सोमवार, २६ ऑक्टोबर, २०२०

"ह्रदयसंवाद-३३": "राजकारण व निव्रुत्ती":

 


"ह्रदयसंवाद-३३": "राजकारण व निव्रुत्ती":

नेहमी मला बुद्धिला चालना देणारे, विचार करावेसे वाटतात. इथून तिथून मी त्यासाठी विविध घटनांचा, कल्पनांचा शोध घेत असतो. ते गवसल्यावर सुरू होते, चिंतन-स्वगत-विचारमंथन. पुढची पायरी असते, हे सारे योग्य तर्हेने नेटक्या शब्दांत व्यक्त करण्याची. हा सगळा नवनिर्मितीचा सोहळा मनाला आंतरिक समाधान देतो. तीच माझी "खरी कमाई" असते !

नुकताच एका नामवंत वयाने जेष्ठ नागरिक असलेल्या राजकारणी नेत्याचा पक्षबदलाचा कार्यक्रम झाला. विजनवासांतून सुटका होऊन आपले बस्तान व पुनर्वसन व्हावे ह्या इच्छेपोटी असे सत्तेच्या शोधातले, पक्षबदल हल्ली नवीन राहिले नाहीत. त्या घटनेला अनुसरून एक संदेश मला सोशल मीडियावर वाचायला मिळाला. त्याचा सारांश असा होता की, वयाने ज्येष्ठ असलेल्या राजकारणी नेत्यांनी, आपलं वय झाल्यावर इतर क्षेत्राप्रमाणे निवृत्त होऊन, कुठलीही अभिलाषा न बाळगता, केवळ
समाजसेवेसाठी उरलेले आयुष्य घालवावे, अशा अर्थाचा प्रतिसाद या घटनेला होता.

त्यामुळे माझ्या विचारांना चालना मिळाली. स्वातंत्र्यपूर्व राजकारण आणि उत्तरोत्तर विशेषतः एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी आणि विसाव्या शतकाच्या अखेरीस राजकारणाचा पोत पूर्ण बदलून गेलेला आपल्याला पहायला मिळाला. केवळ सत्तेसाठी आणि आपल्या स्वतःच्या कुटुंब व निकटवर्तीय गटाच्या संपन्नतेसाठी राजकारण करण्याचा प्रघात सुरु झाला. या पद्धतीचा माहोल पाहता-पाहता उजाडला. स्वातंत्र्या पूर्वी देश स्वतंत्र व्हावा म्हणून जी माणसं स्वतःच्या स्वार्थाचा त्याग एवढंच काय पण संसारिक सुखाचाही त्याग करून केवळ देशसेवेसाठी आपले आयुष्य वेचायचे आणि साधी राहणी उच्च विचार अशा जीवनशैलीला, त्याकाळात मानसन्मान होता. कष्ट आणि शक्यतोवर आपला व्यक्तीगत फायदा राजकारणातून न करणे, अशा प्रवृत्तीच्या माणसांची मोठी मांदियाळी त्या वेळेला होती. त्यामुळे लोकोत्तर असे अनेक नेते आपल्याला मिळाले.

मात्र दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतर चित्र हळूहळू पालटत गेले. अशा वेळेला मनात येते की, स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी जर प्रथम समाज सुधारणा करत, योग्य आदर्श नागरिक बनवण्याची सुधारक मंडळींची जी ईर्षा होती, तिला जर प्राधान्य दिले गेले असते, तर कदाचित पुढचा सगळा इतिहास बदलला गेला असता. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर माझ्या मनात विचार आला की, राजकारण व निव्रुत्ती ह्या विषयावर जणू काही एखादा ऑपिनियन पोल घ्यावा. म्हणून मी एक संदेश सोशल मीडियावर प्रदर्शित केला व त्याला मला जो प्रतिसाद मिळाला, त्यावरून जनमानसाची राजकारणाकडे पाहण्याची आजची प्रातिनिधिक दृष्टी दिसून येते.
माझा तो संदेश असा:

# "राजकारणात देखील निव्रुत्तीचे वय असावे कां? हो उत्तर असेल तर किती असावे? नाही उत्तर असेल तर ते कां?"

त्यावरील प्रतिसाद पहाः

"निव्रुत्तीचे वय नाही. संपत्तीवर मर्यादा असावी कारण राजकारण हे आता धंदा झालं आहे."

"६० वर्ष"

"भा ज प मध्ये काम करता येतं तोपर्यत
इतर सर्व पक्षात पैशे खाता येतात तोपर्यंत."

"राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान सोडून सर्वांना मिळणारे निवृत्ती नंतरचे भत्ते, सुविधा, सवलती संपूर्णपणे काढून घेतल्यास आणि सर्व नगरसेवक, आमदार, खासदारांच्या ते पदावर असतानाच्या सर्व सवलती त्यांचा फेरविचार व अभ्यास करून कमी केल्यास राजकारण हा सुखसंपंन्न धंदा राहणार नाही. या क्षेत्रात तेच लोक येतील, ज्यांना समाजसेवा करायची आहे. त्याने राजकारणांत निवृत्ती केव्हा असावी हा प्रश्नच निकालात निघेल. देशात दलालांनंतर या राजकारण्यांची आणि त्यांच्या मुलांच्या बेकारीची समस्या मात्र नक्कीच ऊभी राहील.

" 60 करावे..compulsory."

"80 पण तोपर्यंत मानसिक स्थितीचा अंदाज घेऊन सारासारविवेकबुद्धी व संस्कृती व स्मृती यांचा अंदाज घेऊन निरीक्षण करून त्यापूर्वी."

"मोदी सरकारने सुरूवात केली आहे की. ७० च्या नंतर बाहेर."

"Age and property must be restricted in politics."

"७५"

"हे मेल्यानंतर सुद्धा म्हणतील मला खुर्ची सकट जाळा."

"निवृत्ती चे वय 60 असे निश्चित करावे तसेच सर्व राजकारण्यांना पेंशनमुक्त करावे 2005 नंतर सरकारी नोकरीत पेन्शन बंद केले तसे."

"निवृत्तीचं वय असावंच, शिवाय
१-एका लोकप्रतिनिधी ला केवळ दोनदाच टर्म मिळावी.
२-घराणेशाहीपेक्षा गुणवत्ता, कामं करण्याची हातोटी, कामं सोपे करुन समाजाभीमुख निर्णय ठामपणे घेण्याची क्षमता, यावर इच्छुकांच्या लेखी मुलाखती घेऊन पुढील लोकप्रतिनिधी ठरविला जावा..अशा बर्याच बाबी आहेत की ज्यामुळे तत्पर सरकार निर्माण होऊ शकेल."

"60 असावे, कारण तुम्ही 60 नंतर नोकरी पण नाही करू शकत, तर राजकारण पण Allowed नाही केला पाहिजे. तसेच पक्षांतर केल्यावर ही 2 टर्म निवडणुक न लढवणे बंधनकारक असावे. कारण पक्षांतर हे फक्त आणि फक्त स्वतःच्याच आर्थिक फायद्यासाठी केले जाते सामाजिक फायद्यासाठी नाही."

"नक्की असायलाच हवे."

"तिरडी बांधे पर्यंत असेल ते."

"65 पर्यंत ठिक आहे. तसा कायदाच करावा.
ते काय म्हणतात ना, कबरीत पाय लटकले वा मसनात लाकडे गेली, तरी मीच उभा रहाणार आणि समजा हा थेरडा मेला, तर तो बायकोला नाही तर मुलांना ऊभे करणार असतो."

"निवृत्तीचे वय ठरवायचे नसते .
तर पद किती वेळा एका व्यक्ति कडे ठेवायचे याचे निकष ठरवायचे असतात.
युएसएचे अध्यक्ष पद दोन वेळा प्राप्त करता येते, तसेच भारतातसुद्धा पद प्राप्त करण्यास कालमर्यादा घातली पाहिजे.
भारताचे प्रमुख नेते होते त्यांनी हे संकेत निर्माण केले पाहिजे होते. जसे युएसए चे पहिले अध्यक्ष यांनी हा संकेत विहित केला आहे.

पंतप्रधान मुख्यमंत्री मंत्री खासदार आमदार महापौर नगराध्यक्ष सरपंच ही पदे तसेच स्थानिक स्वराज्य संस्थाचे सदस्यत्व पण किती वेळा प्राप्त करायचे याचे निकष निश्चित केले पाहिजेत.
दोन तीन वेळा भुषविता येईल.
तसेच शासकीय महामंडळे व पक्षातील पदे ही काल मर्यादित केली पाहिजेत.
परंतु भारतात कायदे केल्या शिवाय काही सुधारणा होत नाहीत.

विशेष म्हणजे कायदा चुकीचा ' त्रुटीपूर्ण दोषपूर्ण अन्यायकारक व अव्यवहार्य असला तरी भारतीय जनता त्याचा स्विकार करते हे इतिहासात आहे व आजही आहे.
उदा.
१. अपत्य मर्यादा ही स्था स्व सं सदस्य यांना लागू आहे, परंतु विधानमंडळ व संसद सदस्य यांना लागू आहे.
२. विधान मंडळ व सदस्य आरोप मुक्त असला पाहिजे. परंतु न्यायालयाने आरोपपत्र दाखल करून घेतले तरी निवडणुकीला उभे राहता येते. सदस्य होता येते व मंत्री पण होता येते.
अनधिकृत बांधकाम केले व पाठीशी घातले तरी स्था. स्व. संस्थेमधील सदस्यत्व रद्द होऊ शकते .
विशेष म्हणजे संरपंच पदावरील व्यक्तिची जि.प अध्यक्ष यांचेकडून चौकशी करता येते, तसा नियम आहे. परंतु असा नियम मंत्री पदासाठी विहित नाही. म्हणजे राज्याच्या मंत्री महोदय यांची चौकशी राज्यसभा किंवा लोकसभा येथील सदस्य समिती कडून करणे तसेच मुख्यमंत्री यांची चौकशी राज्यसभा सदस्य समिती कडून करणे असा नियम असला पाहिजे."

"होय..कुठलेही पद दोन वेळा निवडून आल्यानंतर त्याला ते पद बंदीच. वय 60 पेक्षा जास्त नाही कारण सर्व ठिकाणी हे निवृत्तीचे वय आहे."

"there should be retirement age for MPs /MLAs/ and all other elected leaders from top to bottom from gram panchyat to rajyasabha & retirement age should be same as central government employee i.e. 60 years."

"tyapeksha shikshnachi condition havi. ani 5 yrs army training."

"वय नसाव. पण तो सुशीक्षित असावा मतदार संघाची सामाजिक वभोगोलिक चागली माहिती असावी. आठ दिवसात एकवेळा मतदार संघात भेट असावी. तीन वेळा निवडणूक लढवावी. एक वेळ तरी खात्याचा मंत्री असावा, जर खात्याचा मंत्री नसेल तर नंतर कोणतेहि लाभ देऊ नयेत."

सारांश राजकारण व साधनशुचिता, तसेच निव्रुत्तीचे निकष अशा अनेक विषयांवर राष्ट्रीय महाचर्चेची व त्यानुसार आदर्श आचारसंहिता व सुविहीत कायदे त्यांची प्रामाणिक अंमलबजावणी व्हायला हवी.

धन्यवाद
सुधाकर नातू
ता.क.
दोनशेहून अधिक प्रेरणादायी लेख.......
नेहमी वाचण्यासाठी...........
माझ्या ब्लॉगची ही लिंक उघडा..........
संग्रही ठेवा....शेअरही जरुर करा.....

http://moonsungrandson.blogspot.com

ह्या शिवाय...
साठाहून अधिक एकसे बढकर एक.........
असे विडीओज् पहाण्यासाठी.........
माझ्या you tube वरील
moonsun grandson
चँनेलची ही लिंक......
ताबडतोब उघडा.......आणि.....
चँनेल Subscribe ही करा......

https://www.youtube.com/user/SDNatu

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा