बुधवार, ३० जुलै, २०२५

" वाचता वाचता वाचलेले भावलेले

👍 "वाचता वाचता, वाचलेले भावलेले !":👍 👍"जीवन आनंद-'गुंतणे हीच गुरुकिल्ली' !":👍 💐" आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात आनंद निर्माण करणे, हाच तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद असायला हवा. नीट पाहिल्यावर एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे माणूस जेव्हा निवृत्त होतो, तेव्हाच प्रथम मनाने खचतो. मोकळा वेळ कसा घालवायचा हे कळत नाही. मग तो मनाने प्रथम म्हातारा होतो, नंतर शरीराने म्हातारा होतो. ही मानसिक आणि शारीरिक घसरण वेगाने होते. सर्वांनी कामात व्यग्र राहणे, कशातरी गुंतून राहणे यामुळे मानसिक आरोग्य सुधारते व आनंदी राहण्याची ही गुरुकिल्ली आहे !":💐 # डॉक्टर चिंतामणी लेले 👍 "वाचता वाचता, वाचलेले भावलेले !":👍 👍" कोडा'चे कोडे सुटू शकते !":👍 💐 "एखाद्याचे कोडकौतुक करणे हा वाक्प्रचार मराठीमध्ये कसा सुरू झाला याची कल्पना नाही. परंतु त्यामध्ये 'कोडा'चे कौतुक हा अर्थ मात्र निश्चितच अभिप्रेत नाही. प्रथम हे स्पष्ट केले पाहिजे की, 'कोड' हा कोणत्याही प्रकारचा रोग नाही. ती फक्त त्वचारंगहिनतेची अवस्था आहे. त्याची कारणमीमांसा मात्र अद्यापि अज्ञात आहे. मानसिक दाब वाढला की, काही विषे शरीरात निर्माण होतात आणि ती शरीरामध्ये विशेषत: जेथे सांधे आहेत तेथे उदाहरणार्थ कोपरे-गुडघे बोटांचे सांधे, डोळ्याचा खालचा भाग, तोंडाच्या दोन्ही कोपऱ्यात, कानाच्या मागील बाजूस अशा भागात पसरतात. त्यामुळे 'मॅलॅनिन' या त्वचेस रंग बहाल करणाऱ्या मॅलॅनोसाइट्स यांचा नाश होतो आणि रंगद्रव्य नाहीसं झाल्यामुळे, तो भाग पांढरा फटक बनतो अशी एक थियरीआहे. 1974 मध्ये क्युबामधील डॉक्टर मिचारेस यांनी 'प्लॅसेंटा'मध्ये मेलॅॅनिन निर्माण करण्याची क्षमता आहे हे सिद्ध केले. अथक संशोधनानंतर डॉक्टर मिचारेस यांनी 1980 आपले औषध 'मॅलॅहनीना' या नावाने बाजारात विकण्यास सुरुवात केली. संपूर्ण शास्त्रीय संशोधनातून निर्माण झालेले 'कोडा'वरील ते एकमेव औषध जगात उपलब्ध आहे !":💐 # डाॅ विजय ढवळे 👍 "वाचता वाचता, वाचलेले, ले !":👍 😇 " ही प्रगती की अधोगती ?":😇 🤣 " डॉक्टर विजय ढवळे यांचे 'कॅनडियन भेळ' हे माहितीपूर्ण व मनोज्ञ पुस्तक वाचत होतो. सहज लक्ष गेलं म्हणून समजलं ते पुस्तक 2008 साली प्रसिद्ध झाला होतं खाली किंमत बघितली दहा डॉलर किंवा रुपये 300 ! याचा अर्थ 2008 साली एका डॉलरची किंमत तीस रुपये होती. ताबडतोब आजचा दर बघितला तर एक डॉलर बरोबर 87.48 रुपये असा आढळला ! थोडी स्मरणशक्तीला चालना दिली आणि ध्यानात आले की गणिताच्या विनिमयाच्या उदाहरणात डॉलरची किंमत साडेसात रुपये अशी काही दशकांपूर्वी होती ! त्याचा अर्थ रुपयाचे किती चिंताजनक अवमूल्यन होत राहिले आणि तेवढेच डॉलरचे मूल्य मात्र कायम वाढतेच !! सातत्याने विकासाचा ढोल वाजवला जात असताना, ही प्रगती म्हणावयाची की अधोगती ? मी काही अर्थतज्ञ नाही हे ज्याचे त्याने ठरवावे !":🤣

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा