"सर्जनशील आविष्कार":
मी whatsapp व फेसबुक हे सोशल मिडिया म्हणजे कल्पनाशक्ती व्रुद्धिंगत करणारी व्यायामशाळाच आहे, असं मानतो.
मी सहाजिकच अशा 'शक्तीशाली' संदेश सातत्याने निर्माण करायचा उद्योग करत असतो. सिग्रेटची तल्लफ आल्यावर सिग्रेट ओढणार्याला जसं क्रुतक्रुत्य झाल्यासारखं वाटत असेल तसं काही तरी मी ह्या सर्जनशीलतेमुळे मिळवत बसतो. हा पुढील विविध 'शब्दच्छल' त्याच कक्षेतील:
# "तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार!":
आपणच, वेळोवेळी घेतलेले निर्णय व कृती ह्यामुळे, आपले चांगले वा वाईट करत असतो.
माझ्या एका मित्राची ही गोष्ट आहे. SSC नंतर Science ला पहिल्या वर्षाला ७७% गुण त्याने मिळवल्याने इंटरसाठी त्याचा अभ्यास अधिक चांगला व्हावा, म्हणून वडिलांनी त्याला हॅास्टेलवर ठेवले. पण तेथे तो अभ्यास न करता तासन् तास मित्रांशी गप्पा वा कुठला ना कुठला खेळ खेळणे ह्यात वेळ घालवाव़याचा. एवढे पुरे नाहीं म्हणून की काय, तो काॅलेजमधे गणिताचे तास बुडवायचा.
ह्या सार्याचा परिणाम ह्या हुशार मुलाला इंटरला जेमतेम दुसरा वर्ग मिळण्यात झाला. पुढे पदवीपरिक्षेत तर तिसरा वर्ग मिळून त्याच्यावर अखेर कारकुनी करायची वेळ आली. जे खरं म्हणजे, अंगभूत हुशारीने इंजिनिअरिंग पदवी मिळवून, त्याच्या लायकीचे उच्चस्तरीय जीवन त्याला मिळू शकले असते, ते जावून त्याचे जीवन खडतर बनले. वडिलांनी दिलेली सुवर्णसंधी त्याने आपल्या चुकीच्या वागण्याने मातीमोल केली, निराश होत नशिबाला बोल लावत तो दिवस ढकलत राहीला.
सिगरेट किंवा दारू अशा अनिष्ट व्यसनांमुळे अकाली मरण येऊन कुटुंबाची दुर्दशा करणारे अनेकजण आपण पहातो. पत्ते जुगार ह्यापा़यी सोऩ्यासारखे जीवन वाया घालवून, भीकेला गेलेली माणसेही दिसतात. वेळोवेळी आपल्या आरोग्याला न जपता, डाँक्टरकडे जाणे टाळल्यामुळे दुर्धर रोगाची शिकार झालेलीही उदाहरणे आपल्या माहितीची आहेत. तसेच नोकरीतही कामचुकारपणा वा आपल्या वागण्यामुळे करीयरचे नुक़सान करून घेणारे अशांचीही हीच कथा!
सारांश 'तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार' असे कुणी म्हटले आहे, ते अगदी खरे आहे. आपला वर्तमानकाळच आपले भवितव्य घडवत असतो!
# वाचनासारखा दुसरा कुठला छंद नाही. वाचता वाचता आपणही स्वत:शी संवाद कळत, न कळत करत रहातो, आपलेही अनुभव पडताळून पहातो. नवीन माहिती वा knowledge तर मिळतेच, पण माणसांचे स्वभाव, भाव भावना ह्यांचेही चित्र, विविध वाचनातून उभे रहाते.
पण आज संगणक,मोबाईल ह्यामुळे माहितीचा महासागर, बोटाच्या एका क्लिकवर मिळत असल्याने, हातात एखादे पुस्तक घेवून ते वाचायचे कुणी कष्ट घेत नाही. शिवाय जीवन अधिक धकाधकीचे, स्पर्धेचे झाले आहे. सहाजिकच सारे वेगाने, झटपट हवे असते आणि ते नवतंत्राच्याद्वारे मिळू शकते. वर्तमानपत्रे,पुस्तके, काय अडले,ते ते संगणक वा मोबाईलवर उपलब्ध असते. म्हणूनच आजकाल वाचनालयांचे सभासद प्रौढ माणसेच असलेली दिसतात. फेस बूक, वाँटस् अँप अशासारख्या सोशल मेडीयामुळे तर सर्वांना अक्षरश: वेड लावले आहे. सहाजिकच वाचनसंस्कृती हळू हळू कमी होत चालली आहे. हे चांगले नव्हे. माणसाला स्वतंत्रपणे विचार करायला लावणारी वाचनाची सवय इतिहासजमा होण्याचा धोका आहे.'
# तंत्रज्ञानाच्या किमयेमुळे मर्मबंधांतील दिग्गजांच्या, सुरेल सुमधुर स्वरांच्या ठेवी,
काळावर मात करून पुनश्च अनुभवता येतात!
# "निंदकाचे घर असावे शेजारी"!:
टीका करणे ही देखील उपयुक्त निर्मितीच नव्हे कां? कारण टीका करताना साधक बाधक दोन्हीचा विचार करून वास्तवतेचे पारदर्शी चित्र उभे केले जाते. जशी गरज, ही शोधाची अर्थात नवनिर्मितीची जननी, त्याचप्रमाणे टीका ही प्रगतीच्या बदलाची जननी असते.
टीका खुल्या दिलाने स्विकारणारेच सुधारणेचे नवनवे मार्ग खुले करू शकतात. दुर्दैवाने टीका पचविणारे दुर्मिळ असतात. म्हणूनच जैसे थे अथवा पिछेहाट अपरिहार्य असते. उगाच नाही, संत तुकाराम म्हणतात "निंदकाचे घर असावे शेजारी"!
# "कधी नव्हे ती आता सज्जन, संयमी, सुजाण व सुसंस्क्रुत नागरिक घडविण्याची अत्यावश्यकता अधोरेखीत होत आहे,
कारण तोच शाश्वत विकास!"
# अचानक त्या रात्री, स्वप्नात ‘तेयुश’ हा शब्द येत राहिला होता. जहाल तेजाब मधला ‘ते’ आणि आयु मधला ‘यु’ , प्रकाशातला ‘श’, हयांचा तो अदृश्य मिलाफ आहे हे जाणवले आणि वीज चमकावी तसे हे कोडे उलगडले़.
जीवनात सतत वरिष्ठवर्ग कनिष्ठांवर आपले विचार व निर्णय लादत आला आहे. बिचारा कनिष्ठ वर्ग निमूटपणे हा जाच सातत्याने सहन करत आला आहे. तेजाबातील जहालपणा घेऊन आपल्यावरील आजवरच्या होणार्या अन्यायाची जाणीव ही वीज चमकावी, अशी प्रकाशात आता येत आहे हा ‘तेयुश’ चा मतिता़र्थ असू शकतो.
विविध क्षेत्रात आर्थिक बौद्धिक वैचारिक भावनिक सामाजिक इ. इ. बाबतीत गुणात्मक असमानतेमुळे, अनेक उच्च कनिष्ठ गट निर्माण होत रहातात, भिन्न श्रेणी निर्माण होऊन वरचढपणाचे दबावाचे खेळही चालत रहातात. ह्यांचा अतिरेक झाला की, तो "तेयुश" अर्थात विद्रोह निर्माण करतो. सभोलताली जे घडत आहे त्याची ही पारदर्शी मीमांसा आहे.
"जगा आणि जगू देवूया", एकमेकांचा आत्मसम्मान जपूया. संयम आणि सहनशीलता अंगिकारूया. माणसामाणसांमधली कटूता दूर करून एकमेकांतली दरी मिटवूय. हाच ह्या विचारमंथनाचा संदेश आहे.
# ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही, त्यांची अधिक चिंता न करणे शहाणपणाचे असते,
कारण
आपण ते बदल घडविणार्यांनाच बदलू शकतो!
# हलते फिरते,
अन् चालते बोलते रहाणं,
हे अती ज्येष्ठ नागरिकांचं,
खरंखुरं भाग्यच!
# कोणतंही काम, केव्हा व्हायचं असतं तेव्हाच ते पूर्ण होत असतं. हे आपण लक्षातच घेत नाही आणि उगाचच एखाद्या कामाबद्दल ते पूर्ण होईल की नाही, याची चिंता नेहमी वाहत असतो.
# प्रत्येकापाशी देण्याजोगे असे काही ना काही असतेच, असते.
जे देण्यामुळे आपल्याला आनंद होतो,
ते नेहमी देत रहावे.
# संशयातीत वर्तन ज्यांच्याकडून कायम अपेक्षित आहे, त्यांच्याबद्दल जेव्हा कुणी संशय निर्माण करतात,
तेव्हां दोघांची मोठी कसोटी असते.
# सत्य खरोखर काय आहे,
ते ज्याचे त्याला माहीत असते.
मुखवट्यांच्या आड,
ते एकमेकांपासून लपविण्याचा खेळखंडोबा मात्र नेहमीच चालतो!
# "असाही एक दिवस!":
एखादा दिवस असा येतो की, एका पाठोपाठ गोष्टी बिघडू लागतात. सकाळी पाहुणे गावी जाणार, तर धो धो पाऊस सरू झाला. वहान मिळणे कठीण झाले. घरी गँस सिलीडर रिकामा झाला व नवीन लावला, तर त्याचा गँस लिक होत होता. फोनाफोनी केल्यानंतर असाच कधीतरी एकदाचा, मेकँनिक आला व वाँल्व लिक होत आहे, हा सिलींडर वापरु नका असे सागून गेला. डिलरला फोन करुन करुन थकलो, तेव्हा कुठे नवीन सिलींडर घेवून माणूस आला. हे सारे ठीक होईतो कपडे धुण्याचे मशिन बिघडले. त्याचा मेकँनिक येतो कधी ती वाट पहावी लागली. विसावा महणून चहा गरम करायला घेतला तर ओव्हनचा नन्ना. काही कामाचे कागद प्रिंटरवर छापायला गेलो, तर कार्ट्रीजची शाई संपलेली. अखेर कुणाला तरी फोन करावा तर फोनची बँटरी आऊट व चार्ज करताना फोन गरम.....
# "बोल-अबोल":
बोलता येतं, म्हणून माणसं आयुष्यभर नको इतकं बोल बोल बोलतात. सहाजिकच, जग त्यांना बोल लावल्याशिवाय रहात नाही. आपल्याच करणीनं, अशी माणसं कमावलेलं गमावूनही जातात.
गरजेचं, जरूरीचं असेल, तेव्हांच व तेवढंच बोलायचं, हे ज्यांंना समजतं, अशी माणसं मात्र दुर्दैवाने शोधावी लागतात. बोलण्याचं महत्व, बोलती बंद झाल्याशिवाय कळत नाही. भावना, विचार व्यक्त करण्याची ही शक्ती नष्ट होणं, हे अंधत्वानंतरचं सर्वात मोठं दु:ख!
# जन्म आणि मरण ह्यांत,
असतं फक्त एका श्वासाचं अंतर.
तर, आवडणारा संदेश आणि दखलच न घेतला जाणारा संदेशामध्ये काय असूं शकतं?
# समस्या तसेच गरजा, नेहमी आव्हान उभे करतात. नवकल्पना निर्माण होतात,अशाच आव्हानांतून सुचतात. छोट्या बदलातून अधिक फायदा वा सोय कशी होईल, हे प्रयत्नपूर्वक शोधणे, हयाकरता आपण जरूर काही वेळ रोज द्यावा आणि येथे ती कल्पना शेअर करावी, ही विनंती. निरीक्षणशक्ति, विचार आणि बुद्धि, ह्या जोडीला कल्पकता वापरून दैनंदिन जीवनात अधिक सुलभता व सोयी त्यामुळे निर्माण होऊ शकतील. विचारमंथनाला नवी दिशा देत, ह्या संदेश माध्यमाचा चांगला उपयोग, हा हेतु आहे.
#संघर्ष करणारे आपण एकटेच नसतो.
लहान थोर सारेच संघर्षयात्री असतात.
अडचणीच कर्तबगार माणसं घडवतात.
# अनेक सुलभ अँपस् उपलब्ध असूनही काहींचा, "सोमि" वर मराठी,
धेडगुजरी इंग्रजीतून लिहीण्याचा अट्टाहास कां?
इतका आळस बरा नव्हे!
धन्यवाद
सुधाकर नातू
ता.क.
साठाहून अधिक एकसे बढकर एक.........
असे विडीओज् पहाण्यासाठी.........
माझ्या you tube वरील
moonsun grandson
चँनेलची ही लिंक......
ताबडतोब उघडा.......आणि.....
चेनेल Subscribe ही करा......
https://www.youtube.com/user/SDNatu
त्यासंबंधी एक प्रातिनिधिक प्रतिसाद:
"तुमचे विडीओज् जरुर पाठवत रहा.
ते खूप छान असतात.
कोणालाही समजेल,
अशा सोप्या भाषेत असतात.
धन्यवाद."
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा