अजून काय काय भयानक होणार ? हा यक्षप्रश्न !"
"यक्षप्रश्न":
धकाधकीच्या जीवघेण्या स्पर्धात्मक जीवनामध्ये, विरंगुळा म्हणून करमणुकीचे काही चार क्षण प्रत्येकालाच हवे असतात यात वाद नाही. सुखदुःखे नेहमीचे ताण-तणाव यापासून काही क्षण असे समाधानाचे मिळणे समाजस्वास्थ्याच्या दृष्टीने अत्यावश्यक असते. विविध माध्यमांतून आपल्या कलाविष्कारातून कलाकार आपआपल्या परीने दर्शकांचे समाधान करत असतात. त्यामुळे त्यांना कदाचित अवाजवी प्रसिद्धीही मिळते, तसेच त्यांचे एकंदर आर्थिक आर्थिक जीवनमानही पूर्वीपेक्षा, पुष्कळच चांगल्या दर्जाचे आहे. त्यामुळे सेलिब्रिटी म्हणून कलाकारांचे नांव नेहमीच अग्रणी असते.
पण कदाचित आज-काल अशा सेलिब्रिटींच्या मागे वेड्यासारखे धावणे आणि त्यांना माध्यमांनी ही अवास्तव असे महत्त्व व प्रसिद्धी देणे हे योग्य आहे कां, याचा सगळ्यांनीच विचार करायला हवा. निकोप समाजमनाचे हे निश्चितच लक्षण नव्हे.
खरं म्हणजे करमणूक हा फक्त जीवनाचा एक छोटासा भाग, त्यासाठी कलाकारांना इतके
डोक्यावर चढवणे, निश्चितच अनिष्ट व अप्रस्तुत म्हणायला हवे. दुर्दैवाने काळाचा महिमा असा की, कोणे एके काळी घरातून पळून गेलेली माणसे नाटक सिनेमातून कलाकार होत असत, परंतु त्यांना आजच्या कलाकारांएवढी प्रसिद्धी ,आमदनी आणि मानसन्मान खचितच मिळत होता. त्या तुलनेत आजकाल जे चालले आहे, त्याचा निश्चितच गांभीर्याने सगळ्यांनीच विचार करायला हवा आहे. शास्त्रज्ञ, प्राध्यापक, उद्योगपती असे इतर कितीतरी समाजातील घटक हे आपापल्या परीने समाजहितासाठी योगदान देत असतात. परंतु एकंदर
समाजमनाच्या महत्त्व, प्राधान्य देण्याच्या उतरंडीमध्ये, त्यांचे स्थान कलाकारांइतके तर नसतेच, नसते. उलट कलाकार हे अगदी वरच्या पायरीवर मांडलेले आपल्याला दिसतात. समाजाची एकंदर विचारसरणी व नीतीमत्ता यांच्यात नको असा हा आमूलाग्र बदल झालेला आपल्याला दिसत आहे.
हे सारे आपल्याला कुठे नेऊन ठेवणार, याचा कोणी विचारच करत नाही. त्या जोडीला,नित्यनवीन घोटाळे, गुन्हेगारी वा अनाचार, भ्रष्टाचार आदी जे जे अयोग्य आणि अनिष्ट तेच सातत्याने घडत असते आणि दिवसेंदिवस "हे कलियुग आहे", असे सामान्यजनांनी म्हणत राहून येणारा दिवस पुढे ढकलावयाचा, हे वास्तव भयावह नव्हे कां?
उद्या काय आणि कसे होणार हा यक्षप्रश्नच आहे.
###################### ##
"प्रेक्षकांची ऐशी की तैशी !!":
मोठ्या सुनेला पुढे शिकू न देणारी जहांबाज हम करे सो कायदावाली, जीजीअक्कासारखी सासू आणि तिच्या समोर नेहमी नांगी टाकणारे सारे कुटुंबीय, नाना क्लुप्त्या वापरत, येनकेन प्रकारेण स्टार प्रवाह मालिकेतील "फुलांचा सुगंध" शाबूत ठेवण्याचा आतापर्यंत आटोकाट प्रयत्न करत होते खरे, पण आता अवतारी बाबा की बुवांचे आगंतूक पात्र आणून अंधश्रद्धेच्या पोरखेळांमुळे बहुधा त्याची माती करणार असे दिसते ! त्याचे दोन फायदे-एक तर मालिकेला वळण देत लांबवता येते आणि दुसरा कामाच्या शोधात असलेल्या बुजुर्ग कलाकारांचा मीटर बंद होत नाही, हे जरी खरे, तरी "प्रेक्षकांची ऐशी की तैशी" हेही तितकेच खरे !!
प्रसिद्धी माध्यमांनी देखील अशा आगांतुक बुवाबाजी पात्रांना अवास्तव महत्व न देता उल्लेखाने त्यांना टाळणे इष्ट नव्हे का मालिकांमध्ये उगाचच पाणी घालून त्या लांब होणार्या अशा पद्धतीला त्यामुळे प्रोत्साहन दिले जाते.
###################### ##
फेसबुकवरील....
मेघना वैद्य ह्यांचा हा संदेश:
"कलाकारांच्या शारीरिक, मानसिक आरोग्याबद्दल गंभीरतेने विविध पातळीवर विचार करण्याची वेळ आली आहे असं वाटतं. Rather it's high time. काम आणि पैसे मिळण्याबाबतची असुरक्षितता हे सगळं स्वीकारूनच तुम्ही या व्यवसायात येता ना? हा प्रश्न कलाकारांच्या तोंडावर फेकणं सोप्पं आहे. पण तरीही Reality shows / Serial shootings चे
1)hazardous working hours (14 to 16 hrs per day 😦)
2) त्यातून कमी विश्रांती मिळाली तरी चेहरा नीट फ्रेश दिसला पाहिजे याचा येणारा ताण.
3) हे करत असताना पैसे वेळेवर मिळेपर्यंत वाटणारी anxiety
यामुळे त्या कलाकाराची आणि पर्यायाने त्याच्या कुटुंबाची न भरून येणारी हानी होत असते म्हणून हा प्रश्न ऐरणीवर येणं गरजेचं आहे.
काय वाटतं तुम्हाला?
ह्यावर माझा प्रतिसाद:
"कलाकारांच्या कामकाजाविषयी येणाऱ्या अडचणींची ही बाजू जरी विचारात घेण्याजोगी असली तरी, त्यांना अनाहुतपणे मिळणाऱ्या फायद्यांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. सर्वसाधारणपणे कोणत्याही नोकरी-व्यवसायात वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी अथवा आव्हाने असणे हे स्वाभाविक असते. परंतु कलाकारांना त्यांच्या कामगिरीमधून जी विशेष प्रसिद्धी आणि आत्मसन्मान मिळतो, तसेच कलाविष्काराला दाद मिळाल्याने आत्मसमाधान मिळते, त्या प्रकारचा अनुभव इतर नोकरदार व व्यावसायिकांना येतोच असे नाही..
सहाजिकच देणाऱ्या या अधिकच्या फायद्यांकडे कलाकारांना दुर्लक्ष करता येणार नाही. आपण व्यक्त केलेल्या व्यथेची दुसरी बाजू म्हणून हे म्हणणे मी मांडले. चुकभूल द्यावी घ्यावी घ्यावी."
धन्यवाद
सुधाकर नातू
ता.क.
असेच इतरही अनेक उत्तमोत्तम लेख......
वाचण्यासाठी........
ही लिंक उघडा...........
https://moonsungrandson.blogspot.com
लेख आवडले तर.......
लिंक शेअरही करा..........
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा