गुरुवार, १४ जानेवारी, २०२१

"मोबाईल एक, कल्पना अनेक-४":

 मोबाईल एक, कल्पना अनेक-४":


"माझं पान फेसबुक":
# "अशी ही सोय व असा हा शोध !":
"स्मार्ट फोनमध्ये बोललेले लगेच शब्दात रुपांतर करण्याची सोय आहे. मी विस्रुत लेखन ह्याच पद्धतीने करत होतो. वेळ जसा वाचतो, तसंच मनातले बरोब्बर कागदावर अवतरते आणि तेही तत्परतेने !

लाँकडाऊनचे गेले आठ नऊ महिने तर ह्या माझ्या सवयीचा अतिरेक होऊन मी अनेक videos audios बनवणे व बोलून लेखांमागूश लेख लिहीण्यात अतोनात माझ्या आवाजाचा वापर केला. त्याचा विचित्र दुष्परिणाम माझा आवाज, जवळ जवळ बोलताच न येण्याइतका बसण्यात झाला.

ती चूक मी टाळणे नितांत आवश्यक आहे. अशा वेळी मला "बोलणे ते मजकूर" ही सोय वापरता येणे अशक्य व अयोग्य आहे. तेव्हा एक असा अनोखा शोध लागावा की मला स्फूर्ती आल्यावर मनातले बोल जणु एखाद्या प्रगत Blue tooth द्वारे मोबाईल स्क्रीनवर मजकूर रूपाने अवतारावे ! कधीकधी मला झोपेतही पहाटे नवनव्य कल्पना व विचार सुचतात, त्यावेळी तर असा शोध म्हणजे
"सोनेपे सुहागा !"

"गरज, ही शोधांची जननी असते", त्यामुळे कुणास ठाऊक असा शोध कधी ना कधी लागेलही !
---------------

# सगळीकडे, आरोग्य व्यवस्थेचा बाजार मांडला जात असताना, फँमिली डॉक्टर ही संकल्पना इतिहासजमा होताना दिसत आहे. वैयक्तिक तसेच कौटुंबिक स्वास्थ्यासाठी ते अत्यंत घातक आहे.

# "बस" चुकली?:

निष्कलंक चारित्र्य हा सार्वजनिक जीवनात प्रवेश व वावर करण्यासाठी प्रमुख निकष असणे अत्यावश्यक आहे. नितीमत्ता व प्रचलित कायदा ह्यामधील दरी जोपर्यत मिटत नाही, तोपर्यत सार्वजनिक जीवनातील तथाकथित नेते सत्ता सहजासहजी सोडणे अशक्य. 

सत्तेवर आल्यावर ताबडतोब, प्रखर 'सर्जिकल स्र्ट्राईक' ची खरी गरज व प्राधान्य तो कुणावर करायचा, हे जाणून, प्रथम कामचुकार, भ्रष्टाचाराने बरबटलेल्या व्यवस्थेवर व यंत्रणेवर तो ताबडतोब करणे नितांत आवश्यक होते. दुसरा क्रमांक भयकारी गतीने वाढणार्या गुन्हेगारीवर तसाच आघात करुन, शीघ्र गतीने सर्व स्तरावरील देशातील व परदेशांत लपून बसलेल्या, गुन्हेगारांना कडक शासन सत्वरतेने होत आहे, हे दिसायला हवे होते. तसे जर खरोखर घडते, तर 'अच्छे दिन'चे झुंजूमुंजू होण्याचे समाधान जनतेला आतापर्यंत मिळाले असते. 'Good Governance' करण्याचा प्रामाणिक प्रयत्न होताना दिसला असता.
----------/---

# ✍✍
*जिवाला स्पर्श करणारा*
*सुविचार*
" *वेळ*, *तब्बेत* आणि *नाती* ह्या अशा तीन गोष्टी आहेत की, त्यांना किंमतीचे लेबल नसते. "पण"ह्या हरवल्या की समजते, त्यांची किंमत किती मोठी असते*

# "यक्षप्रश्न !"
"इकडे" 'आड', तर "तिकडे" 'विहीर' आणि
"बाहेरचे" 'दरवाजे' केव्हापासून बंदच !
दिवसेंदिवस समस्यांमागून समस्याच समस्या, ही स्थिती कोण, कधी केव्हा व कशी मार्गावर आणणार ??

# "तीळगुळाची गोडी":
'तशी, ही जोडगोळी'

# "सारीपाट":
माणसाच्या जाणीवांचे विश्व विस्तारत सम्रुद्ध होत असते ते प्रामुख्याने तीन गोष्टींमुळे: एक वाचलेली पुस्तके, दोन आयुष्यात येणारी माणसे आणि तिसरी गोष्ट अवघडलेपणाचे प्रसंग! शेवटी जीवन म्हणजे आंबट गोड अनुभवांचा सारीपाटच तर असते!!
-----------/-/-----

# आता सोशल मिडीयावरील एक विचार करायला लावणारी पोस्ट-अर्थात संदेश:
"*म्हातारपणाची सर्व लक्षणं समजून घ्या आणि ठरवा कि तुम्ही किती म्हातारे झाला आहात* 😄

मित्र बोलावत आहेत परंतु तुम्हाला जावस वाटत नसेल, तर समजा तुम्ही म्हातारे झाला आहात.

मस्त मौजमस्ती करणार्या लहान मुलांवर कारण नसताना चिडलात तर समजा तुम्ही म्हातारे झाला आहात. 👊

रेडिओ वर सुमधूर गीतांचा कार्यक्रम चालू आहे आणि डोक्याला बाम लावासा वाटत असेल तर समजा तुम्ही म्हातारे झाला आहात. 👊

धमाल मस्तीचा सिनेमा सुरू आहे आणि तुम्ही टिका करायला सुरुवात करता तर समजा तुम्ही म्हातारे झाला आहात. 👊

मस्त मजेत मैफिल चालू आहे आणि तुम्ही सल्ला द्यायला सुरुवात करता तर समजा तुम्ही म्हातारे झाला आहात. 👊

नवीन कपडे खरेदी करायची इच्छा होत नसेल तर समजा तुम्ही म्हातारे झाला आहात. 👊

तरूणांच्या कपड्यांवर वारंवार टिपण्या करीत असाल तर समजा तुम्ही म्हातारे झाला आहात.

फुलांवर भ्रमर बघून राॅमेंटिक गीत आठवत नसेल तर समजा तुम्ही म्हातारे झाला आहात. 👊

रेस्टॉरंटमध्ये जाऊन घरच्या अन्नाची स्तुती करायला लागलात तर समजा तुम्ही म्हातारे झाला आहात. 👊

बेफिकीरी सोडून डोक्यावर चिंतेच्या टोपल्या ठेवायला लागलात तर समजा तुम्ही म्हातारे झाला आहात. 👊

पावसात भिजायचा आनंद सोडून छत्री आठवत असेल तर समजा तुम्ही म्हातारे झाला आहात. 👊

ग्रुप मधे आलेल्या सर्व पोस्टना कंटाळला असाल तर समजा तुम्ही म्हातारे झाला आहात.

आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही ग्रुपवर कांही पोस्ट टाकत नसाल, तर तुम्ही नक्की म्हातारे झाला आहात.

-------------------------
आता सोशल मिडीयावरील ही उद्बोधक गोष्ट:

# *एकदा राजाने ब्राह्मणाला अचानक तीन प्रश्न विचारले.*
१) ईश्वर कुठे राहतो ?*
*२) ईश्वर कसा मिळेल ?*
*आणि*
*३) ईश्वर काय करतो ?*

*अचानक हे प्रश्न ऐकून ब्राह्यण गडबडून गेला व म्हणाला या प्रश्नांची उत्तरे मी उद्या विचार करून देतो.*

*ब्राह्यण घरी पोचला तेव्हा खुप उदास होता. ती उदासी पाहून त्याच्या मुलाने विचारले असता, ब्राह्यण म्हणाला ''मुला आज महाराजांनी मला एकावेळी तीन प्रश्न विचारले आहेत. त्याची उत्तरे मला सुचत नाहीत व उद्या त्याची उत्तरे द्यायची आहेत.*

*ब्राह्यणाच्या मुलाने म्हटले ''पिताजी उद्या मला दरबारात घेवून चला, महाराजांना मी त्याची उत्तरे देईन. पुत्रहट्ट बघुन ब्राम्हण दुसऱ्या दिवशी त्याला दरबारात घेवून गेला. ब्राह्यणाला पाहून महाराजांनी म्हटले काल विचारलेल्या माझ्या प्रश्नांची उत्तरे दे.*

*ब्राह्यण म्हणाला "महाराज आपल्या प्रश्नांची उत्तरे माझा मुलगा देईल "महाराजांनी मुलाला पहिला प्रश्न विचारला ''सांग, ईश्वर कुठे राहतो?"*

*मुलाने विनंती केली की, महाराज, एक पेला दूध - साखर घालून आणा. दुध आणल्यावर मुलाने विचारले महाराज दूध कसे आहे महाराजांनी दूध चाखले व म्हणाले गोड आहे.*

*परंतु महाराज यात साखर दिसते का ? महाराज म्हणाले नाही कारण ती दुधात विरघळून गेली आहे. बरोबर महाराज!*

*तसा ईश्वर सुद्धा जगात सर्व ठिकाणी आहे पण जशी साखर दुधात विरघळली आहे तसा ईश्वर सगळीकडे चराचरातअसून तो दिसत नाही.*

*महाराज आनंदीत होवून म्हणाले मग सांग ईश्वर कसा मिळतो ? मुलगा म्हणाला*
*''महाराज थोडे दही मागवाल का?''महाराजांनी दही मागवले. मग ब्राह्यण पुत्र म्हणाला ''महाराज! यात लोणी दिसतो का? "महाराज म्हणाले "लोणी तर यात आहे पण मंथन केल्यावरच मिळेल" ब्राह्यण पुत्र म्हणाला "महाराज देवाचेही असेच आहे. त्यासाठी मंथन- साधना-तपश्चर्या करावीच लागेल,*

*मंथुनी नवनीता।*
*तैसे घे अनंता।।*

*"महाराज खुश झाले व म्हणाले "आता अंतिम प्रश्न, ईश्वर काय करतो?"*

*ब्राह्यण पुत्र म्हणाला महाराज! यासाठी आपल्याला मला गुरु म्हणून स्विकारावे लागेल'' महाराज बोलले - ''ठीक आहे, तुम्ही गुरू व मी तुमचा शिष्य'' पुत्र म्हणाला - ''महाराज गुरू तर उच्चासनावर बसतात व शिष्य खाली बसतो" महाराजांनी सिंहासन खाली केले व स्वतः खाली बसले. ब्राह्यण पुत्र स्वतः सिंहासनावर् बसला व म्हणाला "हे आपल्या अंतिम प्रश्नाचे उत्तर आहे" महाराज म्हणाले "म्हणजे काय? मी समजलो नाही".*

*बालक म्हणाला- ''महाराज ! ईश्वर हेच तर करतो, त्याने ठरविले तर तो क्षणात राजाचा रंक व रंकाचा राव करतो.*

*तुका म्हणे नोहे*
*काय त्या करिता!*
*चिंतावा तो आता विश्वांभर!*
*"दुखी"रहना है तो, सब मे कमी खोजो,*
*और*
*"प्रसन्न" रहना है, तो सब मे "गुण" खोजो.!*

*विचारों को पढ़कर*
*बदलाव नही आता है,*

*विचारों पर चलकर ही*
*बदलाव आता है...*
*...एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा*
*एक "व्यक्तिमत्व" म्हणून जगा !*
*कारण, व्यक्ती कधी ना कधी संपते,*
*पण व्यक्तिमत्व मात्र सदैव जिवंत राहते*..
🙏🌹 🌹🙏

ज्या अनामिक लेखकांनी हे दोन संदेश लिहिले त्यांचे आभार व त्यांना सलाम.

धन्यवाद
सुधाकर नातू

ता.क.
वैविध्यपूर्ण उत्तमोत्तम विडीओज् पहाण्यासाठी": माझ्या you tube वरील moonsun grandson चँनेलची ही लिंक उघडा........ https://www.youtube.com/user/SDNatu ताबडतोब save देखील करुन ठेवा...... विडीओज् आवडले तर लिंक शेअरही करा....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा