सोमवार, २८ जुलै, २०२५

" फेसबुक वरील माझ्या संदेशांच्या आठवणी भाग 2 !":

👍 फेसबुकवरील साठवणीच्या माझ्या संदेशांच्या आठवणी भाग 2 !":👍 फेसबुक वर आपण नेहमी काही ना काही संदेश प्रसारित करत असतो. त्यामधील माझी कथा आणि आठवणी हा विभाग खरोखर अत्यंत उपयुक्त आहे असे मला आढळून आले. जेव्हापासून आपण फेसबुक वर प्रवेश केला तेव्हापासून प्रत्येक दिवसाच्या आपल्या संदेशांच्या आठवणी पुनश्च आपल्याला त्या त्या दिवशी दिसतात ही तंत्रज्ञानाची कमाल आहे. माझी कथा मधील आठवणी आपल्याला पुन्हा कॉपी-पेस्ट करून ब्लॉगवर एखाद्या लेखास्वरूपात टाकता येत नाही असे माझ्या ध्यानात आले परंतु आठवणी हा जो विभाग आहे त्यातील प्रत्येक आठवण आपण तपासून ज्या लक्षणीय आहेत त्यांची नोंद कॉपी पेस्ट स्वरूपात लेखामध्ये करू शकतो हे माझ्या ध्यानात आले हा लेख देखील त्यातलाच प्रयत्न आहे. लेख पुढे वाचण्यासाठी पुढील लिंक उघडा 1 👍" मुंबईमधील लोकल ट्रेनचा जीवघेणा प्रवास !":👌 💐 "मुंबई ही देशाची राजधानी असल्यामुळे संपूर्ण देशांमधून अनेक लोक मुंबईकडे रोजगारासाठी धाव घेतात. गेल्या 50 /60 वर्षात तर माणसांंचे लोंढेच्या लोंढे आल्यामुळे, चिंचोळे बेट असलेल्या मुंबई शहरावर प्रचंड लोकसंख्येचा भार पडला आहे. त्यामुळे अर्धी अधिक मुंबई झोपडपट्ट्या आणि लोकवस्ती सर्व दूर उपनगरांमध्ये अशी स्थिती आहे. आज मुंबईची दाटीवाटीने राहणारी लोकसंख्या 2 कोटी व घनता 73 हजार दर चौरस मैल एवढी प्रचंड झाली आहे. ती 1970 मध्ये 58 लाख होती. पश्चिम रेल्वेने डहाणूपासून,तर मध्य रेल्वेने कर्जत कसाऱ्या इतक्या दूरवरच्या अंतरावरून माणसं कामासाठी मुंबईकडे प्रवास करत असतात. दररोजचे जवळजवळ तीन ते चार तास त्यांचे अशा प्रवासातच जातात. त्या मानाने लोकल ट्रेनची सुविधा बिलकूूल चांगली नाही. उलट मेंढरं कोंबून भरावी त्याप्रमाणे लोकल ट्रेनमध्ये अक्षरश: लोंंबकळत माणसं जात असतात आणि हे चित्र काही गेल्या 50/ 60 वर्षात बदललेलं नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे. बस टॅक्सी ऑटो रिक्षा अशा अनेक सार्वजनिक वाहनांच्या सुविधा उपलब्ध असूनही, मुंबईमध्ये जाण्या येण्यासाठी अर्ध्याहून अधिक माणसं लोकल ट्रेनचाच उपयोग करतात. विशेषत: महिलांची गर्दी ही खरोखर चिंताजनक अशा अवस्थेत प्रवास करते. शिवाय सगळ्यात महत्त्वाची मुंबई शहराची बाब म्हणजे आणि लोकल ट्रेनच्या व्यवस्थेमधली बाब म्हणजे टॉयलेट किंवा स्वच्छतागृहांची प्रचंड कमतरता ! त्यामुळे विशेषतः महिलांना कठीण जाऊन त्यांना त्रास होतो. त्यांच्या आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतो. स्वातंत्र्य मिळाल्यापासून 75 वर्षांमध्ये इतकी प्रगती झाली, उंच उंच इमारती उठल्या,परंतु लोकल ट्रेनची सेवा मात्र जशीच्या तशीच आहे विलंबाने धावणारी, आणि दररोज अनेक जीवांचे प्राणांशी खेळणारी. लोकल ट्रेनच्या प्रवासामध्ये एका वर्षांमध्ये जितकी माणसं मरतात तो आकडा बघून खरोखर कोणालाही शरम वाटावी. चार लाईन असलेल्या लोकल ट्रेनच्या व्यवस्थेमध्ये सहा लाईन/आठ लाईन अशा करून जास्तीत जास्त लोकलस् उपलब्ध करणं अत्यावश्यक आहे. त्यातले त्यात महिलांचे डबे थोडेफार वाढले, खास महिलांसाठी देखील लोकल ट्रेन निर्माण झाल्या,12/ 15 डब्यांच्या लोकलही सुरू झाल्या. हे जरी खरे असले तरी सोबतच्या वृत्ताप्रमाणे महिलांची लोकल ट्रेनने प्रवास करण्याची अवस्था किती दयनीय आणि चिंताजनक आहे ते समजले अक्षरशः War footingवर ही व्यवस्था ताबडतोब सुधारली पाहिजे असं वाटतं !":🤣 2 "हे" 'असे', अन् "ते"ही 'तसे', सांगा, आपले व्हायचे कसे? त्यातून निवडायचे कसे, कसे? जुळवतो, बापुडे कसेबसे!" 3 "स्वार्थ सोडून, निस्वार्थ बुद्धिने चरितार्थ करायचे ठरवले, तरच जीवनांत खराखुरा चिरस्थायी अर्थ निर्माण होऊ शकतो." Hope, Passion & Inspiration are the Three Great Drivers of Life. 4 मुक्त अथॅकारणामुले ऐहिक भरभराट होत राहिली हे ज़री खरे असले तरी नैतिक अधःपतन वेगाने घडत आहे हे चांगले नाही आत्मकेंदरीपणा भयावहपणे वाढत आहे भ्रष्टाचार वरपासून ख़ाली खोलवर पसरला आहे माणसातली माणूसकी संपत चालली आहे असे एकंदर चित्र भासत आहे आहेरे आणि नाहिरे हयांंमधली दरी भयानक वाढली आहे शांतता आणि संमजसपणा भंगत चाललेला दिसतो आहे २५ वर्षानी मागे वलून पहाताना हेचि फल काय मम तपाला ? असे वाटले तर ते चूक नाहीं 😩😩😩 पैशापेक्षा भावना व परंपराना आणि मूल्य महनीय मानणारा मध्यम वर्ग समाजाला नवी दिशा देत राहिलेला असे पण आज हा वर्ग हरवला तर नाही ना? अशी शंका वाटते आहे 😷😷😷😢😢😢 ,5 "सौहार्द, निष्ठा आणि क्रुतीशीतलता ह्यामुळे उज्वल भवितव्याचा मार्ग गवसत रहातो." 6 "भाऊबंदकी, फितुरी आणि निष्क्रियता ह्यामुळे भवितव्याचा कायम र्हास होत रहातो." 7 "भूतकाळाचा गर्भितार्थ समजत, वर्तमानातील अन्वयार्थाच्या दिशेने मार्गक्रमणा केली तर, भविष्यात क्रुतार्थता लाभते." 8 👍"छाप (पड)लेले शब्द-4 !":👌 👍" सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा !":👌 🤣 "आरोग्य आणि शिक्षण या अत्यंत महत्त्वाच्या अशा क्षेत्रांकडे दुर्लक्ष होत गेले, तर एकंदर भौतिक प्रगती कितीही झाली तरी, प्रत्यक्षात सर्वसामान्य माणसांचे जीवन कितपत सुसह्य होणार याची शंका वाटते. एकूण अर्थसंकल्पात आपण आरोग्य आणि शिक्षणावर त्यामानाने समाधानकााक पैसा खर्च करत नाही. मनुष्यबळाची शारीरिक, मानसिक क्षमता आरोग्य विषयाशी संबंधित, तर मनुष्यबळाचे कौशल्य आणि योगदान हे शिक्षणाच्या पायावर अवलंबून. अशा वेळेला अवाढव्य मनुष्यबळाचा आपण योग्य तो उपयोग करून घेत नाही, असेच म्हणायला नको कां? सोबतच्या वृत्तामध्ये महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्थेचे कसे तीन तेरा वाजले आहेत, आणि संबंधित 40 वाहने एकाच जागी पडून आहेत, ह्याचे आरोग्य विभागाला काहीही सोयर सुतक नाही, ही कुणालाही व्यथित करणारी बाब आहे. त्यामुळे दुर्गम भागातील माणसांचे, विशेषत: आदिवासींचे काय हाल होत असतील, याची कल्पना करता येत नाही. पण शहरातील आपापल्या वातानुकूलित केबिनमध्ये मशगूल असणाऱ्या मंडळींना त्याचे काय सोयर सुतक ! अशा तऱ्हेची वृत्ते वाचनात आली की, संवेदनशील मन व्यथीत होते आणि वाटते, 'हम कभी भी नही सुधरेंगे !":🤣 9 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल,अमोल' 191 !":👌 💐"आरसा माणसाच्या चेहऱ्याची प्रतिमा दाखवणारं साधन, तर माणसाचा चेहरा हा त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा किंवा स्वभावाचा आरसा ! साऱ्या जगाला ज्या डोळ्यांच्या नजरेतून माणूस पाहतो, ते डोळे हे माणसाचा स्वभाव आणि चेहरा प्रदर्शित करत असतात. चेहऱ्याकडे पहा रोखून आणि चेहऱ्यावरील भावमुद्रा, तुम्हाला जाणवून देईल, ही व्यक्ती कशा स्वभावाची आहे ! फक्त त्यासाठी माणसं 'वाचायची' कला मात्र तुमच्या अंगी हवी !":💐 10 मनांतले, जनांत!-१": "भूतकाळाचा गर्भितार्थ समजत, वर्तमानातील अन्वयार्थाच्या दिशेने मार्गक्रमणा केली तर, भविष्यात क्रुतार्थता लाभते." "भाऊबंदकी, फितुरी आणि निष्क्रियता ह्यामुळे भवितव्याचा कायम र्हास होत रहातो." "स्वार्थ सोडून, निस्वार्थ बुद्धिने चरितार्थ करायचे ठरवले, तरच जीवनांत खराखुरा चिरस्थायी अर्थ निर्माण होऊ शकतो." आणि अखेरीस, "कोड़े: कधीही न सुटणारे": ----------------------- माणूस मरतो, तेव्हांच कां मरतो? कुणी जन्मत:च, तर कुणी बालपणी वा कुणी एेन तारूण्यांत, तर काही प्रौढपणी, तर काही वृद्धापकाळी हे जग सोडून जातात. प्रत्येकाचे मरतेवेळी वय भिन्न असते, असे कां????.... तर ह्या आहेत माझ्या काही नोंद घेण्याजोग्या संदेशांच्या आठवणी: धन्यवाद श्री सुधाकर नातू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा