मंगळवार, १५ जुलै, २०२५

" वाचता वाचता वेचलेले भावलेले !":

👍 "वाचता वाचता वाचलेले भावलेले !":👍 💐"स्वप्न नगरी मुंबई ची खास बात अशी की जीवन चालू ठेवण्याच्या कुठल्याही पद्धतीत जर तुम्ही कामाचे असाल तर मुंबई तुम्हाला लगेच आपलं करते ते काम तुमच्याकडून करून घेते त्यामुळेच तर दररोज इतकी जण मुंबईच्या दिशेने धाव घेत असतात मुंबईत मुंबई ना माझ्यात प्रचंड बदल घडून आणले प्रोफेशनल मुंबई न शिकवला कमी वेळेत कमी जागेत काम करायला शिकवलं जेवण्या खाण्याच्या सवयी बदलल्या अहो रात्र सावंत तत्पर आणि तयार राहणं मुंबईनं शिकवलं सतत स्वतःला अपग्रेड करायला लावणाऱ्या गोष्टी आत्मसात करायला शिकवलं आम्ही इंदूरहून आलेली मुलं म्हणजे झालं तर झालं केलं तर केलं असं वागायचं पण मुंबईला आम्हाला घड्याळाच्या ठोक्यावर चालायला शिकवलं त्या ठोक्यावर काम संपवायला शिकवलं फुकट लाड नाही आवडतं आवडतं सगळं स्वीकारायला शिकवलं ताजं तवांना रायला शिकवलं !":💐 # श्री स्वानंद किरकिरे #################### 👍 "वाचता वाचता वाचलेले भावलेले !":👍 💐"'Conflict is soul of Drama' असं एक प्रसिद्ध वचन आहे. संघर्षामुळेच नाट्य उभे राहत. संघर्षातून झालेली प्राप्ती ही मौलिक समाधान देणारी असते. भूक आणि संघर्ष यांचं अतूट नातं असतं. खरंच एखाद्या भक्षावर झाप मारणारा पक्षी, दोन पायांवर उभे राहून काटेरी बाबळीची इवली इवली पान खाणारी बकरी आणि पायांचा आवाज न करता वाळक्या पानांवर दबक्या पावलाने चालणारा चिता पाहताना, त्यांचा भूकेसाठीचा संघर्ष उजागर होतो. फांदीवर स्वतःला उलट टांगून घेऊन फळ कुर्तडणारा राघू तर पहातच राहावा. एकूण काय तर भुकेविरुद्ध संघर्ष करायला जेव्हा कोणी पाय रोवून उभा राहतो, तेव्हा तो सुंदर दिसू लागतो.भुके विरुद्ध माणसाचा संघर्ष आदिम आहे. तहान भुके एवढाच संघर्षही आदिम आहे. भोवताली जीवघेणा संघर्ष करणारी माणसं पाहताना, आपले संघर्ष क्षुल्लक वाटू लागतात !":💐 # दासू वैद्य. ############ 👍 "वाचता वाचता वाचलेले भावलेले !":👍 💐 "१६ जुलै कृत्रिम प्रज्ञेचा म्हणजेच यायचा गौरव दिन ए आय अॅप्रिसिएशन डे या दिवशी जगभरात योगदान मान्य केले जाते आपण केवळ योगदान मान्य केले आहे असे नाही तर त्याच्या आहारी गेलो आहोत असे वाटतय शिकणं गरजेचं आहे त्याचा वापरही आवश्यक आहे पण तो कुठे कधी आणि का वापरायचा याचा विचार करणं हे त्याहून अधिक महत्त्वाचं आहे. एआयचं उद्दिष्ट होतं माणसाचं आयुष्य स्मार्ट वेगवान आणि शाश्वत बनवणं अग्नी प्रमाणे आहे ही प्रज्ञा स्वयंपाक करू शकते किंवा घर जाळूही शकते महत्त्वाचे म्हणजे आपण सगळ्यांना काडेपेट्या दिल्या आहेत पण त्यांचा वापर कसा करायचा याचं सूचना पत्रक दिलेलं नाही आज असे अनेक एआय टूल्स आहेत जे काही मिनिटात लोगो व्हिडिओ स्टेटस तयार करतात पण कल्पना करा हेच टूल्स रिल्स बनवण्याऐवजी शेतकऱ्यांना हवामान व मार्केट डेटावर आधारित सल्ला देण्यासाठी पुराचा अंदाज व त्यातून बचाव करण्यासाठी अन्नाचा अपव्य टाळण्यासाठी ज्यादा पीक मागणी विश्लेषणासाठी वापरले गेले तर किती उपयुक्त ठरतील ! एआय टूल्स हा हातोडा आहे. बुद्धिमत्ता अनुभव आणि संयम हा त्याचा हात या योग्य वापरल्यास शाश्वत विकास घडू शकतो. # डॉक्टर अमेय पांगारकर ##############

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा