"गेले ते दिन गेले !":
"होम मिनिस्टर": 'सासूबाई लै भारी':
गेली सोळा वर्षे 'होम मिनिस्टर" हा कार्यक्रम निश्चितच एक कौटुंबिक जिव्हाळ्याचा सुखसंवाद घरोघरी साधत आहे. लाँकडाऊनच्या काळातही online पद्धतीने तो सुरु ठेवण्याची संकल्पना खरोखर स्तुत्य आहे, ह्यात काही शंकाच नाही. मीही शक्य असेल, तेव्हा तेव्हा "होम मिनिस्टर" हा कार्यक्रम नेहमी पहात आलो आहे. पण त्या संकल्पनेचा "सासूबाई लै भारी' म्हणत इतका अतिरेक केला गेला की शेवटी होम मिनिस्टर कार्यक्रमाचा उबग आला.
पण "पुढच्यास ठेच मागचा शहाणा" असे व्हायचे सोडून होम मिनिस्टरची मानलेली भावंडे "सून सासू सून", "सख्खे शेजारी" स्पर्धक वाहिन्यांनी छोट्या पडद्यावर आणली ! हल्ली जसा हास्याच्या जत्रेचा काँमेडी बिमेडी प्रमाणे ऊत आणला जातोय वा डान्स डान्स करत छोट्या पडद्यावर न्रूत्यांचा तांडव सुरू झाला आहे, तसंच आता हे असले सो काँल्ड कौटुंबिक जिव्हाळ्याचे खेळ आता उच्छाद मांडून प्रेक्षकांचे डोके खाणार. आधीच "ठुकरटवाडीच्या दररोजच्या रात्रीच्या तमाशांतील कानठळ्या बसवणार्या ढोलांनी, कानाला दडे, डोळ्यांना झापडे लावत डोक्यांचा अक्षरशः भूगा केला आहे. आता त्यांत ही जागोजागीच्या हौशी कलावंतांची अदाकारी !
मात्र "अग्गबाई सासूबाई" ह्या सुरुवातीला घरोघरी लोकप्रिय झालेल्या, (पण आता निश्चितच कशीही भरकट चाललेल्या) मालिकेचे प्रमोशन करण्यासाठी "होम मिनिस्टर" मध्ये "सासूबाई लै भारी" ही कल्पना, आता अक्षरशः कंटाळवाणी आणि निरर्थक होत चालली आहे.
सहाजिकच "अग्गबाई...मालिका व ही 'सासूबाई लै भारीगिरी' जितकी लौकर बंद होईल तर
"ईडीयट बाँक्स" 'काही ही, हं', म्हणायची वेळ येणार नाही.
# "चारोळी":
"अग्गबाई, सासूबाई !"
"नक्को ग बाई, नक्को ग बाई",
"पुरे ग बाई, पुरे ग बाई",
"ऐक ग बाई, ऐक ग बाई":
# मराठी मालिकांमध्ये, पात्रांमधील संवादांपेक्षा, पदोपदी येणारे उच्चारवांतील पार्श्वसंगीत रसभंग करते. हा अनावश्यक वाद्यमेळा टाळणे योग्य ठरेल.
# बहुतेक सर्वच मालिका लौकरच,
अर्थहीन होत जातात. त्यामुळे वाटते,
जेव्हां ही ईडीयट बाँक्स नव्हती,
तेव्हा आपण अधिक सुखी होतो!
हल्ली बहुतेक सर्वच मालिका चक्क कसाही टाईम पास करून प्रेक्षकांच्या सहनशक्तीचा अंत पहात आहेत. जोपर्यंत काही खिळवून ठेवणारे दाखविता येत नसेल तोपर्यंत त्यांनी सुट्टी घ्यावी!
ह्या शिवाय मालिकांमधून घरगुती करमणूक करण्याच्या नांवाखाली नितीमत्ता व प्रचलित कायदे ह्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत खलनायकी गुन्हेगारीचे विश्वरूप दर्शन घडवत प्रेक्षकांना (बि)घडवण्याचे महान समाजकार्य करण्याचे व्रत ईमाने ईतबारे पार पाडले जात असते, ते वेगळेच ! करणार काय, ना इथे कुणाचा अंकुश, ना कायद्याचा बडगा. मग अंगांत वारे भरून कसेही मोकाट सुटायचे.
उदाहरणे: ""चंद्र आहे साक्षीला" मालिकेत जे बनवा बनवीचे पोरखेळ चाललेत, त्यामुळे मालिकेला
"अशी ही फसवा फसवी" हे नांव देणे श्रेयस्कर.
# "कसेही, काहीही"!:
बहुतेक मालिकांमध्ये सहसा काहीच घडत नाही, नुसता कसाही टाईम पास केला जातो. मध्येच केव्हातरी जरा झटका देतात इतकेच!
कशाला हे असे कसेही, काहीही पाहिले जाते?
# छोट्या पडद्यावर जाहिरातींचा सातत्याने पडणारा मुसळधार पाऊस, प्रेक्षकांना इतका ओलाचिंब करतो की त्याला मूळ कार्यक्रम पहाताना डोके गहाण ठेवल्यासारखे होते. दूरचित्रवाणी वाहिन्या ह्याचाच फायदा घेत आपला व्यवसाय वाढवत रहातात.
# "गेले ते दिन गेले":
कुठे गेले ते सोनेरी चंदेरी भरगच्च करमणुकीचे शानदार दिवस? प्रतिभा आणि प्रतिमा, नक्षत्रांचे देणे, गजरा, मिश्कीली, फुल खिले है गलशन गुलशन, नाट्यावलोकन, ज्ञानदीप इ.इ. सारखे दर्जेदार काव्य शास्त्र विनोद नाट्य ह्यांनी रसिकांना आनंद देणारे कार्यक्रम. तेव्हा आजच्यासारखा अनंत वाहिन्यांचा सुळसुळाट नव्हता. सहाजिकच सध्याची संख्यात्मक वाढ, गुणात्मक मात्र दुष्काळ अशी परिस्थिती होणे, हे दुर्दैव म्हणायचे. वाढता चंगळवाद, वेगाने बदलत जाणारी एकत्र कुटुंब ते न्युक्लिअर कुटुंब ते सिंगल पेरेंट कौटुंबिक नाती विस्कळीत, जीवघेणी स्पर्धा व जीवनसंघर्ष आणि नितीमत्तेचा बोजवारा ह्यामुळे एकंदरच घडी विस्कटत असताना दुसरे काय होणार?
अशीच..
"कल्पनांची भरारी,
विचारांची हुशारी,
आणि....
शब्दांची खुमारी!....
वैविध्यपूर्ण.... बहारदार....
अंतर्मुख करणार्या लेखांसाठी.....
माझ्या ब्लॉगची
ही लिंक उघडा......
https://moonsungrandson.blogspot.com
लेख आवडले तर...
लिंक शेअरही करा.....
वैविध्यपूर्ण उत्तमोत्तम विडीओज् पहाण्यासाठी":
माझ्या you tube वरील
moonsun grandson
चँनेलची ही लिंक उघडा........
https://www.youtube.com/user/SDNatu
ताबडतोब save देखील करुन ठेवा......
विडीओज् आवडले तर लिंक शेअरही करा....
"देव माणूस" मालिकेत तर एक साधा कम्पाँऊंडर असलेला सिरीयल कीलर डॉक्टर अजीतकुमार बनून खूनांमागून खून अगदी थंड डोक्याने, बेगुमानपणे बिनदिक्कत करत रहातो आणि त्याच्या केसालाही (आतापर्यंतच्या भागापर्यंत) जराही धक्का लागत नाही, ह्याला काय म्हणायचे?
# "मालिंकांचे असेही नामांतर !":
"चंद्र आहे साक्षीला" मालिकेचे
"अशी ही फसवा फसवी !"
"माझा होशील ना?": मालिकेचे
"प्रेमाचा खेळखंडोबा !"
किंवा
"प्रेमाचा सावळागोंधळ !"
"देव माणूस": मालिकेचे
"छुपा रुस्तुम !":
"सुंदरा मनामध्ये भरली": मालिकेचे
"वजनदार' प्रेमकहाणी !":
"फुलाला सुगंध मातीचा": मालिकेचे
"कजाग सासू, नाठाळ सून !":
किंवा
"अबोल ही प्रेमकहाणी !":
"आँनलाईन शुभमंगल":मालिकेचे
"गुंतता, ह्रदय हे !":
किंवा
"अशीही लिव ईन् रिलेशनशिप !":
" रंग माझा वेगळा": मालिकेचे
"अमावस्या, झाली पौर्णिमा !:
..........
......... .. . ...
तुम्ही पहात असलेल्या उरलेल्या मालिकांचेही
नामांतर करायचा प्रयत्न करा बरं !
"चंद्र आहे साक्षीला" मालिकेचे
"अशी ही फसवा फसवी !"
"माझा होशील ना?": मालिकेचे
"प्रेमाचा खेळखंडोबा !"
किंवा
"प्रेमाचा सावळागोंधळ !"
"देव माणूस": मालिकेचे
"छुपा रुस्तुम !":
"सुंदरा मनामध्ये भरली": मालिकेचे
"वजनदार' प्रेमकहाणी !":
"फुलाला सुगंध मातीचा": मालिकेचे
"कजाग सासू, नाठाळ सून !":
किंवा
"अबोल ही प्रेमकहाणी !":
"आँनलाईन शुभमंगल":मालिकेचे
"गुंतता, ह्रदय हे !":
किंवा
"अशीही लिव ईन् रिलेशनशिप !":
" रंग माझा वेगळा": मालिकेचे
"अमावस्या, झाली पौर्णिमा !:
..........
......... .. . ...
तुम्ही पहात असलेल्या उरलेल्या मालिकांचेही
नामांतर करायचा प्रयत्न करा बरं !
# "कसेही, काहीही"!:
बहुतेक मालिकांमध्ये सहसा काहीच घडत नाही, नुसता कसाही टाईम पास केला जातो. मध्येच केव्हातरी जरा झटका देतात इतकेच!
कशाला हे असे कसेही, काहीही पाहिले जाते?
# छोट्या पडद्यावर जाहिरातींचा सातत्याने पडणारा मुसळधार पाऊस, प्रेक्षकांना इतका ओलाचिंब करतो की त्याला मूळ कार्यक्रम पहाताना डोके गहाण ठेवल्यासारखे होते. दूरचित्रवाणी वाहिन्या ह्याचाच फायदा घेत आपला व्यवसाय वाढवत रहातात.
# "गेले ते दिन गेले":
कुठे गेले ते सोनेरी चंदेरी भरगच्च करमणुकीचे शानदार दिवस? प्रतिभा आणि प्रतिमा, नक्षत्रांचे देणे, गजरा, मिश्कीली, फुल खिले है गलशन गुलशन, नाट्यावलोकन, ज्ञानदीप इ.इ. सारखे दर्जेदार काव्य शास्त्र विनोद नाट्य ह्यांनी रसिकांना आनंद देणारे कार्यक्रम. तेव्हा आजच्यासारखा अनंत वाहिन्यांचा सुळसुळाट नव्हता. सहाजिकच सध्याची संख्यात्मक वाढ, गुणात्मक मात्र दुष्काळ अशी परिस्थिती होणे, हे दुर्दैव म्हणायचे. वाढता चंगळवाद, वेगाने बदलत जाणारी एकत्र कुटुंब ते न्युक्लिअर कुटुंब ते सिंगल पेरेंट कौटुंबिक नाती विस्कळीत, जीवघेणी स्पर्धा व जीवनसंघर्ष आणि नितीमत्तेचा बोजवारा ह्यामुळे एकंदरच घडी विस्कटत असताना दुसरे काय होणार?
"कालाय तस्मैन् नमः" म्हणायचे व गपगुमान जे जे होईल ते व जे जे दाखविले जाईल ते बघून गोड मानायचे....
धन्यवाद
सुधाकर नातू
ता.क.
धन्यवाद
सुधाकर नातू
ता.क.
अशीच..
"कल्पनांची भरारी,
विचारांची हुशारी,
आणि....
शब्दांची खुमारी!....
वैविध्यपूर्ण.... बहारदार....
अंतर्मुख करणार्या लेखांसाठी.....
माझ्या ब्लॉगची
ही लिंक उघडा......
https://moonsungrandson.blogspot.com
लेख आवडले तर...
लिंक शेअरही करा.....
वैविध्यपूर्ण उत्तमोत्तम विडीओज् पहाण्यासाठी":
माझ्या you tube वरील
moonsun grandson
चँनेलची ही लिंक उघडा........
https://www.youtube.com/user/SDNatu
ताबडतोब save देखील करुन ठेवा......
विडीओज् आवडले तर लिंक शेअरही करा....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा