"कथा व व्यथा-"सुधा" डिजिटल दिवाळी अंक'२०":
असा एकहाती संपूर्ण डिजिटल अंक प्रकाशित करण्याचा माझा हा तिसरा अनुभव. त्याचे अनुभव ह्या लेखात मांडत आहे. हा शारदोत्सव कसकसा साजरा होत गेला ते उमजण्यासाठी, त्यासाठी हा खटाटोप.१ "सुधा"डिजिटल दिवाळी अंक अनुक्रमणिका
१.१ "ह्रदयसंवाद”
अनुक्रमणिका :
1"जीभेवर साखर अन् डोके ठेवा शांत"
2 "द्रुष्टि बनवेल
सृष्टी!"
3 °बहरलेला पारिजातक": “आनंद घ्या आनंद द्या":
4 "राजकारण व निव्रुत्ती":
5 “आयुष्याचा जमाखर्च":
6 "तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार!":
7 "नव्या दिशा नवे मार्ग आणि प्रेरणादायी स्फूर्ती!":
8 "अपरिहार्य परस्परावलंबन !":
9 "सुख, सुख म्हणजे नक्की काय असतं?:
10 "लाँकडाऊनचे कवित्व": "संसाराचा सारीपाट":.
11 "मागोवा, अनुभवांतून शिकलेल्या गोष्टींचा!"
12 "क्षणा क्षणांतच रंग भरा...."
13 ”मधुमेहावर बोलू काही":
--------------------------
"सुधा’ डिजिटल दिवाळी अंक'20:
१.२ "आजोबांचा बटवा”:
अनुक्रमणिका:
1"चांगुलपणाची साखळी":
2 "जन्मगाठ":
3 निव्रुत्तीनंतरचे दिवस":
4 श्री ज्ञानेश्वरींतले अमूल्य विचारधन":
5 "हे प्रणयगंध किती अनंत-१"
6 "आगे बढो वसंतरावजी":
7 "हे प्रणयगंध किती अनंत-२":
8 "हे प्रणयगंध किती अनंत-3":
9 "हे प्रणयगंध किती अनंत-4":
10 "चांगुलपणाची ऐशी तैशी":
11 "हा खेळ, सावल्यांचा !":
12 "आठवण: 'चाळीस वर्षांपूर्वीची 'नांदी' "!
13 "मोबाईल एक, कल्पना अनेक_1": "कोडे- एक कोडेच'! उर्फ कोडे पुराण":
14 "मोबाईल एक, कल्पना अनेक-1":
----------------------------
शिवाय
'सुधा’ डिजिटल दिवाळी
अंक'20 '
१.३ रंगांची दुनिया':
अनुक्रमणिका:
1 "टेलिरंजन-१-काही ही हं"!:
2 "टेलिरंजन-2-काही ही हं"!:
3 टेलिरंजन-3-काही ही हं"!:
4 "टेलिरंजन-4-काही ही हं"!:
5 "चित्रदर्शन-१": "द गुड न्यूज"
6 "चित्रदर्शन-2": "थप्पड":
7 “चित्रदर्शन-३”: "बाघी३":
8 "चित्रदर्शन-4": "मराठी चित्रपट वयात आला!": "प्रवास"
9 "चित्रदर्शन-5": "विकून टाक !" :
10 “रंगदर्शन-1": "व्हँक्युम क्लिनर":
11 रंगदर्शन-2 “ " तरुण आहे रात्र अजुनी!":
12 "शारदोत्सव-1": "अंतस्थ कोणी":
13 "शारदोत्सव-2": “'मेमरी कार्ड:
14 "शारदोत्सव-3": "शाश्वत वास्तववादी विचारसूत्रे"
चित्रदर्शन-4": "मराठी चित्रपट वयात आला!"
रंगदर्शन-2 “ " तरुण आहे रात्र अजुनी!"
15 "शारदोत्सव-4": "एक अद्भूत युगांत":
------^--------------------
'सुधा’ डिजिटल दिवाळी अंक'20:
१.४ "नियतीचा संकेत”
अनुक्रमणिका:
1 “संक्षिप्त वार्षिक राशीभविष्य-२०/२१
"पुढचे पाऊल_¬जन्मचंद्रराशी”:
;शनिमहात्म्य: *शनीची साडेसाती*:
2 सर्वात भाग्यवान कोण?":
3 "राहू व केतूच्या आगामी राश्यंतराचे राशीनिहाय परिणाम":
4 "राहू व केतूच्या आगामी राश्यंतराचे दूरगामी परिणाम":
5 "अभ्यासकांसाठी उपयुक्त माहिती":
6 "संख्याशास्त्र उपयुक्त माहिती":
7 "जन्मपत्रिकेची चिकीत्सक मीमांसा":
8 "माहितीचा खजिना":
9 'दीर्घायुष्य कोणाला? कसे व कां?:
10 "पुढचे पाऊल"
अर्थात अभिनव राशीभविष्य:
१नोव्हे.20 ते ३१ डिसें'21:
।। शुभम् भवतु।।
--------^-------------------
२ प्रचार व प्रसिद्धीची झलक:
२.१
"सुधा" डिजिटल दिवाळी अंक'२०:
मानधन फक्त रु.१००/-
ह्रदयसंवाद, आजोबांचा बटवा, रंगांची दुनिया ह्या तीन विभागांत मनोरंजक व मार्गदर्शक वैविध्यपूर्ण अनेक लेख......
ह्याशिवाय
खास आकर्षण.......
"नियतीचा संकेत" मध्ये.....
अनुकुल गुणांवर आधारित प्रयत्न व अपेक्षा ह्यांची सांगड घालून समाधान मिळविण्याचा मार्ग सुचविणारे एकमेवाद्वितीय सर्व राशींचे
संपूर्ण वार्षिक राशीभविष्य-'२०/२१"...
"सर्वात भाग्यवान कोण?"...
"दीर्घायुष्य कोणाला? कसे व कां?".....
"राहू व केतूच्या राश्यंतराचे दूरगामी व राशीनिहाय परिणाम....
असे अनेक अभ्यासपूर्ण लेख.....
इतके पुरे नाही,
म्हणून की काय......
माझा "Digital Management Musings"* हा खास अंक विनामूल्य दिवाळी भेट.....
त्वरा करा...
लगेच प्रतिसादात आपला होकार व whatsapp no द्या. Online payment कसे पाठवायचे ते कळवले जाईल....
"वाचकांची पसंतीची मोहोर"....
-------------------
२.२
सुधा" दिवाळी डिजिटल अंक'२०:
मूल्य केवळ रु. १००/-
online payment
अंक मिळाल्यावरच करायचे !........
त्वरा करा...
लगेच आपला होकार whatsapp ने 9820632555 किंवा येथे आपला मोबाईल नंबर देऊन कळवा........
अंकाची ओळख करून देणारा विडीओ
पहाण्यासाठी ही लिंक उघडा........
https://youtu.be/JQFPsdMZvm0
-------------------------
२.३ रंगीत प्रचार प्रतिमा:
------------------------३ वितरण
३.१
सादर वंदन
"सुधा" डिजिटल दिवाळी अंक-२०२० साठी आपण प्रसिद्धीपूर्वीच मागणी नोंदविली, त्याबद्दल मनःपूर्वक आभार. तो लौकरच प्रकाशित केल्यानंतर तुम्हाला पाठवला जाईल. तेव्हा online payment बद्दल माहिती दिली जाईल.
येथे माझा "Digital "नियतीचा संकेत" हा खास ज्योतिष विषयक अंक विनामूल्य पाठविण्यात मला आनंद होत आहे.
नूतन दिवाळी व नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
धन्यवाद
सुधाकर नातू.
ता.क.
"सुधा" डिजिटल दिवाळी अंक-२०२० विषयीचा माझा संदेश आपण आपल्या whatsapp grps मध्ये जरूर share करावा, ही विनंती.
-------------------------
३.२
।। श्री ।।
सादर वंदन
आज दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर माझा एकहाती
लेखन प्रयत्न असलेला "सुधा" डिजिटल दिवाळी अंक'२० तयार करून तो प्रकाशित करायला मला, माझ्या मुलाची श्री समीरची खूप मदत झाली. त्याने केलेल्या योग्य त्या मांडणी व सजावटीसह हा अंक चार भागात मी तुम्हाला पाठवत आहे. जणु चार दिवाळी अंक वाचल्याचा आनंद तुम्हाला मिळणार आहे.
असे वेगवेगळे अंक पाठवण्याचा उद्देश डिजिटल वाचनामध्ये शेवटी मर्यादा असतात, हे गेल्या दोन वर्षांच्या अनुभवावरुन मला ध्यानात आले. त्यामुळे ह्या सगळ्या चारही विभागांचा मजकूर जर एकत्र केला असता-(यंदा २१६ प्रुष्ठे), तर वाचकांना पाहिजे तो लेख वाचण्यासाठी बर्यापैकी कष्ट घ्यावे लागतील हे माझ्या लक्षात आले. त्यामुळे सुटसुटीत असे:
१ 'हृदय संवाद'-५७ प्रुष्ठे
२ 'आजोबांचा बटवा'-५१ प्रुष्ठे
३ 'रंगांची दुनिया'-५० प्रुष्ठे
आणि
४ 'नियतीचा संकेत'-६८ प्रुष्ठे
हे चार सुधा डिजिटल दिवाळी अंक'२० विभाग मी येथे पाठवत आहे.
सर्व दिवाळी अंक विभाग जरूर वाचा. एकहाती वयाच्या ७६ व्या वर्षी केलेला माझा हा प्रयत्न आपल्याला आवडेल अशी आशा आहे.
आपल्या सहकार्याबद्दल आभार व आपल्या योग्य त्या प्रतिसादाची अपेक्षा ठेवतो.
ही दिवाळी आणि आगामी नववर्ष सगळ्यांना सुख समाधान व आनंदाचे जावो ही सदिच्छा.
धन्यवाद
आपला
सुधाकर नातू
१४/११/२०२०
माहीम मुंबई ४०००१६
ता.क.
त्याच बरोबर पुढे ह्या संपूर्ण सुधा डिजिटल दिवाळी अंकाचे मानधन शंभर रुपये ऑनलाईन कसे पाठवायचे त्याचा संदेश देत आहे. ते आपण पाठवावे ही विनंती.
--------------------------
३.३
सुधा" डिजिटल दिवाळी अंक'२०:
मानधन Rs 100/- only
You can pay by PayTm to my mb no
9820632655
Or
Thru bank to my savings bank a/c in Cosmos coop bank ltd DL Vaidya Road Dadar west Mumbai 400028
a/c no 0120501023764
IFSC code: COSB 0000012
--------------------------
३.४
एक विनंती संदेश:
माझे 'सुधा' डिजिटल दिवाळी अंक'20 चार विभाग व मॅनेजमेंट म्युझिंगस् डिजिटल अंक आपल्याला आता मिळाले असतील. ते आपण सवडीने वाचालच.
अंक वाचल्यावर आपला जो काही बरा वाईट प्रतिसाद असेल तो मला कळला तर मला आनंद होईल.
जाता जाता माझी विनंती एवढीच की, ते सारे अंक, आपण कृपया इतर संदेश आलेले जसे पुढे ढकलतो, तसे पुढे पाठवू नयेत. कारण आपण त्यांच्यासाठी
रू 100/_मूल्य वेचले आहे. आपण कृपया ज्यांना ते अंक पाठवू इच्छिता, त्यांचे नाव आणि व्हाट्सअप मोबाईल नंबर जर आपण मला कळविण्याचे थोडे कष्ट घेतलेत, तर मी आपला आभारी राहीन. त्यामुळे मी त्यांना माझ्या ह्या अंकांच्या वैशिष्ट्ये याबद्दल अवगत करून, त्यांचा व्यवस्थित प्रसार व प्रचार करू शकेन. त्यांची इच्छा असेल तर ते माझ्याकडे
मागणी नोंदवतील आणि माझ्या प्रयत्नांना योग्य तो न्याय व मूल्य मिळेल.
धन्यवाद.
सुधाकर नातू
किंवा,
सोईचे द्रुष्टीने, माझ्या डिजिटल "सुधा" दिवाळी अंकाची यथासांग ओळख करून देणारा माझा पुढील संदेश* आपल्या whatsapp grps तसेच परिचितांना क्रुपया पाठवावा.
तुमच्या यथोचित प्रतिसादाची अपेक्षा आहे.
धन्यवाद
सुधाकर नातू
* प्रसिद्धी संदेश-२.३
--------------------------
४. वितरणपश्चातचे "कवित्व":
दिवाळीच्या सुमुहूर्तावर १४ नोव्हेंबर'२० रोजी अंक संच मागणी नोंदविणार्या सर्व वाचक ग्राहकांना आँनलाईन पाठविण्यात आले.
सुदैवाने त्यानंतर आठवडाभरात जवळ जवळ पुष्कळांनी मानधन रु १००/- online पाठविले व आनंद झाला.
मात्र त्यानंतर ते मानधन पाठवण्याची विनंती करणारा पुढील संदेश पाठविला व आतापर्यंत ह्या
बेफिकीर वाचकांकडून मनस्ताप होणारा मनस्ताप वाढतच गेला:..
४.१
"आठवणसंदेश-१":
"सुधा" डिजिटल दिवाळी अंक'२०:
मानधन Rs 100/-सुचनांप्रमाणे आपण online पाठवले नसेल तर ह्या शनी, रविवारी सुट्टीत क्रुपया ते पाठवावे.
You can also pay by PayTm to my mb no 9820632655
धन्यवाद"
--------------------------
"आठवणसंदेश-२":
आपणाकडून अजून कोणतेच उत्तर नाही.
Please do rhe needful.
-------------------------
"आठवणसंदेश-३":
आपणाकडून अजून कोणतेच उत्तर नाही.
Please do rhe needful.
--------------------------
"आठवणसंदेश-४":
आपल्या मागणीनुसार माझा "सुधा" डिजीटल दिवाळी अंक'२० पाठवून, आता दोन आठवडे झाले. तरी त्यानंतर आतापर्यंत अंकाचे online पाठवावयाचे मानधन रु १००/- मला आलेले नाही. तसेच ते स्मरण करून देणार्या माझ्या संदेशांना आपण कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. ह्या बेपर्वाईचे सखेद आश्चर्य वाटते.
क्रुपया ह्या संदेशानंतर तरी आपण ते ताबडतोब online पाठवाल अशी अपेक्षा ठेवतो.
सुधाकर नातू
----------------------------
ह्या बेपर्वाईच्या कटू घोटांमुळे रु १००/- इतकी मामुली रक्कम पाठविण्याच्या मोजक्या, अगदी एका हाताच्या बोटांवर मोजता येतील अशा defaulters वाचकांच्या प्रर्व्रुत्तीचे मनःशांती विचलीत करण्याचे अनुभव आल्यानंतर धडा मिळाला की, असे अंक वितरण झाल्यानंतर त्याचे मूल्य पाठविण्याची कल्पना पूर्णतः चुकीची होती. सहाजिकच त्यानंतर प्रथम online मोबदला व तो मिळाल्यानंतर अंक पाठविला जाईल ही सुधारणा केली आहे.
"व्यथा व मनस्ताप वाढ":
त्या defaulters पैकी दोन वाचकांनी कधीही कोणताही प्रतिसाद वा उत्तर देणे बिनधास्तपणे टाळले.
# एकाने मानधन पाठवले.नाही हे कळविल्यानंतरच्या reminder ला असे प्रतिसाद दिले:
# "मी मी कधी मागितला 🤔 (हे उत्तर त्याने १४नोव्हेंबर''२० रोजी अंक मिळाल्यानंतर ताबडतोब कळवू शकला असता!)
त्याचा पुढचा प्रतिसाद उद्वेगजनक होता;
# "👆🏻 मेसेज पुढे पाठवत आहे जेणे करून कोणाला घ्यायचा असेल तर तो डायरेक्ट घेईल त्या साठी डिटेल मगितले होते!"
हा मला धक्काच होता. अधिक तगमग नको म्हणून मी नाईलाजाने हे उत्तर धाडले:
"माझ्या समजूतीत घोटाळा झाल्याने मी अंक पाठवले. ते मिळाल्यानंतर पेमेंट online कसे पाठवायचे तेही कळवले होते. असो. आपल्याला अंक सस्नेह भेट दिले आहेत असे समजतो. धन्यवाद.
# दुसर्याने इतक्या महाभारतानंतर दिलेले उत्तर तर चीड आणणारे होते:
# "सध्या आम्ही ***** ह्या गांवी %%%% ह्या जिल्ह्यात आहोत!"
जेव्हा अंक मिळाला तेव्हापासून की कधी ह्याचा ह्यात उल्लेख नाही. शिवाय ते कुठे केव्हा असण्याचा onlIne payment पाठविण्याशी काय संबंध होता, हे त्यांचे त्यांना ठाऊक ! कारण ज्या अर्थी हे उत्तर त्यांच्या मोबाईल वरून मला whatsapp वर आले त्याचा अर्थ त्या गांवी internet range उपलब्ध होती हे स्पष्ट आहे.
# तिसर्या ग्रहस्थांचा प्रतिसाद असाच न पटण्याजोगा:
# "🏵🙏🏻🌸हो पाठवतो सर ,माझी अडचण अशी झाली की माझ्याकडे G pay
App आहे त्यावरून मला फक्त करता येत ,pay Tm नाही ,ते मुलाकडून करावे लागते ,सर काळजी करू नका ,जास्त उशीर झाला की मी दंडा सह पैसे पाठवीन मागच्या वर्षी सारखे ,
थँक्स"
ह्याला मी असा प्रतिसाद दिला:
"अंकाचे मानधन रु १००/-पाठविण्यात आपल्या उशीराबद्दल दंड जरुर नाही. मुलाला तुम्ही सांगितले की, PayTm ने तो सत्वर पाठवू शकतो. धन्यवाद."
अशा तर्हेने आज दिवाळी अंक पाठवून २६ दिवस झाले तरी मला ह्या मोजक्या defaulters नी साधे फक्त रु १००/- मानधन पाठविण्याचे सौजन्य दाखविलेले नाही. ह्यानंतर कोणताही पाठपुरावा करणे ही माझ्यासाठी मानसिक ताणतणाव वाढविणारी बाब असेल, ह्यात शंका नाही. त्यामुळे उदार मनाने ह्या मानधन देणे जाणीवपूर्वक टाळणार्यांना माझा मेहनतीने बनविलेला साहित्य खजिना मी विनामूल्य दिवाळी भेट म्हणून दिला, असे समजून ह्या कथेच्या व्यथेवर पडदा टाकणेच अखेरीस शहाणपणाचे ठरेल.
सुधाकर नातू
ता.क.
पहिला 'सुधा' डिजिटल दिवाळी अंक'१८ हा मी ज्यांनी ज्यांनी मागणी केली, त्या सर्वांना विनामूल्य वितरित केला होता.
मात्र दुसरा "सुधा" डिजिटल दिवाळी अंक'१९ वितरित करताना तो मिळाल्यानंतर online
रु. ७५/-मानधन पाठवायचे ह्या पद्धतीने वितरित केला होता. तेव्हा निदान माझ्या द्रुष्टीने तरी Getting money is not the issue here, but the purpose is to recognise the efforts gone through and honour the value of our tradition of Marathi Diwali issues, in new shape! अशी विचारधारा होती.
निवडक मान्यवरांना मात्र हा अंक विनामूल्य पाठवला होता.
दुर्दैवाने तेव्हाही असेच हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या वाचकांनी असेच रु. ७५/-मानधन पाठविण्याचे सौजन्य दाखवले नव्हते.
ह्या वेळी "सुधा" डिजिटल दिवाळी अंक'२० हा तिसरा अंक मात्र मी कोणालाही विनामूल्य न पाठवता रु.१००/- मानधन ठेवले. हे करण्यामागे डिजिटल माध्यमातून वाचन कठीण असते ही जाणीव मला झाली. त्यामुळे विनामूल्य अंक मिळूनही तो खरोखरच किती वाचक वाचतील ही शंका आली. त्यामुळे ज्यांना असे डिजिटल वाचन करून दिवाळी अंक वाचण्याची इच्छा आहे व आपल्या खिशातून रु. १००/- मानधन पाठविण्याची ज्यांची तयारी असेल तेच त्याबद्दल मागणी नोंदवतील ही पार्श्वभूमी होती. शिवाय मी हा जो साहित्य निर्मितीचा इतका एकहाती खटाटोप करत आहे, त्या कष्टांचे असे अल्पस्वल्प कां होईना चिज व्हावे ही रास्त मनीषा होती. After all, "Nothing is Free and if you need, you should be ready to pay for it."
धन्यवाद
सुधाकर नातू.
पहिला 'सुधा' डिजिटल दिवाळी अंक'१८ हा मी ज्यांनी ज्यांनी मागणी केली, त्या सर्वांना विनामूल्य वितरित केला होता.
मात्र दुसरा "सुधा" डिजिटल दिवाळी अंक'१९ वितरित करताना तो मिळाल्यानंतर online
रु. ७५/-मानधन पाठवायचे ह्या पद्धतीने वितरित केला होता. तेव्हा निदान माझ्या द्रुष्टीने तरी Getting money is not the issue here, but the purpose is to recognise the efforts gone through and honour the value of our tradition of Marathi Diwali issues, in new shape! अशी विचारधारा होती.
निवडक मान्यवरांना मात्र हा अंक विनामूल्य पाठवला होता.
दुर्दैवाने तेव्हाही असेच हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या वाचकांनी असेच रु. ७५/-मानधन पाठविण्याचे सौजन्य दाखवले नव्हते.
ह्या वेळी "सुधा" डिजिटल दिवाळी अंक'२० हा तिसरा अंक मात्र मी कोणालाही विनामूल्य न पाठवता रु.१००/- मानधन ठेवले. हे करण्यामागे डिजिटल माध्यमातून वाचन कठीण असते ही जाणीव मला झाली. त्यामुळे विनामूल्य अंक मिळूनही तो खरोखरच किती वाचक वाचतील ही शंका आली. त्यामुळे ज्यांना असे डिजिटल वाचन करून दिवाळी अंक वाचण्याची इच्छा आहे व आपल्या खिशातून रु. १००/- मानधन पाठविण्याची ज्यांची तयारी असेल तेच त्याबद्दल मागणी नोंदवतील ही पार्श्वभूमी होती. शिवाय मी हा जो साहित्य निर्मितीचा इतका एकहाती खटाटोप करत आहे, त्या कष्टांचे असे अल्पस्वल्प कां होईना चिज व्हावे ही रास्त मनीषा होती. After all, "Nothing is Free and if you need, you should be ready to pay for it."
धन्यवाद
सुधाकर नातू.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा