बुधवार, ३० जुलै, २०२५
" फेसबुक वरील माझ्या योगदानाच्या साठवणीतल्या आठवणी भाग 3 !":
👍 फेसबुकवरील साठवणीच्या माझ्या संदेशांच्या आठवणी भाग 3 !":👍
फेसबुक वर आपण नेहमी काही ना काही संदेश प्रसारित करत असतो. त्यामधील माझी कथा आणि आठवणी हा विभाग खरोखर अत्यंत उपयुक्त आहे असे मला आढळून आले. जेव्हापासून आपण फेसबुक वर प्रवेश केला तेव्हापासून प्रत्येक दिवसाच्या आपल्या संदेशांच्या आठवणी पुनश्च आपल्याला त्या त्या दिवशी दिसतात ही तंत्रज्ञानाची कमाल आहे. माझी कथा मधील आठवणी आपल्याला पुन्हा कॉपी-पेस्ट करून ब्लॉगवर एखाद्या लेखास्वरूपात टाकता येत नाही असे माझ्या ध्यानात आले परंतु आठवणी हा जो विभाग आहे त्यातील प्रत्येक आठवण आपण तपासून ज्या लक्षणीय आहेत त्यांची नोंद कॉपी पेस्ट स्वरूपात लेखामध्ये करू शकतो हे माझ्या ध्यानात आले हा लेख देखील त्यातलाच प्रयत्न आहे.
"एखाद्या समुहावर पुन:पुन्हा याचना करण्याची परिस्थिती येणे,
हे त्यांचे,
त्यांच्यातील नेत्रुत्वाचे आणि
शासनाचे दारुण अपयश असते."
"मराठी मालिकांतील प्रेमाच्या त्रिकोणातील पात्रांचे संभ्रमांतले वागणे,
काही केल्या,
संपतच नसल्याने
कां व कशाकरता पहायच्या त्या?"
The Most Apt Message on the Dasha Hara Day- The Vijaya Dashami: 'With messy, disastrous experience of the coalition Govt in the last decade at the center and 15 years at the state level, while on central level voters have become already wise to opt for a single party Govt at the center, it's now expected on State front, prudent voters should select only that candidate whose party has more probability to get single handedly the reqd majority. The experience and capability to govern effectively, with a developmental vision is too important. Naturally, in a five pronged race, the obvious choice is wide open and definite; How? Please See: There is already a very pathetic experience of the two players, out of these five, to Govern the state and out of remaining 3 parties, the one doesn't have an experience to govern independently, any state and the 4th one also has failed to govern even at even one corporation level. So the choice logically, falls on BJP, the 5th player who has demonstrated remarkable governance at more than one state and their one time state level CM has been rewarded the Prime Ministership by wise voters. So, Jai Ho BJP candidates! Thank you
"विक्रीयोग्य सेवा देणार्याने,
प्रामुख्याने पैशांपेक्षा,
ग्राहकाच्या हिताला व समाधानाला,
प्राधान्य देणे अत्यावश्यक असते."
"याचना करणारा जेव्हां,
परिस्थितीचा सारासार विचार न करता हक्काची भाषा करतो, तेव्हा
अराजक फार दूर नसते."
"पसंतीची मोहोर: ३५०० लोकांना माझे फेसबुकवरील संदेश आवडले.
मन:पूर्वक धन्यवाद."
३०मिनिटांतील १५जाहिरातींसाठी, उरलेल़या १५ मधे २मिनीटे पुढे काय दिसणार ते दाखवणयातरता, १३ मिनिटांतील रोजचे दलण 'पाणी' घालत संपवायचे. कोणत़या जाहिराती कोणत़या वेली दाखवणयातरता ठेवायच़़या, त्याची शहानिशा करायची नाही. कारण नसताना मालिका लांबवा़यचया अणि ग़रीब बिचारया प्रेक्षंकंाचा अंत पहायचा. हे सारे खेल खंडोबे कधी कोण थांबवणार?जाहिरातदारांचा पैसा वाया, प्रेक्षंकंाचा वेल वाया घालावायचे हे तमाशे आता पुरे झाले. ठराविक कालांत संपणारया अर्थपुणॅ मालिका आता हवया आहेत.'TV बंद' अशी मोहीम सुरु करावी आणि आपला बहुमूल्य वेल चांगलाच वापरावा हे गरजेचे आहे.
"सोडूनिया विचार,
करूया आचार.
अपुला पक्ष बदलूनिया,
धरुया कास, सत्तेची!"
"अती तेथे माती !":
सोनी' मराठी वाहिनीवरील हास्य जत्रेचा महापूर आता पुरे झाला. त्याचे तसेच तसेच भाग बघून वीट आला. त्यापेक्षा प्राईम टाईमवरील करमणुकीच्या मालिकांचे अधून मधून पुनःप्रक्षेपण करणे रास्त होईल.
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल,अमोल' 196 !":👌
💐 "आपल्या जवळ असलेली भाकरी आपली आपणच खाणे ही वृत्ती, तर आपल्या जवळ भाकरी असूनही दुसऱ्याची भाकरी ओरबाडून घेणे ही झाली विकृती; तर आपल्याजवळ असलेली भाकरी दुसऱ्या भुकेलेल्याला पूर्ण देऊन टाकणे, हीच खरी संस्कृती !":💐
माणुसकीचे हृदयस्पर्शी दर्शन
"हा हंत, हा अंत!":
काळ हा आहे, कलियुगाचा
अपेक्षा कां आता, सत्ययुगाच्या?
करु या, विश्वासघात मतदारांचा
उड्या मारु या, झटपट पक्षांतरांच्या!
कास धरु या, खुर्च्या त्या सत्तेच्या!!
आला कां जवळी अंत, तो लोकशाहीचा??
"मोबाईल फोन आला की,
क्रमांक जसा दिसतो,
तसेच त्याचे अचूक ठिकाण समजायला हवे.
अशी सुविधा कधी मिळू शकेल?"
लाजिरवाणी अधोगती:
वाढती गुन्हेगारी, विशेषत: महिलांवरील अत्याचार, खूप विलम्बाने न्याय, भ्रष्टाचाराचा महाराक्षस, जीवघेणी महागाई, खड्डयानी भरलेले रस्ते, वेगाने वाढणारी अनधिकृत बांधकामे आणि झोपड़पट्टी, हे साधण्यासाठी मतपेटीकड़े लक्ष ठेवून कसेही वाकवले जाणारे क़ायदे, सार्वजनिक वहातूकीची दयनीय स्थिती, रखडत चाललेली व खर्च नाहक वाढणारी विकासकामे ही यादी अशीच वाढतच जाईल. सरकार कोणतेही येवो, सर्वसान्यांचे जीवन जिकीरीचे झाले आहे, हेच खरे आहे. आज ७ दशकांनंतरही असे चित्र असणे, हे निश्चित भूषणावह नाही. ही अधोगती कोण कशी आणि किती कालानंतर थांबवणार?
👍"छाप(पड)लेले शब्द !":👌
👍"चाकोरी बाहेरचा धाडसी उपक्रम
!":👌
😜 "सजीवांमध्ये नर आणि मादी किंवा
मनुष्यमात्रांमध्ये स्त्री आणि पुरुष एवढी दोन लिंग आपल्या परिचयाची असतात आणि अजून काही वेगळा प्रकार असू शकतो, याची सहसा दखल घेतली जात नाही. त्या तिसर्या वर्गाला वाळीत टाकल्यासारखी वागणूक पुष्कळदा असते, हे आपण पाहत आलो आहोत.
अशा वेळेला हे धक्कादायक वृत्त नजरेसमोर आले आणि मी अचंबित झालो.
त्या दखल न घेतल्या जाणार्या पारलिंगी (हा शब्दही आगळावेगळा) समूहासाठी काही वेगळे असे करावे हे रुईया
महाविद्यालयासारख्या, (ज्याचा मी देखील कोणी एकेकाळी विद्यार्थी होतो) त्यांनी हे धाडस करावे, हे खरोखर काळापुढचे पाऊल होय. ज्याप्रमाणे कोणी एकेकाळी रधों कर्वे यांनी कुटुंब नियोजनाच्या बाबतीत समाजाचा प्रखर विरोध पत्करून प्रयत्न चालवले, त्याची आठवण झाली. महाराष्ट्राला समाज सुधारणेच्या माध्यमातून काळाच्या पुढे नेणाऱ्या समाज सुधारकांच्या मांदीयाळीच्या परंपरेतील हा प्रयत्न आहे असे वाटते.
काळ झपाट्याने पुढे चालला आहे आणि त्याबरोबरच समाज देखील बंदिस्त वातावरणामधून अधिकाधिक मोकळा होत चालला आहे, हेच या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल !:😜👍"रंगांची दुनिया 👌
💐"रसिकमनांची रसिली यात्रा !💐
👍"आकाशातील पाळणे !":👌💐
👍" मनोगत": ध्वनीफित.
"स्मार्टफोन हातात आल्यापासून "ह्या हृदयीचे त्या हृदयी !" करण्याचा माझा छंद गेली पाच सहा वर्षे चालू आहे. त्यातीलच हा मुक्तसंवादाचा प्रयोग. आपण ही ध्वनीफित शेवटपर्यंत जरूर ऐकावी.
तिची गुगल ड्राँईव्हवरील ही लिंक उघडा.....
https://drive.google.com/file/d/1Rbfb-wc51r0Pci17CXksBf-3IFP8ITed/view?usp=drivesdk
ध्वनीफितीमध्ये उल्लेखिलेल्या "निवडक विचार मोती !" अर्थात् Treasure Book ची अनुक्रमणिका पुढे देत आहे. त्यामधील विचारधन आपल्यापर्यंत प़ोहोचविण्याचा माझा संकल्प आहे.
आपला प्रतिसाद द्यावा अशी विनंती आहे.
धन्यवाद
सुधाकर नातू
वेगले छोटे राज्य मागणयामागे भावना विकास हयापेक्षा नवयाने उपलब्ध होणारी सत्ता स्थाने हा स्वार्थ देखिल अगृकृमाने असतो. विकास करणयाची भाषा करून अच्छे दिनचे बुजगावणे उभे करणारी मंडली हीच आहेत,हे विसरून चालणार नाही. असा जोड़ीदार असूनही, अखंड महाराष्ट्राचा जप करणार्े निमूटपणे आपली सत्ता स्थाने संोडत नाहीत,हयाचा अर्थ काय?
"नितीमत्ता, गुणवत्ता, कर्तव्यपरायणता, निस्वार्थता
आणि सहिष्णूता ह्यांची नितांत गरज, कधी नव्हे ती,
आता भासत आहे."
👍"छाप पडलेले शब्द-2 D !":👌
👍" चांंगुुलपणाची गर्भश्रीमंती !":👌
💐 "नुकत्याच पार पडलेल्या t20 वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये भारत विश्वविजयी झाला, ही खरोखर सर्व भारतीयांसाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब होती. त्यामागे खेळाडूंचे जसे योगदान होते त्याचप्रमाणे त्या संघाला घडवणाऱ्या प्रशिक्षक श्री राहुल द्रविड यांचेही समर्थ मार्गदर्शन कारणीभूत होते. त्यानिमित्ताने सर्व टीमला 125 कोटी रुपयांचे बक्षीस आयसीसीतर्फे देण्यात आले. तर प्रशिक्षक द्रविड यांना रूपये पाच कोटी व त्यांच्याबरोबरच्या सपोर्ट देणाऱ्या टीमला प्रत्येकी अडीच कोटी रूपये देण्याचे आयसीसीने ठरवले. परंतु द्रविड यांची थोरवी अशी की, त्यांनी सर्वांना समान बक्षीस द्यावे असे सांगून जास्तीचे रुपये अडीच कोटी नाकारले.अशा तऱ्हेचे चांगुलपणाचे गुण त्यांच्यात पहिल्यापासूनच आहेत हे आपण ध्यानात घेेतले पाहिजे. क्रिकेटची कारकीर्द संपल्यानंतर बहुतेक जण काही ना काहीतरी रूपाने टीमला जोडलेला राहतो आणि त्यामध्ये संघाचे परीक्षक व्हावं ही नेहमी इच्छा असू शकते. पण त्या
पायरीपर्यंत जाण्यापूर्वी द्रविड यांनी विविध मधल्या पायऱ्या ओलांडतच प्रशिक्षण घेत, स्वतःला घडवत, मगच संघाच्या प्रशिक्षक पदाची जबाबदारी स्वीकारली, हे खरोखरच भूषणावर आहे.
अशा तऱ्हेचा निस्प्रुह न्यायीपणा आणि चांगुलपणा खरोखर हल्ली दुर्मिळ होत चाललेला आहे. त्या दृष्टीने सोबतचे वृत्त हे खरोखर प्रत्येकाच्या डोळ्यात कृतज्ञतेचे आनंदाश्रू आणणारे आणि द्रविड यांना मानवंदना करणारे असणार यात शंका नाही. अशा तऱ्हेची सद्गुणी, सज्जन निस्वार्थी माणसे दुर्मिळ होत चालली आहेत, हे दुर्दैवच नव्हे कां? विशेषत: सध्याच्या राजकारणात जे काही आपल्याला प्रताप दिसतात, त्यावरून राजकारण्यांनी या आदर्श पासून धडा घ्यावा अशीच ही घटना आहे.
श्री द्रविड यांना सहर्ष मानवंदना व
मनःपूर्वक शुभेच्छा !":💐
धन्यवाद
श्री सुधाकर नातू
👍"छाप(पड)लेले शब्द !":👌
👍"चाकोरी बाहेरचा धाडसी उपक्रम
!":👌
😜 "सजीवांमध्ये नर आणि मादी किंवा
मनुष्यमात्रांमध्ये स्त्री आणि पुरुष एवढी दोन लिंग आपल्या परिचयाची असतात आणि अजून काही वेगळा प्रकार असू शकतो, याची सहसा दखल घेतली जात नाही. त्या तिसर्या वर्गाला वाळीत टाकल्यासारखी वागणूक पुष्कळदा असते, हे आपण पाहत आलो आहोत.
अशा वेळेला हे धक्कादायक वृत्त नजरेसमोर आले आणि मी अचंबित झालो.
त्या दखल न घेतल्या जाणार्या पारलिंगी (हा शब्दही आगळावेगळा) समूहासाठी काही वेगळे असे करावे हे रुईया
महाविद्यालयासारख्या, (ज्याचा मी देखील कोणी एकेकाळी विद्यार्थी होतो) त्यांनी हे धाडस करावे, हे खरोखर काळापुढचे पाऊल होय. ज्याप्रमाणे कोणी एकेकाळी रधों कर्वे यांनी कुटुंब नियोजनाच्या बाबतीत समाजाचा प्रखर विरोध पत्करून प्रयत्न चालवले, त्याची आठवण झाली. महाराष्ट्राला समाज सुधारणेच्या माध्यमातून काळाच्या पुढे नेणाऱ्या समाज सुधारकांच्या मांदीयाळीच्या परंपरेतील हा प्रयत्न आहे असे वाटते.
काळ झपाट्याने पुढे चालला आहे आणि त्याबरोबरच समाज देखील बंदिस्त वातावरणामधून अधिकाधिक मोकळा होत चालला आहे, हेच या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल !:😜
वेगले छोटे राज्य मागणयामागे भावना विकास हयापेक्षा नवयाने उपलब्ध होणारी सत्ता स्थाने हा स्वार्थ देखिल अगृकृमाने असतो. विकास करणयाची भाषा करून अच्छे दिनचे बुजगावणे उभे करणारी मंडली हीच आहेत,हे विसरून चालणार नाही. असा जोड़ीदार असूनही, अखंड महाराष्ट्राचा जप करणार्े निमूटपणे आपली सत्ता स्थाने संोडत नाहीत,हयाचा अर्थ काय?
"नितीमत्ता, गुणवत्ता, कर्तव्यपरायणता, निस्वार्थता
आणि सहिष्णूता ह्यांची नितांत गरज, कधी नव्हे ती,
आता भासत आहे."
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा