपणारी कल्पना दोन तास घोळवणे.
लेखक: चार पानात लिहून संपणारं या गोष्टीसाठी ४०० पानं खर्ची घालणारा.
फॅशन: शिंप्याच्या हातून झालेल्या चुका.
पासबुक: बँकबुक, जगातील सर्वोत्कृष्ट पुस्तकाचे नाव. (जर भरपूर बॅलन्स असेल तर)
गॅलरी: वरच्या मजल्यावरून लोकांच्या डोक्यावर कचरा फेकण्याची जागा.
लेखणी: एकाच वेळी असंख्य लोकांचा गळा कापण्याचे साधन.
छत्री: एकाचा निवारा, दोघांचा शॉवर बाथ.
कॉलेज: शाळा आणि लग्न यामधील, मुलींचा काळ घालवण्याचे एक साधन.
परीक्षा: ज्ञान तपासून घेण्याचे एक हातयंत्र.
परीक्षा: पालक आणि शिक्षक यांच्या साडेसातीचा काळ.
दाढी: कुरुपपणा लपवण्याचे रुबाबदार साधन.
थाप: आजकाल 100% लोक ही फुकटात एकमेकांना देतात.
काटकसर: कंजूषपणाचे एक गोंडस नाव-प्यार वाली लव स्टोरी!
---------------------------------------------------
"Food for Thought:
Richard Tempelor चे बहुमोल विचार":
# आपण कुठे चाललो आहोत?
आपल्याला काय करायचे आहे?, चाकाला गती द्या. शांत रहा. लक्ष विचलित करू नका. गोंधळू नका. स्वतःला ओळखा. काय करू शकता, काय नाही, ते ठरवा.
# नेहमी सकारात्मक विचार करा, वेळ वाया घालू नका. दररोज कोणत्या वेळी मन लावून काम होते, ते शोधा.
# भीती वाटणारे काम त्वरित करा. अतिश्रम नकोत.
# आज वेळेची वेळेची गुंतवणूक ही उद्याची बचत.
# नीटनेटके रहा. विश्वसनीयता टिकवा. इतर बदलतील, हा भ्रम सोडा.
# थोडक्यात समाधान माना. चांगल्या सवयी अंगीकारा. कामाची शिस्त पाळा. अष्टावधानी व्हा. विसरले काय ते शोधा.
# सर्व गोष्टी स्वतः करू नका, कामे वाटा. जलद वाचन करा. योग्य ती पूर्वतयारी करा. योग्य निर्णय ठामपणे घ्या.
# सुसंवाद कौशल्य वाढवा. तुम्हाला जे सांगायचे, ते सांगा. शांत राहा, जरूर पडल्यास दहा आकडे मोजा.
# अग्रक्रम ठरवा. कोणती कामे तातडीची आणि कमी तातडीची महत्त्वाची कोणती, आणि कमी महत्त्वाची कोणती हे ठरवा. तहान लागल्यावर विहीर करू नका.
असे हे अतिशय उपयुक्त विचार मला वाचायला मिळाले. त्याची मराठींत मी नोंद ही अशी घेतली.
----------------------------------------------------------
"सुविचार":
अमृत मासिक:
-ओला बोळा, आठवणी पुसून टाका.
-आत्मसंतुष्ट रहा, स्वतःला योग्य वाटते ते करा.
-दुसऱ्याच्या दृष्टीकोन समजून घ्या, ज्याला जसे योग्य वाटते तसे त्याला समजून घेऊन वागा.
उगाच सल्ला देत बसू नका.
-विचार जितका कमी कराल, तेवढे मात्र निर्विचार निर्विकार मौनीव्रत उत्तम.
--------------------------------------------------
'मनोगत':
-ऐहिक संपत्तीपेक्षा उत्तम शरीरसंपदा
लाखमोलाची.
-निर्व्यसनीपणा हा मनोनिग्रहाचा दर्शक असतो.
-सत्ससंगतीमुळे आपणही चांगल्या विचारांच्या वातावरणात राहतो.
-उत्साह व आनंद म्हणजे जीवनातले खरे मित्र.
-परिस्थिती व वेळ पाहून वागणे ही यशाची गुरुकिल्ली आहे.
-बदलत्या परिस्थितीचा स्वीकार करून तिच्या अनुरूप बदलावे.
-स्वतःच्या मर्यादा ओळखण्याची हुशारी हवी.
-प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते, ती त्याच वेळी
करावी.
-----------------------------------------
असेच आवर्जून वाचावेत असे शंभराहून अधिक
लेख......
ही लिंक उघडा..
आपल्या wapp group मध्ये शेअरही करा:
http//moonsungrandson.blogspot.com
धन्यवाद
सुधाकर नातू
१७/३/२०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा