"टेलिरंजन-६": "प्रेम इतकं कां आंधळं असतं?":
टीवीवरील मराठी मालिकांमधील नायिकांना काय झालंय काही कळत नाही. 'प्रेम आंधळ असतं' हे जरी खरं असलं, तरी बहुतेक मालिकांमध्ये न पटणार्या अशा दोन व्यक्तींमध्ये प्रेमाचे धागे कसेही कुठेही जुळवलेले दिसतात. एक गरिब तर दुसरा श्रीमंत. वास्तवात खरोखर अशक्य आहे, अशाच तर्हेचा हा सगळा प्रेम जुळविण्याचा मामला दिसतो. "कयामत से कयामत तक" किंवा "एक दुजेके लिए" पध्दतीने आई वडीलांचा प्रखर विरोध व त्याच्याशी प्रेमी युगुलाचा सामना, जिथे तिथे टीवीवर आपल्याला पहायला मिळतो."लेक माझी लाडकी" मालिकेचे ह्या संदर्भात ज्वलंत उदाहरण दिसेल. हाँस्पिटलमधील नर्स कस्तुरी, एका हवालदार पोलीसाची लाडकी लेक, तर तिथेच डॉ सौरभ हा तरुण डाँक्टर एका गुंडाचा, भाई प्रतापचा मुलगा. ही दोघं योगायोगाने अशी एकत्र येतात व प्रेमात पडतात. कयामत वाटणारी गोष्ट ही की हा भाई, डॉ. चा बाप, एका एन् काउंटरमध्ये त्या हवालदाराने गोळ्या मारल्याने गेली पंधरा वर्षे हाँस्पिटलमधे कोमात असून, उपचार घेत असतो. सहाजिकच डॉ. ची आई मम्मी व हे कस्तुरीचे वडील ह्यांचा ह्या प्रेमी युगूलाच्या विवाहास प्रखर विरोध ! प्रेम आंधळं असतं, ते हे अस्स!
आता नव्याने सुरू झालेल्या मालिका त्यासाठी विचारात घेऊ.
साधी एका गँरेजमध्ये मोटर मेकॅनिक असलेली, विशेष न शिकलेली मुलगी-चारू, ज्याची मोटार दुरुस्त करते, त्या एका नामवंत शिक्षण संस्थेचा प्रमुख असलेला देखणा असा तरूण नायक सत्यजीत, ज्याने त्याच्या समवेत काम करणार्या एका सुंदर, हुशार तडफदार तरुणीच्या कार्यक्षमतेवर खुष होऊन, थोड्या थोडक्या नाही तर चक्क एक लाख रुपयाचे मनगटी घड्याळ जिला सप्रेम भेट म्हणून दिले आहे, तिच्या प्रेमात कां, कसा म्हणून पडणार, "हे चांदणे शिंपीत जाशी" या मालिकेत पहायला लागणार आहे....
अगदी तशीच गोष्ट, किंबहुना त्याहूनही अतिशयोक्ती वाटावी अशी गोष्ट 'येऊ कशी मी नांदायला" या मालिकेत दिसणार आहे. कुठेतरी चाळीत, अंबरनाथला दोन भाऊ छोट्याशा घरात एकत्र राहणारे आणि त्यातील एकच कमावता. अशा एकत्र कुटुंबातील तशी जाडसर बुटकी मुलगी-स्विटी दिसायलाही तेवढी काही सुंदर व आकर्षक नाही. तिच्या आईच्या मैत्रिणीच्या घरी मुंबईत काय जाते आणि तिथे श्रीमंत असलेल्या त्या मैत्रिणीचा मुलगा आंघोळ झाल्यावर, आपल्या खोलीत नाचत असताना, ही आगाऊ मुलगी दार काय उघडते व त्याला नको त्या अवस्थेत बघते काय आणि तो मुलगा जो खरोखर देखणा आहे, या मुलीच्या प्रेमात काय पडतो हे सारे नवलच. साधा पत्र्याचा डब्बा पोचवण्यासाठी कोणी चक्क, ह्या प्रेमविव्हल नायकासारखी स्वतःची गाडी काढून मुंबईहून लगेच दुसर्याच दिवशी अंबरनाथला जात नाही आणि तिथे गेल्यावर तर त्याचे प्रेम उतूच जाते.
कल्पना करायची म्हणून काय वाटेल ते करणार की काय? काहीतरी सुंदर, मनाला पटेल, रूचेल असे वास्तववादी, कां बरे मालिकांमध्ये दाखवत नाहीत, काहीच न कळे! 'प्रेम आंधळ असतं' त्याला मर्यादा नाही कां?
यावर कडी म्हणजे "ऑनलाइन शुभमंगल" ही मालिका. शंतनु आणि शर्वरी चा ऑनलाईन विवाह झाल्यानंतर त्यांच्या खऱ्याखुऱ्या प्रत्यक्ष विवाह समारंभापूर्वीच्या 'संगीत' मध्ये शंतनूचे पूर्वीचे प्रेमप्रकरण बाहेर काय येते आणि जिच्याबरोबर दोन वर्ष 'लिव्ह ईन' मध्ये तो राहिला, त्या ऐश्वर्याचे प्रेम प्रकरण आता कळलेले असूनही, केवळ म्हातार्या आजारी आत्याआजीचा बुजगावण्यासारखा उपयोग करून शर्वरीला त्यांच्या म्हणजे सदावर्तेंच्या घरी राहण्याचे सुचवले काय जाते आणि तीही ते आनंदाने स्वीकारते काय नवलच ! पुढे ऐश्वर्या आणि शर्वरी एवढे सगळे होऊन कोणीच शंतनुचे प्रेमप्रकरण आत्या आजीला सांगत नाही आणि मालिका उगाचच पुढे पुढे नेली जाते. आपल्या आईचा प्रखर विरोध असूनही आणि ज्या मुलाचे हे असे पूर्वीचे प्रेम प्रकरण आहे ते माहित असूनही शर्वरीसारखी मुलगी आंधळ्यासारखी त्याच्यावर प्रेम काय करते, पटतच नाही. उलट ही मुलगी कां म्हणून स्वतःला संभाव्य धोक्यांत कां घालते, याचेच राहून राहून नवल वाटते.
सगळ्यात कडेलोट झालाय तो म्हणजे "चंद्र आहे साक्षीला" या मालिकेमध्ये! स्वतःचा घटस्फोट झालेला नसूनही केवळ पत्नीला-सुमनला मूल होऊ न शकल्यामुळे व तशी शक्यता पुढे नसल्यामुळे, स्वाती गुळवणीसारख्या कुमारिकेला, ना ना प्रकारच्या क्लुप्त्या करणारा, श्रीधरसारखा बनेल माणूस अनेक उलट सुलट नाटके करत शेवटी तिला आपल्या फशी काय पाडतो आणि तीही आंधळेपणाने त्याच्या जाळ्यात फसत काय जाते ! साराच संतापजनक प्रकार! तिची विधवा आई अशी मूर्ख की, प्रत्यक्ष घटस्फोटाची हातात डीक्री पडलेली नसतानाही, आपल्या मुलीला चोरून महाबळेश्वरला जायला परवानगी काय देते!
अशी ही आंधळ्या प्रेमाने सारासार विचार गमवलेली स्वाती उर्फ श्रीधरसाठी मतलब साधण्यापुरती सुमन, तिथे देवा ब्राह्मणांस समक्ष विवाह काय करते आणि नशिबाने, तिच्या आत्याबाई तिथे आल्यामुळे, पुढचे जे काही नको ते, व्हायचे असते ते होत नाही, हे तिचे व आपलेही नशीबच. हा विवाह जुळवू पाहणाऱ्या शेजारीण माधुरीचा, मोर्चा काढून स्त्रिया निषेध करत, तिच्या तोंडाला काळे काय फासतात! इतके सारे होऊनही स्वातीला आपण खरोखर कुठल्या खड्ड्यात पडत आहोत याची जाण नसावी, ह्याला मर्यादाच नाही.
अशा मतलबी प्रेमाचे नाटक करायचे करायचे म्हणजे किती, तर खोट्या बनवलेल्या बायकोच्या तोंडून श्रीधर ती घटस्फोटाला विरोध करणार नाही, असा आश्वासनाचा प्रसाद तिने दिल्याबरोबर, ताबडतोब स्वातीचा होणारा
ग्रुहप्रवेश आणि त्यानंतर त्या दोघांचे मिलन, हा प्रकार खरोखर खळबळजनक असाच आहे. स्वाती लायब्ररीची नोकरी संपल्यानंतर संध्याकाळी घरी जायच्या ऐवजी इकडे येऊन श्रीधरला आपले सर्वस्व अर्पण काय करते, ह्याला काय म्हणायचे? हे सगळे असेच व्हावे म्हणून श्रीधरची बायको उर्फ खोटी बहीण घराबाहेर काय राहते, सगळंच अक्षरशः उद्वेगजनकच. खरं म्हणजे आत्या बाईचा अचानक या सगळ्या नाट्यात होणारा प्रवेश, हे प्रकरण वेळोवेळी उघडकीला आणून, काय योग्य आणि काय अयोग्य याची जाणही ह्या मायलेकीना करून देत असते. तरी दोघींना काहीच त्याची फिकीर नसते. सरोगेट मदर घेऊन संतती निर्माण करणे परवडत नसल्याने, श्रीधर आणि सुमन यांचा हा जो काही अघोरी आणि अपराधजन्य असा खेळ चाललाय, तो खरोखर आपल्या समाजाची एकंदर नीतिमत्ता कशी खालावत चालली आहे ते दाखवणारा आहे.
मुद्दा असा आहे की छोट्या पडद्यावर आदर्श असे काही दाखवण्याऐवजी, गुन्हेगारी अपराधी पद्धतीचे हे प्रकार उघड उघड दाखवणे, कितपत संयुक्तिक याचा गांभीर्याने विचार करायची वेळ आली आहे. तुम्हाला फ्रीहँड दिला आहे, सेन्सॉर वगैरे काही नाही म्हणून निर्माते व वाहिन्या किती स्वातंत्र्य घेणार आणि एकंदर अयोग्य असे दाखवणार, ह्याला काही मर्यादा? इथे स्वाती खरं म्हणजे एवढी काही घोडनवरी नाही आणि तरी तिला विवाह आणि विवाहानंतरच्या सुखाची वेड्यासारखी ओढ लागणे, हेही वास्तवात पुष्कळच अशक्य वाटते. शेवटी 'प्रेम आंधळ असतं' आणि बहुतेकजण असे अविचारी आंधळे प्रेम करून शेवटी पस्तावतात दुसरं काय! या मालिकेतही स्वातीबद्दल कुठल्याही प्रकारची सहानुभूती वाटत नाही कारण एकंदर तिचं वागणं पटतच नाही.
"श्रीमंत घरची सून" या मालिकेत तर अनन्या एका उद्योगपतीची मुलगी, त्याच्याच कंपनीत काम करणाऱ्या अथर्वच्या प्रेमात वेड्यासारखी पडते आणि त्याच्या मागे अक्षरशः हात धुवून लागते. त्याच्या आईचा, तिच्या आईने केलेला अपमान तसेच त्याच्या आईला घरी, श्रीमंत घरची मोठी सून आणि तशीच श्रीमंत घरची जाऊ लाभल्यामुळे खुप वाईट अनुभव आलेला असतो. सहाजिकच, तिला एखाद्या मध्यमवर्गीय मुलीशीच आपल्या मुलाचा विवाह व्हावा असे वाटत असते. दुसरीकडे, श्रीमंत अनन्याच्या आईला त्यांच्या तोलामोलाचा असलेला विक्रांत जावई म्हणून योग्य वाटतो. हे सारं असूनही अथर्व आणि अनन्या यांचं प्रेम जुळतं, हा देखील अशक्य असा योगायोग.
वास्तवाची खरी बाजू एकदा कळल्यावर शहाण्यासारखं न वागता, अनन्या कुठल्या थराला जाते हे आपण दररोजच्या भागात बघत आहोत. बिचारा अथर्व सध्या कोंडीत सापडलेला आहे. त्याचेही जरूर तिच्यावर प्रेम आहे, परंतु या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्या ज्येष्ठांचा, या लग्नाला विरोध असताना आपण पुढे जाऊ नये हे त्याला वाटणे साहजिक असते. पण ते मान्य न करता अथर्वने काहीही करून, आपला स्वीकार करावा यासाठी अनन्या अक्षरशः आकाश पाताळ एक करत असते. एकतर्फी प्रेम करणाऱ्या वेड्या प्रेमवीर कथा ऐकल्या, पाहिल्या. परंतु इथे तसाच प्रकार अनन्या करते की काय असेच तिचे बेभान ताळतंत्र सोडलेले वागणे आहे. "प्रेम आंधळ असतं" याचं हे ज्वलंत उदाहरण.
"उबग आणणारा पोरखेळ!"
"माझा होशील ना!" ह्या मालिकेत दादामामा आजारी पडल्यापासून सुरु झालेला, आदित्य व सई ह्यांचा एकमेकांवरील प्रेमाचा लपंडाव, काही केल्या संपता संपतच नाही. जोडीला डॉ सुयश व मेघना ह्यांच्या अधूनमधून लुडबुडण्याने, प्रेमाचा त्रिकोण की, चौकोनाचा पोरखेळ, किती लांबवत न्यायचा ह्यावर काही धरबंधच उरलेला नाही. अक्षरशः उबग आला ह्या मालिकेचा आणि प्रेमाच्या तमाशाचा.
"प्रेम आंधळ असतं" हे केवळ तरुणांच्या बाबतीत खरं नाही, तर चक्क लग्न झालेला तरुण मुलगा असूनही "अग्गबाई सासुबाई" मधली विधवा आसावरी, शेफ व स्वतःचे हाँटेल असलेल्या अभिजीत राजेंच्या प्रेमात आंधळ्यासारखी पडून चक्क विवाह काय करते आणि हे न पटल्यामुळे लाडका लेक बबड्या पुढे काय काय नको ते कारनामे करतो ! आपल्याला आता खरं म्हणजे सार्या पोरखेळाचा कंटाळा आलेला आहे. मालिका चालवायची म्हणून काहीही करायचं याला मर्यादा नाही, हेच ही मालिका दाखवते.
न पटणार्या अशा अनेक गोष्टी या मालिकेत आहेत समजा त्या विधवा बाईचा एकंदर जीवनात कठीण असा काळ असता, तिला कोणी नीट वागवत नसते किंवा एकंदरच तिच्या जीवनामध्ये नैराश्य यावे अशी कौटुंबिक स्थिती असती तर कदाचित त्या बाईने तरुण मुलगा असूनही नंतर आपल्या विवाहाचा विचार केला असता तर थोडे पटले असते. पण तसे पटणारे कोणतेही संयुक्तिक कारण काहीही नसताना, तिची सूनच पुढाकार घेऊन या घोड नवरी आणि नवर्याचं सूत जुळवण्यात हातभार लावते हाही प्रकार अशक्य कोटीतलाच.
मालिकांमध्ये शेवटी अशक्य तेच दाखवायचं किंवा जे मनाला पटणार नाही तेच पुढे आणायचं, जे कायद्याला पटणार नाही अशा विवाहबाह्य संबंधांना "माझ्या नवऱ्याची बायको", वा "आई कुठे काय करते" सारख्या मालिकांतून किती लांबवत काय न्यायचं, याला काहीही मर्यादा उरलेली नाही. वेळ आली आहे ती T20 सामन्यांप्रमाणे, ठराविक मर्यादित भागांच्या मालिकांची. आधीच संपूर्ण कथानक जसे नाटक सेन्सॉर बोर्डाकडून मान्यता घेऊन, नंतरच रंगभूमीवर आणली जातात त्याच प्रमाणे दूरदर्शन वरील मालिकांनाही तोच न्याय लावला जावा. कारण नाही तर आधीच समाज रसातळाला चालला आहे, या अशा अश्लाघ्य करमणुकीच्या खेळांमुळे पुढे काय भयानक परिणाम समाजात होतील याचा कोणीतरी आता तरी विचार करायला हवा.
शेवटी आपण हेच म्हणायचं:
"प्रेम इतकं कां आंधळं असतं?":
धन्यवाद
सुधाकर नातू
ता.क.
I have you tube channel:
moonsun grandson
With over 50 videos uploaded so far and its link is:
https://www.youtube.com/user/SDNatu.
लिंक उघडून विडीओज् पहा......
आवडले, तर लिंक शेअरही करा........

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा