सोमवार, २६ ऑक्टोबर, २०२०

"टेलिरंजन-५": काही ही हं!:

 "टेलिरंजन-५": काही ही हं!:

माणसाचं आयुष्य म्हणजे जणू आगगाडीचा प्रवास असतो मुंबई पासून दिल्ली पर्यंत. पण इथे जेव्हा तुम्ही गाडीत शिरता, तेव्हाच तुम्हाला जिथे उतरायचं त्या स्टेशनचं तिकीट दिलं जातं. ते तुमच्या जवळ असतं, पण तुम्हाला ते दिसत नाही.

आज ती आठवण व्हायचं कारण म्हणजे टेलिव्हिजन वरच्या मालिका त्या सुरू होतात पण संपणार कधी, हे खरं म्हणजे त्या वेळेला माहीत नसतं. पण फारच थोड्या वर्ष-दोन वर्ष तर काही पाच पाच वर्ष टिकून राहतात. अल्पजीवी मालिका देखील असतात. आता हे असं कां? ह्या प्रश्नाला उत्तर काही मिळत नाही.

मालिकांचा आयुष्य हे खरं म्हणजे प्रेक्षकांच्या मर्जीवर आणि जाहिरातदारांच्या निर्णयावर अवलंबून असतात. त्यामुळे काही मालिका टिकतात, तर काही मालिका लवकर संपवलल्या जातात. आता व्यवसाय म्हणून मालिका जास्तीत जास्त टिकाव्यात, म्हणून लेखक आणि इतर टीम ना काही त्याच्यामध्ये नवनवीन कल्पनारुपी धो धो पाणी घालतात. मात्र व्याधी दूर होऊन, आजार्याचे आरोग्य सुधारावे म्हणून, डॉक्टर जसे औषधोपचार करतात तशी प्रेक्षकांची नस कळली तरच मालिका आवडतील. अशी ही माणसाची आणि मालिकांची गंमत आहे.

प्रत्यक्षात मात्र वेगळेच माथी मारले जाते, बिचार्या प्रेक्षकांच्या.

मराठी मालिकांमध्ये नेहमी तर्काला किंवा व्यवहारात अशक्य असेल किंवा कोणालाही मनाला पटणार नाही अशाच तर कां दाखवतात, काही कळत नाही.."अग्गबाई सासुबाई" मध्ये इतकी वर्ष वैधव्यांत काढून असावरी मुलाचं लग्न झाल्यानंतर म्हातारचळ लागल्यासारखं चक्क अभिजीत राजेंच्या यांच्या प्रेमात काय पडते आणि त्यानंतर त्यांचे काही बाष्कळ पोरखेळ चालतात, ते सर्व खरोखर न पटणारे असेच. "माझा होशील ना? ही मालिका चांगली रंगतदार बनत असताना, अचानक आदित्य आणि सई यांचं आदित्यच्या आईच्या वाढदिवसानिमित्त आश्रमात गेल्यापासून, नंतर जे जे काही घडत जातं, ते केवळ मूर्खांचा बाजार असल्यासारखंच. त्याचे साहेब लोक त्याला वेटर काय बनवतात, आँफीसमध्ये नशा पार्टी काय करतात किंवा वेड्यासारखी सई त्याने दिलेली रातराणी ईअरिंगची भेट हरवली म्हणून, कचऱ्यात काय शोधत बसते, सारे काही न पटण्याजोगे. नावाजलेली मालिका देखील अपवाद नाही. "आई कुठे काय करते" मधे देखील असंच काहीतरी न पटणारं दाखवतात. आपला नवरा व्यभिचार करतोय हे कळूनही अगदी कडेलोट होईपर्यंत त्याची पत्नी आप्पा आणि सासूबाईंना त्याचे नालायक प्रताप सांगायचे सोडून, इतरच काही सांगत बसते हे पटत नाही. तसंच इतक्या हुशार सासूबाईंना देखील संजना आणि अनिरुद्ध काही झालं असेल म्हणून ती अशी वागत असेल हे कळत नाही !

प्रेक्षकांना अक्षरशः संताप येईल अशा तर्‍हेचंच काहीतरी दाखवत बसणाऱ्या या मालिकांचा इतका उबग आला की, शेवटी मी सोशल मीडियावर एक संदेश प्रदर्शित केला. तो प्रेक्षकांना मालिकांसंबंधी काय वाटते, ते सांगायला लावणारा होता, जणु एखादा ओपिनियन पोल असल्यासारखा. त्याला भरघोस प्रतिसाद मिळाला. तो येथे देतो त्यामुळे टीव्हीवर काही ही हं दाखवलं जातं, त्याची कल्पना येईल:

# माझा संदेशः
"निरर्थक, पोरकट व बाष्कळ असं, कसंही, काही ही हं, दाखविणार्या "अग्गबाई सासूबाई", "माझा होशील ना?", "माझ्या नवर्याची बायको" अशा मालिकांमुळे झी मराठी वाहिनीचा दर्जा वेगाने घसरत चालला आहे, असं वाटतं कां?°
"झी मराठी वाहिनी ला दर्जा म्हणजे काय तेच माहीत नाही. प्रेक्षकांना ही ते आपल्याच तोडीचे समजतात".

त्याला आलेले हे प्रातिनिधीक प्रतिसाद:

"झी च कशाला, एकंदरच सगळा आनंदी आनंद आहे, मराठी चॅनेल म्हणजे."

"मी तर म्हणतो, या मालिकांमुळे ती वाहिनीच बंद करायला पाहिजेत. मराठी मालिका इतक्या पांचट असु शकतात... प्रेक्षकांचा अगदी अंत पाहतात या मालिका ... माझ्या तोंडुन चटकन शिवी निघून जाते मालिका लागल्या बरोबर... वाहिनीवर खटला दाखल करावासा वाटतो..."

"ते निर्लज्ज आहेत. टीआरपी घसरला की अॅड कमी होतात मग एका फटक्यात बंद करतील.राक्षसाचा प्राण पोपटात असतो तसा यांचा जाहीरातीत असतो. हे दरीद्रीच आहेत. ईतर ठिकाणी 'सावित्रीज्योति' 'बाबासाहेब' 'आई कुठे काय करते?' गर्दी खेचत आहेत.तसही नीट बघीतल, तर कित्येक वर्ष ते एकच कथा नांव बदलुन दाखवतात. खेडेगाव शेलार नाहीतर गायकवाड घराणं, भांडण कट कारस्थान वेड लागणं, स्मृती जाणं, स्वयपाकात मीठ. दागिन्याचा डबा ..भंगार.वाईट म्हणजे 'अलटी पलटी' ती फारच भिकार होती.

"आपल्या सर्वांच्या मताशी मी पूर्ण सहमत आहे. एक साधा आणि सोपा उपाय आहे. झीे मराठी वाहिनी पाहूच नये. मी आता तेच केलेय कारण एवढेच आपली हातात आहे."

"झी असे नाही, तर कुठलेही चॅनेल घ्या. high profile dhanda kasa karava hech shikvtat"

"हे सगळं योग्य ठिकाणी पोहोचवा आणि सांगा सुखाने जगु द्या प्रेक्षकांना."

"मराठी न्युज चँनल्स, मराठी सिरियल्स सगळ बोगस होत चालले आहेत. एकही मालिका अशी नाही की ज्यापासून आपल्याला चांगल काही शिकता येईल. भंगार, गलीच्छ, वाईट कसे आणि किती वागता येईल, याचेच पाठ असतात या सिरीयल्स मधे. आणि गम्मत म्हणजे आपल्या रीयल लाईफमधे आपण स्वतः कोणतीही नवीन गोष्ट करताना ह्यांना/अहों ना विचारून सांगते. अस वागतो. या भंगार सिरीयल्स मधे नवरा म्हणजे एकदम बावळट, त्याला काही ही समजत नाही किंवा तिच्या समोर बोलायचेच नाही. ती चुकीची वागत असली तरी. या सिरीयल्समधील बायकांनी नवर्याकडे नुसतं पाहीलं तरी तो लगेच मुग गिळुन बसतो. हे अजिबातच न पटणार आहे. ईतके मूर्ख कां दाखवतात पुरुषांना सिरीयल्स मधे?"

"असले विचार लिहिताना रोज किती खोटी वृत्ती दाखवली आहे, हे बघितल्याशिवाय कळतच नाही. ह्याचा अर्थ टीका करणारे रोज ह्या मालिका बघतात. आणि नंतर आज काय वाईट दाखवले, त्या वर चर्चा करतात. ह्यातच ह्या सर्व मालिकांचे यश आहे. बघणे बंद करा पहिले. मग काय विचार मांडणार. तेव्हा लिहितील आम्हाला खोटे लिहायला आवडत नाही, म्हणून बघतो."

"हिंदी किंवा मराठी भाषेत - काही चांगल्या मालिका, कुठल्या वाहिनीवर सुचवता येतील कां ?"

"पूर्वीच्या श्वेतांबरासारखं पाहिजे
फक्त १३ एपीसोड"

"मराठी वाहिन्यांना दर्जा कशाशी खातात, हे तरी माहिती आहे कां, असा प्रश्न पडतो. मग तो घसरायचा प्रश्नच येतो कुठे."

"आता सोज्वळ, सात्विक ,करमणूकप्रधान मालिका कौणत्याच वाहीनीवर नसतात. आठवा जुनी मालिका ,गंगाधर टीपरे, अग्नी हौत्र. ई.ई."

"प्रेक्षक हा मनोरंजनासाठी टिव्ही बघतो. परंतू असल्या खालच्या दर्जाच्या मालिका बघत असताना, त्याला फक्त मनस्तापच मिळतो. मालिका निर्मात्याची विचारांची पातळी किती घसरली आहे, हे असल्या मालिका बघत असताना लक्षात येते. असल्या मालिका बंद करायचे फक्त प्रेक्षक वर्गाच्याच हातात आहे. असल्या खालच्या स्तराच्या मालिकांवर बहिष्कार करुन, टिआरपी कमी होईल."

इ.इ.....
आता तरी मालिकांमध्ये वाममार्गाला प्राधान्य न देणारे, वास्तवाला धरून असणारे नेमके T20 सामन्यांसारखे आटोपशीर, मनोरंजन केले जावे
हीच अपेक्षा.

धन्यवाद
सुधाकर नातू

ता.क.
दोनशेहून अधिक प्रेरणादायी लेख.......
नेहमी वाचण्यासाठी...........
माझ्या ब्लॉगची ही लिंक उघडा..........
संग्रही ठेवा....शेअरही जरुर करा.....

http://moonsungrandson.blogspot.com

ह्या शिवाय...
साठाहून अधिक एकसे बढकर एक.........
असे विडीओज् पहाण्यासाठी.........
माझ्या you tube वरील
moonsun grandson
चँनेलची ही लिंक......
ताबडतोब उघडा.......आणि.....
चँनेल Subscribe ही करा......

https://www.youtube.com/user/SDNatu

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा