"एक वाचलेला दिवस !":
शीर्षक मोठं गमतीशीर आहे, असं तुम्हाला वाटत असेल. 'एक उनाड दिवस' असा मला वाटतंय लेख किंवा 'एक उनाड दिवस' चित्रपट तुम्ही पाहिला असेल. परंतु माझा कालचा दिवस हा एक 'वाचलेला' दिवस होता असं आता मला जाणवतंय.त्याचं असं झालं, माझ्या लक्षात आलं की मी विशेषकरून मोबाईल हातात धरून सकाळपासून झोपेपर्यंत "तू माझा सांगाती" सारखा मोबाईल मध्ये वेळ घालवत आलेलो आहे. व्हाट्सअप बघ, फेसबूक बघ, ई-मेल बघ अशा तऱ्हेने अधुनमधुन मोबाईलमध्ये डोकवायची माझी सवय घातक आहे हे मला जाणवलं. ठरवलं, आता मोबाईल वापराचा उपास करायचा. परंतु संपूर्ण २४ तास ते मला जमणार नाही, असं वाटल्यामुळे मी ठरवलं की, सकाळपासून सायंकाळी चार ते पाच वाजेपर्यंत मोबाईलला हात लावायचा नाही. माझी वाचनाची सवय त्यावेळी कामाला आली.
पुष्कळ दिवस काहीच वाचलं नव्हतं. रविवारनंतरचे पेपर वाचायचे राहिले होते. त्यामुळे म. टा. आणि लोकसत्ता हातात घेतला आणि वाचनाचा माझा रतीब, मी चालू केला. त्यातूनच मला हा 'वाचलेला' दिवस सापडला ! वेगवेगळ्या तऱ्हेचे मजेशीर अनुभव त्या वाचनातून माझ्यासमोर उभे राहिले.
पहिला लेख होता, तो आपल्या घरातील देवाच्या पूजेच्या मूर्ती किंवा पोथ्या किंवा धार्मिक पुस्तकं तसबिरी इ.इ. यांचं घर बदलताना किंवा बदल्या होताना बऱ्याच वेळेला आपण काही शकत नाही. या समस्येवर प्रकाश पाडणारा तो लेख होता. या समस्येच्या मुळाशी जाऊन कुणी ना कुणीतरी प्रयत्न करतोय याचा तेथे उलगडा होता. पुण्यातील आणि नाशिक मधील संस्था व व्यक्ती यांच्याकडून अशा तर्हेचा पुढाकार घेतला गेला आणि त्यातून कितीतरी धार्मिक साहित्य योग्य मार्गाने, कुणाची मनं न दुखवता व्यवस्थापित केले गेले. खरंच किती वेगळा अनुभव होता हा !
तो अनुभव वाचून होतो नाही, तोच नव्या जगाची प्रगती व दिशा दाखवेल असा लेख वाचनात आला आणि तो मनाला अधिकच उभारी देऊन गेला. सध्या ट्विटरवर 'सीईओ' म्हणून पराग अगरवाल या भारतीयाची नेमणूक झाल्याचा तो लेख होता. आज जगामध्ये अग्रगण्य कंपन्यांमध्ये अनेक भारतीय सर्वोच्च पदी आहेत हे आपण पाहतच आहोत. आज जगामध्ये अग्रगण्य कंपन्या आहेत त्यांचे असेच उच्चाधिकारी बहुतांश 'आयआयटी' पदवीधारक आहेत, ही भारताला ललामभूत अशीच गोष्ट आहे. त्यासंबंधीचा त्या लेखातून भारतीयांच्या बुद्धिमत्तेची पताका संपूर्ण जगभर कशी आज योग्य तर्हेने फडफडते आहे याचे दर्शन झाले आणि मला खरोखर क्रुतक्रुत्य झाल्या सारखे वाटले.
आज ज्यांना उगाचच नावे ठेवली जातात, त्यांच्याच द्रष्टेपणासारख्या निर्णयामुळेच 'आयआयटी' सारखी संस्था भारतभर योग्य त्या ठिकाणी स्थापली गेली. त्याचेच उत्तम परिणाम, आपण आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर आर्थिक साम्राज्याचं आधिपत्य करतोय, हे त्या वाचनातून ध्यानात आलं.
ह्या नंतर चक्क पुराणातली एक गोष्ट वाचायला मिळाली. पराभूत आणि नैराश्याने ग्रासलेल्या आपल्या मुलाला संजयाला, त्याची आई विदुला कशी प्रेरित करते त्याबद्दलची ! ही गोष्ट कृष्ण कुंतीला आणि नंतर ती पांडवांना सांगते. तिचा मतितार्थ हा की, तुम्हीदेखील निराश न होता आपल्यावरील अन्यायासाठी कायम ठाम निश्चयाने उभे रहा, व लढा. त्याचे ते स्फूर्तिदायक चित्र होते. प्रत्येकाने आपला जो धर्म आहे, म्हणजे आपल्या त्या त्या वेळेची जी जीवनाची इतिकर्तव्यता आहे, ती प्राधान्याने पूर्ण करावी, हा विचार मांडणारा लेख अथवा ती गोष्ट खरोखर प्रत्येकालाच मार्गदर्शक आहे. कसे जगावे, आपण जे हातात घेतो किंवा परिस्थितीवश आपल्यासमोरचे कर्तव्य पार पाडणे, ही आपली पहिली आणि एकमेव प्रायोरिटी असायला हवी. हा वेगळ्या प्रकारचा अनुभव त्या वाचनातून मिळाला.
एवढंच पुरे नाही, म्हणून मला माझ्या आजोळची, जे कोकणात आहे, त्या कोकणातील शांतूदादाची गोष्ट वाचायला मिळाली. त्यावेळच्या एकंदर परिस्थितीचे, माणसांच्या जीवनशैलीचे त्यांची गरिबी आणि एकंदर परिस्थितीला तोंड देऊन कुटुंबियांना आपल्या परीने योग्य तऱ्हेने न दुखावता आपली प्रगती करणारा, शांतुदादा अखेरीला गावी आपलं घर बांधायचं हे स्वप्न पार पाडायला जातो, तेव्हा ही प्रगतीची कमान कशी उतरत जाते याचं ते हृदयंगम चित्र होतं. माणसाचे जीवन किती अगम्य आणि अतर्क्य असंच असतं ! केव्हां कसे दिवस येतील काहीच सांगता येत नाही. माणूस कोणत्या वेळी कोणता निर्णय घेईल आणि त्यामुळे त्याचे काय काय बरे वाईट परिणाम होतील ते सांगणे, तर्कापलिकडचे असते.
सध्याच्या अस्वस्थ करणार्या अशा काळाची जी काही कहाणी आहे तीचे समर्पक विडंबनात्मक दृष्टीने मांडणारा, "दीड दमडी" हा लेख देखील मनाला एका वेगळ्याच जगात घेऊन गेला. आणि त्याच वेळेला एकीकडे अनिश्चित अस्वस्थतेचा माहोल आपल्या सभोवती घोंघावत असताना, शाळेतली एक कविता आठवली:
"सरिता करीते कां कधी खंत,
सरिता करीते कां कधी खंत !"
थोडक्यात सध्याच्या काळात "कुठल्याही तर्हेची खंत बाळगू नये" हाच तो त्या 'दीड दमडी' मधून मला लाभलेला मार्ग होता. अशा तऱ्हेने त्या दिवशीच्या वाचनांतून, अजून दोन-चार गोष्टी सांगता येतील. परंतु त्यांचा मतितार्थ एवढाच की,
"ज्याची चलती आहे, त्याच्या मागे लोक धावत जातात आणि जर तो मागे पडला तर त्याला कचर्यासारखा बाजूला फेकून देतात !"
असं करता करता, केव्हा दुपारचे चार किंवा पाच वाजले कळलच नाही. आणि आपोआपच मला जाछवले की खरंच आपला तो दिवस खरोखर "वाचला" असं मला वाटलं ! लगेच हात सवयीप्रमाणे मोबाईलकडे गेले आणि आमची गाडी मूळ पदावर आली !. पण त्यातून मला जे जे लाभलं ते ते मी तुमच्यापुढे इथे सारांशाने मांडलं.
असाच "वाचलेला" दिवस तुमच्याही जीवनात यावा असं मला वाटतं.
धन्यवाद
सुधाकर नातू
ता.क.
रसिक वाचकांसाठी,
अमूल्य संधी !:
💐💐💐💐💐💐💐💐💐
"सुधा"
"डिजिटल दिवाळी अंक-'२१":
"नवलोत्सव"
💐💐💐💐💐💐💐💐💐
शिवाय,"जुने ते सोने" ही खास अर्थपूर्ण पुरवणी
वर्ष चौथे....
मानधन फक्त रू.१००/-.......
आँनलाईनने......
सर्वात महत्वाचे.......
खास दिवाळी भेट:
"Digital Management Musings"
किंवा डिजिटल "नियतीचा संकेत" ह्यातील तुमच्या पसंतीचा एक उपयुक्त लेखसंग्रह विनामूल्य.....
ताबडतोब......
प्रतिसादात अंकाची मागणी प्रतिसादात
तुमचा ईमेल आयडी
वा whatsapp no. देऊन नोंदवा....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा