गुरुवार, ८ ऑक्टोबर, २०२०

"आजोबांचा बटवा-११": "चांगुलपणाची ऐशी तैशी":

 "आजोबांचा बटवा-११": "चांगुलपणाची ऐशी तैशी":

प्रत्येक माणसाचे एक विशिष्ट व्यक्तिमत्त्वाचे असते, तशीच वागण्याची तर्हाही वेगवेगळी अशी चित्रविचित्र पद्धत असू शकते. प्रत्येकाच्या स्वभावाचे कंगोरे वेगळे असतात, कुणी अती बिनधास्त, तर कोणी चिकित्सक असतो. ह्याचे मनोरंजक दर्शन, खूप वर्षांपूर्वी मला "संवाद" हा ई टीव्हीवरील मुलाखत, चर्चावजा कार्यक्रम बघताना आला होता.

त्या कार्यक्रमात, देशपांडे नावाच्या एका लेखनिकाने, कै. बाबुराव पेंढारकरांच्या व्यवहारी दृष्टिकोनाविषयी जी आठवण सांगितली, ती खरोखर संस्मरणीय होती. तिचा मला जसा आठवतो तसा सारांश येथे प्रथम देतो:

"लेखनिक म्हणून देशपांड्यांना बाबूराव दर तासाला जाण्या-येण्याचे बसभाडे आणि शिवाय दोन तासांचे दहा रुपये देणार होते. जर देशपांडे येऊनही, काही कारणाने लेखनाचे काम झाले नाही, तर तासाचे अडीच रुपये दिले जाणार होते. हे इतके काटेकोर व्यवहार कमी आहेत म्हणून की काय, पण समजा एखाद्या दिवशी देशपांडे काही कारणामुळे, पेंढारकरांकडे येऊच शकले नाहीत, तरीही बाबुराव त्यांना अडीच रुपये देणार होते. हे न केलेल्या कामाचे अडीच रुपये कशा करता? या प्रश्नाचे बाबूरावांचे उत्तर खरोखरच मार्मिक व त्यांची व्यावहारिक दृष्टी दाखवणारे होते. "ते अडीच रुपये आपापसातील लेखनिक व लेखक ह्यांच्यामधील ऋणानुबंध जपण्यासाठी होते."

खरोखरच कमाल आहे ह्या माणुसकीची व चांगुलपणाची!

आज इतक्या वर्षांनंतर हा संदर्भ कां व कसा आठवला ते आता सांगतो.
कोरोना महामारीच्या महासंकटामुळे, लाँकडाऊनचे काळात घरोघरी घरकाम करणारे सेवक वा मोलकरणींना सुरक्षेच्या कारणास्तव बोलावले जात नव्हते. नंतर हळूहळू काही महिन्यांनंतर, ज्या वेळी त्यांना घरकाम करायला बोलावलं गलं, तेव्हा त्यांना ज्याने त्याने आपआपल्या मर्जीनुसार पूर्ण पगार वा निदान अर्धा पगार त्यांच्या गैरहजेरीबद्दल दिला.

अशी ही चांगुलपणाची साखळी आपण नेहमी पाहत असतो. कुणी ना कुणी कशा ना कशा प्रकारे एकमेकांना मदत करत असलेले आपल्याला दिसून येते. मात्र ह्याला छेद देणारी ही थोडीशी वेगळी गोष्ट आहे, अशाच एका जेष्ठ जोडप्याची. त्यांनी सहाजिकच आधीचे तीन चार महिने कोणताही धोका नको, म्हणून मोलकरणीला बोलावले नव्हते. परंतु नंतर तिची कामे करणे त्यांना वयोमानापायी अशक्य झाल्यावर, तिचा गैरहजेरीतील सर्व महिन्यांचा पगार दिला आणि त्याप्रमाणे ती काम करायला लागली. इतके महिने घरातली सगळी साफसफाई न झाल्याने ते काम आवश्यक होतं. साहाजिकच ती आल्यावर त्या जोडप्याने तिला पूर्ण घर साफ करायला सांगितले. तो महिना पूर्ण झाल्यावर नेहमीचा पगार तिला दिल्यावर, ती काय म्हणाली ते अगदी खेदजनक होते.

ती म्हणाली की "मला महिन्याचा पूर्ण पगार फक्त दिलात, पण सर्व घर साफ केलं त्याचे वेगळे पैसे तुम्ही दिले नाहीत!" खरे म्हणजे या जोडप्याने तिच्या गैरहजेरीचा पूर्ण पगार देण्याऐवजी तिला अर्धा पगार दिला असता, तरी चालण्यासारखे होते कारण लाँकडाऊन झाल्यावर तर ती सरळ गावालाच निघून गेली होती. तिच्या गैरहजेरीत, तिची कामे ह्या व्रुद्ध जोडप्यानेच केली होती. सहाजिकच अर्धा पगाराचीच तिने खरं म्हणजे अपेक्षा ठेवायला हवी होती. परंतु चांगुलपणा म्हणून त्या जोडप्याने सर्व महिन्यांचा पूर्ण पगार दिला होता, ह्याची थोडीतरी जाण तिने ठेवायला हवी होती.

ह्या गोष्टीतले तथ्य काय, तर अशा
मोलकरणीसारख्या काही लोकांना, फक्त त्यांच्या हक्कांची जाणीव असते, पण जबाबदारी वा कर्तव्याची नाही. खरं म्हणजे मालकाने गैरहजेरीबद्दल दाखविलेल्या चांगूलपणाची थोडीशी परतफेड समजून, आपले एक आवश्यक कर्तव्य म्हणून, तिनेही आपल्या वयोव्रुद्ध मालकाने सांगितलेले घर साफसफाईचे काम केल्यावर कसलीच अपेक्षा तिने ठेवायला नको होती. पण ती नको तेच बोलली, हे दुर्दैव्व. त्या ज्येष्ठ जोडप्याने दाखविलेल्या चांगुलपणाची ही अशी विपरीत परतफेड होती.

"चांगुलपणाची ऐशी की तैशी" असेच ह्या अनुभवावरुन म्हणायचे.

सुधाकर नातू

ता.क.
साठाहून अधिक एकसे बढकर एक.........
असे विडीओज् पहाण्यासाठी.........
माझ्या you tube वरील
moonsun grandson
चँनेलची ही लिंक......
ताबडतोब उघडा.......आणि.....
चेनेल Subscribe ही करा......

https://www.youtube.com/user/SDNatu

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा