शुक्रवार, ११ जुलै, २०२५
"मनातले जनात शारदोत्सव":
👍" मनातला जनात शारदोत्सव !":👍
💐 "बेस्ट ऑफ जयवंत दळवी' पुस्तकातील आतापर्यंत केवळ तीन प्रकरण मी वाचून काढली आहेत-संपादक सुभाष भेंडे यांनी दळवींचे जीवन, व्यक्तिमत्व आणि समग्र साहित्य यांची जडणघडण कसकशी होत गेली, त्याचे 'प्रारंभीचे चार शब्द', कल्पनांचे फुगे फुगवत समोरच्याला गुंतबवून टाकणारे विक्षिप्त 'रॉय किणीकर'आणि कडू गोड आठवणींचे जाळे सभोवताली गुंडाळत, रस्त्यावरून स्वतःच्या महालात जाण्यापर्यंत यशस्वी झालेले आयुष्य जगत गेलेले मनस्वी 'केशवराव कोठावळे' ही ती तीन प्रकरणं, माझ्या मनाची भूक तुडुंब भरेल इतके सारे मला देऊन गेली आहेत. माझ्या मनातील तृप्तीची ढेकर, मी येथे जनात ही अशी मांडत आहे इतकेच.
असे सकस वाचन वाचायला मिळणे, हा योग जसा भाग्याचा तसंच केवळ पोटाची भूक भागणे पुरेसे नाही, हे जाणवून देणारे, मनाच्या अनुभवांची श्रीमंती वाढवत नेणारे वाचनासारखे तृप्तीचा समाधानाचा आनंद मिळणे हे अहोभाग्यच होय ! साहजिकच आता 'बेस्ट ऑफ जयवंत दळवी' माझे तन मन व्यापून टाकत, आगामी काही दिवस माझ्यासमोर मनभावन क्षणांची तिजोरीच खुली करत जाणार यात शंकाच नाही !":💐
################
👍"क्लासिक दिग्दर्शक-लेखिका जयश्री दानवे !":👍
👍"भारतीय चित्रपट सृष्टीचा अविस्मरणीय मागोवा !": 👍
हे पुस्तक अभ्यासपूर्ण लेखनकौशल्याची कमाल आहे.
बॉलीवूड मधील बारा क्लासिक दिग्दर्शकांच्या यशस्वी थोरवीला योग्य तो न्याय तर दिला आहेच, पण त्या त्या दिग्दर्शकाच्या कार्यकर्तृत्वाचे सार संबंधित उत्तम चित्रपट कोणते तेही त्यांनी अचूक अधोरेखित केले आहे ! कसे ते बघा:
के आसिफ-दिव्य स्वप्नांचा बादशाह
मुगले आजम
मेहबूब खान- युगप्रवर्तक दिग्दर्शक
मदर इंडिया अंदाज
विमल रॉय- ऑफ बीट सिनेमाचा जन्मदाता
देवदास मधुमती बंदिनी यहुदी
कमाल अमरोही- कलात्मक भव्यतेची कमाल
पाकीजा दिल अपना प्रीत पराई महाल रजिया सुलतान
बी आर चोप्रा- सामाजिक समस्यांचा बादशहा
हमराज गुमराह नया दौर कानून
यश चोप्रा- रोमँटिक चित्रपटांचा जादूगार
चांदनी दिल तो पागल है सिलसिला दाग वक्त
ऋषिकेश मुखर्जी- मध्यमवर्गीयांचा कौटुंबिक दिग्दर्शक
अभिमान गुड्डी चुपके चुपके आनंद
विजय आनंद- दिग्दर्शनाचा सर्वांग सुंदर बादशहा
गाईड तेरे घर के सामने ब्लॅकमेल ज्यएल थीफ
गुलजार-सर्वस्पर्शी 'गुलजार' दरवळ
मेरे अपने आम्ही मौसम बसेरा
शक्ती सामंत-अमर प्रेमाचा सफल दिग्दर्शक
काश्मीर की कली अमर प्रेम अमानुष आराधना
व्ही शांताराम-अमर कलात्मक चित्रपती
दो आखे बारा हात नवरंग पिंजरा
जनक जनक पायल बाजे
शाम बेनेगल-आर्ट फिल्म्सचा अंकुर
जुनून झुबेदा भूमिका कलयुग
प्रत्येक दिग्दर्शकाचा हा यथोचित आणि सर्वांगसुंदर असे वैशिष्ट्य दाखविणारा ऐवज वाचणे म्हणजे चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम चित्रपटांची इतिहासाची उजळणी करणे असेच होते. असे पुस्तक वाचायला मिळणे, हा देखील एक परमभाग्याचा सुयोग आणि अर्थातच म्हणूनच या पुस्तकाला एक क्लासिक पुस्तक असेच म्हणावे लागेल !":
धन्यवाद
श्री सुधाकर नातू
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा