"दाद, प्रतिसाद व पडसाद":
श्री ****
पुढे माझा नवा, ताजा ताजा लेख पाठवत आहे, तो क्रुपया वाचून, तुम्हाला कसा वाटतो ते कळवावे:
ह्या whatsapp संदेशानंतर मी माझा हा लेख माझ्या ह्या स्नेह्याला, मी पाठवला होता:
"ह्रदयसंवाद-३१":
"शुभस्य शीघ्रम् क्षणाक्षणांतच रंग भरा !"
आपल्याला चांगलं जमणारं आणि आवडणारं, असं काही करायला मिळणं, याच्यासाठी कदाचित भाग्य लागत असावं. कारण तशी संधी मिळणारे, ती न मिळणाऱ्यांपेक्षा, कां, कुणास ठाऊक, आपल्याला नेहमीच कमी असलेले आढळून येतात.........
तुमच्या अंगात काही कला असते, तुमची बुद्धिमत्ता तल्लख असते, कुठली ना कुठली तरी आवड वा छंद, अशा कितीतरी गोष्टी तुमच्याजवळ असतात. पण प्रत्यक्ष जीवनात मात्र खडतर असं, जे कदाचित भलतच घडतं........इ.इ.
लेख पुढे वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगची लिंक उघडा.....
http://moonsungrandson.blogspot.com
त्यानंतर अक्षरशः काही तासांतच त्या मित्राकडून व त्याच्या स्नेह वर्तुळातील व्यक्तींकडून
इतक्या सत्वर व अर्थगर्भ प्रतिसाद माझ्या ह्या लेखाला आले की मी त्यांची कधी कल्पनाच केली नव्हती. त्यामुळे मला झालेला आनंद शब्दातीत आहे. ह्या सर्व विचारांचे प्रतिबिंब माझ्या ब्लॉगवरच्या लेखात देण्याची कल्पना मनात आली आणि हा खास लेख त्याचेच रूप आहे.....
ते विविध दाद, प्रतिसाद व पडसाद असे:
# श्री ****** ह्या मित्राची दाद:
"तुमचा हा लेख नेहेमीप्रमाणेच विचाराला खाद्य पुरवणारा आहे. मी २/३ वेळा वाचला, वाटते अरे हे तर सोपे आहे. पण सुरुवात कशी करायची हे मात्र उमगत नाही.
एकदा वाटते आपले आतापर्यंतचे आयुष्य असे कोणते खडतर गेले? नेहेमी प्रमाणे आरामात सर्व करत आहोत. जे काही करत आहो त्याचा कंटाळाही आलेला नाही किंवा आपल्याला काही मिळवायचे राहून गेले असेही वाटत नाही. मग ही अल्पसंतुष्ट वृत्ती कि आळशी पणा ? काही कळत नाही. असो .
एक मात्र आहे तुम्ही मांडलेला प्रत्येक मुद्दा हा विचारप्रवृत्त करायला लावणारा असतो मात्र.
मला जसे वाटले तसे लिहिले आहे चुकभूल द्यावी / घ्यावी .
मी हा लेख माझ्या काही मित्रमंडळीं व नातेवाईक याना पाठवला आहे. त्यांच्या प्रतिक्रिया आल्यावर कळवतो . सध्या 2/३ आल्याआहेत त्या पुढे देत आहे. 👇👇
त्याप्रमाणै ह्या लेखाला आलेले ते प्रतिसाद व पडसाद असे आहेत:
# श्री #####:
"खरे आहे. आपली आवड ,आपले छंद समजून त्यात पुढे जाणारे लोक लेखात म्हंटले प्रमाणे खूपच कमी आढळतात. बहुतांशी लोक जसे जमेल तसे जगण्याला तोंड देत प्रवाहा बरोबर भरकटत जातात. आपली आवड, छंद विसरून जातात. बऱ्याच वेळा खोलवर जावून विचार पण करत नाही की काय केले म्हणजे मला समाधान मिळते? त्यातून पैसा मिळो व ना मिळो पण मला स्वतःला समाधान मिळतेय का? त्यासाठी श्री. नातूंनी म्हंटल्याप्रमाणे माणसाने चिंतन केले पाहिजे. कदाचित आता उशीर झाला असला, तरी आयुष्याच्या संध्याकाळी तो आनंद गवसण्याची शक्यता नाकारता येत नाही."
# श्री %%%%.
" ‼लेख अतिशय प्रांजळ आहे...असेच वास्तव आहे...९५% पर्यंत हेच घडत आले आहे व पुढेही घडणार आहे..लेखात सुरवातीला म्हटल्या प्रमाणे भाग्य असावे लागते (पण तसा उल्लेख यश मिळाल्यावरच होतो).हे भाग्य म्हणजे पुष्पहाराला शेवटी चमक येण्यासाठी वेढलेले कलाबूतच असते असे आपण म्हणू शकतो. मला वाटते लेखात व्यक्त केलेली खंत, पुढील कारणांमुळे सतत वृध्दींगत होत जाते..... स्वतः स्वतःशी प्रामाणिक नसणे,, स्वतः चे गुणदोष न ओळखणे.(तसा प्रयत्नही न करणे), समाजाबरोबर वाहवत जाणे,, अपरिहार्य आहे असे समजून तडजोडी करणे,, तात्कालिक सोयी पहाणे,, अतीव कष्ट टाळणे, इ.इ.इ. लेखात शेवटी आवाहन केलंय तसे काही घडण्याची शक्यता **एखादा टक्काही* नाही..कारण सद्य स्थितीत सतत तडजोड करणे हेच समाजाचे( व समाज धुरिणांचे ) प्राधान्य आहे... महत्वाचे👉 माझ्याही बाबतीत काही फार वेगळे झाले नाही..वर उल्लेख केलेल्या बाबी मलाही तंतोतंत लागू आहेत,मी फक्त वैयक्तिक असूनही समाजाच्या म्हणून नमूद केलेल्या आहेत...😥‼
#श्री @@@@:
आध्यात्मिक विचारसरणीचे ग्रहस्थ:
"यश-अपयश, पूर्णता-अपूर्णता, आर्थिक प्रगती-मानसिक सुख हे विरोधाभास काही नवीन नाहीत. खरं म्हणजे अगदी वैदिक काळापासून या विषयांवर बराच उहापोह झाला आहे. बृहदारण्यक उपनिषदाची ही मूळ थीम आहे. पण आपल्या धार्मिक ग्रंथांचा आधार घ्यायचा मोह टाळून यावर तर्कसंगत विचार आपण करू शकतो.
आपल्याला आवडणारं काम आपण ज्या वेळी करतो तेंव्हा खूप मानसिक समाधान मिळतं यात शंका नाही, मग ते काम रूढार्थाने यश किंवा आर्थिक लाभ देणारं असो वा नसो. याविरुद्ध यश किंवा आर्थिक लाभ मानसिक सुख देतातच असंही नाही, मग ते आवडीच्या कामातून असो वा नसो.
या वरून एक लक्षात येतं की Happiness is a state of mind आणि ती बर्याच इतर गोष्टींवरसुद्धा अवलंबून असते. थोडंसं अंतर्मुख होऊन विचार केला की कळतं की आवड-नावडच आपल्या खूप समस्यांच्या मुळाशी आहे.
व्यवहारातली छोटी मोठी सुखं ही प्रत्येकाच्या वाट्याला येतात आणि तो आपल्या जगण्याचा भाग आहे, पण प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा सुखी समाधानी रहायला मनाची वेगळी ठेवण लागते. खरं म्हणजे निरंतर सुखासाठीच प्रत्येकजण धडपडत असतो, पण गंमत अशी आहे की ते आपल्यातच दडलेलं असतं. फक्त थोडासा दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे."
शेवटी,
# श्रीमती ****.
"उत्तम विचार... मनात असलेला पण अमूर्त..."
माझ्या लेखातील विचारांना अशी भरभरून दाद देणार्या ह्या सर्वांचा मी मनःपूर्वक आभारी आहे.
धन्यवाद
सुधाकर नातू
ता.क.
माझा you tube channel:
moonsun grandson
ही लिंक save करा.......आणि पहा....
विविधांगी उपयुक्त विडीओज्....
https://www.youtube.com/user/SDNatu
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा