श्री संत ज्ञानेश्वर म्हणतातः
"वाचे बरवे कवित्व ।
कवित्वि बरवे रसिकत्व ।
रसिकत्वीही परतत्व ।
स्पर्श जैसा ।"
(ज्ञानेश्वरीः ८:३४५)
ज्ञानेश्वरांनी लिहिलेली किती ही सुंदर ओवी. तिचा मला उमजलेला भावार्थ हा असा विस्ताराने सांगता येईल:
"तुम्हाला बोलता येणं, नक्की चांगलं; चांगलं वाटेल असं बोलता येणं त्याहूनही चांगलं. तर त्याही पेक्षा बरवे म्हणजे कवित्व. प्रतिभा व कल्पनांचे सेतु भाव अर्थपूर्ण शब्दात लयीत मांडता येणं हे कवित्व.
त्याच्याही पुढे जाऊन ज्ञानोबा माउली आपल्याला सांगते की, कवित्वापेक्षा श्रेष्ठ रसिकत्व. जे जे जगामध्ये चांगल, सुभग मंगल व आनंददायी आहे, मग ते वाचन, न्रूत्य नाट्य, संगीत, चित्रमय निसर्ग सौंदर्य असो वा वैश्विक मूल्ये उदात्त भावना व क्रुती, प्रसंग, आदर्श व्यक्तिमत्त्वे त्यांचे असाधारण योगदान इ.इ. काही असो ते जाणण्णाची, वेचण्याची व त्याला मनापासून दाद देण्याची व्रुत्ती हे आणि हेच रसिकत्व.
अशा रसिकत्वाचा ज्यांच्या ठायी वास असतो ते भाग्यवान. ज्ञानेश्वर महाराज पुढे जे मांडतात, ते तर त्यांचे प्रतिभासंपन्न, सर्वोत्तम निरिक्षण आहेः रसिकत्व म्हणजेच परतत्व ! स्थळ काळ आणि समस्त वस्तुमात्रापलिकडेही काही अद्रुष्ट, अलौकिक व अमूर्त असं काही असणं, म्हणजे परतत्व. खर्याखुर्या रसिकाला जेव्हा जेव्हा अशी अद्भुतरम्य जाणीव, काही पाहिल्याने वा ऐकल्याने अथवा अनुभवल्यामुळे होते,
तेव्हा तेव्हा त्याला जो परमानंद होतो, तो जणु आत्मसाक्षात्कार झाल्यासारखा असतो. "
माझ्या पुरते बोलायचं झालं तर अशा साक्षात्कारी क्षणी माझ्या डोळ्यातून आपोआप अश्रु येतात आणि स्थळ काळ वेळ विसरून मला अमूर्ताच्या जाणीवेचा स्पर्श होत सद्गदित व्हायला होतं. ती वेळ व ते क्षण कधी मधी व अवचितच येत असतात हे जसं खरं, तसंच ते येणं ही दुरापास्त व अवघडच असतं. पण मी अशाच म्रुगजळांच्या कायम शोधात असतो. अन् ते गवंसताच मला 'युरेका युरेका' म्हणण्या वाचून गत्यंतर नसते....
"My Day is Made. असा तो परतत्वस्पर्शी अनुभव असतो.
जाता जाता मी प्रामाणिकपणाने सांगतो की, हे सारं असं शब्दात उलगडताना तो सोनरी अनुभव पुन्हा पुन्हा जगतोय.
सुधाकर नातू
ता.क.
हा लेख मनाला भिडला असेल तर.....
असंच नेहमी भावनोत्कट, चांगलं उत्तम वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगची ही लिंक उघडा...
http//moonsungrandson.blogspot.com
लिंक संग्रही तर ठेवाच......
परंतु आवर्जून शेअरही करा......

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा