"सोशल मिडीयावरील माझी मुशाफिरी-२ !":
सोशल मिडीयावर मी नेहमी स्वनिर्मित संदेश पोस्ट करतो. आज त्यासंबंधीच्या जुन्या आठवणी पहात असताना, मला विशेष नोंद घ्यावेत, असे माझे निवडक संदेश ह्याही लेखात उलगडत आहे. आठवणींची ही साठवण वाचकांना आवडेल, अशी मला आशा आहे.......
# "कोड़े: कधीही न सुटणारे !":
-----------------------
माणूस मरतो, तेव्हाच कां मरतो? कुणी जन्मत:च, तर कुणी बालपणी वा कुणी एेन तारूण्यांत, तर काही प्रौढपणी, तर काही वृद्धापकाळी हे जग सोडून जातात. प्रत्येकाचे मरतेवेळी वय भिन्न असते, असे कां?
आगगाडीतील प्रवास करताना जसा जो तो आपले स्थानक आले की उतरून जातो, तसाच हा सारा प्रकार असतो ! पण आपले 'तिकीट कुठपर्यंतचे आहे ते कुणालाच माहीत नसते. आयुष्य हे क्षणभंगूर आहे ह्याची जाणीव, कुणी मरण पावल्याची बातमी कानी येते, तेंव्हाच होते.
ह्या जगांत प्रत्येकाचे काही विशिष्ट प्रयोजन असावे, तेव्हढे झाले की त्याला 'राम' म्हणावा लागतों ! पुष्कळ वेळी सारी कामे वा आकांक्षा पूर्ण न करता, माणसाला येथून निरोप घ्यावा लागतो. थोडक्यात, जीवन आणि मरण हे कधीही न सुटणारे कोडे आहे !
--------------------------
# 'जादू?:
नुकताच एक संदेश येथे वाचायला मिळाला, हा माणूस लिहीतो: 'मी कधीही छोट्या पडद्यावरच्या मालिकाच बघत नाही, परवा,थोड्या वेळासाठी केवळ अर्धा एपिसोड कसाबसा पाहिला आणि टीवी बंद केला' हे वाचून मी मात्र, अक्षरश:
आश्चर्यचकीत झालो, कारण ह्या मालिकाच, माझ्यासारख्या ज्येष्ठ नागरिकाचा दररोजचा अत्यावश्यक असा खुराक आहेत. सायंकाली ७ ते १० जणु रात्रपाळी असल्यासारखा मी टीवी समोर मालिकाच पहा़त असतो. मालिकांचा आणि माझा संबंध 'तुंझे माझे जमेना आंणि तुझ्यावाचून करमेना' असा आहे !
व्यसनी माणसाला उमजत असते की आपण जे करतो, ते योग्य नाही, हानिकारक आहे, पण तो जसा तरीही व्यसन काही केल्या सोडू शकत नाही, तसेच माझे मालिका पहाण्याच हे वेड मला सोडता येत नाही !
' कॅथार्सिस' मध्ये जसा वेदनेतून आनंद मिळतो, तसाच काही तरी अनुभव मला मालिका पहाताना होतो. मालिका उगाचच लांबलचक केल्या जातात, त्यात 'पाणी' घातले जाते, त्यातील पुष्कळ गोष्टी निरर्थक असतात::::वगैरे वगैरे दुषणे लावत, लावत न चुकता परत मी मालिका पहातच रहातो. कुठे तो मालिकाच न बघणारा किंवा घरी बिलकुल टीवीच न घेणारा आमचा एक दोस्त आणि कुठे रोज़ रोज़ रतीब घातल्यासारखा मालिका पहाणारा मी ! असा वेळ वाया घालवण्यापेक्षा तोच वेळ, दुसर्या एखाद्या विधायक कामात घालवावा, हे पटूनही, काही केल्या वळत नाही, ही माझी खंत आहे ! कोणी सागेल कां ह्या ईडीयट बाॅक्समधे अशी कोणती जादू आहे?
-----------------------------
# "एक सच्चा रयतसेवक ! ":
'अंतर्नाद'आॅगस्ट'१६ मधील 'एक सच्चा रयतसेवक' हा कै. कर्मवीर भाऊराव पाटील हयांच्यावरील हृदयस्पर्शी लेख वाचून मन भरून आले. त्यातील भाऊरावांनी घेतलेल्या दोन शपथांची आठवण, ह्या पहाडाएवढ़या अद्भुत माणसाचे थोरपण दाखवून गेली.
पहिली शपथ, महात्मा गांधीजींपासून प्रेरणा घेऊन जीवनभर, ऊंची कपडयांचा त्याग व अनवाणी चालण्याची शपथ आणि दुसरी, एका ग़रीब, अगतिक महिलेच्या तळतळाटामुळे, जीवनभर बाहेर कधीही दूध न मागण्याची शपथ ! संपूर्ण हयातभर, हया महान कर्मवीराने शिक्षणाची गंगा तळागाळापयँत पोहोचावी, हया हेतूने रयत शिक्षण संस्थेचा सर्वदूरवरचा पसारा ज़िद्दीने उभा केला.
कुठे त्या वेळचे समर्पित भावनेने शिकविणारे शिक्षक व साधे सरलमार्गी विद्यार्थी आणि कुठे आताचा शिक्षणसम्राटांचा विद्यादानाचा बाजार !
जाता जाता, मला अचानक आठवले-ह्याच सच्च्या रयतसेवका़च्या नांवे दिला जाणारा शैक्षणिक विभागांतील सर्वोत्तम पुस्तकाचा माझ्या एकमेव पुस्तकाला-'प्रगतिची क्षितीजे'ला मिलाळेला, काही वर्षांपूवीॅचा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार !
हया लेखामुळे माझेही काही ऋणानुबंध, वंदनीय कर्मवीरांशी जोडले गेल्याचे समाधान मला मिलाले.
----------------------------
# "वाचा आणि विचार करा":
"जन्मगांठ?: "नव्हे फसवाफसवीचा लपंडाव?":
मनाविरुद्ध सहजीवनाचे नाटक आणि त्यामधील ताणतणाव सहन करत, किती जोडपी जीवन कंठत असतात, कोण जाणे ! एकाचा स्वार्थ, हा दुसऱ्याच्या दुःखाला कारणीभूत होतो, हे कोणी मुळी लक्षातच घेत नाही आणि फसवणूकीची ही वाटचाल अनेकानेक जन्मगांठीमधून कायम चालू रहाते............
हे निकोप समाजाचे लक्षण निश्चितच नव्हे..........
----------------------------
# " चिंताजनक सद्दस्थिती":
एकीकडे नित्य वाढत्या अपेक्षा, दुसरीकडे संधींचा दुष्काळ आणि त्यांत भर म्हणून मतलबी स्वार्थी राजकारण, हेही पुरेसे नाही म्हणून की काय, अनियंत्रित नोकरशाही, ढासळती प्रशासकीय गुणवत्ता अशा चक्रव्यूहात शास्वत विकास पुरता अडकला आहे. जो पर्यंत सर्वच क्षेत्रात, समस्त स्थरांवर विहीत कर्तव्ये आणि त्यासाठीचे प्रत्येकाचे उत्तरदायित्व समाधानकारकरित्या पूर्ण करण्याची ईर्षा निर्माण होत नाही, तोपर्यंत उत्तरोत्तर भवितव्य अंध:कारमय होणार हे निश्चित.
---------------- ------------
# "मनाचे कोडे":
आपले मन खरोखर कुठे असते, कसे असते, दिसते, माहीत नाही. पण मनांत काय असते, ते मात्र फक्त आपल्यालाच उमजत रहाते. X-ray, MRI CT scan वा सोनोग्राफी मुळे आपल्या शरीरात काय काय घडामोडी चालू आहेत ते दिसते, आपल्याला व इतरांनाही.
पण मनांतले असे इतरांना समजू, उमजू देणारे यंत्र निदान आजपर्यंत तरी अस्तित्वात नाही. ही जगातील, सर्वात महान क्रुपाच आहे. असे अद्भुतरम्य यंत्र जेव्हा केव्हा निघेल, तेव्हा काय हलकल्लोळ होईल, त्याची कल्पनाच करवत नाही.
शेवटी मन हे कोडे आहे आणि ते तसेच, कोडेच राहू दे!
-----------------------------
# "पैसा, ही पैसा !":
लक्ष्मी चंचल असते,तिची देवाण घेवाण सतत चालू असते. हे चक्र न थांबणारे असते. लक्ष्मी नेहमी स्वकष्टांतून,प्रामाणिक मार्गाने यावी. ग़ैर मार्गाने कष्टांशिवाय आलेली लक्ष्मी कधीही चांगली नाही;अशी लक्ष्मी सुख शांती देत नाही. हाच निसगॅ नियम आहे,जो Newton चा पहिलया नियमानुसार आहे. संध्याची अशांतता, ताणतणाव, हिंसा विध्वंसक वातावरण हा भ्रष्टाचाराने बरबटलेलया मार्गांनी येत असलेलया लक्ष्मीचा परिणाम आहे. कारण अशा व्यवहारांत एका बाजूला कर्तव्याचा विसर, फ़क़त हाव असते, तर दुसरया बाजूला अगतिकता असते. कोण, कसा केवहा थांबवणार भ्रष्टाचाराचा हा विदारक भस्मासूर?
----------------------------
# "शाश्वत तत्व":
"स्वार्थ सोडून, निस्वार्थ बुद्धिने चरितार्थ करायचे ठरवले,
तरच जीवनांत खराखुरा चिरस्थायी अर्थ निर्माण होऊ शकतो."
"जगाला फसवले तरी, कुणी
कधीही
आपल्या मनाला फसवू शकत नाही. देहबोली मनातल्या भावभावना प्रकट करतच असते.
-----------------------------
# "फिरूनी नवीन जन्मेन मी-अर्थात् कर्म सिद्धांत !":
आपल्यामुळे दुसर्याचे नुकसान कधी होऊ नये, एवढे जरी व्रत, तुम्ही निष्ठेने जीवनामध्ये पाळले तर तुमच्याकडून अनिष्ट अशी कार्ये होणार नाहीत. त्याउलट शक्यतोवर आपल्यामुळे इतरांना काहीतरी हितकारक असे लाभ होऊ शकतील, अशा तऱ्हेचे जर तुम्ही प्रयत्न केलेत, तर तुमच्या पदरी चांगली कर्मे केल्याचे फळ मिळू शकते.
विज्ञानाचा विचार केला तर न्यूटनचा जो पहिला नियम आहे "अँक्शन इज इक्वल टू रिअँक्शन" तो म्हणजे आपला कर्म सिद्धांत असे थोडक्यात म्हणायला काय हरकत आहे?....
---------------------------
धन्यवाद
सुधाकर नातू