"नियतीचा संकेत-८": 'दीर्घायुष्य कोणाला? कसे व कां?:
आता त्यातील मूळ मुद्दा व अभ्यासू निरीक्षण मात्र आठवत आहे. त्यामुळे मी तोच लेख वेगळ्या रुपात, माझ्या स्म्रुतीला काहीसा ताण देऊन, येथे उलगडण्याचा मी प्रयत्न करत आहे. ते मुलभूत निरिक्षण असे आहे:
जन्मलग्नपत्रिके मध्ये लग्न स्थान दुसरे, सहावे आठवे व बारावे स्थान व त्यातील ग्रहस्थितीचा अभ्यास, दीर्घायुष्य कां मिळते ह्या दृष्टीने महत्त्वाचा असू शकतो, या संकल्पनेवर तो लेख आधारित होता.
त्याकरता मी माझ्या संग्रहात असलेल्या दीर्घायुषी म्हणजे साधारण ८४ वर्षांहून अधिक आयुष्य लाभलेल्या मंडळींच्या पत्रिकांचा अभ्यास करून तो निष्कर्ष मांडला होता. ह्या स्थानांच्या ग्रहांचा एकमेकांशी संबंध किंवा एकमेकांच्या स्थानात असणे अथवा स्वगृही उच्चीचे असणे ह्यावर दीर्घायुष्य अवलंबून असते असा साधारण निष्कर्ष मी त्या लेखातून मांडला होता.
आता पुन्हा माझ्या पत्रिकासंग्रहातून (ज्या सुदैवाने मी सातत्याने एका खास डायरीत टिपून ठेवत होतो) काही उदाहरणे व पत्रिका विश्लेषण पुढे मांडत आहे:
१ सहसा कधीही आजारी न पडलेल्या ८९ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या स्रीची ही पत्रिका:
जन्मलग्न व्रुषभ- र बु द्वितीय-मं षष्ठ-गु
अष्टम-रिकामे बारावे-शु
लग्नेश शुक्र बाराव्या स्थानी, तर बाराव्या स्थानाचा मालक मंगळ, द्वितीय स्थानात. द्वितीय स्थानाचा अधिपती बुध लग्नात आहे. अष्टम स्थानाचा अधिपती गुरू षष्ठात आणि षष्टाचा अधिपती शुक् बाराव्या स्थानी. अशा पाचही स्थानांचे संबंध आले आहेत त्यामुळे या स्त्रीला ८९ वर्षांचे दीर्घायुष्य लाभले.
२ धडधाकट व उत्तम आरोग्यसंपन्न शरीरयष्टी व स्थिर मनःस्थिती लाभून ८४ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या पुरूषाची ही पत्रिका:
जन्मलग्न-कन्या बु मं द्वितीय-रिकामे
षष्ठ-रिकामे अष्टम-गु बारावे-र
लग्नेश बुध उच्चीचा स्वगृही. प्रथम स्थानाचा अधिपती असा शुभ संबंधित उच्चीचा असला तर चांगले आरोग्य व दीर्घायुष्य मिळण्यासाठी हे उत्तम कारण असते. शिवाय इथेच अष्टमेश मंगळ आहे तर द्वादषेश रवि स्वगृही, अशा योगांमुळे या व्यक्तीला चांगले आरोग्य व दीर्घायुष्य लाभले.
३ अत्यंत देखणे व्यक्तिमत्त्व व दीर्घोद्योगी असलेल्या, ८७ वर्षांचे आरोग्यसंपन्न जीवन लाभलेल्या पुरुषाची ही पत्रिका:
जन्मलग्न कन्या तेथेच र बु शु व श द्वितीय-गुरु षष्ठ-ह के अष्टम-रिकामे बारावे-रा व मं
या पत्रिकेतही लग्नेश बुध स्वगृही असून तो उच्चीचा कन्या राशीत आहे. लग्न स्थानाचा अधिपती असा शुभ संबंधित असला तर त्या व्यक्तीला चांगले दीर्घायुष्य लाभते याशिवाय बाराव्या स्थानाचा अधिपती रवी लग्नात आहे अष्टमेश व्ययात आहे, तर द्वितीय स्थानाचा अधिपती शुक्र लग्नी आहे. षष्ठेश शनी लग्नात आहे. अशा रीतीने पाचही स्थानांचे संबंध उत्तम झाल्यामुळे हा माणूस आयुष्यभर तरतरीत राहीला.
४ कर्तबगार धडाडीचे ८६ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या पुरुषाची ही पत्रिकाः
जन्मलग्न-कुंभ श द्वितीय-शु षष्ठ-चं के
अष्टम-गु बारावे-रा
लग्नेश शनी स्वगृही आहे. लग्नेश स्वगृही असणे हे दीर्घायुष्य मिळण्याचे प्रथम उत्तम कारण असते. द्वादषेशही तोच आहे. तर द्वितीय स्थानाचा अधिपती गुरु, अष्टमात, षष्ठेश चंद्र स्वग्रुही. फक्त अष्टमेश बुध, हा वेगळा चतुर्थ स्थानात मित्र क्षेत्री आहे, एवढाच काय तो फरक. बाकी पाचही स्थान शुभ संबंधित. त्यातून शुक्र उच्चीचा, अष्टम स्थानाचा अधिपती बुध ज्या राशीत आहे, त्याचा धनी शुक्र. अशामुळे या व्यक्तीला चांगले आरोग्य व दीर्घायुष्य लाभले.
५ उत्साही व खंबीर व्यक्तीमत्व लाभलेल्या ८५ वर्षाच्या पुरुषाची ही पत्रिका:
जन्मलग्न-मकर रा द्वितीय-श षष्ठ-रिकामे
अष्टम चं ने बारावे-र बु शु
लग्नेश द्वितीय स्थानात स्वगृही, षष्ठेश बुध बाराव्या स्थानी तर अष्टमेश रवि बाराव्या स्थानी आहे. शिवाय शुक्र बाराव्या स्थानी असून त्या स्थानाचा अधिपती गुरू जो दशमात तुळेत आहे त्याच्याशी अन्योन्य योग करतो. अशा परस्पर संबंधांमुळे चांगले दीर्घायुष्य लाभले.
६ आरोग्यसंपन्न ९५ वर्षांचे जीवन लाभलेल्या स्रीची ही पत्रिका:
जन्मलग्न-व्रुश्चिक गु मं द्वितीय-रिकामे षष्ठ-रिकामे अष्टम-चं ह्या स्थानाचा अधिपती बुध हा पत्रिकेत, द्वादषेश शनीच्या राशीत आहे. बारावे-श
येथे लग्नेश मंगळ स्वगृही वृश्चिकेत असल्यामुळे बलवान आहे, द्वितीयेश त्याच्याबरोबरच आहे, षष्ठेश मंगळ स्वगृही प्रथमस्थानी असल्याने, ग्रहयोग पाचही स्थानांचे होऊन या स्त्रीला इतके दीर्घायुष्य लाभले.
७ विक्रमी शतकपूर्ती करुन १०५ वर्षांचे निरोगी निरामय आयुष्य लाभलेल्या पुरुषाची पत्रिकाः
जन्मलग्न-धनु रिकामे द्वितीय-ह षष्ठ-बु शु श अष्टम-चं मं ने बारावे-गु
लग्नेश गुरु व्ययात तर व्ययस्थानाचा अधिपती मंगळ, अष्टमात. अष्टमेश चंद्र स्वगृही. त्याचप्रमाणे षष्ठेश शुक्र स्वग्रुही व द्वितीय स्थानाचा अधिपती शनी, षष्ठात असे पाचही स्थानांचे संबंध या पत्रिकेमध्ये आढळून येतात. त्यातून षष्ठेश व अष्टमेश स्वगृही अशा बलवान योगांमुळे
शतकपूर्तीचे भाग्य या व्यक्तीला लाभले, असे मानू शकतो.
चांगले शरीरारोग्य आणि उत्तम दीर्घ आयुष्य यासाठी प्रथम द्वितीय षष्ठ अष्टम आणि द्वादश स्थाने यांचा आयुष्य लाभण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे योग एकमेकात असावे लागतात. त्यातून या पाचही स्थानाचे ग्रह जर याच पाच पैकी कुठल्याही स्थानात असले वा स्वगृही किंवा उच्चीचे असले, तर सोन्याहून पिवळे! दीर्घायुष्य मिळण्यासाठी ह्या दृष्टीने आम्ही अभ्यास केला.
अर्थात अजून यासाठी तशी अधिक उदाहरणे आपल्याला घ्यावी लागू शकतात. मात्र हां नियम व निरीक्षण अयोग्य ठरविण्यासाठी, असेच पाचही स्थानांचे अपेक्षित योग असूनही, अल्पायुषी वा कमी आयुष्य मिळणार्या माणसांची पुष्कळ उदाहरणे जर मिळाली, तरच या निरीक्षणाला कदाचित छेद जाऊ शकतो एवढेच आम्ही सध्या म्हणतो. ज्योतिषाचा सखोल अभ्यास व्हावा, यातून वेगवेगळ्या प्रकारची अशी निरीक्षणे मानवी आयुष्या बाबतची केली जावीत असेच मला अभ्यासकांना सांगणे आहे.
धन्यवाद
सुधाकर नातू
ता.क.
माझा you tube channel:
moonsun grandson
ही लिंक save करा.......
आणि पहा....
विविधांगी उपयुक्त विडीओज्....
https://www.youtube.com/user/SDNatu
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा