"निवडक नाटकांचा रसास्वाद"
लाँकडाऊनच्या कसोटी पहाणार्या कालखंडांनंतर आता मराठी माणसाला प्रिय अशी रंगभूमीवरील नाटकांची नांदी पुनश्च सुरु झाली. त्या निमित्ताने निवडक नाटकांचा रसास्वाद आपणासाठी सादर करण्याचा मी उपक्रम सध्या करत आहे. त्यातील हा माझा रसास्वाद.......पसंद अपनी अपनी, खयाल अपने अपने" ह्यानुसार वाचकांनी ह्या प्रयत्नाकडे पहावे, ही प्रारंभी विनंती....
१ "देवबाभळी" डोक्याला खुपली:
सध्या ह्या संगीत नाटकाचा, नको तितका उदो, उदो चाललेला दिसतो. एवढे खरोखरच नावाजण्यासारखे इतके काय आहे, म्हणून ही कलाकृती पहायला आवर्जून गेलो. पण मला काय वाटले, ते येथे प्रांजलपणे मांडत आहे.:
संत तुकारामांच्या पत्नीच्या म्हणजेच, आवलीच्या पायात देवबाभळीचा काटा रूतला, ह्यामुळे तिच्या सेवेला रखुमाई येते, एवढी एकच छोटीशी गोष्ट ह्या नाटकावरून समजली. बाकी सारा दोन तासांचा मामला अतर्क्य आणि डोक्याला ताप देणाराच होता. ना इथे तुकारामांचे लोकप्रिय श्रवणीय अभंग, ना ह्या दोघींची सारखी सारखी पण अनाठायी येणारी पदे, अर्थपूर्ण. इतके पुरस्कार मिळवणारी ही नाट्यक्रुती, म्हणून प्रत्येकी तीनशे रुपयांची तिकीटे खर्चून ह्या नाटकाला गेलो खरे, पण अखेर कधी एकदा ह्या दोघींचा कंटाळवाणा खेळ संपून आपली सुटका होते असेच झाले.

जमेची केवळ एकच बाजू आणि ती म्हणजे तो जुना काळ यथातथ्य उभा करणे. पण तेवढ्या एकाच गोष्टीसाठी ह्या नाटकाला इतके पुरस्कार देऊन असे डोक्यावर घेणे सर्वथैव अप्रस्तुत वाटले.
कुठे ते संगीत रंगभूमीचे पुनरूज्जीवन होईल अशी आशा निर्माण करणारे नाट्यसंपदाचे 'अवघा रंग एकची झाला', आणि कुठे हे डोक्यात जाणारे देवबाभळी!
बहुमोल वेळ व पैसा तर गेला वायाच, पण जाण्या येण्याचे श्रम आणि दोन तास आसनाला जखडून बसण्याची शिक्षा बोनस म्हणून करून घ्यावी लागली. अशा कलाक्रुतीला नावाजणारे परिक्षक व टाळ्या वाजवणारे प्रेक्षकही धन्य!
पुढच्यास ठेच, मागचा शहाणा व्हावा म्हणून हे स्पष्ट मांडले.

------------------------------------------ --------------------
२ "ए परफेक्ट मर्डर": "संकट, की एक संधी?":
नव्या नाटकाचा रहस्यमय रसास्वाद:
सध्या महाराष्ट्रात पीकपाण्याने दगा देऊन भीषण दुष्काळ आणला असला, तरी मराठी रंगभूमीवर मात्र, नऊ-दहा नव्या कोर्या नाटकांचे पीक आले आहे, ही एक आश्चर्यकारक तशीच आनंददायी घटना आहे. एकाच वेळी इतकी नाटके रंगभूमीवर येणे बहुदा कधी घडले नसावे.
ह्या सगळ्यांमध्ये अगदी पूर्ण वेगळे, रहस्यमय असे एक नाटक, "ए परफेक्ट मर्डर" बघण्याचा आज शिवाजी मंदिर दादरमध्ये योग आला.
तर्कशुद्ध रीतीने आपल्याला ज्या व्यक्तीचा कांटा काढायचा आहे, तो दुसऱ्याच व्यक्तीला वापरून अत्यंत सुसंबद्ध रीतीने कसा तडीला न्यायचा ह्याचे बिनतोड नियोजन, थंड डोक्याने करणाऱ्या अफलातून नायकाचे हे नाटक आहे. त्यामुळे अगदी प्रारंभापासून अखेरपर्यंत जे काही रंगभूमीवर घडत जाते, ते सर्वच प्रेक्षक अक्षरश: जीव मुठीत धरून, उत्कंठापूर्ण नजरेने बघतात.
पुष्कळ दिवसांनी शिवाजी मंदिरला प्रेक्षकांसाठी गॅलरी उघडली जाण्याचा योग आला. ह्या नाटकाच्या पहिल्याच प्रयोगाला सुसंस्कृत सुखवस्तु असलेल्या रसिकांची मांदियाळी हाऊसफुल गर्दीत बघायला मिळाली, हे खरोखर प्रेक्षकांचे तसेच नाट्य सादर करणाऱ्या टीमचे अहोभाग्यच!
श्री. पुष्कर श्रोत्रीनी नायकाच्या भूमिकेत शंभर टक्के उत्तम योगदान दिले असेच म्हणावे लागेल. त्याखालोखाल पोलीस इन्स्पेक्टर झालेल्या श्री. सतीश राजवाडेँनी आपल्या वेगळ्या ढंगातील बोली भाषेने रहस्याची नाट्यमयता तसेच उकल खुबीने केली. तसा मोठा दोष काढायला ह्या नाटकात जवळ जवळ काहीच नाही. मात्र एक गोष्ट जाणवली, ती म्हणजे नायिकेच्या भूमिकेत असलेल्या श्वेता पेंडसे ह्यांचा नाकांत बोलल्यासारखा आवाज नीट स्पष्टपणे ऐकू येत नव्हता वा घुमत होता. त्यामुळे किंचित् रसभंगही होत होता. सहाजिकच त्यांनी आवाजावर अजून वेगळी मेहनत घेऊन, तो इतर पात्रांप्रमाणेच स्पष्टपणे योग्य त्या टोनमध्ये घडवायला हवा, एवढीच सूचना.
खूप दिवसांनी पैसा वस्सूल करणारी कलाक्रुती बघायला मिळाली, ह्यास्तव संपूर्ण टीमचे मनापासून अभिनंदन. हे नाटक असेच हाउसफुल गर्दीने शतकमहोत्सवी प्रयोग करू शकेल ही सदिच्छा!
जाता जाता, एक गोष्ट सुचवावीशी वाटते ती म्हणजे, नावाप्रमाणे "ए परफेक्ट मर्डर" घडवणारा नायक सहीसलामत सुटतो व अखेरीस नामानिराळा राहू शकतो. असे जर दाखवले गेले असते तर अधिक बहार आली असती.
नायकाला ज्या व्यक्तीला ठार करायचे होते, ती तर वाचते आणि मारेकरी ब्लँँकमेलरचाच खून तिच्या कडूूून होतो. आलेल्या अशा संकटाचे तो संधीत कसे रुपांतर करू शकतो, असे दाखवत, नाटकाच्या शीर्षकाला शंभर टक्के न्याय देता येईल, असा आगळा वेगळा "प्लॅन बी" म्हणून मी असे सुचवू इच्छितो की, नायक हे सिद्ध करतो की, ह्या ब्लँकमेलर कँ. करमरकरचा खून, नायिका व तिचा प्रियकर चौधरी ह्यांनी मिळून, तो घडवून आणला. त्यामुळे नायकाला एका दगडात अनेक पक्षी तर मारता येतील व तो परत नामानिराळा राहून, "ए परफेक्ट मर्डर" ह्या संकल्पनेला अधिक उंचीवर घेऊन जाईल! अर्थात् हे विख्यात हिचकाँक ह्यांच्या कलाक्रुतीचे रूपांतरित नाटक असल्यामुळे अशा तर्हेचा बदल करता येईल कां, ह्याचा विचार टीमला करावा लागू शकेल. असो.
======================================
३ "दिशाभूल करणारा प्रमोशनचा फंडा":
सध्याच्या मराठी नाटकांची प्रेक्षकांचा अपेक्षाभंग करणारी अवस्था व्यक्त करणारा सोशल मिडीयावरचा हा संदेश खुपच बोलका आहे:
“आम्ही आत्ताच " अमर फोटो स्टुडिओ " हे नाटक मध्यंतरात अर्धवट सोडून आलो . अतिशय टुकार नाटक आहे. सुरवातीपासूनच एका प्रसंगाचा दुसर्याशी काय संबंध आहे तेच समजत नव्हते. केव्हा मध्यंतर होते आणि घरी जातो असेच वाटत होते. गेल्यावेळचे " ९ कोटी ५७ लाख " हे संजय मोने लिखित आणि अभिनित नाटकाबद्दल अपेक्षा होत्या पण त्या काही पुऱ्या झाल्या नाहीत. पण कमीत कमी ते नाटक शेवटपर्यंत पाहिले तरी .

ह्या दोन्ही नाटकांच्यावेळी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे प्रेक्षकात नाटकामधल्याच्या ओळखीच्या लोकांची पेरणी केली होती आणि फालतू संवाद आणि विनोदावर ते उगाच खोटे खोटे मोठ मोठ्याने हसून दाद देत होते. हे सर्व सहजच लक्षात येत होते कारण बाकी पूर्ण नाट्यगृहात शांताता होती. आज तर कमालच झाली एक लोकप्रिय अभिनेत्री, पहिल्या रांगेत बसली होती आणि नाटक सुरु होण्या अगोदर तीने तीच्या मागच्या रांगेतील आणि बाजूच्या रांगेतील खास बसवलेल्या सहकाऱ्यांना अमेय आला कि आपण सगळ्यानी मोठ्याने टाळ्या वाजवून हसायचे अशा सूचना दिल्या. त्याप्रमाणे सर्व चालू होते.
हे सर्व फारच उद्वेगजनक होते. बाकी सर्व प्रेक्षक ह्या लोकांची हुल्लडबाजी ऐकायला येत नाहीत.”
नाटकाच्या प्रमोशनचा फंडा रसिकांची दिशाभूल करणाराच नव्हे कां?
धन्यवाद
सुधाकर नातू
ता.क.
हा प्रयत्न तुम्हाला भावला, आवडला, वा कसा वाटला, त्याचा प्रतिसाद जरुर द्या......
माझ्या ब्लॉगची पुढील लिंक सेव्ह करा.....
https://moonsungrandson.blogspot.com
ती लिंक अधूनमधून उघडून, वैविध्यपूर्ण ललित लेख वाचण्याची संवय लावून घ्या.......
योग्य वाटल्यास, ही लिंक......
आपल्या परिचय वर्तुळात शेअरही करा.......

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा