बुधवार, ९ जुलै, २०२५
"गुरुपौर्णिमेनिमित्त अर्थपूर्ण शुभचिंतन !":👍
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
👍"गुरुपौर्णिमेनिमित्त अर्थपूर्ण शुभचिंतन !":👍
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
💐" अर्थपूर्ण हा शब्दच मुळात खरोखर किती अर्थपूर्ण आहे हे वेगळं सांगायला नको. अर्थ म्हणजे जे काही व्यक्त होत आहे मग ते कुठल्याही माध्यमात असू दे, त्याचे अचूक सार आणि अर्थपूर्ण म्हणजे असे सार की जे मनाला भिडणारे, भावणारेे नवीन प्रेरणा देणारे आणि मार्गदर्शक गुरुप्रमाणे आत्मविकासाचा रस्ता दाखवणारे ते म्हणजे अर्थपूर्ण !
आज हे सारे विचार सुचायला महाराष्ट्र टाइम्स मधील गुरुपौर्णिमेनिमित्त काही छोटे छोटे मनोगतांचे वृत्तांत नजरेत आले त्यामुळे ! त्याशिवाय अजून एक प्रेरणा या 'अर्थपूर्ण'मुळे मला आज लाभली. ती म्हणजे पूर्वी मी मला वाटतं 10/12 वर्षांपूर्वी दूरदर्शन मालिकांच्या पाणी टाकत लांबत जाण्यामुळे रात्री आठ ते नऊ या 'गोल्डन अवर'मध्ये मालिका न बघता असेच जे जे काही मनाला भिडणारे वृत्तांत वाचत असे, ते कटिंग करून एका ड्रॉइंग बुक मध्ये मी चिकटवत असे. त्याला 'ट्रेझर बुक'असे नावही दिले होते .आज या अर्थपूर्ण अशा वृत्तांमुळे मला तसेच पुनश्च करावे असे वाटू लागले आहे आणि बघू या, आता गोल्डन ट्रेझर बुक तयार होते कां ते !":💐
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा