"टेलिरंजन-४": "काही ही, हं!":
टेलिव्हिजनवर, एखाद्या गोष्टीचा अतिरेक, हाच बहुदा मराठी मालिकांचा स्थायीभाव दिसतो. 'रंग माझा वेगळा' मधील उद्योजिका सौंदर्याचा काळ्या रंगाची नफरत करण्याचा कमालीचा अतिरेक किंवा 'आई कुठे काय करते' मधील आई, अरुंधतीचा कमालीचा अतिरेकी भोळेपणा, 'अग्गबाई सासुबाई' मधील आसावरीची बबड्यावरची अतिरेकी ममता, 'स्वामिनी' मधील आनंदीबाईंची कायमची अतिरेकी कपट कारस्थाने करण्याची प्रर्व्रुत्ती, आपण निमूटपणे पहात आलोच आहोत.आता त्या सार्यांना साथ द्यायला, अत्यंत संथगतीने पुढे जाणार्या 'शुभमंगल आँनलाईन' मधील शंतनुच्या आईचा, मुलाचे लग्न एकदाचे कधी होणार, ह्या ध्यासाचा अतिरेक, गेला आठवडाभर पाहून अक्षरशः वीट आला. ही मालिका त्यामुळे सलगपणे पहाणे, अशक्यच झाले होते. ह्या सुरवातीपासूनच कंटाळवाण्या वाटणार्या मालिकेचे, नायकाचा विवाह होणे, एवढाच इवलासा जीव असलेले, कथानक कशी, किती दिवस तग धरेल हा प्रश्नच आहे.
मराठी मालिकांमध्ये अजून काय असतं, माहिती आहे कां? कोणत्याही गोष्टीची, इतकी काही अतिशयोक्ती करतात की, आपल्याला जे पटत नाही तसेच दाखवलं जातं. 'स्वामिनी' मध्ये लहानपणची रमाबाई, नको इतकी खोडकर बोलघेवडी आणि वाटेल तेव्हा वाटेल ते बोलणारी, त्यामुळे कठीण प्रसंग निर्माण करून घेणारी चिमखडी रमा, मोठी झाली की, ती इतकी लाजाळू व भीत्रट की पुन्हा त्याचमुळे कठीण प्रसंगांमधून त्रास. परत तीच गोष्ट माधवरावांची, तरुणपणी आता, बालपणचे रमेवरचे नितांत प्रेम विसरून जातात आणि मी नाही बाबा, रमा मला नको बाबा, असं म्हणून 'नाही मी बोलतं', काय म्हणायचं, एवढेच नाही तर ती त्यांच्या समोरही तीन महिने नको, असा हट्ट काय करायचा! मालिकेत केवळ नाट्यमयता येण्यासाठी असं कसही, काही ही दाखवायचं कां?
"अग्गबाई सासुबाई" मध्ये सोहमचे वागणे न पटल्यामुळे त्याची पत्नी, शुभ्रा तिचे मंगळसूत्र काढून ठेवते परंतु घर सोडून जात नाही. मागे जेव्हा असेच सोहमचे उफराटे वागणे झाले होते, तेव्हा आपल्या आई-वडिलांना घेऊन ती आली होती. आता ती तसे काहीही करत नाही. आपला नवरा चांगला नाही पूर्ण वाया गेलेला आहे, हे समजूनही तिचा तिथेच राहण्याचा अट्टाहास, हे म्हणजे काही ही हं झालं. मुळात ती अशा नालायकाच्या प्रेमातच कां व कशी पडली, हा प्रश्नच आहे. पण प्रेम आंधळं असतं, म्हणायचं. शिवाय तिची सासूबाई आसावरी देखील तिला आपलं मानत नाहीत, कारण तिने बबड्या बरोबरचे नाते तोडले. तरीही केवळ मालिका पुढे जावी, म्हणून शुभ्रा तिथेच ठिय्या मारून बसते, हे देखील काही ही हं, नाही कां?
ह्याच मालिकेत, बबड्या मित्राच्या एका नको त्या बोलण्यामुळे, चिडून आईने केलेले सगळे आँर्डरचे पदार्थ नष्ट करतो. त्यामुळे ज्या बायकांनी ऑर्डर दिली त्यांचा तगादा, आसावरी गांवी गेल्यामुळे, आता शुभ्राच्या मागे लागतो. तेव्हा तिच्या विनंतीवरून अभिजीत राजे सारा फराळ करून द्यायला मदतीला येतात. तेव्हा बबड्या त्यांचा आवाज ओळखत नाही आणि तो कुणीतरी पैसे मागायला आले असे समजतो. त्याला स्वतःला कोणाकडून त्याने पैसे घेतले तेही आठवत नाही. नकली घेणेकर्याच्या रुपाने आलेल्या-अभिजित राजेंना घरात प्रवेश मिळावा याकरता, शुभ्रा त्याला बेडरूममध्ये लपायला काय सांगते! नंतर बायकांच्या आँर्डर्स पुर्या करण्यासाठी रात्री बबड्याला स्वयंपाकघरात ढकलून लाडू काय वळायला लावतात ही दोघं! हे सगळं सगळं अक्षरश: न पटण्याजोगे आणि अर्थातच काहीही हं!
"शुभमंगल ऑनलाइन" मध्ये देखील, भाजी मार्केट मध्ये भेटलेल्या शर्वरीला अनुपमा लगेच बरोबर ओळखते! खरं म्हणजे तिला केवळ एकदा डिलिव्हरी द्यायला आलेली तेव्हा पाहिलेलं. बरं तर बरं, तिच्याबरोबर घरी स्कूटरने आल्यावर तिला घरात घेऊन अनुपमाकडून आग्रहाने तिचा पाहुणचार काय केला जातो ! शर्वरीदेखील आपलं काम सोडून भाजी वगैरे न घेता, इतर कामे न करता, सरळ यांच्याकडे येते काय आणि बडबड करत सगळ्यांची धमाल उडवून देते काय, सारं नवलच. सगळ्यात कळस म्हणजे निरोप घेऊन बाहेर जाताना रांगोळीच्या जवळ, शंतनुला ती सेल्फी काढायला काय लावते, वारे वा! असं कधीतरी शक्य आहे कां? काही तरी दाखवायचं म्हणून किती क्रिएटिव्ह लिबर्टी घेणार, याला मर्यादा?
शेवटचे उदाहरण. 'माझा होशील ना'? मालिकेत तर ठायी ठायी अतिशयोक्तीचे प्रसंग आहेत. पण त्यांतील कळस म्हणजे सईचे आदित्यने बक्षिस म्हणून दिलेल्या व नंतर हरवलेल्या रातराणी इअरिंगचा कचर्यांत वेड्यासारखे झपाटून सगळीकडे घेतलेला शोध घेणे, हा अतिशयोक्तीचा कळसच. काही ही हं!
शेवटी "काही ही हं!", दाखवणं हाच तर मालिकांचा फंडा असतो. प्रेक्षकांची पर्वा कोण करतो? त्यांना जणू काही डोकंच नसतं! अरे जरा तरी तर्काला धरून दाखवा की.
शेवटी जाता जाता, सर्व चँनेलस् वर ब्रेकमध्ये सेंकंद ते सेकंद त्याच वेळेला जाहिराती दाखवल्या जातात आणि सहाजिकच प्रेक्षकांच्या हातातल्या रिमोटला कोणताच अर्थ रहात नाही. हा प्रेक्षकांवर केवळ व्यावसायिक फायद्याला प्राधान्य देऊन सर्व वाहिन्या सांघिक अन्याय करतात नाही कां?
जाहिरातींच्या भाऊगर्दीत, बातम्यांमध्ये सकारात्मक गुंजभर,
'असेही तसेही', 'कसेही काही ही हंं! दाखवणार्या मालिका डोकेदुखीच!
पर्याय काय?
सुधाकर नातू
"वागावे कसे? असे, की तसे?"........
You tube वरील
माझ्या moonsun grandson
ह्या चँनेलला आता दोन वर्षे पूर्ण झाली........
त्या निमित्ताने.......
भरघोस स्वागत झालेल्या......
विडीओज् पैकी, हा खास तुमच्यासाठी.......
लिंक उघडा व पहा.......
https://youtu.be/OIzPGQi-q3o
आवडला, तर हा चँनेल जरूर
subscribe करा....
सुधाकर नातू
"वागावे कसे? असे, की तसे?"........
You tube वरील
माझ्या moonsun grandson
ह्या चँनेलला आता दोन वर्षे पूर्ण झाली........
त्या निमित्ताने.......
भरघोस स्वागत झालेल्या......
विडीओज् पैकी, हा खास तुमच्यासाठी.......
लिंक उघडा व पहा.......
https://youtu.be/OIzPGQi-q3o
आवडला, तर हा चँनेल जरूर
subscribe करा....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा