"वाचाल, तरच वाचाल !" आणि लिहाल, तर सावराल !":
वाचनासारखा दुसरा कुठला छंद नाही. वाचता वाचता आपणही स्वत:शी संवाद कळत, न कळत करत रहातो, आपलेही अनुभव पडताळून पहातो. नवीन माहिती वा ज्ञान तर मिळतेच, पण माणसांचे स्वभाव, भावभावना ह्यांचेही चित्र, विविध वाचनातून उभे रहाते.
पण आज संगणक, मोबाईल ह्यामुळे माहितीचा महासागर, बोटाच्या एका क्लिकवर मिळत असल्याने, हातात एखादे पुस्तक घेवून ते वाचायचे कुणी कष्ट घेत नाही. शिवाय जीवन अधिक धकाधकीचे, स्पर्धेचे झाले आहे. सहाजिकच सारे वेगाने, झटपट हवे असते आणि ते नवतंत्राच्याद्वारे मिळू शकते. वर्तमानपत्रे,पुस्तके, काय अडले, ते ते संगणक वा मोबाईलवर उपलब्ध असते. म्हणूनच आजकाल वाचनालयांचे सभासद प्रौढ माणसेच असलेली दिसतात. फेसबूक, वाँटस्अँप इ.इ... अशांसारख्या सोशलमिडीयांमुळे तर सर्वांना अक्षरश: वेड लावले आहे. सहाजिकच वाचनसंस्क्रुती हळू हळू कमी होत चालली आहे, हे चांगले नव्हे. माणसाला स्वतंत्रपणे विचार करायला लावणारी वाचनाची सवय इतिहासजमा होण्याचा धोका आहे.
"सिंहावलोकन":
गेल्यावर्षी मार्चनंतर कोरोना महामारी आल्यामुळे वाचनासारखा आपल्याला दुसरा कुठलाच विरंगुळा नव्हता. कर्मधर्मसंयोगाने दिवाळीनंतर व आसपासच्या काळात, माझ्याकडे दहा/बारा दिवाळी अंक तसेच बरीच पुस्तके माझ्या मुलाने मला उपलब्ध करून दिली होती. त्यांची मी नोंद घेतली होती. आज मागे वळून पाहताना काय वाचले आणि अजून काय वाचावयाचे राहिले, ते याप्रकारे आहे. खरंच वाचनाची मला जर आवड नसती, तर हा पावणेदोन वर्षांचा काळ कसा गेला असता, कुणास ठाऊक. म्हणून म्हणतो "वाचाल तरच वाचाल !":
माझी नोंद:
पुस्तके /दिवाळी अंक # - वाचलेले
पुस्तकाचं नांव:
# 1 आठवणींचे असेच असते # वाचले
लेखक संपादक अरुण शेवते
2 पुस्तकाचे नांव:आनंद पर्व
लेखक: गुरूमाऊली भागवत
# 3आपण यांना ओळखता # वाचले
बिपिनचंद्र ढापरे
# 4 इसापनीतील छान छान गोष्टी वाचले
बाबा भांड
5 आसपासच्या गोष्टी
भारती पांडे
# 6 इंडस्ट्री 4 नव्या युगाची ओळख # वाचले
डॉक्टर भूषण केळकर
7 गुरुचरित्र कथासार
जितेंद्रनाथ ठाकूर
# 8 किस्से शास्त्रज्ञांचे # वाचले
प्राध्यापक सुनील विभुते
# 9 एकशे एक प्रेरणादायी कथा
जी फ्रान्सिस झेवियर# वाचले # वाचले
# 10 कर्हेचे पाणी-खंड 7
मीना देशपांडे
# 11आनंद योगी पुल # वाचले
ना धो महानोर
# 12 युगंधर नेते यशवंतराव चव्हाण
संपादक वा ह कल्याणकर
13 बिल गेट्स
डॉक्टर अनंत लाभसेटवार
14 खरं सांगायचं तर, (स्मरण रंजन)
माधव खाडिलकर
# 15 शहाण्या माणसांची फॅक्टरी
डॉक्टर सलील कुलकर्णी
# 16 सुखाचा शोध # वाचले
वि स खांडेकर
# 17 कर्म सिद्धांत # वाचले
हिराभाई ठक्कर
# सर्वच वाचले "दिवाळी अंक-२०२०"
ऋतुरंग, पद्मगंधा, लोकमत उत्सव, महाराष्ट्र टाइम्स, मौज, दीपावली, मणी पुष्पक, अक्षर, कालनिर्णय,
अंतर्नाद, ग्रहांकित, जय जप तप.
--------------------------
हे सर्व वाचता वाचता दिवाळी अंक व पुस्तकांच्या बाबतीत हे जाणवले की पुस्तके वाचली की आपण घरातच न ठेवता इतरांना देत जावी. त्यामुळे
वाचनसंस्कृती वृद्धिंगत होऊ शकते. तेव्हापासून मी शक्य होईल तशी, पुस्तके अथवा दिवाळी अंक इतरांना वाचल्यावर देत आलो आहे. त्यातही मला आनंद व समाधान मिळवून गेले आहे......
"लिहाल तर सावराल !":
वाचण्याप्रमाणे मला घेण्याचाही चांगला धंदा आहे आणि आतापर्यंत माझे अनेक लेख विविध नियतकालिकांत प्रसिद्ध झाले आहेत स्मार्टफोन मिळाल्यापासून मी उत्तरोत्तर प्रगती करत स्वतःचा ब्लॉग आणि व्हिडिओ चॅनेल, युट्युबवर, त्याचप्रमाणे ऑडिओ अर्थात ध्वनिफिती बनवणे यात देखील माझा उपलब्ध वेळ उपयोगात आणत गेलो. त्यामुळे ह्या कसोटी पहाणार्या काळात, कधीही निराशा तर आली नाहीच, परंतु नवनवीन कल्पना सुचत, उत्साह आणि आनंद व्रुद्धिंगत होत गेला.
लिहिण्यासारखा देखील उपयुक्त आणि अंतर्मुख होऊन, स्वतःची स्वतःला ओळख करून देणारा दुसरा कुठलाही छंद नाही. त्यामध्ये तुम्हाला तुमची निरीक्षणशक्ती, स्मरणशक्ती आणि कल्पनाशक्ती यांना चांगल्यापैकी उपयोगात आणून अनुभवसंपन्न, नवनिर्मिती करता येते आणि झालेली नवनिर्मिती, कविवर्य विंदा करंदीकरांनी म्हटल्याप्रमाणे, "घेता घेता, देणाऱ्याचे हात हजार घ्यावेत", तसेच आपण आपले हे विचारधन आणि अनुभवधन अनेकांना सोशल मीडियाच्या साहाय्याने देऊ शकतो आणि त्यांच्या भावभवतालाला अधिक समृद्ध करू शकतो.
धन्यवाद
सुधाकर नातू
ता.क.
सुधा" डिजिटल दिवाळी अंक'२१:
प्रकाशित करण्याचे नेहमीप्रमाणे ठरविले आहे.....
खास आकर्षण......
'नियतीचा संकेत': अर्थात ग्रहबदलानुसार "अनुकूल गुणांवर आधारित संपूर्ण वार्षिक राशीभविष्य लिहून शुभारंभ केलाही आहे......
ह्या शिवाय........
ह्रदयसंवाद, आजोबांचा बटवा, टेलिरंजन....
"वाचा, फुला आणि फुलवा".......
अशी वैविध्यपूर्ण साहित्यिक मेजवानी......
आपली मागणी आजच 9820632655 ह्यावर whatsapp ने
किंवा sudhakarnatu@hotmail.com वर ईमेलने नोंदवा......
अपेक्षित प्रतिसाद मिळाल्यावर आँनलाईन मानधन मूल्य रु १००/-कसे पाठवावयाचे ते कळविण्यात येईल.....
धन्यवाद
सुधाकर नातू
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा