"रंगदर्शन-२": "बेताल व्हँक्यूम क्लीनर !":
लाँकडाऊनच्या कसोटी पहाणार्या कालखंडांनंतर आता मराठी माणसाला प्रिय अशी रंगभूमीवरील नाटकांची नांदी पुनश्च सुरु झाली. त्या निमित्ताने निवडक नाटकांचा रसास्वाद आपणासाठी सादर करणे सुरू केले आहे. पहिले नाटक होते:"व्ह्ँक्यूम क्लिनर".
आता दुसरा रसास्वाद उलगडण्यापूर्वी, मी रंगभूमी संबंधित रसिकांना येणाऱ्या अनुभवांविषयी हे तीन मुद्दे सध्या मांडतोः
# पहिली एक बाब नाटकाची वेळ आणि त्यासाठी तिकिटे काढणे या संदर्भातील आहे. पहिली गोष्ट कुठलंही नाटक कधीही वेळेवर सुरू होत नाही ही कायमची रडकथा आहे. आपल्या इथे जसं माणसांना महत्व नाही, तसेच वेळेला किंमत नाही. किती तरी समुहतास आपण वाया घालवत असतो. ललित कलादर्शचा अचूक वेळेवर नाटकाचा पडदा उघडण्याचा आदर्श केव्हाच पुराणात गेलेला
दिसतो.
# दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑनलाइन तिकीट बुकिंग संबंधी. ते घेतल्यानंतर सुद्धा, नाट्यगृहावर जाऊन नाटकाच्या वेळेला प्रत्यक्ष तिकीट घेणे व त्यासाठी लाईन लावणे हा प्रकार खरोखर त्रासदायक आहे. त्यापायी नाटक वा संबंधित कार्यक्रम उशीराने सुरू करावा लागण्याचा अनुभव येतच असतो.
# चित्रपट गृहात मोबाईलवरचं तिकीट दाखवलं की ते रेकॉर्ड होऊन प्रेक्षकांना थिएटरमध्ये प्रवेश मिळतो. तीच योजना नाट्यगृहांमध्ये कां होऊ शकत नाही याचे आश्चर्य वाटते. आज डिजिटलचा जमाना असूनही मराठी रंगभूमी मागे कां, ह्याचा संबंधितांनी विचार करायला हवा. पुन्हा असा त्रास सहन करून त्यासाठी नऊ ते दहा टक्के तिकीटदरापेक्षा जास्त रक्कम द्यावी लागणे हे ही रास्ता नव्हे. मी तर आता आँन लाईनने नाटकाचे तिकीट घ्यायचेच नाही असा, कानाला खडाच लावला आहे. जाता जाता शेवटची पण महत्वाची नोंद ही की नाट्यग्रुहांतील ध्वनीनियंत्रण व्यवस्था खूप सुधारणे आवश्यक आहे. शेवटच्या रांगेतही बसलेल्या रसिकाला रंगमंचावरील संवाद सुस्पष्ट ऐकू येणे अत्यंत गरजेचे आहे.
ह्या पुढील लेखात सध्या रसिकांचा उदंड प्रतिसाद
मिळणार्या "एका लग्नाची दुसरी गोष्ट" नाटकासंबंधी दुसरी (दुखरी?) बाजू मी मांडणार आहे.
धन्यवाद
सुधाकर नातू
ता.क.
हा प्रयत्न तुम्हाला भावला, आवडला तर तसा प्रतिसाद जरुर द्या.....
माझ्या ब्लॉगची पुढील लिंक सेव्ह करा.....
https://moonsungrandson.blogspot.com
ती लिंक अधूनमधून उघडून लेख वाचण्याची संवय लावून घ्या....
योग्य वाटल्यास.....
आपल्या परिचय वर्तुळात शेअर करा..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा