"रंगदर्शन-७":
"हरवलेल्या पत्त्यांचा बंगला":"हा तर 'कन्यावासा'चा ईमला!"
"हरवलेल्या पत्त्यांचा बंगला" या नाटकाच्या शीर्षकातच

तुमचे कुतुहूल जागवण्याची विलक्षण ताकद आहे आणि त्यामुळे हे नाटक आहे तरी काय ते बघितलेच पाहिजे, असे वाटून आम्ही या नाटकाला गेलो.
बदलत्या वेगवान जीवनशैलीचा जो उच्चभ्रू समाजावर आणि मध्यमवर्गातून उच्चभ्रू समाजाकडे धावत जाणाऱ्या वर्गावर जो अनिष्ट परिणाम झाला आहे, त्याचे विदारक चित्र "तरुण आहे रात्र अजुनी" या नाटकात बघायला मिळाले होते. योगायोगाने त्यापाठोपाठ सध्या जेष्ठ एकाकी नागरिकांची स्थिती, ज्यांची मुले परदेशात गेल्यामुळे झाली आहे, त्या विषयीचे सामाजिक कौटुंबिक व भावनिक आंदोलनांचे चित्र प्रभावी पणे मांडणारे नाटक 'हरवलेल्या पत्त्यांचा बंगला' पहायचा योग आला.
त्या संदर्भात आम्ही वाचलेली माहीती अशी की, ह्या नाटकाचे वैशिष्ट्य म्हणजे सध्या नाट्यलेखन करण्यास नवेनवे चेहरे येत नाहीत अशी जी काही ओरड चालू होती. त्याला उत्तर वा उपाय म्हणून एक चांगला उपक्रम घेण्यात आला, त्यात नाट्यलेखनाची स्पर्धा घेण्यात आली. प्रतिष्ठित तज्ञ परिक्षकांकडून सार्या स्पर्धकांनी लिहिलेल्या नाटकांची छाननी करून, अखेरीस जे नाटक सर्वोत्तम ठरले, ते म्हणजे हे स्वरा मोकाशी लिखित, "हरवलेल्या पत्त्यांचा बंगला".
असे समजते की, जवळजवळ दोन हजाराच्यावर नाटकांच्या संहिता या स्पर्धेमध्ये आल्या होत्या. त्यामुळे या नाटकाचे खरोखर वैशिष्ट्य हे की ते सर्वोत्तम ठरले. तर असे हे नाटक, ज्यामुळे मराठी रंगभूमी त्रिगुणात्मक-व्यवसाय, कला व नवा विचार, नवी द्रुष्टी अशा पायावर मोठ्या दिमाखाने उभी आहे हे उमजून येते.
ही एका अशा आईची कहाणी आहे, जिचा मुलगा परदेशात स्थायिक झालेला आहे, मुलगी मात्र बदलापूरसारख्या उपनगरात आणि ही आई इथे शहरात एकटी, नुकत्याच रीडेव्हलप झालेल्या चाळीतून दोन रूमच्या सदनिकेत रहात आहे. तिला सोबतीला म्हणून एक तरुण मुलगी तिच्याबरोबर राहत आहे. अशा प्रारंभाने हे नाटक सुरू होते. तेव्हाच थोडीशी कल्पना येते की सध्या जवळजवळ घरटी, एखादा तरी मुलगा किंवा मुलगी परदेशात स्थायिक झालेल्या कुटुंबांमध्ये काय उलथापालथ होते ते.
हे दोन अंकी नाटक जसजसे उलगडत जाते, तसतसे सध्याच्या वास्तवतेचे चित्र आपल्यासमोर वेधक व भेदकपणे उभे राहते. आतापर्यंत सासुरवास अथवा सूनवास अशा तऱ्हेचे अनुभव आपण चित्रपट, मालिका वा नाटकातून घेतलेले आहेत. परंतु या नाटकात बदलापूरला राहणारी विवाहित मुलगी, आपल्या आईला गृहीत धरून कशा कशातर्हेने त्रासदायक असे अनुभव तिला घ्यायला भाग पाडत जाते. म्हणजे इथे सूनवास वा सासुरवास नसून 'कन्यावास' असा नवा प्रकार आपल्याला बघायला मिळतो. त्यासाठीचे जे विविध भावनाप्रधान प्रसंग उभे केले आहेत, ते प्रत्यक्ष बघण्यातच मौज आहे.
आपल्या स्वार्थासाठी ती मुलगी शेवटी आईच्या घरी शहरात आपल्या सोयीसाठी, कुटुंबासहित राहू इच्छिते आणि तिच्या आजारी सासूच्या सोबतीला आपल्या आईने मात्र एकटीने बदलापूरला जावे, अशा तर्हेची आग्रहाची इच्छा व्यक्त करते! ह्यावरूनच या मुलीने आईला "कन्यावास" किती बिनदिक्कतपणे आणि कसा दिला असेल ते कळेल. ह्या वेळेपर्यंत, आई बिचारी होता होईल तो तिचे सारे हट्ट, मागण्या निमूटपणे पुर्या करत असते. परंतु शेवटी ही अशी वेळ येते, तेव्हा अखेर आपला मनातला उद्रेक आई ज्या तळमळीने व्यक्त करते तो मनाला चटका लावून जातो. अखेरीस मतलबी मुलीपेक्षा, परकी पेईंग गेस्ट तरूणीच कशी आईला जिव्हाळ्याची सहाय्यक ठरते! वास्तववादी असेच हे कौटुंबिक व भावनिक चित्र आहे.
आपल्या देशामध्ये सद्यस्थितीत परिस्थितीवश, गुणवंतांना ज्या संधी मिळायला हव्यात व त्यांची भरभराटीची स्वप्ने पुरी व्हायला हवीत, ती होत नसल्यामुळे मुलं परदेशात गेली, मात्र त्या वैभवाचा थोडा फार फायदा ज्येष्ठ नागरिकांना झाला खरा, परंतु अखेरीस दुर्दैवाने त्यांच्यावर एकाकी अगतिकतेची वेळ कशी येते, त्याचे चित्र या नाटकात पाहायला मिळते. म्हणूनच बदलत्या काळाचे बदलते रूप चपखल उभे केल्यामुळे हे नाटक खरोखर वैशिष्ट्यपूर्ण ठरते. ते सहकुटुंब जाऊन पाहावे असेच नाटक आहे, असे म्हणावेसे वाटते.
आपल्या वाट्याला आलेले एकाकीपण, शहाणपणाने स्विकारून, कर्तबगार आणि समंजस अशा आईच्या भूमिकेत वंदना गुप्ते यांनी आपल्या कारकिर्दीतील मानाचा तुरा ठरावी, अशी अभिनयाची उंची गाठली आहे. त्याला तोडीस तोड म्हणून, तिच्या मुलीच्या रूपात प्रतीक्षा लोणकर यांनीदेखील आपल्या भूमिकेला नव्या युगातील मध्मवयीन स्री म्हणून यथातथ्य न्याय दिला आहे. सोबत म्हणून पेईंग गेस्टच्या रुपात रहाणार्या तरुण मुलीच्या व्यथा आणि तिचे ह्या जेष्ठ आई बद्दल असणारे आपुलकीचे नाते अतिशय हळुवारपणे मांडणार्या, भूमिकेत दीप्ती लेले यांनीदेखील चांगले काम केले आहे. गुणी जावई झालेले अभिनेते व ह्या आजीचा नातू दोघे नाटकात आपल्या वाट्याला आलेली कामगिरी ठीक बजावतात. चाळीचा विकास होऊन निर्माण झालेला दोन रूमचा फ्लॅट देखील अतिशय कलात्मरितीने या नाटकात उभा केलेला आहे.
सारांश अगदी आगळ्यावेगळ्या आधुनिक जगातले, 'तरुण आहे रात्र अजुनी' नाटका पाठोपाठ, पूर्वीच्या जमान्याची आठवण करून देणारे हे नाटक आम्हाला पाहायला मिळाले हा गंमतीशीर योगायोग. अगदी अल्पावधीत या नाटकाने रौप्यमहोत्सवी प्रयोग करण्याइतकी मजल गाठली यातच सारे काही आले. अर्थातच अधिकाधिक नाट्यरसिक या नाटकाला आश्रय देऊन लवकरच त्याचा शतकमहोत्सव झाला तर नवल वाटणार नाही. सर्व संबंधितांचे मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा.
अशाच अनेक वाचनीय लेखांसाठी माझ्या ब्लॉगची
ही लिंक उघडा......
wapp grp वर शेअरही करा......
http//moonsungrandson.blogspot.com
विरंगुळा व जिज्ञासा ह्यासाठी.....
You tube वर जा. सर्चमध्ये लिहा:
माझ्या चँनेलचे नांव:
moonsun grandsun
आणि संपूर्ण वार्षिक राशीभविष्य व इतरही जीवनोपयोगी विडीओज् पहा:
चँनेल subscribe करा......
सुधाकर नातू

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा