गुरुवार, २४ जुलै, २०२५
" सोशल मिडिया वरील मुचाफिरी
मी सोशल मीडियावर उपयुक्त अशा माहितीच्या शोधात असतो सर्फिंग करताना एक फॉरवर्डेड संदेश माझ्या एका स्नेहा कडून आला तो म्हणजे दादर माटुंगा शिव वगैरे बद्दल लिहिलेला एक वाचनीय लेख होता त्याचे लेखक श्री नितीन साळुंखे. जे आपणा सी ठावे ते इतरांना द्यावे या न्यायाने मी त्यांच्या सौजन्याने तो लेख व त्या मित्राची टिप्पणी पुढे सादर करत आहे आपल्यालाही ही माहिती रोचक उद्भव मनोरंजक वाटेल अशी आशा आहे..
*आमचे अद्वितीय दादर आणि माहीम. मी दादर आणि माहीमकर !* 👌🏽
*दादर चा जन्म आणि बारसं..!!*
मुंबईच्या इतिहासाचा अभ्यास करताना, मला नेहमी एक गोष्ट खटकायची. ती ही की, मुंबईतलं आजचं सर्वात महत्त्वाचं ठिकाण असलेल्या 'दादर'चा उल्लेख पूर्वी कुठेच आढळत नाही. मुंबईच्या ब्रिटिशपूर्व इतिहासात फोर्ट विभागाव्यतिरिक्त वाळकेश्वर, वरळी, भायखळा, माझगांव, परळ, शीव (सायन) इत्यादींचा उल्लेख आहे, मात्र यात 'दादर' कुठेच नव्हतं. मग प्रश्न पडला तो, 'दादर' होतं की नाही ? असल्यास अगदी नगण्य स्वरुपातील वस्ती होतं, का..?
या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात निघाल्यावर लक्षात येऊ लागलं, की इतिहासातला दादरचा पहिला उल्लेख ब्रिटिश काळातल्या सन १८९६ मध्ये येतो. सन १८९० मध्ये मुंबईत प्लेगची मोठी साथ आली होती आणि दाटीवाटीने वसलेल्या त्या काळच्या मुंबईतली माणसं मोठ्या संख्येने मृत्युमुखी पडू लागली होती. तेव्हाची मुंबई भायखळा-माझगांवपर्यंतच होती. पुन्हा असं घडू नये म्हणून ब्रिटिशांनी मुंबईच्या वस्तीचा विस्तार करण्याचं ठरवलं. एव्हाना मुंबईतल्या सर्वच बेटांना एकमेकांशी जोडून झालं होतं आणि या सात बेटांमधे प्रचंड जमीन उपलब्ध झाली होती. तरीही मुंबईतली वस्ती भायखळ्यापर्यंतच मर्यादित असल्याने, आजच्या दादर परिसरात 'भरणीमुळे उपलब्ध झालेली जमीन' ही शेती-वाड्यांसाठी वापरली जात होती. प्लेगच्या साथीनंतर ब्रिटिश सरकारने मुंबईतली गर्दीची वस्ती दादर-माटुंग्यापर्यंत वाढवायची ठरवून त्याप्रमाणे नियोजन करण्यासाठी सन १८९८ मध्ये *'Bombay Inprovement Trust (BIT)'* ची स्थापना केली. BIT ने व्यवस्थित अभ्यास करून आपली पहिली योजना बनवली आणि तिला नांव दिलं, ते 'Dadar-Matunga- Wadala-Sion Scheme..!' या ठिकाणी, म्हणजे सन १९०० च्या दरम्यान 'दादर' ठळकपणे मुंबईच्या इतिहासात येतं. सन १९१४ च्या आसपास या ट्र्स्टमार्फत हिन्दू काॅलनी, पारशी काॅलनीसारख्या देखण्या वस्त्या आणि फाईव्ह गार्डनसारखा देखणा परिसर जन्माला घातला गेला. आजचं दादर जन्मलं, ते इथे पूर्वेला 'मुंबई ४०००१४' असा पिनकोड घेऊन.!
'दादर पूर्व' संपूर्णपणे निसर्गाकडून हिसकावून घेतलेल्या (रिक्लेम) जमिनीवर वसवलं गेलेलं आहे, याची आठवण दरवर्षी पावसाळ्यात या इथं थोड्याश्या पावसानेही तयार होत असलेला समुद्र आपल्याला करुन देत असतो.! इथे पाणी का तुंबतं याचं कारण इथं सापडतं. बाकी नालेसफाई वगैरे नेत्यांच्या फाॅर्च्यूनर, मर्सिडीज गाड्यांचा वार्षिक हप्ता आणि पंचवार्षिक निवडणूक फंडासाठीची तयारी असते.
असो.. पूर्वेला नव्याने तयार केलेला भूभाग पुढे पश्चिमेकडच्या माहिम बेटाला जोडला जाऊन पश्चिमेला माहिम-प्रभादेवी ते पूर्वेला नायगाव-माटुंग्याच्या चौकोनातला भाग 'दादर' म्हणून अस्तित्वात आला असला तरी, दादर पश्चिम, पूर्वेच्या दादरनंतर किमान ३०-३५ वर्षांनंतर जन्माला घालण्यात आलं आहे. 'जन्माला घालण्यात आलं' हा शब्दप्रयोग मी मुद्दामहून केलेला आहे. कारण पूर्वेचं दादर जसं समुद्राच्या बळकावलेल्या जागेवर वसलंय, तसं पश्चिमेचं दादर हे पूर्वीपासूनच अस्तित्वात असलेल्या माहिमकडून घेतल्या गेलेल्या भूमीवर वसलंय. होय, आजचं शिवसेना भवनपासून ते सिद्धिविनायकाच्या देवळापर्यंतचं पश्चिमेचं हे दादर, एकेकाळच्या माहिममधे आहे आणि हा भाग त्या काळात 'लोअर माहीम' म्हणून ओळखला जात असे. आजच्या प्रभादेवी मंदिरापर्यंत तेंव्हा माहिमचाच भाग होता. श्री प्रभादेवीचं मंदिर माहिमला होतं असा उल्लेख 'महिकावतीच्या बखरी'त सापडतो, तो यामुळेच.
जुना नकाशा पाहिला, तर माहिम बेट वरळी बेटाच्या पूर्व दिशेला दिसतं. तसंच ते वरळी बेटाच्या मध्यापर्यंत साधारणत: समांतर गेलेलं दिसतं. श्री प्रभादेवीचं मंदीर असलेला भाग आज आपण प्रभादेवी म्हणूनच ओळखत असलो तरी, तो पूर्वीच्या माहिमचाच भाग आहे. माहिम आणि वरळी बेटामधली चिंचोळी खाडी एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला कधीतरी बुजवून जमीन तयार करण्यात आली आणि तयार झालेल्या जमिनीवर कॅडेल रोड म्हणजे आजचा स्वा. सावरकर मार्ग, त्याच्या शेजारचं सुप्रसिद्ध 'शिवाजी पार्क' आणि त्या लगतची वस्ती अस्तित्वात आली. हे सर्व होता होता विसाव्या शतकातलं चौथं दशक संपत आलं होतं. सुरुवातीला हा भाग नारळांच्या वाड्यांचा, शांत, सुंदर निवासाचा असा होता. पढे हळूहळू वस्ती वाढत गेली आणि प्रशासकीय सोयीसाठी हा भाग माहीममधून तोडून तो 'दादर पश्चिम, मुंबई २८' म्हणून अस्तित्वात आला. आजही माहिम-दादरची हद्द सेना भवनसमोरच्या 'राम गणेश गडकरी' चौकात एकमेंकाना भिडते.
इथपर्यंत पूर्व आणि पश्चिम 'दादर'चा जन्म कसा झाला हे समजलं. आता जन्माला घातलेल्या मुंबईच्या अपत्याला 'दादर' हे नांव कसं मिळालं असावं, याचा विचार करू..!
'दादर' हे नांव जिना, पायरी किंवा शिडी यावरून मिळालं, असा उल्लेख अनेक ठिकाणी सापडला. पण हे तर्कदृष्ट्या पटणं अवघड जातं. एक तर या परिसरात कसले दादर होते आणि ते एवढे प्रसिद्ध का होते, याचं उत्तर कुठे सापडत नाही. दुसरं म्हणजे म्हणजे, समजा इथले दादर सुप्रसिद्ध असावेत म्हणून मुंबईतल्या ह्या भागाला दादर नांव मिळालं, तर मग दादर या नांवाची आणखीही काही ठिकाणं आहेत, त्यांचं नांवही जीना या अर्थाच्या दादरवरून आलं असं मानायचं का? उदा. दादर या नांवाच एक ठिकाण रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात आहे. गुजराते जवळचं दादराही (नगर हवेली) प्रसिद्ध आहे. आणखी एक दादर मुंबई-अहमदाबाद हायवेवर पालघरच्या जवळपास कुठेतरी वाचलेलं मला आठवतं. मुंबईचं दादर नांव जिन्यावरून आलं असं मानलं, तर मग या इतर ठिकाणच्या दादरांचं नांव कसं पडलं, हा प्रश्न अनुत्तरीत राहातो. सबब, मुंबईचं दादर हे नांव शिडी, जीना, पायरी, स्टेप्स किंवा स्टेयरकेस या शब्दांना ओळखल्या जाणाऱ्या पायऱ्यांमुळे पडलं हे मला तर्कदृष्ट्या पटत नाही.
मग हे नांव या सुप्रसिद्ध विभागाला कसं मिळालं असावं याचा विचार करताना मला दोन धागेदोरे सापडले. पैकी एकाला इतिहासात काहिसा आधार आहे, तर दुसरा पूर्णपणे तर्कावर आधारीत आहे.
तर्कावर आधारीत असलेलं माझं दुसरं गृहीतक प्रथम मांडतो. आजचं दादर माहिम, वरळी आणि पूर्वेकडच्या परळ बेटात बसलेलं आहे, हे एव्हाना आपल्या लक्षात आलं असेल. या बेटांमधल्या परिसरात भरती-ओहोटी नुसार पाणथळ जमीन, डबकी, चिखल, दलदल आदी असणं अगदी स्वाभाविक आहे. दादर ही अजुनही खोलगट जागा आहे, हे दर पावसाळ्यात आपल्याला (बीएमसीला नाही) नव्याने समजते. खोल या अर्थाच्या काहीसे जवळ जाणारे दरा, दरी, दरार असे शब्द आहेत हे शब्द मला 'दादर' या शब्दाचे जवळचे नातेवाईक वाटतात. दुसरं म्हणजे या परिसरात त्या काळात भरती-ओहोटी मुळे निर्माण होणारा चिखल आणि दलदल. यातला 'दलदल' हा शब्द मला विशेष लक्ष देण्यासारखा वाटतो. 'ल' आणि 'र' ची अनेकदा अदलाबदल होत असताना दिसते. बोबडं बोलणाऱ्या व्यक्ती किंवा लहान मुल अनेकदा 'र'च्या जागी 'ल' उच्चारतात. 'ल'च्या जागी 'र' होणं तसं दुर्मिळ असलं तरी काही ठिकाणी होत असतंच. उदा. 'स्टेला' ह्या ग्रीक शब्दाचा अर्थ 'स्टार' असा आहे. इंग्रजीत तो 'स्टार' म्हणूणच समोर येतो. 'सलीया' चं 'सरीया' होतं. याच न्यायाने 'दलदल'चं 'दरदर' व कालांतराने पुढे 'दादर' झाला असावं असं मला वाटतं.
परिसराच्या एखाद्या ठळक लक्षणावरून त्या परिसराला नांव देण्याची लोकांची सवय जसं, वाघाचा वावर असणारी गांवे वाघीरे, वाघीवरे, ताडदेवनजीकची चिखलवाडी किंवा मसजिद बंदरजवळची पायधुणी इत्यादी लक्षात घेता, दलदल-दरदर-दगर-दादर झालं असण्याची शक्यता नाकारता येत नाही. माझ्या तर्काला आणखी बळकटी देतो तो जुन्या हिन्दीतील 'दादूर' ( संस्कृत-दर्दुर:) वा 'दादूरा' हा 'बेडूक' या अर्थाचा शब्द. आता बघा, पाणथळ जमीन, दलदल अशा ठिकाणी 'दादूरा' असणं अगदी स्वाभाविक आहे आणि त्यामुळे बेडकांची जागा या अर्थाने 'दादूरा' म्हणजे 'दादर' झालं असावं का, असंही मला वाटतं. अर्थात हे सर्व माझ्या तर्कावर आधारलेले माझे (गैर)समज आहेत. मी मुंबईचा अभ्यासक आहे, तज्ञ नव्हे. याबाबत तज्ञांनी मी मांडलेल्या तर्कावर अधिक विचार करावा, असं सुचवेन.
आता इतिहासात आधार असलेलं माझं पहिलं गृहितक. मुंबईचा पहिला राजा 'प्रताप बिंब' हा सन ११४० मध्ये गुजरातहून दमण, केळवे-माहीम मार्गे मुंबईत आला. या प्रताप बिंबाने मुंबईतील माहीम येथे आपली राजधानी वसवली. या राजाने मुंबईत येताना त्याच्यासोबत केळवे-माहीम परिसरातील सोमवंशी, सूर्यवंशी कुळातील अनेक कुटुंबं आणली आणि त्यांना मुंबईत वसवलं. इतकंच नाही तर येताना या सर्वांनी त्याची जुनी राजधानी केळवे-माहीम परिसरातल्या गावांची आणि देवतांची नावंही इथे आणली, असं म्हणता येईल. कारण आताच्या मुंबई माहीमला या राजानेच आपली जुनी राजधानी केळव्याकडच्या माहीमचं नांव दिलेलं आहे. या बेटाला पूर्वी 'बरड बेट' म्हणजे बॅरन बेट किंवा मराठीत ओसाड बेट म्हणत. प्रताप बिंबाची पूर्वीची राजधानी असलेल्या केळवे-माहीम मधल्या 'माहीम'च नांव प्रताप बिंबाने मुंबई माहिमला दिलं, हा लिखित इतिहास आहे.
तसंच काहीसं पुढे असलेल्या परिसरात त्याने मुंबईतलं 'नायगाव' वसवलं असावं. भाईन्दरची 'धारावी' इथे आणून माहीम बेटाच्या पूर्वेला वसवली. त्याने शितलादेवीही इथे आणली. पूर्वीच्या राज्यकर्त्यांची ही पद्धतच असावी, असं इतिहासावरून म्हणता येतं. एखाद्या राजाने नवीन राज्य वसवलं, की आपल्या जुन्या ठिकाणांची आणि देवतांची नांव नव्या ठिकाणांना देण्याची प्रथा असावी. मुंबईत अनेक ठिकाणी दिसणाऱ्या शितलादेवी, हरबादेवी किंवा खोकलादेवींची मंदिरं अशीच केळवे-माहिम परिसरातील देवतांशी साधर्म्य सांगणारी आहेत.
पण याचा दादरशी कसा काय संबंध येतो, असा प्रश्न तुम्हाला पडेल. तर तो तसा संबंध लावता येतो. केळवे-माहीम पालघर भागात 'दादरपाडा' नावाचा केळव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर वसलेला भाग आजही आहे. इतकेच नाही तर त्या शेजारी असलेल्या खाडीलाही 'दादर पाडा खाडी' असं नांव आहे. या दादरपाडा भागातीलही काही लोक राजा बिंबाच्या काळात त्याच्यासोबत आले असावेत व ते माहीम बेटाच्या दक्षिणेच्या टोकाला, म्हणजे आजच्या प्रभादेवी परिसरात वसले असावेत आणि त्या वस्तीला त्यांनी 'दादर पाडा' असं आपलं जुनंच नांव दिलं असावं. माहिमच्या या भूभागावरच दादर नव्याने अस्तित्वात आलं हे आपण वर पाहिलं. आताच्या माहिम, प्रभादेवीच्या दरम्यान त्याकाळात नवीन वस्ती वसवताना, त्या वस्तीला इथल्या जुन्या वस्तीच्या नावातलं 'पाडा' गाळून 'दादर' हे नाव प्राप्त झालं असावं, असं म्हटलं तर चुकू नये. दादरच्या नावामागे असू शकणारं हे गृहीतक, मला वरच्या जीना, दलदल वगैरेंच्या कथा-तर्कांपेक्षा सत्याच्या अधिक जवळ जाणारे वाटतं. माझं हे गृहीतक इतिहासाशी सुसंगत वाटतं. तज्ञांनी यावरही विचार करावा.
'दादर' पूर्व-पश्चिम हे कसं दुसऱ्याकडून घेतलेल्या जमिनीवर वसलेलं आहे, त्याचा हा धावता आढावा. मुंबईतील उर्वरित ठिकाणांच्या मानाने वयाने अत्यंत तरुण असूनही, दादर आज मुंबंईतलं सर्वात महत्त्वाचं नगर बनलेलं आहे. कानामागून आलेल्या पोराने मुंबईवर आपली छाप टाकलेली आहे. मुंबईच्या भवितव्याची जाहीर चर्चा याच पोराचं अंगण असलेल्या शिवाजी पार्कात नित्यनेमाने होत असते. 'मुंबईची एक इंच जमीनही कुणाला हिसकावू दिली जाणार नाही' अशा गर्जना माहीम आणि समुद्राकडून हिसकावलेल्या जागेवरून केल्या जातात, तेव्हा हा इतिहास माहित असल्याने मला गालातल्या गालात हसू फुटतं...!
© -@नितीन साळुंखे
// या अप्रतिम लेखावर माझ्या एका मित्राची टिप्पणी
🙋♂️😆👍🏽✌🏽👌🏽👌🏽 *सुंदर!*
*खरच, अप्रतिम लेख. माझ्या सारख्या दादर-माहीमच्या रहिवाशाला फार मनोरंजक माहिती मिळाली. माझ्याकडे पण एक मुंबईचा जुना इतिहास सांगणारे पुस्तक आहे. परंतु त्यातसुद्धा दादर बद्दल विशेष माहीती नाही. माहीम, वरळी, शीव (सायन) या ठिकाणांची जास्त माहीती उपलब्ध आहे. मी जन्माने दादरकर आहे. जन्मापासुन माझी २८ वर्षे दादरमधे पोर्तुगीज चर्च परिसरात गेली. त्यानंतर आजतागायत ५२ वर्षे मी शितळादेवी परिसरातला माहीमचा रहिवासी आहे.* *म्हणुन मी नेहमी म्हणतो आमचे दादर- माहीम.* 😂
####################
.
तुम्ही कल्पना करू शकता का?*
*दिवसा ढवळ्या अचानक अंधार पडतो, पक्षी घरट्याकडे परततात, वातावरणात थरथराट पसरतो, आणि लोक एकमेकांकडे बघत राहतात – “हे काय चाललंय?”*
२ ऑगस्ट २०२५ या दिवशी अशीच एक विलक्षण खगोलीय घटना घडणार आहे – पूर्ण सूर्यग्रहण (Total Solar Eclipse)!
*🌑 नेमकं काय होणार?*
२ ऑगस्ट रोजी पृथ्वी, चंद्र आणि सूर्य एकाच रेषेत येणार असून चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकणार. त्यामुळे दुपारी १२:३० ते १:१० च्या सुमारास काही काळासाठी संपूर्ण अंधार पडणार आहे.
हा अंधार काही क्षणांचा असला तरी तो दिवसा अनुभवलेली "रात्र" असेल. अनेकांना या घटनेचा अनुभव अंगावर काटा आणणारा ठरणार आहे.
*🔭 कोणकोणत्या भागात दिसणार?*
भारतामधील काही उत्तर आणि पश्चिम भागांमध्ये हे संपूर्ण सूर्यग्रहण स्पष्टपणे दिसणार आहे. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, दिल्ली, मध्यप्रदेश या राज्यांमध्ये आकाशात "सूर्य नाहीसा" झाल्याचं दृश्य पाहायला मिळेल.
*🧠 वैज्ञानिक दृष्टिकोन*
NASA, ISRO आणि अन्य जागतिक अंतराळ संस्थांनी या ग्रहणावर बारकाईने लक्ष ठेवले आहे. हे संपूर्ण (खग्रास) सूर्यग्रहण असून २०२५ नंतर असं ग्रहण २१२६ मध्येच होणार आहे!
सूर्यग्रहणाच्या वेळी:
थेट सूर्याकडे पाहू नका, डोळ्यांना गंभीर इजा होऊ शकते.
Special Solar Filter Glasses वापरा.
स्मार्टफोनने सूर्य पाहण्याचा प्रयत्न टाळा, कॅमेरा डॅमेज होण्याची शक्यता आहे.
*🙏 धार्मिक आणि भावनिक दृष्टीकोन*
भारतात सूर्यग्रहणाला धार्मिक दृष्टिकोनातूनही महत्त्व आहे. या दिवशी अनेक लोक स्नान, ध्यान, जप करत असतात. मंदिरांत विशेष पूजा-अर्चा केली जाते.
काही जण ग्रहणाच्या वेळी अन्न-जल सेवन टाळतात.
अनेक संत आणि शास्त्रज्ञ "ग्रहण म्हणजे एक प्रकारची ऊर्जेची स्थिती" मानतात.
*🐦 निसर्गावर परिणाम*
संपूर्ण सूर्यग्रहणाच्या वेळी:
पक्षी आणि प्राणी गोंधळून जातात, ते रात्र असल्यासारखं वागतात.
तापमानात थोडीशी घट होते.
झाडांच्या हालचाली आणि परागीकरणावर परिणाम होतो.
*📷 तुम्ही हा क्षण कसा जपाल?*
जर तुम्ही हे सूर्यग्रहण पाहण्याची योजना करत असाल, तर:
सुरक्षित जागा निवडा जिथून आकाश स्पष्ट दिसेल.
DSLR किंवा स्मार्टफोनसाठी Solar Filter घ्या.
टाइम-लॅप्स शूटिंग करण्याचा प्रयत्न करा.
*🚨 शेवटचा सल्ला – ग्रहणाचा अंधश्रद्धांशी काही संबंध नाही!*
सूर्यग्रहण हा शुद्धपणे खगोलीय आणि वैज्ञानिक प्रकार आहे. याला कोणताही अपशकून, अमंगल किंवा अनिष्ट परिणाम मानण्याचं कारण नाही. विज्ञानाच्या युगात आपण हे सुंदर दृश्य डोळसपणे पाहायला हवं – योग्य खबरदारी घेऊन!
*✍️ निष्कर्ष:*
२ ऑगस्ट २०२५ – ही तारीख कदाचित तुमच्या आयुष्यातील सगळ्यात अनोखी दुपार घेऊन येणार आहे. सूर्यग्रहणाचं हे दृश्य केवळ डोळ्यांनीच नव्हे तर मनातही कायमचं कोरलं जाईल.
*संकलन : @Emkay.... महेंद्र कुंभारे*
सोमीवरील मुसाफिरी
*जीवनाचे दोन नियम आहेत,*
*बहरा फुलांसारखे आणि पसरा सुंगधासारखे.*
*कुणाला प्रेम देणं सर्वात मोठी भेट असते,*
*आणि कुणाकडून प्रेम मिळविणे सर्वात मोठा सन्मान
असतो.*
*जमवणं सोपं असतं आणि जपणं अवघड,*
*मग ती नाती असो किंवा माणसं.*
*आठवणींच्या हिंदोळ्यावर*
आठवणी कशा किती, विभिन्न भावना दर्शविती
ज्याची येते तो अनभिज्ञ, ज्याला येती त्याला सुखावती *π*
बाळ कोल्हत्करांचे मोठे संवाद, विसरु शकत नाही
झाकीर यांची तबला थाप, नेहमी संस्मरणात राही *π*
आयुष्यात काही व्यक्ती, हमखास लक्षात रहाती
सवय, लकब, चेहरा, त्याला कारणीभूत ठरती *π*
पहिली नजरभेट आठवता, कोणालाही तरुणाईत नेते
संमिश्र आठवणीं त्याने, हलकेच उजळित करते *π*
छत्री असता पहिल्या सरीत, भिजण्याची हौस आठवते
छत्री असुन लिफ्ट दिल्याने, भिजल्याचे हसू येते *π*
शाळेत जाण्या आतुर, असलेली जशी नात आठवते
शाळेतून परतताना तशीच, नातवाची घाई हसवते *π*
सूचक असतात काही, तर हळव्या आठवणी असती
असल्या कशाही तरी, समोरच्याला उचकी मात्र देती *π*
रक्तापेक्षा काही आठवणी, ऋणानुबंध श्रेष्ठ ठरवती
आठवणी काही मनाला, अगदी अंतर्मुखही करती *π*
आठवणींच्या सहाय्ये शब्दकोड्यांस, मिळे उर्मी
मेंदू तल्लख, डिमेंशिया नाही, वेगळी नको त्याची हमी *π*
आठवणींच्या चिंचा गाभुळ, रुचतील काय तुला रे
सुमन कल्याणपुरांचे गाणे, गुणगुणती आनंदे सारे *π*
आठवण येण्या इतकच असतं, आठवणीत राहणं श्रेष्ठ
स्मरणभेटीचा आनंद करी, मैत्रीची वीण घट्ट
---
बदलत्या जगामध्ये आता अर्थव्यवहार अत्यंत मूलभूत आणि महत्त्वाचे असतात. माणसाच्या जीवनातही अर्थव्यवहार कितीतरी उलथापालथी करू शकतात. अशा वेळेला प्रत्येक सुबुद्ध नागरिकाने अर्थसाक्षर होणे गरजेचे असते. त्याचाच एक प्रयत्न म्हणून आम्ही श्री उदय पिंगळे यांच्या लेखांचे अभिवाचन सादर करत असतो.
येथे ते 'फिनटेेक उद्योग आणि नव्या संधी' या त्यांच्याच लेखाचे अभिवाचन सादर करत आहेत !":
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा