रविवार, १८ ऑक्टोबर, २०२०

"बहरलेला पारिजातक": "आनंद घ्या आनंद द्या":


°बहरलेला पारिजातक":
आनंद घ्या आनंद द्या":

योगायोगाची मला गंमत वाटते. कालच "हृदयसंवाद" या मालिकेमधील "सुख, सुख म्हणजे काय असतं? यासंबंधी एक व्हिडिओ माझ्या चॅनेलवर आणि एक लेख माझ्या ब्लॉगवर प्रदर्शित केला होता. त्यांचा मतितार्थ एवढाच होता कीः
"सध्याच्या बदलत्या कसोटीच्या काळामध्ये, प्रत्येकाने आपल्यासाठी सुख आनंद वा समाधान म्हणजे काय असतं, हे ज्याचं त्याने शोधावं आणि मिळवावं हा."

आणि आजची गंमत अशी झाली की, मोबाईलमधील जुने whatapp वरील संदेश साफ करताना, एका व्हिडिओने माझे लक्ष वेधले. हा व्हिडिओ# मी कदाचित आधी उघडून बघितलाही नव्हता. म्हणून कुतूहलाने उघडला व पहातच राहिलो, अगदी शेवटपर्यंत. कुणाच्या रिटायरमेंटचे वेळी केलेले ते भाषण होते. वक्ता कोण आहे माहीत नाही. पण विचार छान मांडले होते. सर्वांनी आवर्जून बघावे, ते सर्व मुद्देसूद तर होतेच, पण भविष्यात सर्वांना उपयुक्त असंच पुष्कळ त्यात मला गंवसलं..! ☝🏻

त्यामधील ते दिलखुलास संभाषण, मला विलक्षण इतके परिणामकारक व प्रेरणादायी भासले की,
त्यामुळे मला वाटलं की, हा जो आनंद मला हे पाहताना आणि ऐकताना मिळाला, तो इतरांना द्यावा. ताबडतोब मी माझ्या संग्रहातील समवयस्क ज्येष्ठ व्यक्तींना मी तो विडीओ शेअरही केला. ते करत असताना मला जणु एखादे पुण्यक्रुत्यच आपण करत आहोत, असं काही वाटून गेलं. सहाजिकच या मनोगताचं शीर्षक "बहरलेला पारिजातक": "आनंद घ्या आनंद द्या" असं सुचून गेलं.

तुमचे कुतूहल जास्त न चाळवता ह्या विडीओतील सार येथे मांडण्याचा यत्न करतो:

"उपजीविका व जीविका ह्यांनी आपले जीवन बनते. आपण आपलं जीवन जगण्यासाठी, जे जे करतो ती उपजीविका, तर जीविका म्हणजे चवीने, समाधानानाने कसं जगावं, यासाठी जे जे करायचं अनुभवायचं ते म्हणजे जीविका. अर्थातच जीविका म्हणजे एखादी कुठलीही कला, ती जर तुमच्या अंगी असेल, तर तुम्हाला त्यामधून जे समाधान, जो आनंद मिळतो, तो अवर्णनीय असतो." हे मांडणारं ते संभाषण.

मी आत्तापर्यंत स्वतः निर्मिलेला संदेश लेख वा विडीओज् इतरांना वाटत आलो, ते ह्या हेतूने की, "जे जे आपणासी ठावे ते ते इतरांना द्यावे" या उद्देशाने. पण अशा आगळ्यावेगळ्या व्हिडीओमुळे मला असं जाणवलं की आपल्याला असा इतरांच्या निर्मितीमधूनही जो आनंद मिळू शकतो, तो आनंददेखील इतरांमध्ये अधूनमधून वाटायला हवा, कारण यात एक वेगळेच सुख वा समाधान आहे.

कदाचित माझा हा त्या दृष्टीने दुसरा उपक्रम म्हणावा लागेल. पहिला जुन्या हिंदी चित्रपटसृष्टीतील सुमधुर वैभवशाली संगीताची सुरबहार एखाद्या अप्रतिम गीताद्वारे, शेअर करून मी 'गाए चला जा' ह्या माझ्या आनंद देण्याच्या प्रक्रियेत नुकतेच सुरू केला आहे.

सरते शेवटी मुद्दा हा की, सुख वा आनंद कुठे दुसरीकडे शोधायला लागत नाही, तर जे जे काही आपल्याबरोबर घडत असतं, आपण क्षणोक्षणी जे जे अनुभवत असतो, त्यातून आपल्याला मिळवता येतं. हा साक्षात्कार मला आज झाला. तो मी इथे असा उलगडला. तुम्ही देखील असेच तुम्हाला भावणारे सुखद क्षण असेच टिपायला शिका व ते वाटत जा. त्यामुळे ते द्विगुणित होतील, यात शंकाच नाही.

धन्यवाद
सुधाकर नातू

ता. क. 

असेच प्रेरणादायी लेख.......
नेहमी वाचण्यासाठी...........
माझ्या ब्लॉगची ही लिंक उघडा..........
संग्रही ठेवा....शेअरही जरुर करा.....

http://moonsungrandson.blogspot.com

ह्या शिवाय...
साठाहून अधिक एकसे बढकर एक.........
असे विडीओज् पहाण्यासाठी.........
माझ्या you tube वरील
moonsun grandson
चँनेलची ही लिंक......
ताबडतोब उघडा.......आणि.....
चँनेल Subscribe ही करा......

https://www.youtube.com/user/SDNatu

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा