शुक्रवार, १८ जुलै, २०२५
" सोशल मिडियावर मुक्त संचार भाग दोन
सोशल मीडिया म्हणजे कल्पनाशक्तीला पूर्ण वाव देणारी अशी जणू तालीमच. नवीन माहिती नवीन दृष्टिकोन आणि जगामधल्या घटनांची जाणीव आपल्याला सोशल मीडियामुळे एका क्लिकवर मिळू शकते अर्थात त्यासाठी सोशल मीडिया कसा वापरायचा हे महत्त्वाचे असते केवळ टाइमपास असा दृष्टिकोन न ठेवता त्यापासून आपल्याला अधिक सजग होता येईल असा विश्वास ठेवून त्यावर मी मुक्त संचार करत असतो निरक्षर विवेकाप्रमाणे जे जे चांगले उपयुक्त तेथे मी येथे ब्लॉगवर टिपून घेतो.
श्रीकांत पांगारकर यांच्या फेसबुकपेजवरून सविनय पुढील विवेचन घेतले आहे:
इस्राईल चे राष्ट्रपती बेंजामिन नेतन्याहू यांच्या वर्तमान परिस्थितीत भाषणाचे हे मराठीत भाषांतर केलेले संक्षिप्त स्वरूप.. जे यहुदींच्या आत्मकथेचा सारांश समजून देते..
"७५ वर्षांपूर्वी आम्हाला इथे फक्त मरण्यासाठी आणलं गेलं होतं. आमच्याकडे कोणताही देश नव्हता, स्वतःच सैन्य नव्हतं. आणि त्यावेळी आमच्यावर ७ देशांनी युद्ध पुकारलं. आम्ही फक्त ६५ हजार होतो. आम्हाला वाचवायला कुणीही नव्हतं. आम्ही सतत मारले जात होतो. लेबनॉन, सिरिया, इराक, जॉर्डन, इजिप्त, लिबिया, सौदी अरेबिया... कोणालाही आमची दया आली नाही. सगळ्यांनी आमचं नाश करायचं ठरवलं होतं. पण आम्ही काही जण त्यातून वाचलो..
UN ने आम्हाला एक भूमी दिली, जी 65 टक्के वाळवंट होती. पण आम्ही तिला आमचं मानलं. त्या जमिनीला आमच्या रक्ताने पाणी दिलं. आम्ही ती आमची भूमी मानली. कारण आमच्यासाठी तीच सर्वकाही होती. आम्ही सर्वकाही विसरलो नाही. आम्ही स्पेनमधून वाचलो, हिटलरपासून वाचलो, अरबांपासून वाचलो, सद्दामपासून वाचलो, गद्दाफीपासून वाचलो, हमासपासून वाचलो, हिजबुल्लाहपासून वाचलो आणि आम्ही ईराणपासूनसुद्धा वाचू.
आमच्या जेरुसलेमवर आतापर्यंत 52 वेळा हल्ला झाला. 23 वेळा घेरलं गेलं, 39 वेळा उद्ध्वस्त झालं, 3 वेळा पूर्णपणे नष्ट केलं गेलं, 44 वेळा कब्जा करण्यात आलं, पण आम्ही कधीही जेरुसलेम विसरलो नाही. ते आमच्या हृदयात आहे, आमच्या मनात आहे, आणि जोवर आम्ही आहोत, जोवर एक जिवंत यहूदी आहे, तोवर जेरुसलेम आमच्या आत्म्यात राहील.
जगाने हे लक्षात ठेवावं, ज्यांनी आम्हाला नष्ट करायचं ठरवलं, ते आज स्वतः नष्ट झालेत. मिस्त्र, लेबनॉन, बेबिलोन, युनान, सिकंदर, रोमन... कुठे आहेत ते? पण आम्ही अजून आहोत.
आमच्यावर इस्लामने आक्रमण केलं. ते आम्हास नष्ट करू पाहत आहेत. त्यांनी आमचे रिवाज घेतले, आमच्या उपदेशांवर ताबा मिळवला, आमच्या परंपरा घेतल्या, आमच्या पैगंबरचं नावही बदललं. अब्राहमचा इब्राहिम झाला, सोलोमनचा सुलेमान, डेविडचा दाऊद, मोजेसचा मूसा. मग एक दिवस ते म्हणाले, तुमचा पैगंबर आल्याचं आम्ही कबूल करावं. पण आम्ही नाही मान्य केलं. करणार तरी कसं? कारण ती वेळ त्यांच्या येण्याची नव्हतीच! मग आम्हाला मारलं गेलं. आमची शहरे घेतली गेली. यसरब हे शहर मदीना झालं. आम्ही कत्तल झालो, घराबाहेर हाकलले गेलो.
मक्केत काबा मध्ये आम्ही 2 लाख होतो, सगळे मारले गेले. आम्हाला शत्रू ठरवून ठार मारलं गेलं. मग सीरिया, ओमान, इराक, तुर्की… कुठे कुठे नाही. सीरियात 3 लाख, इराकात 2 लाख, तुर्कीमध्ये 4 लाख यहुद्यांना मारण्यात आलं. आम्ही मारले गेलो, सतत. आमची शहरे, आमचा पैसा, आमचे घरं, पशु, इज्जत, आमचं सगळं लुटलं गेलं. पण आम्ही टिकून राहिलो. 1300 वर्षांत कोट्यवधी यहुदी मारले गेले. पण आम्ही पुन्हा उठलो. 75 वर्षांपूर्वी आमच्यावर थुंकलं जायचं, अपमान केला जायचा, मारहाण व्हायची. पण आम्ही आमच्या आत्मविश्वासावर, आमच्या नेतृत्वावर उभे राहिलो.
आज आमच्याकडे स्वतःचा देश आहे. स्वतःचं सैन्य आहे. स्वतःची अर्थव्यवस्था आहे. इंटेल, मायक्रोसॉफ्ट, IBM, फेसबुक… हे सर्व आम्ही उभं केलं. आमचे डॉक्टर औषधे बनवत आहेत, लेखक पुस्तकं लिहित आहेत. हे सगळं मानवतेसाठी आहे.
आम्ही वाळवंट हिरवळीत बदललं. आमचं अन्न, औषधं, उपकरणं, उपग्रह सगळ्यांसाठी आहेत. आम्ही कुणाचे शत्रू नाही. आम्ही कुणाला संपवायची शपथ घेतलेली नाही. आम्हाला कुणाला उध्वस्त करायचं नाही. आम्ही कट करत नाही, आम्हाला फक्त जगायचं आहे. आमच्या देशात, आमच्या जमिनीवर, आमच्या घरात, आदराने...
गेल्या हजारो वर्षांपासून आम्हाला मिटवलं गेलं, पिटाळलं गेलं, कब्जा केलं गेलं. पण आम्ही नाही हरलो, नाही मिटलो. आणि यापुढेही हरणार नाही. आम्ही जिंकू. आम्ही नक्की जिंकू.
3000 वर्षांपासून आम्ही जेरुसलेममध्ये आहोत. आणि आज पुन्हा आम्ही आपल्या देशात – इजरायलमध्ये आहोत. तो आमचाच होता. आमचाच आहे. आणि आमचाच राहील. जेरुसलेम आम्हाला हवं आहे, आणि आम्ही जेरुसलेमचेच आहोत."
.
.
.
हे भाषण म्हणजे केवळ इस्रायली जनतेची गर्जना नाही, तर संपूर्ण यहुदी इतिहासाचं जिवंत स्वगत आहे… आणि ज्यांना हिंदूंच्या हजारो वर्षांच्या यातना ज्ञात आहेत, ज्यांच्या काळजात मातृभूमीचं बारंवार झालेलं विघटन, शक, हूण, मुघल, निजाम, डच, ब्रिटिश अशा क्रूर परकीयांच्या हातून झालेली फाळणी, जुलूम आणि छळ अजूनही दाटून बसले आहेत… ज्यांना धर्म बळकावला गेला, देवस्थानं उद्ध्वस्त झाली, नावं पुसली गेली, संस्कृती पायदळी तुडवली गेली – अशा जखमा आजही कोवळ्या आहेत… त्यांच्यासाठी हा आवाज अगदी ओळखीचा वाटतो..
जसं जेरुसलेम यहुद्यांच्या आत्म्यात आहे, तशीच अयोध्या, काशी, मथुरा आमच्या हृदयात आहे. पाकिस्तानात हरवलेली तक्षशिला, बांगलादेशातील शक्तिपीठ जशोरेश्वरी, अफगाणिस्तानातील नंदनगढचा हिंगलाज माता मंदिर आणि गंधारची संस्कृती, श्रीलंकेतील रामसेतू व अशोकवन, तिबेटमधील कैलास-मानसरोवर, इंडोनेशियातील प्रंबानन मंदिर व जगातील सर्वात मोठं हिंदू मंदिर बोरबुदूर – ही सगळी स्थळं आमच्याही आत्म्यात आहेत, आमच्या संस्कृतीच्या शिरांशात मिसळलेली आहेत..
इस्राईल च्या राष्ट्रपतींचे शब्द फक्त वेगळे आहेत.. भावना मात्र तीच आहे..
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा