"हृदय संवाद-३२" "सुख, सुख म्हणजे नक्की काय असतं?:
पुष्कळवेळा अचानक आपल्याला कुठेतरी काहीतरी वाचलेलं आठवतं आणि एकंदरच मनाची विचार करायची जी काही पद्धत असते ती आमूलाग्र बदलून जाते. माझं आज तसंच झालं. गेल्या आठवड्यात पेपरमध्ये वाचलेले, अचानक माझ्या ध्यानात आलं. प्रारंभीच त्याचा मला आठवणारा व मनापासून रूचलेला गोषवारा येथे सांगतो. त्याचा अंतर्मुख होऊन तुम्ही विचार जरुर करा:
"सर्वसाधारणपणे आपल्या सुखाच्या व्याख्या ह्या आजपर्यंत ठरलेल्या होत्या, सुख आनंद, आनंद म्हणजे काय तर भेटीगांठी, पार्ट्या व हॉटेलिंग करणे, चित्रपट वा नाटकाला जाणं किंवा एखाद्या लग्न, मुंज वाढदिवस समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रमाला सहपरिवार जाणं किंवा पर्यटनाला एखाद्या चांगल्या नव्या ठिकाणी जाऊन निसर्गरम्यतेचा अनुभव घेणे, ही ठराविक पद्धती म्हणजेच सुखाचा अनुभव वा आनंदमयी जीवन अशीच आपली आतापर्यंत कल्पना झाली होती. ती तशीच मनात रुजून बसली होती.
पण भयानक असे कोरोनाचे महासंकट अवचितपणे आपल्याला विळखा मारुन बसले. त्यामुळे आता वर्तमानात सगळेच संदर्भ बदलल्यामुळे सुख म्हणजे खरं काय असतं, असूं शकतं हा विचार पुन्हा अगदी मनाची कोरी पाटी ठेऊन करावयाची वेळ आली आहे. कारण आपण आनंद म्हणून आत्तापर्यंत जे समजत वा करत होतो, ते जवळजवळ अशक्यच आहे, निदान नजिकच्या वर्षभरात तरी."
अशा तर्हेचा काही ना काही तरी अर्थ निघावा, असा तो त्या वर्तमानपत्रातल्या मजकूर होता. तो खरोखर न विसरण्याजोगाच व सध्याच्या काळात आपण प्रत्येकाने मनात ठेवावा असाच आहे असं मला वाटलं, अन् म्हणूनच आज मी इथे व्यक्त केला इतकेच.
खरंच सुख सुख वा आनंद म्हणजे काय? ते आता आपण आपल्या कुटुंबात चार भिंतीत कोंडून घेतल्यासारखे जीवन जगत असताना, शोधायला हवं, ही आपल्याला जणू काही नवी दृष्टी मिळाली आहे, असंच काहीतरी झालंय असं मला वाटतं. हा सुखाचा शोध तर नक्कीच घ्यायला हवा, की आपल्याला सुख म्हणजे काय? आनंद म्हणजे काय? अर्थात हे ज्याचं त्याने आपापल्या परीने आपापल्या कुवतीप्रमाणे आणि आपल्या एकंदर जीवनानुभवाचे पार्श्वभूमीवर पहायला शिकायला हवे. आपले आपणच शोधायला हवे, पकडायला हवे असं मला वाटतं.
आता हे जे काही सारं, मी ओघाओघात लिहिलं आणि हे लिहिताना जी प्रक्रिया माझ्या मनाची झाली, तोही एक आनंददायी अनुभव आहे, असं मला नव्याने जाणवलं. कारण या साऱ्या शब्दमंथनातून काही ना काही तरी तुम्हाला नव्याने बघायला, वेगळा विचार करायला, मी कळत नकळत लावू शकलोय. हे व असेच नव्या द्रुष्टीचे, नव्या जाणीवांचे सुखाक्षण आपल्याला मिळत जाणार याची खात्री बाळगायला हवी.
सारांश, आज "फिरुनी नवे जन्मेन मी" हा विचार मनामनात मुरवायला हवा....
धन्यवाद
सुधाकर नातू
ता.क.
असेच प्रेरणादायी लेख.......
नेहमी वाचण्यासाठी...........
माझ्या ब्लॉगची ही लिंक उघडा..........
संग्रही ठेवा....शेअरही जरुर करा.....
http://moonsungrandson.blogspot.com
ह्या शिवाय...
साठाहून अधिक एकसे बढकर एक.........
असे विडीओज् पहाण्यासाठी.........
माझ्या you tube वरील
moonsun grandson
चँनेलची ही लिंक......
ताबडतोब उघडा.......आणि.....
चँनेल Subscribe ही करा......
https://www.youtube.com/user/SDNatu
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा