बुधवार, २ जुलै, २०२५
" वाचता वाचता वेचलेले भावलेले
👍"वाचता वाचता वेचलेले भावलेले !":👍
💐 "प्रत्यक्षात वास्तव हे असतं की कोणतीही कामगिरी व्यक्ती व परिस्थिती परिपूर्ण नसते ती 100% चांगली व 100% वाईट नसते त्यात चार चांगल्या चार वाईट आणि चार न्यूट्रल आणि अनेक या सर्वांच्या मधल्याही अशा गोष्टी आहेत इंद्रधनुष्याचा अर्क एका स्पेक्ट्रम वर जसे एकामागोमांग एक विविध रंग दिसतात तशीच कोणतीही व्यक्ती व परिस्थिती दोन टोकांच्या मध्ये कुठेही असू शकते चांगल्या वाईटच्या विविध प्रमाणातल्या मिश्रणाच्या स्वरूपात केवळ दोन मीटिंगमध्ये दोन रंगांमध्ये व जगाला स्वतःला व जगाला पान अवास्तववादी आहे आपण सर्वच त्रिमितीय बहुरंगी आहोत पातळ क***** किंवा पांढऱ्या कागदासारखी आपली व्यक्तिमत्व नाहीत ती आहेत विविध रंगांच्या वाकारांच्या फुलदाणी सारख्या त्रिमतीय वस्तूंसारखी परफेक्शन परफेक्शन मधलं हे ब्लॅक अँड व्हाईट थिंकिंग मुळे आपण वास्तवापासून दूर जाऊन स्वतःचेच नुकसान करून घेतो !":💐
# डॉक्टर तेजस्विनी कुलकर्णी
"वाचता वाचता वेचलेले !":
"स्त्री जन्मा ही तुझी कहाणी !":
करियरला प्राधान्य देणाऱ्या महत्त्वाकांक्षी स्त्रीच्या आयुष्यातही एक थांबा असतो मातृत्वाचा आयुष्यात येणारा हा टप्पा अनेकांच्या प्राधान्यक्रम बदलून टाकतो आई झाल्यावर स्त्रीचे आयुष्य पूर्णपणे बदलते तिचे सगळे काही बाळापासून सुरू होते आणि त्याच्या पर्यंत येऊन थांबते त्यामुळे तिची इच्छा असूनही तिला अनेकदा करिअरला बाजूला सारावे लागते तिने करिअर करण्यासाठी थोडीफार धडपड केलीच तरी तिला बऱ्याच गोष्टींना सामोरे जावे लागते तिने त्यावेळी घेतलेले निर्णय समोरच्या लोकांना पट्टाच असे नाही त्यामुळे तिच्या मातृत्वाच्या थांब्यावर अधिक काळ राहावे लागते हे खरे आहे
# चैताली जोशी
######
👍'वाचता वाचता वाचलेले, भावलेले !":👍
💐"मुंबई विषयी कितीही बोललो लिहिलं तरी पुरणार नाही. मुंबईने मला काय दिलं असा जेव्हा मी विचार करतो तेव्हा काही गोष्टी मला प्रकर्षाने इथे सांगाव्याच्या वाटतात. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे मला विविधतेचे दर्शन मुंबईने घडवलं. या शहरान मला सहजीवन म्हणजे काय ते शिकवलं, ज्याला इंग्रजीत आपण Acomodative Tensency म्हणतो ती माझ्या अंगी बाणवली.आपल्याला कधी आयुष्यात एकाकी वाटलं किंवा अचानक आपल्याला अपेक्षित मदत मिळू शकली नाही, तर पर्यायांची भक्कम साखळी या शहरांना मला दिली. सतत माझ्या मागून मुंबई एक सपोर्ट सिस्टीम चालत आलेली आहे, असंच कायम मला वाटत आले आहे. हो, पण असं करताना मी कुणालाही स्वीकारणार नाही हेही मला मुंबईला सांगितलं आहे. त्यामुळे तुमच्या अंगी असलेले गुण, असलेल्या क्षमता, कौशल्य दाखवा आणि या शहराची प्रशंसा घ्या, हे मुंबई मला कायम सांगत आली आहे. मेरिट हे महत्त्वाचं असतं, "चालसे"धोरण कामी येत नाही, हे मुंबईत येऊनच आपल्याला कळतं !":💐
# श्री मकरंद खटावकर
,############
👍"वाचता वाचता वेचलेले भावलेले !":👍
💐 "प्रत्यक्षात वास्तव हे असतं की, कोणतीही कामगिरी व्यक्ती व परिस्थिती परिपूर्ण नसते. ती 100% चांगली व 100% वाईट नसते, त्यात चार चांगल्या चार वाईट आणि चार न्यूट्रल आणि अनेक या सर्वांच्या मधल्याही अशा गोष्टी आहेत. इंद्रधनुष्याच्या एका स्पेक्ट्रमवर जसे एकामागोमाग एक विविध रंग दिसतात, तशीच कोणतीही व्यक्ती व परिस्थिती दोन टोकांच्या मध्ये कुठेही असू शकते. चांगल्या वाईटच्या विविध प्रमाणातल्या मिश्रणाच्या स्वरूपात केवळ दोन मीतींमध्ये दोन रंगांमध्ये स्वतःला व जगाला पाहणे अवास्तववादी आहे.
आपण सर्वच त्रिमितीय बहुरंगी आहोत. पातळ करड्या किंवा पांढऱ्या कागदासारखी आपली व्यक्तिमत्व नाहीत, ती आहेत विविध रंगांच्या आकारांच्या फुलदाणीसारख्या त्रिमतीय वस्तूंसारखी ! परफेक्शनमधलं हे 'ब्लॅक अँड व्हाईट थिंकिंग' मुळे आपण वास्तवापासून दूर जाऊन स्वतःचेच नुकसान करून घेतो !":💐
# डॉक्टर तेजस्विनी कुलकर्णी
##############
👍" बोल अमोल- वाचता वाचता वेचलेले !:👌
👍 " भोगवादाचा सुरू असलेला अतिरेक यामुळे आपण समाधानाचे जगणे विसरून जाऊ की काय असे भय वाटू लागावे अशी परिस्थिती आहे. अशावेळी परस्पर निरपेक्ष प्रेम, श्रद्धा आणि विश्वास यातील त्रिसुत्रीची पेरणी करणे आणि समाधानाचे पीक घेणे आज खरा परमार्थ आहे, हेच खरे अध्यात्म आहे आणि हीच खरी अध्यात्मिकता आहे भोवतालच्या तमसाची तमा न बाळगता प्रकाशाची उपासना करणे आपल्या हाती आहे. सकारात्मकतेने स्नेहाचे दीप उःजळत राहू तर साफल्याची पहाट झाल्याशिवाय राहणार नाही!"👍
# श्री विवेक घळसासी
##@####@######
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा