"बहरला पारिजात दारी":
आमच्या लहानपणी ज्या घरामध्ये आम्ही रहायचो, ते घर म्हणजे एक मजली टुमदार कौलारू चाळ होती. प्रत्येकाच्या घरासमोर छोटेसे छान अंगण बनवण्याजोगी मोकळी जागा होती. माझा मामा कोकणातला असल्यामुळे, त्याने तिथे चांगली जागा बनवून अंगण छान सपाट करून घेतले होते. भोवताली अनेक फुलझाडे, वेली त्याने लावल्या होत्या.
तिथेच एका बाजूला पारिजातकाचे झाड त्याने लावले होते. शिवाय अंगणात बसायला त्याने एक बैठा ओटाही बनवून घेतला होता. विशेषतः पुष्कळदा सकाळी आम्ही त्या ओट्यावर बसायचो आणि पारिजातकाच्या फुलांचा सडा पडलेला असायचा. लाल चुटूक देठं आणि कोवळ्या पांढऱ्याशुभ्र टवटवीत पाकळ्यांचा तो फुलांचा ताटवा आणि त्याच्या मंद सुगंधाचा दरवळ आसमंत व आमची मनं आनंदाने प्रसन्न करून जायचा.
आपोआपच ते मधुर प्रेमगीत मनामनात गुंजारव करायचे:
"बहरला पारिजात दारी, फुले कां पडती शेजारी !"
एकंदर तो अनुभव न विसरण्याजोगाच, त्यामुळे मिळणारे समाधान व आनंद शब्दातीत आहे. ते मोजकेच अवघ्या चरचराशी तादात्म्य पावल्याचे मनपसंत बहारीचे क्षण कायमचे पकडून ठेवावेत असेच. आज अचानक त्यांची आठवण व्हायला, अशाच तर्हेचे अनेक क्षण आपल्या आयुष्यात येत असतात, पण आपले त्याकडे लक्ष नसते, हे जाणवले.
म्हणूनच माझ्या ब्लॉगवरील "ह्रदयसंवाद" "रंगांची दुनिया-रंगदर्शन, शारदोत्सव", "वाचा फुला आणि फुलवा" "आजोबांचा बटवा" अशा बहुविध लेखमालिकांमधून, मी त्या बहार आणणार्या पारिजातकाच्या फुलांच्या आठवणींच्या, स्वर्गीय अनुभवाचा पुनःप्रत्यय देण्याचा माझा प्रयत्न सातत्याने करत असतो. आतापर्यंत ३२५ हून अधिक लेख गेल्या ४/५ वर्षांत लिहूनही झाले.
अल्पावधीतच ५०००० हून अधिक व्ह्यूअरशिप मिळालेल्या माझ्या ब्लॉगची लिंक येथे देताना, सहाजिकच मनांत त्याच सुमधूर आठवणींचा जागर होत आहे......
माझ्या ब्लॉगची ही लिंक आपल्या संग्रही अगत्याने ठेवा....... विरंगुळा म्हणून उघडत जा.....
https://moonsungrandson.blogspot.com
लेख पसंतीस आले तर....
लिंक शेअरही करा.....
धन्यवाद
सुधाकर नातू
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा