शनिवार, २९ फेब्रुवारी, २०२०

"वाचा आणि फुला, फुलवा-४": "दाहक वास्तवता":


"वाचा आणि फुला, फुलवा-४":
"दाहक वास्तवता":
वाचण्यासारखा छंद नाही, वाचण्यासारखा आनंद नाही, कारण त्यामधून आपल्याला अनेक व्यक्तींचे अनेक तर्‍हेचे विचार पाहायला, वाचायला अनुभवायला मिळतात. पुन्हा पुन्हा उजळणी करावी असे जर काही मला वाचनातून मिळत गेले, तर ते माझ्या ह्या अभिनव सदरातून मांडणे मी सुरु केले आहे. ही एक प्रकारची आनंदयात्राच आहे आणि तिला चांगला प्रतिसाद मिळत आहे.पहिल्या लेखाप्रमाणे, दुसऱ्या लेखनपुष्पातही "जीवन तत्त्वज्ञान" विषयावरील कविवर्य विंदा करंदीकर, ह्यांच्या आठ गझला मी मांडल्या होत्या. आता त्यातीलच ही अखेरची, तितकीच अर्थपूर्ण गझल!:
९."निर्वाणीचे गझल":मौज दिवाळी अंक"२०११:कविवर्य विंदा करंदीकर:
"त्याला इलाज नाही":धिक्कारली तरीही सटवीस लाज नाही;
श्रद्धा न पाठ सोडी,, त्याला इलाज नाही.
देवांतुनी जगाला ज्याने विमुक्त केलेंत्यालाच देव करिती! त्याला इलाज नाही.

लढवून बांधवांना संहार साधणारा
गीता खुशाल सांगे! त्याला इलाज नाही.
तत्वज्ञ आणि द्रष्टे एकमेका खंडून एकमेकांकथिती विरुद्ध गोष्टी; त्याला इलाज नाही.

तें भूत संशयाचें ग्रासून निश्चितीला
छळते भल्याभल्यांना; त्याला इलाज नाही.

विज्ञान ज्ञान देई; निर्मि नवीन किमया
निर्मी न प्रेम शांती; त्याला इलाज नाही.
बुरख्यात संस्कृतीच्या आहे पशू दडून
प्रगटे अनेक रूपे! त्याला इलाज नाही.

असतो अशा जिवाला तो ध्यास मूल्यवेधी! अस्वस्थता टळेना; त्याला इलाज नाही.

ज्यांना अनेक छिद्रें असल्याच अनेक नावा
निर्दोष ना सुकाणू; त्याला इलाज नाही.
वृद्धापकाळ येतां जाणार तोल थोडा;
श्रद्धा बनेल काठी! त्याला इलाज नाही.
कविवर्य विंदा करंदीकर.


या सगळ्याचा अर्थ एवढाच की बऱ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात. आपण त्या बदलू शकत नाही आणि कितीही अट्टाहास केला की आपल्याला असे असे हवे, तरी तसे काहीही घडत नाही. तेव्हा त्याला इलाज नाही, असे म्हणून पुढे जायचे.

थोडक्यात ज्या गोष्टी आपण बदलू शकतो, ज्या बदलण्याची आपल्यामध्ये कुवत असते, परिस्थिती असते, अशाच गोष्टीच फक्त बदलण्याची शक्यता असते. नाहीतर ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत परिस्थिती व बाह्य अशा कितीतरी गोष्टी आपल्या शक्तीपलीकडे आहेत, त्या बदलण्याचा अट्टाहास न करता आपण आपल्या मार्गाने पुढे जावे. त्यामुळे उगाचच शक्ती वाया जाणार नाही आणि मनाची ही अवस्था नैराश्याकडे जाणार नाही, हाच बहुदा या गझलेचा अन्वयार्थ.
कविवर्य विंदा करंदीकरांच्या आपणापुढे सादर केलेल्या नऊ गझला, खरोखर अंतर्मुख करणाऱ्या आहेत. मी जसा त्या २०११ साली नोंदवुन ठेवल्या आणि आज आता त्यांचा हा असा उपयोग मला करता आला, तसाच कायम तुम्हाला ह्या गझलांचा निश्चित उपयोग होईल, याची मला खात्री आहे. म्हणून या नऊही गझला आपण आपल्या संग्रही निश्चित ठेवा आणि जेव्हा जेव्हा आपल्याला वाटेल, तेव्हा तेव्हा त्यांची उजळणी करा. पुन्हा तुम्हाला नवीन उमेद येईल आणि तुमच्या नव्या प्रेरणा जागृत होतील याची मला खात्री आहे.
--------------------------
"लोकमत"'उत्सव' दिवाळी अंक'१९:"सोशल मीडिया आणि सोशल एकटेपणा"लेखक: अमर दामले

सध्या एकटेपणांतून सुटका म्हणून, सोशल मीडियामध्ये आपण सगळे कसे वहावत चाललो आहोत, त्या विषयावर भारावून टाकणार्या वरील लेखांतील निवडक अंश म्हणूनच पुढे देत आहे:
"खरंच एकटेपण इतकं वाईट असतं कां?:खरंतर 'स्वतः निवडलेले एकटेपण' आणि 'लादले गेलेले एकटेपण' यात फरक आहे.
एकटेपणाकडे अनेकदा 'बिचारेपणाच्या' दृष्टीकोनातून बघितले जाते आणि गल्लत होते. त्याऐवजी ती स्वतः जवळ जाण्याची संधी म्हणून बघितले जाऊ शकते. कारण स्वतःशी संवाद हीच आता एक दुर्मिळ गोष्ट होत चालली आहे. आपल्या आजूबाजूच्या लोकांशी खूप बोलतो. आपण, अगदी भरभरून बोलतो. पण स्वतःशी? स्वतःशी केव्हा बोलतो? मधून मधून स्वतःची बोललो पाहिजे हे अनेकांच्या गावीही नसतं. इतरांशी बोलणं सोपं आहे, पण स्वतःशी बोलणं, स्वतःला समजून घेणे कठीण असतं. 'जाणावे आपणाशी आपण' असं समर्थ' सांगतात ते यासाठी बहुदा.

खरंतर आज तंत्रज्ञानाने सोशल मीडिया नावाचं केवढं मोठं घबाड आपल्याला दिलंय. एकमेकांशी संपर्क ठेवायचा म्हटला तर 'फास्ट कम्युनिकेशन' साठी एवढे पर्याय आपल्या हाताशी. मात्र त्याच वेळी एक मान्य करावं लागतं की, आपण तुटत चाललो आहोत एकमेकांपासून. आपण जोडले गेलो आहोत, पण जुळलेले नाही. एकटे पडतोय, विलग होतोय, खूप लोकांच्या संपर्कात राहूनही, घट्ट मैत्री कुणाशीच नाही. सगळं वरवरच.

गर्दीतही आपण एकटे ही जाणीव मनाला थकवते. जीवाला जीव देणारे हाकेला धावून येणारे लोक आजूबाजूला हवे असतील तर त्यासाठी वेळ ईन्व्हेस्ट करावा लागतो. इथे तर सगळा मामलाझटपटचा."
"अर्थात तंत्रज्ञानाचा वेग आणि व्याप्ती इतकी प्रचंड आहे की, सतत काहीतरी नवं आपल्यावर लादलं जातंय आणि आपणही त्या भूरळीला बळी पडतोय. आपल्याला या सगळ्याची गरज आहे की नाही, याचा विचार न करता, त्याच्या आहारी जातोय. सोशल मीडियाला बळी पडलेले आपण हे त्याचंच उदाहरण."
"कळप प्रवृत्ती हेदेखील माणसाचं एक खास स्वभाववैशिष्ट्य. कळपात राहिल्याने कदाचित सुरक्षित वाटते. एकटे पडण्याची शक्यता कमी होते."
"आम्ही झोपेतून जागे होणार नाही, हे जणू ठरवलेच आहे. 'अति तेथे माती' हे माहित आहे आपल्याला. पण तेवढा विचार करण्याची उसंत कोणाला आहे? त्याच्या पाशात आपण नुसते गुरफटलो नाहीत, तर सद्सद्विवेकबुद्धी हरवून बसलो आहोत. त्यातून अनेक जटिल मानसिक समस्या निर्माण झाल्या आहेत.
आपलं चुकतंय अशी बोचणी कुठेतरी जाणवते. त्यातून मग भावनांवर ताबा ठेवता न येणं, चिडचिड होणं, सर्जनशीलतेचा अभाव असल्याने रोजचं आयुष्य यंत्रवत वाटणं. कोणतेही काम करण्यात उत्साह नसणं. त्यातून बळावलेली नैराश्याची भावना, आपल्यात काहीतरी कमी आहे असा विचार वारंवार येणं, हे सगळं ओघानं आलंच. हळूहळू आपण कुटुंबापासून समाजापासून दूर पडतोय, ही भावना बळावते. एकटेपणाची भावना होते."
"प्रचंड बौद्धिक ताकदीच्या भरवशावर आपण ग्रह-तार्‍यांना कवेत घ्यायला निघालोय. मात्र हे सगळे करताना, स्वतःचीच बोलायचं राहून जातंय की काय? मोठ्या मोठ्या गोष्टी करायच्या धुंदीत, लहान सहान गोष्टीतील आनंद आपण हरवतोय काय? याचा विचार करावा लागेल."लेखक: अमर दामले----------------------------
ह्या लेखात लेखकाने एकटेपण आणि समाज माध्यमांचा आपल्यावर होणारा अनिष्ट परिणाम, याचे विश्लेषण खरोखर अभ्यासपूर्ण रीतीने मांडलेले आहे. ते आपल्या सर्वांनाच अंतर्मुख करायला लावणारे आहे. सोशल मीडियाच्या आहारी किती जायचे, त्याचा उपयोग आपल्या भल्यासाठी कसा करायचा, हे ज्याचे त्याने ठरवायला हवेच, तशी वेळ आता आलेली आहे असेच म्हणायचे.
--------------------------विरंगुळा व जिज्ञासा ह्यासाठी.....You tube वर जा. सर्चमध्ये लिहा:माझ्या चँनेलचे नांव:
moonsun grandsun
आणि संपूर्ण वार्षिक राशीभविष्य व इतरही जीवनोपयोगी विडीओज् पहा:
चँनेल subscribe करा......तसेच...शंभराहून अधिक वाचनीय लेखांसाठी माझ्या ब्लॉगचीही लिंक उघडा......wapp grp वर शेअरही करा......


http//moonsungrandson.blogspot.com


धन्यवाद

सुधाकर नातू

गुरुवार, २७ फेब्रुवारी, २०२०

"ह्रदयसंवाद-१०": "विचारधन":


 "ह्रदयसंवाद-१०": "विचारधन":

"शब्दा'च्या निःशब्द भावकळा-१":
शब्द:
-मुळात शब्द, ही माणसाजवळ असलेली एकमेवाद्वितीय शक्ती आहे,
-मनामनांतले जनांत नेण्याचे, ते एक अद्भुत माध्यम आहे,
-अव्यक्त प्रत्यक्षात आणण्याचे, हे एक सामर्थ्य आहे,
-माणसं जोडण्याचा वा तोडण्याचा, त्याचा गुणधर्म आहे,
-निःशब्द अवस्थेतही, परिणामाची सांगता आहे,
आणि, आणि...

-कोण, कुणासाठी काय, कसा केव्हा वापरतो, त्यामध्येच त्याचे सारे मर्म आहे!

उदाहरण:
"सौहार्द":
शब्दामध्ये सहवासाचा सुगंध आहे,
ह्या हृदयीचे त्या हृदयी समजून घेण्याचा भाव आहे,
माणसामाणसांमधील संबंधांचे माधुर्य आहे.

तुम्ही सुद्धा असाच वेळ मिळेल तेव्हा, मनात येईल तो शब्द घ्या आणि त्याबद्दल जे जे मनात येते ते लिहून काढा...
शब्दा'च्या निःशब्द भावकळा तुम्हालाही उमजतील.....

मराठीबद्दल प्रेम केवळ भाषा दिनीच दरवर्षी २७ फेब्रुवारीलाच फक्त कां येते, आणि नंतर त्याचे काय होते, याचा विचार करायलाच हवा.

सुदिना
--------------------------

# "मूल्यशिक्षण सांस्कृतिक रिनायसन्स!":

परिस्थिती समाधानकारक कां असमाधानकारक, ह्यासाठी प्रामुख्याने जबाबदार आहे ती माणसांची आणि समाजाची मानसिकता. गेल्या काही दशकांत, ढासळत गेलेली मूलभूत मूल्यव्यवस्था आणि खालावलेली सांस्कृतिक सजगता, ह्या भीषण र्हासाला कारणीभूत आहे, हे खेदाने म्हणावे लागते. शक्य आहे, त्यामागे, अंगिकारलेली मुक्त अर्थव्यवस्था आणि जवळ सगळ्याच गरजांचे अपरिहार्य होत चाललेले बाजारीकरण.

माणसांपेक्षा जेव्हां समाज पैसा आणि फक्त पैशाचाच विचार करतो अन् ध्यास धरतो, तेव्हा कोणतेही मार्ग अंतिमतः सपशेल अपयशी ठरणार हे कटू सत्य आहे.

आज गरज आहे ती तळागाळापासून वरपर्यंतच्या मूल्यशिक्षणाची आणि सांस्कृतिक रिनायसन्सची!

सुदिना

---------------------------

# "घडवा चमत्कार!":
जो तो धावतो आहे, थांबण्याचे नाव नाही, कशाकरता? कुणा कुणाकरता? लोकसंख्या हरणाच्या वेगाने वाढत गेली, त्यातून संधी मात्र, जीवनामध्ये असं मुंगीच्या पावलांनी पुढे येत रहिल्या. सहाजिकच जीवनसंग्रामाच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी, धापा टाकाव्यात, उर फुटावे, इतक्या वेगात धावणे, अपरिहार्य बनले आहे. कधी कुणी त्या खवळलेल्या समुद्रातून, बाहेर येऊन स्वस्थ आरामखुर्चीत बसला आहे, काहीही न करता, काहीही विचारही न करता? केवळ अशक्यच. कारण धावणे कशासाठी तर अधिकाहून अधिकाचा हव्यास धरणे, हाच आपला जीवनाचा मंत्र बनला आहे म्हणून.

एकदा तरी थांबून बघा. भवतालातील संग्रामाकडे पाठ फिरवून शांतपणे निर्गुण निराकार निर्विष असे बसून बघा डोळे मिटून, कधीही केव्हाही.
प्रयत्न करा आणि बघा काय काय चमत्कार घडतात तुमच्या जीवनात तुमच्या मनोबलात!

आता गंमत बघा, हे देखील मी असाच प्रयत्न करत आरामखुर्चीत बसून हे सारं मांडत आहे, कारण कितीही झालं तरी माणसाच्या मागे विचार करण्याचं भूत लागलं आहे, ते कधी त्याची पाठ सोडतच नाही!

अर्थात् अविचाराने वागण्यापेक्षा, असे विचार करायला लावणारे, विचार करत बसण्यात देखील हवा हवासा अर्थ आहेच आहे.

सुदिना

--------------------------

"मागे वळून पहा":

दिनदर्शिकेची पुढची पाने बघायची वेळ ही, केव्हां सुट्टी वा सण आहे, ते जाणून घेण्यापुरतीच मर्यादित असते. सहाजिकच मागील पानांचे दर्शन, केवळ महिना संपल्यावर पान उलटताना होते एवढेच.

पण नुकतेच वर्ष संपल्यावर, दिनदर्शिका गुंडाळी करून बाजूला ठेवताना, तिच्या मागील पानांकडे लक्ष गेले अन् कळत न कळत ठिय्या मांडून, एका बैठकीत बाराही पानांवरील विविध विषयांवरील, उपयुक्त माहितीपूर्ण असे सर्व लेख वाचून काढले.

आपण इतके दिवस जाणीवा विस्तारणार्या कोणत्या मौल्यवान खजिन्याला मुकलो होतो, ते उमजले. आपणही दिनदर्शिकांची मागील पाने जरूर नजरेखालून घालावी.

अधून मधून मागे वळून पहाणे हिताचेच असते!

सुदिना

---------------------------

# "मुखवटे आणि चेहेरे"!:

विचार, उच्चार आणि आचार ह्यामध्ये, एकवाक्यता ठेवणे, सगळ्यांना जमतेच असं नाही. ते जमण्यासाठी प्रामाणिकपणा, निष्ठा आणि निस्पृहता असे मूल्याधिष्ठित गुण अंगी असावे लागतात.

चंगळवाद आणि "अर्थ हाच सर्वार्थ" मानणाऱ्या आजच्या युगात, सहाजिकच हे सारे गुण दुर्मिळ होत चालले आहेत.

सहाजिकच आपल्याला सभोवताली दिसतात, वावरतात, ते मुखवटे आणि चेहेरे, चित्रविचित्र अन् विश्वास न ठेवण्या जोगे!

"कालाय तस्मै नमः" दुसरं काय?!
'सुदिना'

---------------------------

# "लोळणं अन् जगणं!":
दिवसभराच्या परिश्रमांनंतर, आलेली गाढ झोप तर झालेली आहे, परंतु उठायचं, मन काही घेता घेतच नाही. उठायला तर हवं आहे, पण उठून न जाता, त्यापेक्षा डोळे मिटून मऊ,मऊ गादीवर लोळत पडावंस वाटतं, ह्या कुशीवरून त्या कुशीवर. प्रत्येक क्षण अन् क्षण लोळत घालवण्यात, जे सुख आहे, ते त्या
झोपेमध्ये देखील नाही, असंच वाटतं.

कारण, उठायची तर हुरहूर, पण लोळत पडायची कसनुशी हवीहवीशी असोशी. खरंच हे लोळत पडण्यातलं सुख विसरता विसरतच नाही, कदाचित् त्यामुळेच तर अपरिहार्य चिरनिद्रेपेक्षा, जागेपणीचं हवहवंस जगणं, त्यांतली सळसळ, हळहळ, कळकळ आणि मळमळही खरोखर सोडाविशीच वाटत नसावी कां?
'सुदिना'
----------------------------------
आणि संपूर्ण वार्षिक राशीभविष्य व इतरही जीवनोपयोगी विडीओज् पहा:
चँनेल subscribe करा......

शंभराहून अधिक वाचनीय लेखांसाठी माझ्या ब्लॉगची
ही लिंक उघडा......
wapp grp वर शेअरही करा......

http//moonsungrandson.blogspot.com

धन्यवाद
सुधाकर नातू माहीम मुंबई १६
Mb 9820632655

बुधवार, २६ फेब्रुवारी, २०२०

"वाचा आणि फुला, फुलवा-३": "जीवन तत्त्वज्ञान":


 "वाचा आणि फुला, फुलवा-३":"जीवन तत्त्वज्ञान":
"निर्वाणीचे गझल"मौज दिवाळी अंक"२०११:कविवर्य विंदा करंदीकर:
वरील दिवाळी अंकामध्ये, कविवर्य विंदा करंदीकर यांच्या एकाहून एक सरस अशा रचना मी मुद्दामून माझ्या नोंदवहीत नोंदवून ठेवल्या होत्या.त्यातील चार रचना ह्यापूर्वी, मी पहिल्या भागात दिल्या होत्या. आता हा दुसरा भाग.

तुम्हाला आता "जीवन तत्वज्ञान" व आपले मनोविश्व योग्य तर्हेने बदलण्यासाठी ह्या अप्रतिम गझला निश्चितच तुम्हाला अनुरूप वाटतील, अशी मला खात्री आहे.
अतिशय सोप्या भाषेत जीवन तत्त्वज्ञान सांगणाऱ्या या सार्‍या रचना, खरोखर प्रत्येकाने अंतर्मुख होऊन प्रत्यक्षात त्याप्रमाणे वागायला हवे असेच सांगणाऱ्या आहेत:
५."उपयोग काय त्याचा?":
शब्दात भावना नाही, ना वेध अनुभवाचा,
रचना सुरेख झाली; उपयोग काय त्याचा?

व्याहीच पत्रिकेचा, घालीत घोळ बसले;
नवरी पळून गेली! उपयोग काय त्याचा?
सुग्रीण रांधणारी; सुग्रास अन्न आले:
अरसिक जेवणारे; उपयोग काय त्याचा?

जमली महान सेना; शस्त्रे सुसज्ज झाली;
संधी निघून जाता, उपयोग काय त्याचा?

ऐश्वर्य प्राप्त झाले; झाली दिगंत कीर्ती;
स्नेही न एक लाभे; उपयोग काय त्याचा?

सर्वांस स्वास्थ आले; सगळीकडे सुबत्ता;
स्वातंत्र्य फक्त नुस्ले; उपयोग काय त्याचा?

केले गुरु अनेक; यात्रा अनेक केल्या;
शांती न प्राप्त होता, उपयोग काय त्याचा?
कविवर्य विंदा करंदीकर.
६."त्याला तयारी पाहिजे":
अग्नीमुळे प्रगती घडे; हे अन्नही त्याने शिजे;चटका बसेल केव्हातरी; त्याला तयारी पाहिजे.
पुष्पे, फळे, अन् सावली वृक्षातळी या गावली; काटा अभावित बोचता, त्याला तयारी पाहिजे.
आपल्या चुका ना आपणां, इतरांस त्या दिसती परी त्याचीच चर्चा व्हायची, त्याला तयारी पाहिजे.

केले कुणास्तव, किती ते कधी मोजू नये;
होणार त्याची विस्मृती; त्याला तयारी पाहिजे.
डोक्यावरील घेऊनी आज येथे नाचती,घेतील ते पायातळी; त्याला तयारी पाहिजे.
सत्यास साक्षी ठेवूनी वागेल जो, बोलेल जो,
तो बोचतो मित्रांचाही! त्याला तयारी पाहिजे.
पाण्यामध्ये पडलाच ना?- पाणी कसेही असो- आता टळेना पोहणे, त्याला तयारी पाहिजे.
कविवर्य विंदा करंदीकर.
७."आशा दिसते तिथे मला":
हा शब्द जुळवी, गुणगुणे, मस्तीत आपुल्या रंगला; कविता म्हणा न म्हणा कुणी!आशा तिथे दिसते मला.
ज्याने प्रतिष्ठा लाभते ते रूढ रस्ते सोडूनी
हा वाट काढी वेगळी, आशा तिथे दिसते मला.
अंतिमाचा शोध घेणे हे जया जडले पिसे,
त्याला कुणी वेडा म्हणा! आशा तिथे दिसते मला.
ओसाडशा जमिनीतूनी जो पीक काढू पाहतो, करुनी प्रयोग नवेनवे, आशा तिथे दिसते मला.
शक्तिशाली दुर्जनाशी लढण्यास होतो जो खडा, मागे किती पाहीचना! आशा तिथे दिसते मला.
स्वप्न साकारीत असता हात ज्याचे पोळती,
ना ढळे अयशात निष्ठा, आशा तिथे दिसते मला.
सच्चेपणाने काम, जो करण्यात तृप्ती पावतो,
मानो न मानो देव तो, आशा तिथे दिसते मला.
कविवर्य विंदा करंदीकर.
८.
"आनंद घेत जावे":
असहाय्य दु:खिताना आनंद देत जावे;
आनंद देत असता, आनंद घेत जावे.
आनंद मिळविण्याची शक्ती मुलात मोठी;
तो बालयोग स्मरूनी आनंद घेत जावे.

संघर्ष खेळ माना; घ्या प्रेम सत्यसाथी
त्यातूनही व्रतीचा आनंद घेत जावे.

आकाश, माड, दर्या एकत्र पाहताना,तीर्थास भेटल्याचा, आनंद घेत जावे.

आयुष्यवेधी सगळ्या ग्रंथातूनी महान
सर्वात्म जाहल्याचा, आनंद घेत जावे.

सहजीवनात द्यावा सन्मान एकमेका;
प्रेमात मीलनाचा आनंद घेत जावे.

मृत्यू असे म्हणून जगण्यास अर्थ आहे;
अर्थात् मूल्य येण्या, आनंद घेत जावे.
कविवर्य विंदा करंदीकर.--------------------------
ह्यावर अधिक काही वेगळे विवेचन करण्याची गरजच नाही, इतक्या त्या सहज सोप्या भाषेतकविवर्य विंदा करंदीकर ह्यांनी मांडल्या आहेत.अविस्मरणीय अशा ह्या बोधक रचना आपल्याला एक नवी दिशा दाखवतील व द्रुष्टी देतील अशी आशा आहे.
ह्यासारख्याच कविवर्य विंदा करंदीकरांच्या गझला पुढील लेखात.
धन्यवादसुधाकर नातू
ता.क.असेच विविधरंगी लेखवाचण्यासाठी ही लिंक उघडा.....आपल्या wapp group मध्ये शेअरही करा:


http//moonsungrandson.blogspot.com

मंगळवार, २५ फेब्रुवारी, २०२०

"रंगांची दुनिया-१०": "चित्रदर्शन-२":  "मराठी चित्रपट वयात आला !":


"रंगांची दुनिया-१०":
"चित्रदर्शन-२":
"मराठी चित्रपट वयात आला!":

"प्रवास"
योगायोगाने नुकताच मी अशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरे यांच्या प्रमुख भूमिका असलेला
"प्रवास" हा चित्रपट पाहिला.

"जीवनाचा अर्थ व हेतूंचा शोध व बोध" आपण केला पाहीजे, असे सांगणार्या ह्या चित्रपटाने मला जाणवले की, जे जे आपल्याजवळ अनुभव व ज्ञान आहे, त्यातील उपयुक्त असे ज्यांना ज्यांना देता येईल, ते आपण देत राहावे, हाच आपला या पुढचा जीवनाचा हेतू आहे. त्याप्रमाणे आपण आपल्या प्रयत्नांची वाटचाल अशीच सुरू ठेवली पाहिजे. अर्थात हे माझ्यापुरते हो. इतरांनी त्यांचे आपआपल्या परिने हेतू ठरवावेत.

एका सामान्य माणसाचा जीवनाचा अर्थ व हेतू शोधून देणारा हा चित्रपट आहे. अभिजात इनामदार एक साधा माणूस असतो आणि आपलं आयुष्य मुलांच्या बायकोच्या आपल्या सगळ्या संसारासाठी वेचत असतो. मुलगा अमेरिकेला जातो, इथे एकाकी हे व्रुद्ध दापत्य व त्यातील CKD ने त्रस्त असा कर्ता पुरुष अभिजातला दोन वेळा आठवड्यातून डायलिसिस करून घ्यायचं जीवघेणं दुःख असतं. एका रात्री आयत्या वेळेला रिक्षासुद्धा सहजी मिळत नाही, त्याला हाँस्पिटलमध्ये न्यायला, केवढा त्रास होतो बायकोला, असे काही प्रसंग दाखवून त्याच्यातून पूर्वकल्पना दिली आहे पुढे काय होणार त्याची.

अमेरिकेतला मुलगा म्हणतो, बाबा तुम्ही काहीतरी चेंज घ्या, फोकस बदला, तुमचं जीवन त्याच त्या गोष्टीत अडकलयं. अभिजात अंतर्मुख होऊन, आपल्या जगण्याचा अर्थ काय, हेतु काय, याचा शोध घेत राहतो आणि त्याला अचानक जाणवतं की, आपण आहोत, त्यापेक्षा असे अनंत गरीब व दुःखी कष्टी लोक आहेत, ज्यांना काही ना काही गरज आहे. त्यांच्यासाठी आपण काही ना काही केले पाहिजे.

विचार करता करता, त्याला एकदम "युरेका युरेका" सारखं काहीतरी सापडतं आणि ते म्हणजे आपली स्वतःची गाडी आहे, तिला अँम्ब्युलन्स बनवून आपण तिचा उपयोग, अशाच दुःखी कष्टी आणि गरजु रोग्यांना हाँस्पिटलमध्ये नेण्यासाठी करावा. नंतर तो कुठेही मागेपुढे पाहत नाही आणि आपल्याला या कामात अक्षरशः दिवस नाही, रात्र नाही, स्वतःला झोकून देतो. पाहता पाहता त्याचे रिपोर्टस् नॉर्मलला येतात. डॉक्टरही चकित होतात. अँम्ब्युलन्स मँन म्हणून त्याचा आंतरराष्ट्रीय सन्मान होतो.

जीवनाचा प्रवास करताना, आपल्याला जर आपण कां जगतो आहोत, कोणासाठी कशासाठी, जगत आहोत, आपला हेतू काय आहे, हे जर उमजले, तर आपल्याला आपला मार्ग सापडत जातो. अशा तर्‍हेचे अतिशय अनमोल विचार मांडणारा हा चित्रपट मला पाहायला मिळाला आणि त्यामुळे मला माझ्या जीवनविषयक अभियानासाठी प्रेरणा मिळाली......

"विकून टाक !" :
मराठी चित्रपट आता प्रायोगिक नाटकं सारखे काही वास्तववादी प्रयोग करायला लागले आहेत असे दिसते. जीवनातील कौटुंबिक नातीगोती आणि त्याच्यातील ताणतणाव ह्या चाकोरीबद्ध अशा विषयांना सोडून, वास्तवातील काही दाहक अशा घटनांकडे अथवा विषयांकडे चित्रपट आपले लक्ष देऊ लागले आहेत, ही खरोखर स्तुत्य गोष्ट आहे.

नुकताच आम्हाला एक असाच चित्रपट पाहायला मिळाला, नाव होते "विकून टाक". वरवर पाहता हा एखादा फार्स असेल, अशा तर्हेचे एकंदर त्याचे शीर्षक आणि जाहिरातीतील दृश्य होते. परंतु प्रत्यक्ष चित्रपट पाहायला गेल्यावर, सध्याच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि दुष्काळी परिस्थितीत गांजलेल्या अनेक खेडेगावातील पाण्यासाठी वणवण करणाऱ्या माणसांचे, एक मनाला चटका लावून टाकणारे असे प्रतिनिधिक चित्र पहायला मिळाले.

त्या पार्श्वभूमीवर एका खेड्यातील, एका अभागी शेतकर्यांने आत्महत्या केल्यानंतर, त्याच्या कुटूंबियांना भरपाई म्हणून मिळायचे पैसे राहिले दूरच, परंतु अचानक त्याच्या मुलावर आपली किडनी विकण्याचा आरोप येतो आणि चित्रपटामध्ये उत्तरोत्तर रंग चढत जातो. दुबईमध्ये नोकरी करणार्या या मुलाचे लग्न मोठ्या धूमधडाक्यात होणार असते. परंतु अचानक असे काही विचित्र घडते की त्या मुलावर जेलमध्ये जायची वेळ येते.

जे हाती येईल, ते "विकून टाक" असे म्हणणे सोपे असते. ऑनलाइन अशा तर्हेच्या वेगवेगळ्या साईट्समुळे, आली हातात वस्तू की ती विकली जाते, हे वास्तव मोठ्या गमतीशीर रीतीने चित्रपटात अधोरेखित केलेले आहे. नायकाच्या, भंगार विकणाऱ्या मित्राच्या रूपाने, त्यामुळे चित्रपटातील वस्तूविक्रीचे नाट्य वेगळेच वळण घेत, अधिक रंगतदार होत जाते.

मित्राबरोबर दारू पीत असताना हा नायक भंगार विकणाऱ्या साइटवर, आपली किडनी विकायची आहे, अशी माहिती टाकतो आणि त्याच्यावर उत्तरोत्तर संकटांची मालिका येत राहते. त्याच्या भाग्यामध्ये क्षणोक्षणी चढ-उतार होत राहतो. त्यामुळे अनेक नाट्यपूर्ण प्रसंगांतून चित्रपटाची कथा आपली उत्सुकता वाढवत नेते. किडनी विकत घेऊ इच्छीणारे, दुबई मधील श्रीमंत अरबाच्या रूपात आलेले पात्र व त्याचा उंट या कथेमध्ये अधिकाधिक मसाला भरत जातात.

उत्तरार्ध मात्र ह्याहूनही एका भयानक अशा खेळाचा भाग आहे, हे ध्यानात येऊन आपल्याला खरोखरच धक्का बसतो. किडनी विकणाऱ्या एका टोळीचा तो भाग आहे, असा आरोप नायकावर होऊन, त्याला जेलची हवा खावी लागते. अखेरीस तो हिकमतीने त्यामागच्या दुष्ट टोळीचा छडा कसा लावतो आणि त्याची या चित्तथरारक नाटकातून सुटका कशी होते, ते प्रत्यक्ष चित्रपटातच बघायला मिळेल.

किडनी विकार हा खरोखर भयानक असून डायलिसिस जर सातत्याने करता येणे कठीण झाले तर, किडनी प्रत्यारोपणाचे माणसांवर किती तरी दडपण येते. कारण नियमात बसवून, सहजासहजी किडनी मिळणे, कठीण असते. अशावेळी गुन्हेगारी प्रवृत्तीची मंडळी काय काय उद्योग करतात, त्याचे भेदक वास्तव चित्रपटात मध्यंतरानंतर पहायला मिळते. कलियुगात माणूस पशुवत वागायला लागल्याचे ते भयानक रूपच होय.

चित्रपटाचा पहिला भाग विश्वसनीय आणि उत्कंठा वाढविणाऱ्या पद्धतीने चित्रित केला आहे. त्या तुलनेत दुसऱ्या भागात मात्र बऱ्याचशा गोष्टी विस्कळीत आणि ओढून ताणून, कशाही जोडून अखेरीस या किडनी रॅकेटकडे आणून सोडलेल्या वाटतात, असे जरी असले, तरी सध्याच्या शेतकऱ्यांच्या आणि ग्रामीण जनतेच्या दुरावस्थेचे आणि आरोग्यविषयक किडनी प्रत्यारोपणाच्या विषयाचे गुन्हेगारी चित्राची हाताळणी, ह्या चित्रपटात केली आहे.

मात्र त्याच हाताळणीत असलेले काही दोष वगळता, कल्पना येणार नाही, अशा विषयाला ऐरणीवर आणणारा "विकून टाक" चित्रपट पहावा असाच आहे. एक गोष्ट मात्र खरी, मराठी चित्रपटांना थिएटर व योग्य वेळ मिळणे दुरापास्त, तसेच, काही अपवाद वगळता फक्त एक आठवडा ते जेमतेम तग धरून राहतात ही. सगळ्यांनीच अंतर्मुख होऊन विचार करण्याजोगी ही गोष्ट आहे.

सुधाकर नातू

रविवार, २३ फेब्रुवारी, २०२०

राशीनिहाय माहवार अनुकूलगुण कोष्टक-२०१९/२०":


"राशीनिहाय माहवार अनुकूलगुण कोष्टक-२०१९/२०":

वार्षिक भविष्याला अधिक वस्तुनिष्ठ बनविण्याचे दृष्टीने आम्ही
ग्रहबदलानुसार प्रत्येक राशीला, प्रत्येक महत्त्वाचा ग्रह किती दिवस अनुकूल आहे याचे गणित करून, माहवार अनुकूल गुण कोष्टक बनवले आहे: १ नोव्हेंबर ते २०१९ ते ३१ डिसेंबर २०२० पर्यंतचे.

त्याचा उपयोग आपण जे आपल्या राशीला माहवार अनुकूल गुण मिळतात, त्यानुसार प्रयत्न आणि अपेक्षा यांचा समतोल साधून जीवनामध्ये अधिक समाधान आपण मिळवू शकता. हे उपयुक्त कोष्टक वापरताना, अनुकूल गुण कमी, तर प्रयत्न वाढवावयाचे व अपेक्षा कमी ठेवावयाच्या. तर अनुकूल गुण जास्त तर प्रयत्न व अपेक्षा दोन्ही वाढवून अधिक प्रगती करावयाची.

अशी ही संकल्पना गेली तीन दशके विलक्षण लोकप्रिय होत आहे.
आपणही तिचा लाभ घ्यावा.

धन्यवाद
सुधाकर नातू





शनिवार, २२ फेब्रुवारी, २०२०

"वाचा आणि फुला, फुलवा-२": "जीवन तत्त्वज्ञान".


 "वाचा आणि फुला, फुलवा-२": "जीवन तत्त्वज्ञान"
वाचण्यासारखा छंद नाही, वाचण्यासारखा आनंद नाही, कारण त्यामधून आपल्याला अनेक व्यक्तींचे अनेक तर्‍हेचे विचार पाहायला, वाचायला अनुभवायला मिळतात. त्यामुळे आपल्याला अंतर्मुख होऊन काही ना काही तरी घेता येतील म्हणून, जेव्हा जेव्हा काही खरोखर मनाच्या कोपऱ्यात नोंदवुन ठेवावे आणि पुन्हा पुन्हा उजळणी करावी असे जर काही मला वाचनातून मिळत गेले, तर ते माझ्या ह्या अभिनव सदरातून मांडणे मी सुरु केले आहे. ही एक प्रकारची आनंदयात्राच आहे आणि तिला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

ह्या दुसऱ्या लेखनपुष्पासाठी, विषयही कुठला मिळाला तर तो म्हणजे "जीवन तत्त्वज्ञान" हा!
"निर्वाणीचे गझल"
मौज दिवाळी अंक"२०११:
कविवर्य विंदा करंदीकर:
वरील दिवाळी अंकामध्ये, कविवर्य विंदा करंदीकर यांच्या एकाहून एक सरस अशा रचना मी मुद्दामून माझ्या नोंदवहीत नोंदवून ठेवल्या होत्या.

त्यातील रचना दोन भागात अशा तुम्हाला आता इथे देताना मला मनापासून खूप आनंद होत आहे.
"जीवन तत्वज्ञान" विषयाकरिता ह्या अप्रतिम गझला निश्चितच तुम्हाला अनुरूप वाटतील, अशी मला खात्री आहे.
अतिशय सोप्या भाषेत जीवन तत्त्वज्ञान सांगणाऱ्या या सार्‍या रचना, खरोखर प्रत्येकाने अंतर्मुख होऊन प्रत्यक्षात त्याप्रमाणे वागायला हवे असेच सांगणाऱ्या आहेत:
१.
"एवढे लक्षात ठेवा":
ती पूर्वजांची थोरवी, त्या पूर्वजांना गौरवी,
ती न कामी आपुल्या, एवढे लक्षात ठेवा !

जाणते जे सांगती, ते ऐकून घ्यावे सदा,
मात्र तीही माणसे, एवढे लक्षात ठेवा !

चिंता जगी या सर्वथा, कोणा न येई टाळता,
उद्योग चिंता घालवी, एवढे लक्षात ठेवा !
विश्वास ठेवावाच लागे, व्यवहार चाले त्यावरी,
सीमा तयाला पाहिजे, एवढे लक्षात ठेवा !

दुपटीने देत जो ज्ञान, आपण घेतलेले,
तो गुरुचे पांग फेडी, एवढे लक्षात ठेवा !

माणसाला शोभणारे युद्ध, एकच या जगी,
त्याने स्वतःला जिंकणे, एवढे लक्षात ठेवा !
कविवर्य विंदा करंदीकर
---------------------
२.
"तेथून दूर जावे"!
सर्वस्व अर्पिती जे, त्यांचेच गीत गावे.
त्याची घडे टवाळी, तेथून दूर जावे!
नसता विनोद काही हसतात, लोक सारे,
चाले असा तमाशा, तेथून दूर जावे!
संगीत ज्या ठिकाणी, रसहीन चाललेले,
बुद्धीस साजवाया, तेथून दूर जावे!

विद्वान कल्पनांचा, काढीत कीस जेथे,
सामान्य माणसांनी, तेथून दूर जावे!
जनतेस नागवूनी, बनतात जे पुढारी,
त्यांचा झडे नगारा, तेथून दूर जावे!
बागेत हिंडताना, कुंजात लाडकीशी,
कुजबुज कानी येता, तेथून दूर जावे!
मोहान्ध होऊनिया, जे दार गाठलेले,
ते उघडण्याच पूर्वी, तेथून दूर जावे!
कविवर्य विंदा करंदीकर.
३.
"ते जरा समजून घे".
ही लाट आहे तोवरी, खुशाल तू गाजून घे!
गाजण्याला अर्थ कितीसा? हे जरा समजून घे.
हे अशिक्षित रांगडे, प्रश्न पुसती भाबडे;
पुसतात हे थोडे नसे! ते जरा समजून घे.
शतकानुशतके जाहली पिळवणूक ज्यांची इथे, सुटल्यास त्यांची सभ्यता, हे जरा समजून घे.

त्या यौवनासह येतसे हा आग्रही उत्साहही;
अतिरेक थोडा व्हायचा! ते जरा समजून घे.

त्यांना न अपुले आवडे, त्यांचे रूचे ना आपणा; बीज प्रगतीचे विरोधी, हे जरा समजून घे.

प्रेमाप्रमाणे रागसुद्धा माणसांना जोडतो, मानवातिल गुढ नाते, ते जरा समजून घे.

टाळ झडती तेवढ्याने मानू नको ही पंढरी,
शूटिंग चाले या इथे, ते जरा समजून घे.
कविवर्य विंदा करंदीकर.
----------------------
४.
"धीर थोडासा हवा."
कालौघ जावा लागतो अवतार घेण्याला नवा
विष्णूस त्या! मग आपण धीर थोडासा हवा.
अंधार दाटे भोवती; हाती असे इवला दिवा;
सारे दिवे पेटवाया, धीरज थोडासा हवा.

मानू नको यांना मुके, हें न अजूनी बोलके;
बोलते होतील तेही, धीर थोडासा हवा.
शेत रूजले, वाढलेही डोलते वाऱ्यावरी,
पीकही येईल हाती; धीरज थोडासा हवा.

स्वर लाभला; गुरुही भला; चाले रियाजही चांगला; जाहीर मैफल जिंकण्या, धीर थोडासा हवा.
'या गुणांचे चीज नाही'- तक्रार दुबळी व्यर्थ ही; चीज होण्या वेळ लागे; धीर थोडासा हवा.

घाई कुणा? वा केवढी? काल ना पर्वा करी;
काला बरोबर नांदण्या, धीर थोडासा हवा.

कविवर्य विंदा करंदीकर.
----------------------
ह्यांवर अधिक काही वेगळे विवेचन करण्याची गरजच नाही, इतक्या त्या सहज सोप्या भाषेत
कविवर्य विंदा करंदीकर ह्यांनी मांडल्या आहेत.
अविस्मरणीय अशा ह्या बोधक रचना आपल्याला एक नवी दिशा दाखवतील व द्रुष्टी देतील अशी आशा आहे.

ह्यासारख्याच कविवर्य विंदा करंदीकरांच्या गझला पुढील लेखात.
धन्यवाद
सुधाकर नातू

बुधवार, १९ फेब्रुवारी, २०२०

"रंगांची दुनिया-९": "टेलिरंजन-१": "छळती किती, आम्हा या मालिका? !":


"रंगांची दुनिया-९":
"टेलिरंजन-१":
"छळती किती, आम्हा या मालिका? !":

शीर्षकावरून लक्षातच आलं असेल की, मराठी मालिका पाणी घालत कंटाळवाण्या होतील, इतक्या वाढवत वाढवत, दर्शकांच्या माथी मारल्या जातात. त्या डोके गहाण ठेवून जर बघितल्या, तरच कदाचित सुसह्य वाटू शकतात, यावर हे सगळे विचार असणार हे लक्षात आलं असेल. वेगवेगळे मुद्दे घेऊन मालिकांच्या उदाहरणांसह आम्ही विविध मालिका सर्वसाधारण रसिक समंजस प्रेक्षकाला कसे छळतात, ते दाखविण्याचा प्रयत्न येथे करणार आहोत.

"काळेभोर केसांच्या आजी":
पहिला मुद्दा हा आजी-आजोबांचा आहे. हल्ली मालिकांमध्ये आजी-आजोबा विशेषतः आजी स्वतःला खूपच तरुण समजतात. असेच त्यांचे एकंदर रंगरूप व व्यक्तिमत्व असते. आजी ह्या आपणही तरुण आहोत हे दाखवण्यासाठी काळेभोर केस ठेवण्याचे हट्ट धरतात. ही संहितेची गरज असू नये, सहाजिकच, ती भूमिका साकारणार्या अभिनेत्रींची इच्छा वा हट्ट असेच म्हणावयाचे.
उदाहरणार्थ "घाडगे अँड सून"
"आई कुठे काय करते"

"आंधळ्या प्रेमाच्या खाणा-खुणा!":
मालिकांमध्ये सर्वसाधारण जीवनामध्ये अशक्य अशा तर्‍हेचे प्रेम जुळवलेले दाखवले जाते. विधवा बाई-अनु, जिला एक मुल देखील होऊन गेलेले आणि अगदी गरीब घरातली, त्याच्यापेक्षा वयाने मोठी, तिच्या प्रेमात, उद्योगपती असलेला सिद्धार्थसारखा देखणा तरुण प्रेमात पडलेला आणि त्याचा विवाह व्हावा म्हणून, अनेक नाट्यमय प्रसंग ओढून ताणून रंगवत जाणारी मालिका म्हणजे "सुखांच्या सरींनी, मन हे बावरे"! इथे कुठल्याही सुखांच्या सरी कधीही कोसळताना दिसत नाहीत! आता बोला, हे शीर्षक कशासाठी?

तीच गोष्ट "अग्गबाई सासुबाई" मधली! इथे तर
आपल्या सासूचा विवाह व्हावा, म्हणून एक चक्क नवविवाहित सून, अक्षरशः धडपडताना दाखवलेली जाते. ज्या बाईला विवाहित मुलगा आहे, चांगला सांभाळून घेणारा सासरा आहे आणि तसं बघितलं तर तिच्या आयुष्यात कुठलाही एकाकीपणा अथवा त्रास, दुःख नाही, अशी ही स्त्री खूपच भोळीभाबडी आहे आणि ती एका प्रौढ अविवाहित शेफ असलेल्या पुरुषात कशी काय गुंतत जाते, हे मान्य होणं, केवळ अशक्यच आहे. समाजातील वास्तवतेवर प्रकाश टाकायचं सोडून, उगाचंच प्रौढ विधवा विवाहाचा एक वेगळा विचार टाकण्याच्या अट्टाहासांत, हा जो काही पोरखेळ चालवला जातो, तो कसा काय पटेल? एखादी एकाकी प्रौढ विधवा स्त्री, जीला मुलगा बिलकुल विचारत नाही आणि जीला काही आधार नाही, उलट जगण्यासाठी अनेक विवंचना आहेत, या सगळ्यांचा खूप त्रास होत आहे, अशावेळी तिला सोबत आधार व सहवास म्हणून एखाद्या समदुःखी प्रौढ पुरुषाबरोबर स्त्रीचा विवाह करावा, असे मनात येणे, अयोग्य नाही, परंतु इथे मालिकेत सगळंच उरफाटं आहे. ह्या दांपत्याने लैला मजनुसारखं वावरणं शोभत नाही. म्हणून तर
"अग्गबाई सासुबाई"
हे शीर्षक मालिकेला दिले की काय!

मालिकांमधील आंधळ्या प्रेमाच्या कळा ह्या खुळ्या, असे आम्ही जे म्हणतो ते ह्याच करता!

"असेही, तसेही काहीही...ही हं..!":
"घाटगे अँड सून"मध्ये अक्षय अमृता आणि टियारा यांचा जो तीन पायाची शर्यत असल्यासारखा प्रेमाचा व विवाह-घटस्फोट असा लपंडाव चाललेला, तो अक्षरशः उबग आणणारा होता. घटस्फोट घेतलेल्या सुनेला मुलगी म्हणून आजेसासूबाईंनी घरातच ठेवून घेणे, हा विचित्र प्रकार केवळ मालिकेतच होऊ शकतो.

"तुझ्यात जीव रंगला" मध्ये धाकटी सून स्वार्थापोटी, जे काही खलनायकी प्रकार आपल्याच कुटुंबाचा नायनाट होईल इतकेच नव्हे, तर स्वतःचा नवराही त्यातून सुटणार नाही, इतक्या थराला जाणारी सून फक्त मालिकेत सापडणार. पाण्यात बुडालेला मेलेला राणा दोन वर्षांनी परत येणे आणि नंतर मालिका वाढवण्यासाठी त्याने
चक्क पोलिसात भरती होणे, हे म्हणजे लांबण लावण्याचे हास्यास्पद लक्षण नव्हे तर दुसरं काय?

असाच कहर केला आहे तो "सुखांच्या सरींनी, मन हे बावरे", ह्या मालिकेत. इथे गोष्ट तर दिमाखात चालू असताना, म्हणजे श्रीमती दुर्गाबाई जी चांगली कर्तबगार धडाडीची उद्योग सम्राज्ञी आहे, ती चक्क घरातून गायब होऊन, कुठे तरी गुरूकडे जाते, केव्हा तर, तिच्या घरामध्ये तिचा एकुलता एक नवविवाहित लाडका मुलगा सिद्धार्थवर, एकतर्फी प्रेम करणारी सानवी घरात येऊन आपल्या आजारी आई बरोबर राहण्यासाठी येताना! ही अशक्यप्राय अशीच गोष्ट नाही कां? नंतर चक्क अभिनेत्रीच बदलून, नवी दुर्गा परत येऊनही, असून नसल्यासारखी निष्प्रभ आणि ही खलनायकी एक तर्फी प्रेम करणारी जवळजवळ वेडी मनोरुग्ण सानवी, घराचाच नव्हे तर कंपनीचाही पूर्ण ताबा घेऊन सगळ्यांना घराबाहेर रस्त्यावर काढते! याला खरोखर काय म्हणायचे, प्रेक्षक मूर्ख आहेत असे समजून, ही मंडळी आपल्याला कसेही वाटेल तसे भरकटलेले कसे दाखवत राहतात, याचेच नवल वाटते.

"माझ्या नवऱ्याची बायको" मालिकेबद्दल तर बोलायलाच नको! तिथे तर नाही नाही ते काहीही कसेही प्रसंग व नवनवीन व्यक्ती आणत मालिका अक्षरशा उबग येईल, इतकी पुढे पुढे बिनदिक्कत नेली जात आहे. गुरुनाथ हा नायकाचा कसलेला व्हिलन होणे आणि त्याहीपेक्षा त्याची पत्नी राधिका, एक मामुली गृहिणी, जणु चमत्कार होऊन, चक्क मसाला विकणार्या
रूपये ३०० कोटींच्या कंपनीची मालकीण होणे, घटस्फोटानंतर नवा गडी नवा राज्य सारखे तिचे मित्राशी लग्न होणे. तिला जणू विकतचे, इतके दिवस न उगवणारे सासू-सासरे मिळणे आणि अशाच अजून एका तिसऱ्या तरूणीच्या रूपाने शनायालाही शह द्यायला मालिकेत प्रवेश करणे, असे कितीतरी उद्वेगजनक न पटण्याजोगे असे प्रसंग दाखवून, या मालिकेचा अक्षरशः चोथा केला आहे. तरीही मालिका चालूच आहे, कारण कदाचित आपले डोके गहाण ठेवून बघणारेच प्रेक्षक ती बघत असावेत.

"रंग माझा वेगळा" मधील एक गर्विष्ठ धनाढ्य आई, ऐश्वर्या आपल्या मुलाने वा कुटुंबातील कोणीही, काळ्या रंगाच्या माणसांशी, संबंध ठेवू नये असा दुराग्रही अट्टाहास कां करत असते, ते तिचं तिलाच ठाऊक, वा ते रहस्य वेळ पडेल ( म्हणजे मालिका लांबवायचे उपाय संपल्यानंतर!) तेव्हा उघड होईल. तिचा मुलगा डॉक्टर कार्तिक तशाच एका गरीब घरातील पण काळ्या मुलीशी प्रेमसंबंध जोडू पाहतो. तर तिथे त्या मुलीची आई, जी सावत्र आहे, तिचा दुस्वास करत, तिच्याच वयाचा मुलगा असलेल्या एका प्रौढाशी तिचा विवाह अक्षरशः जबरदस्तीने तीन दिवसात केलाच पाहिजे, अशी धमकी देऊन करायला लावते! हा सगळा प्रकार खरोखर अतर्क्य आहे, तसेच आयत्या वेळेला, मेचका तिथे डॉक्टर कार्तिक घेऊन त्याने ते लग्न मोडणे, असे अनेक अविश्वसनीय प्रसंग एका पाठोपाठ, या मालिकेत सुरवातीपासूनच बघायला मिळत आहेत.

मारूतीच्या शेपटीसारखे मालिकांचे हे रडगाणे असेच लांबविता येईल. काही सन्माननीय अपवाद वगळता, बहुतेक सर्व मालिकांत, सुरुवातीचे थोडे भाग अतिशय उत्कंठा वाढविणारे व पाहण्यालायक असतात. परंतु कथाबीज जर इवलेसे असले तर, मालिका पहाण्याचा रस नाहीसा होऊन, पुढे काय करायचे असे प्रश्न निर्माण होऊन मालिकेला कसेही कधीही फाटे फोडत जातात. नवीन पात्रं आणि नवीनच काहीतरी वेगळे प्रश्न निर्माण करणे अशा युक्त्या वापरत मालिका लांबवल्या जातात, हे योग्य नव्हे.

ह्याकरता "छळती कां आम्हा या मालिका? !" हेच खरे. चित्रपटांप्रमाणेच सेन्सॉर बोर्डासारखे नियंत्रण मंडळ मालिकांसाठीही अनिवार्य होणे व कोणतीही मालिका मर्यादित भागांतच संपविणे आवश्यक ठरवले जावे. क्रिकेटमधील अत्यंत लोकप्रिय 20-20 सामन्यांपासून बोध घेऊन सर्वांनी असे बदल लौकर घडवून आणावेत.

सुधाकर नातू

शुक्रवार, १४ फेब्रुवारी, २०२०

👍"वाचता, वाचता फुलली एक आनंदयात्रा !":👌

👍" वाचता, वाचता फुलली एक आनंदयात्रा !":👌:
वाचण्यासारखा छंद नाही, वाचण्यासारखा आनंद नाही, कारण त्यामधून आपल्याला अनेक व्यक्तींचे अनेक तर्‍हेचे विचार पाहायला, वाचायला अनुभवायला मिळतात. त्यामुळे आपल्याला अंतर्मुख होऊन काही ना काही तरी घेता येतील म्हणून, जेव्हा जेव्हा काही खरोखर मनाच्या कोपऱ्यात नोंदवुन ठेवावे आणि पुन्हा पुन्हा उजळणी करावी असे जर काही मला वाचनातून मिळत गेले, तर ते माझ्या ह्या अजून एका अभिनव सदरातून मांडण्याचा माझा मनोदय आहे. ही एक प्रकारची आनंदयात्राच आहे आणि योगायोगाने या पहिल्या लेखनपुष्पासाठी, विषयही कुठला मिळाला तर तो म्हणजे आनंद हा!
१.
"महाराष्ट्र टाईम्स मधील सगुण-निर्गुण सदर"
रोहिणी तुकदेव:
"जन्म आणि मृत्यू या दोन बिंदूंच्या मध्ये असलेल्या आडव्या रेषेला जीवन म्हणायचं. जीवन सार्थकी करण्यासाठी, त्याकरता वेळ न गमावता मनातली स्वतःची उन्नत प्रतिमा पूर्ण करण्याची त्वरा करायला हवी. वेळ नेहमीच कमी असणार आहे आणि म्हणूनच सकाळी उठल्याबरोबर, आजचा दिवस आपल्याला मिळाला या आनंदात प्रसन्नपणे कामाला लागायला हवे. दर दिवशी मिळणारा चोवीस तासांचा अवधी लचका तोडल्यासारखे गंभीर जखम आणि तीव्र वेदना होऊन जाईल की, आशादायी उद्याच्या तयारीसाठी उमेद आणि उत्साह देऊन होऊन जाईल, हे आपण आपल्या वेळेशी संगणमत करून अर्थपूर्ण आणि आनंददायक अनुभवांची साखळी कशी निर्माण करतो, त्यावर ठरते"...

महाराष्ट्र टाईम्स मधील सगुण-निर्गुण हे दैनिक सदर नेहमीच वाचण्यासारखे असते. त्यामधील रोहिणी तुकदेव यांच्या लेखातील हे विचार मला भावले.
आजचा दिवस कालच्यापेक्षा अधिक चांगला गेला हे उद्यालाही म्हणता यावे, असा प्रयत्न हवा, असेच ह्यातून घ्यायचे. मिळणारा क्षणन् क्षण सार्थकी लावावयाचा......
------------
२.
"मॅजेस्टिक गप्पां": मटा व्रुत्तांत:
जगण्यातील आनंदाचा शोध ही तर आंतरिक जाणीव, ते आनंदयात्रींनी उलगडले. वेगळ्या वाटेवरचा प्रवास मॅजेस्टिक गप्पांमध्ये तीन विचारवंतांनी खरोखर आनंदाचा शोध वेगवेगळ्या प्रकारे घेतला सुख म्हणजे आनंद नाही, आनंदाचा शोध हा आंतरिक असतो, चाकोरीतले आखून दिलेले आयुष्य सोडून स्वच्छ आंतरिक हाक ऐकणारी माणसे, आनंदाच्या शोधात असतात. हा प्रवास सोपा नसतो, त्यात अनेक खाचखळगे असतात. पण तरीही आनंदाचा शोध घेण्याची असोशी तीव्र असते. चाकोरीतले आयुष्य सोडून वेगळी वाट गुंडाळणाऱ्या या तीन आनंदयात्रीनी प्रेक्षकांना खरोखर मंत्रमुग्ध केले.
संजीव लाटकर यांनी आनंदाचे नेमके गमक सांगताना, प्रत्येक क्षण हा आनंदाचा असतो, जन्माचा गाभा हा प्रेम आनंद आणि उर्जा ह्या पलीकडे नसतो. कोणतीही अपेक्षा न ठेवता केलेले प्रेम ऊर्जा देते. ती आयुष्यभर पुरते. कारण ती पैशातून आलेले नसते ,ती आनंदाने वाढते. आनंदाच्या सुखाच्या मागे धावणारे सगळेच आनंदी होत नाहीत. लेकराला खाऊ घालताना आईच्या चेहर्‍यावर दिसतो तो आनंद, विठोबाच्या मंदिराचा कळस दिसताच भक्ताच्या डोळ्यात येणारे पाणी हा असीम आनंदाचा क्षण असतो. म्हणून आनंदाच्या विरुद्धार्थी शब्द नाही, मात्र सुखाच्या दुःख हा आहे. आनंदाच्या पुढची अवस्था ही परमानंदाची आहे, असे लाटकर यांनी सांगितले.
राहुल कुलकर्णी यांनी भौतिकदृष्ट्या स्थिरस्थावर असतानाही, आतमधून काही वेगळे करण्याचा धडका बसत होत्या. कलेचे बोट अलगद धरून त्यांनी कोकणातल्या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने शेती करण्याचा निर्णय घेतला कृषी पर्यटनाची सुरुवात केली. पण तिथे शेतकऱ्यांच्या माध्यमातून अक्षर-साक्षरता सामान्यांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला. निसर्गाच्या जवळ जाताना मिळालेला आनंद, हा कोणाला काहीच सिद्ध करून दाखवण्याच्या स्पर्धेतून मुक्त होतो. खऱ्या आनंदाचा एक निर्मळ झरा आतमधून वाहू लागतो, असा प्रवास राहुल यांनी उलगडून दाखवला.
परिघाबाहेरच्या आनंदाचा शोध घेणारे तिसरे नाव होते, अनिल साबळे. आदिवासींना पाड्यातल्या माणसांना आश्रमशाळातल्या लेकरांना मदतीचा हात देणारे, अनिल यांनी पाहिलेला आहे, गुहेमध्ये चाळीस वर्ष राहणारा माणूस. अत्यंत गरिबीमुळे तीस वर्षाहून अधिक काळ चहा न प्यायलेल्या माणसाला. घरातला माणूस गेल्यावरही अडलेल्या बाईचे बाळंतपण करणारी गावातली दाई, यांच्या आनंद शोधण्याच्या यात्रेमध्ये होती. शोध घेता घेता देण्यातला आनंद किती अगाध असतो ही जाणीव उपस्थितांना खूप खूप सांगून गेली.
म्हणूनच मी म्हणतो:
"क्षणा क्षणातच रंग भरा....
हितकर, रुचकर करण्याचा चंग धरा....
रुसण्या, रडण्याचा छंद ,व्यर्थ ना करा....
जीवन जगण्याचा हाच, अर्थ खरा!....
क्षणा क्षणांतच रंग भरा".....
---------------------
३.
"ही माझी पायवाट" लघुकथा:
"माहेर" फेब्रुवारी'२०२०ः
विवेक घोडमारे
"हेतु ठरला, म्हणून साऱ्या वाटा तिकडेच नेऊन सोडतात असं थोडंच होतं? वाटांच्याही मनात आणखी पोटवाटा असतातच की. त्यात भटकून प्रवासाची दिशा उलटपालट होईस्तो वाटसरूला कळत सुद्धा नाही. लाटांनी नाकातोंडात घुसून किनाऱ्यावर फेकून दिल्यावरच, नाविकाला आपल्या निग्रहाच्या तोकडेपणाची जाणीव घडत असते. तसेच हेही तेव्हाच उमगतं, सामना निष्ठूर काळाशी आहे. मुख्य रस्ते बंद झाले की, पायवाटा निर्माण होतातच की!"

शेवटी जीवनात जर समाधान मिळवायचे असेल, तर आपले अपेक्षा आणि प्रयत्न ह्यांच्यात बदलत्या परिस्थितीत अचूक समतोल साधता येण्याचे कौशल्य अंगी हवे. तुमची द्रुष्टी बदला, एक नवी स्रुष्टी दिसेल. जे नाही, त्याचा विचार करत चिंता करण्यापेक्षा जे आहे, त्यात आनंद शोधायला शिका....
-------------------
जेव्हा जेव्हा असेच खरोखर मनाच्या कोपऱ्यात नोंदवुन ठेवावेत आणि पुन्हा पुन्हा उजळणी करावी, ते वाचता वाचता वेचलेले शब्द मी ह्या अभिनव सदरातून मांडले आहेत. ही एक प्रकारची आनंदयात्राच आहे.....
ह्या अशा शारदोत्सवात ह्यापुढेही सामिल व्हायचे असेल, तर प्रतिसादात होकार कळवावा, ही विनंती.
धन्यवाद
सुधाकर नातू


बुधवार, १२ फेब्रुवारी, २०२०

"ह्रदयसंवाद-९": "निर्णयामागचे कवित्व":



"ह्रदयसंवाद-९":
"निर्णयामागचे कवित्व":

कोणत्याही प्रसंगी आपल्याला निर्णय घ्यायलाच लागतो. आपण सातत्याने दिवसांमागून दिवस, तासांमागून तास, सातत्याने कुठले ना कुठले तरी निर्णय घेतच असतो. निर्णय घ्यायला लावणारी गोष्ट म्हणजे एखादा हेतू असतो, समस्या असू शकते किंवा इतरही काही गोष्टी निर्णय घेताना असू शकतात. कधीकधी निर्णय घेण्यावाचून पर्यायही नसतो. परंतु बहुतांश वेळी निर्णयावर कृती करायची की नाही, याला मात्र निश्चितच पर्याय असतोच असतो.

जेव्हा अनेक पर्याय निर्णयामागे उपलब्ध असतात, तेव्हा कळत नकळत आपण कोणत्या गोष्टीमुळे आपल्याला अधिक फायदा, अधिक सुखकर वाटेल हे पाहात असतो, तसे पहाणे गरजेचेही असते. त्यामधून आपण त्या वेळेला जास्त फायदा आहे तो निर्णय घेतो आणि कदाचित नंतर कृतीही करतो. शेवटी निर्णय जसा महत्त्वाचा, तशीच कृती देखील महत्त्वाची असते. म्हणजे योग्य तो निर्णय, योग्य त्या वेळी आणि योग्य त्या कृतीने जर घेतला, तर कदाचित आपला हेतू प्राप्त होऊ शकतो. निर्णय आणि कृती यांचा आपल्या जीवनात सातत्याने संचार सुरू असतो. यशस्वी माणसे, योग्य निर्णय योग्य वेळी योग्य कृतीने घेतात, असेच पाहायला येते.

एक साधं उदाहरण सांगतो. मी नेहमी दादरला लायब्ररीत मासिके पुस्तक वगैरे बदलायला जातो. असे कधीतरी बाहेर जाणे हा माझ्यासारख्या ज्येष्ठ नागरिकासाठी एखाद्या प्रकारचा बदल असतो. माझ्या जीवनात मात्र नेहमी उगाचच, मला बाहेर जायला आवडतं असं नाही, कारण मी मुलतः घरकोंबडा माणूस आहे.

त्या दिवशी लायब्ररीमध्ये जावं की नाही हा निर्णय मला घ्यायचा होता. त्यावेळेला मी सहज बघितलं, मासिकं परत करायची शेवटची तारीख कधी आहे ते. तर ती त्याच दिवशी नसून, दुसर्या दिवशी आहे, ते लक्षात आल्यानंतर मला वाटलं, आज दादरला जाऊच नये. त्यात काहीही नुकसान नाही, कारण जर मासिकं वा पुस्तके परत करायला उशीर झाला तरच दंड भरावा लागतो. म्हटलं तर ही चालढकल, आणि म्हंटलं तर हे म्हणजे आपला स्वतःचा कम्फर्ट झोन बघण्याचा प्रकार म्हणून न जाण्याचा निर्णय. इथे माझ्या मुलभूत घरकोंबडा स्वभावाचाही प्रभाव होता. माझ्या मते कोणताही निर्णय जेव्हा माणूस घेतो, तेव्हा तो आपला असा कम्फर्ट झोन हाच प्राधान्याने मनात ठेवत असतो. ह्या उलट जो माणूस, घरात न बसता बाहेर प्रवास करणे पसंत करणारा असेल तो सरळ बाहेर लायब्ररीत जाण्याचा ताबडतोब निर्णय घेईल, माझ्यासारख्या नसत्या उठाठेवी करत वेळ वाया घालवणार नाही.

आता निर्णय घेणे कसे आपल्या पाचवीला पुजलेले असते, ते बघू. जीवनामध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंत सातत्याने आपण कथधी ना कधी कुठे ना कुठे कुठला ना कुठला तरी निर्णय घेत असतो. बाळंतपणासाठी पत्नीला कोणत्या डॉक्टरकडे नांव घालायचे तो निर्णय, मूल झाल्यानंतर आजारपणातले उपचार किंवा मूल होताना सीझेरियन जर करायची वेळ आली तर काय करायचं तो निर्णय, मूल मोठे होऊन शाळेत घालताना कुठल्या माध्यमात, कुठल्या शाळेत घालायचं, तो निर्णय. स्पर्धेच्या जीवनामध्ये कुठल्या विषयाची, कोणाची शिकवणी ठेवायची कां कुठल्या क्लासला घालायचं असा निर्णय. शालान्त परीक्षेनंतर संततीला कुठल्या विभागात पुढे शिकवायचं आर्ट्स कॉमर्स सायन्स कां आणखीन दुसरं काही तो निर्णय. त्यानंतर नोकरी मिळवायची कां कुठला व्यवसाय कां कसा करायचा तो निर्णय. मनाजोगती नोकरीची संधी मिळणं हल्ली कठीण आणि मिळाली तर कुठली स्वीकारायची कोणत्या निकषावर स्वीकारायची हा निर्णय. असे निर्णयांचे शेपूट कधीच थांबता थांबतच नाही.

पुढे विवाह जुळणीच्या वेळेला, "कांदेपोहे करून" विवाह, कां प्रेमविवाह आणि प्रेम विवाह जर झाला किंवा होत असला, तर बहुधा हाचा अनुभव येतो की, दोन्ही बाजूला कोणतीही तक्रार नाही वा अडचण नाही, विरोध नाही, अशा तऱ्हेची निवड फारच क्वचित प्रेम करताना केली जाते, कारण प्रेम आंधळं असतं! त्यामुळे दोन्ही बाजूंपैकी कुठेतरी विरोध, कधी पळून जाऊन लग्न असे अनुभव येत असतात. नंतरही ते प्रेमविवाह टिकतीलच ही खात्री नाही ती नाहीच.

समजा, कांदेपोहे हा मार्ग स्वीकारून विवाहाचा निर्णय जरी घेतला तरी, तो देखील पुष्कळदा इंपल्सिव्हली म्हणजे अनाहूत आवेगाने घेतला जातो आणि बहुतेक वेळा नंतरच बऱ्याच काही गोष्टी अशा लक्षात येतात की, आपला निर्णय बरोबर होता की नाही असे प्रश्न पडावेत. कारण कधी शिक्षण सांगितले त्यापेक्षा कुणाचं कमी असतं, तर कोणाला नोकरीतला पगार सांगितला, तो नसतो, तर कुणाचे आजार वा व्यंग ध्यानात नंतर लक्षात येते, तर कुणी आळशी कामचुकार, तर कुणाच्या जोडीदाराला नको त्या गोष्टींचे व्यसन, तर कुणाचा स्वभाव रागीट वा हट्टी मुडी, तर कुठल्या बाबतीत मुलीच्या आईवडिलांची सारी जबाबदारी मुलीवरच आहे ते विवाहानंतरच लक्षात येते. निर्णय चुकण्याच्या अशा नाना तर्हा जन्मगांठी बांधताना!

थोडक्यात कुठली ना कुठली तरी चूक,
जन्मगांठीची निवड करताना होतच असते. म्हणजे जसं प्रेमविवाह मध्ये आपल्याला कुठलीही खोट नसलेली, निवड करणं कठीण असतं. "कांदेपोह्यां"च्या बाबतीतही अनुरूप अशी सर्व बाजूंनी कुठलीही तक्रार नाही अशा प्रकारचे निर्णय खरोखर घेतले जातातच कां हे संशोधनाचं काम आहे.

निर्णय घेताना विविध पर्याय आणि त्या पर्यायांच्या पासून होणारा लाभ आणि त्यांची तुलना हे करणे खरं म्हणजे आवश्यक असते. परंतु ते केले जात नाही. ह्याकरता खरोखर काही उपायच नाही. कारण हे असेच होत असते. त्या त्या वेळी, ती व्यक्ती, त्या त्या परिस्थितीमध्ये जे आपल्याला योग्य वाटते, तेच ती करत असते. त्यामुळे कधी निर्णय बरोबर येतात, तर कधी निर्णय चुकतात. त्याला काही इलाज नाही. एक गोष्ट मात्र खरी, कुणीही केव्हाही जर आपण निर्णय घेतला तर त्याच्या परिणामांना त्याने तोंड द्यायची तयारी ठेवावी. नंतर आपल्या मनासारखं झालं नाही म्हणून, दुसऱ्या कुणाला दोष देण्याचे उद्योग कुणी करू नये.

आता हे सारं लिहीण्यापूर्वी काय लिहावं, कसं लिहावं व कोणत्या विषयावर लिहावं, हा निर्णय घेत असताना, बोलता बोलता, नव्हे लिहीता लिहिता, "निर्णय" हाच विषय घेऊन, जे जसे सुचत गेले ते तसतसं काळ्यावर पांढरे असे उतरवित गेलो.

ते चांगले कां टाकाऊ हा निर्णय घेणे मात्र तुमच्याच हातात आहे!

सुधाकर नातू

ता.क.
विरंगुळा व जिज्ञासा ह्यासाठी.....
आपल्या राशीचे संपूर्ण वार्षिक राशीभविष्य
व राहू केतूच्या राश्यंतराचे परिणाम जाणण्यासाठी.......
You tube वर जा. सर्चमध्ये लिहा:
माझ्या चँनेलचे नांव:

moonsun grandsun

आणि विडीओज् पहा:
चँनेल subscribe करा......

मंगळवार, ११ फेब्रुवारी, २०२०

"रंगांची दुनिया-८": "शारदोत्सव-५": "एक व्रतस्थ आत्मचिंतन": "अंतस्थ कोणी":


"रंगांची दुनिया-८": "शारदोत्सव-५":
"एक व्रतस्थ आत्मचिंतन":
"अंतस्थ कोणी":
लेखक: डॉ. गिरीश दाबके.

रवींद्र पिंगे यांचे "साहित्य संचार" हे पुस्तक वाचल्यानंतर मला जर त्याच्यातून काही मिळालं असेल, तर ते म्हणजे विविध लेखकांच्या विविध विषयांवरची पुस्तकांची अत्यंत संग्राह्य अशी यादी. हे जसं खरं, तसंच डॉ गिरीश दाबके यांच्या
"अंतस्थ कोणी" या पुस्तकाच्या वाचनानंतर मला वैशिष्ट्यपूर्ण व अंतर्मुख करणाऱ्या विचारांचा
इतका काही खजिना मिळाला, की त्याला तोड नाही.

वरील पुस्तकांच्या यादीतून खरं म्हणजे मी नेहमी वाचनालयातून कोणतं ना कोणतं तरी पुस्तक आणावं, अशा मूड मध्ये होतो. परंतु त्या दिवशी काय झालं, कुणास ठाऊक. त्या यादीत नसलेलं, "अंतस्थ कोणी" असे अनोखे शीर्षक असलेले हे श्री गिरीश दाबके यांचं पुस्तक मला मिळालं.
श्री. गिरीश दाबके आणि माझा परिचय असल्यामुळे मी ते पुस्तक घ्यायचं ठरवलं.

पुढे जाण्यापूर्वी, मी आमच्या ह्या परिचयाची पार्श्वभूमी सांगतो:

आम्ही सायनला बालपणी केवळ तळमजला असलेल्या बैठ्या चाळवजा बरँक्समध्ये रहायचो.
तिथे आमच्या शेजारीच पहिल्या खोलीमध्ये नित्सुरे कुटुंब रहायचे आणि त्यांच्याकडे गिरीशचे वडील, ज्यांना आम्ही जनाकाका म्हणायचो तेही रहायचे. ते त्यावेळी अविवाहित होते. कालांतराने आम्ही सारेजण वेगवेगळ्या ठिकाणी स्थिर झालो आणि अचानक केव्हातरी मध्यंतरी, काही वर्षांपूर्वी, माझी आणि गिरीशची फोनवर भेट झाली. तो मालाडला आणि मी माहीमला हे जसे ध्यानात आले, तसेच तो काही लेखनही करतो एवढेच बोलताना समजले होते.

परंतु नंतर पुष्कळ वर्षे आमचा संपर्क आला नाही आणि आज अचानक हे पुस्तक घेतल्यामुळे, पुढे अशा काही घटना घडल्या की, आमचा पुन्हा संपर्क जोडला गेला. मी घरी आल्यावर हे पुस्तक आणि मासिकं चाळत होतो. मासिकं माझी वाचून पूर्ण झाली, व ह्या पुस्तकांतील मी कुठलं तरी प्रकरण वाचताना, मला त्यावेळी तरी ते कंटाळवाणं वाटलं आणि त्यामुळे मी पुस्तक बाजूला ठेवलं. खरं म्हणजे सहाजिकच मी ते पुस्तक न पुढे वाचताच, वाचन पूर्ण झालेल्या मासिंकांबरोबर वाचनालयात परत करणार होतो.

पण योगायोगाने तसे काही घडले नाही आणि तिथेच मोठा सुयोग जुळून आला. कारण नंतर पुन्हा जेव्हा सवड मिळाली, तेव्हा मी हे पुस्तक उघडले आणि सरळ 'अंतस्थ कोणी' ह्याचउत्कंठावर्धक प्रकरणाचं पान उघडलं गेलं. ते प्रदीर्घ उत्कंठावर्धक प्रकरण वाचल्यानंतर, मी अक्षरशः अचंबित झालो, त्यापाठोपाठ "नरेंद्रायण" हे प्रकरणही वाचलं आणि ठरवलं त्याच्याशी संपर्क साधायचा. हे पुस्तक पूर्ण वाचून नंतरच वाचनालयात परत करायचं. त्या प्रमाणे ठरवून मी व्हाट्सअँप वर माझा हा प्रतिसाद पाठवला:

"डॉ गिरीश दाबके,
सादर वंदन.

मी सुधाकर नातू, माझा मोबाईल नंबर तुझ्या संग्रही असेलच ही शक्यता नाही, म्हणून ही सुरवात.

मी सध्या तुझे "अंतस्थ कोणी" हे पुस्तक वाचत आहे आणि अक्षरशः थक्क झालो आहे. हिमनगाचे पाण्यावरचे टोक इतकीच मला आतापर्यंत गिरीश दाबके ह्या माणसाची माहिती होती, कारण ह्या पुस्तकातील, तू आता डॉक्टर गिरीश दाबके असून तुझ्या साहित्यिक सांस्कृतिक व राजकीय वर्तुळातील उत्तम कामगिरी व थोरा मोठ्यांच्या आश्चर्यकारक इतक्या लोकसंग्रहामुळे वाटून गेले.

इथेच हा मोबाईल नं मिळाला. लगेच हा संदेश लिहीण्यास उद्युक्त झालो. मी 'किस्रीम' दिवाळी अंक'१९ मधील तुझ्या लेखावर माझा प्रतिसाद तुला मेसेंजरवर धाडला होता. त्याला उत्तर आले नाही वा तो पाहिल्याचे निदर्शनास आले नाही. म्हणून आता तो संदेश येथे पुढे पाठवत आहे:

१६ जानेवारी'२० रोजी तुला मी मेसेंजरवर पाठविलेला संदेश:

'नुकताच मी "किस्रीम दिवाळी अंक'१९ वाचला आणि त्यात तुझा संपर्कसंदर्भ मिळाला. तो क्रमांक wapp चा नव्हता. म्हणून येथे फेसबुक मेसेंजरवर संदेश.

अंकामधील डॉ शामाप्रसाद मुखर्जींविषयीच्या इतिहासाची तपशीलवार कहाणी तू मांडली आहेस. ती निश्चितच चटका लावणारी आहे व मला ह्या घडामोडी अपरिचित असल्याने त्यांची दाहकता अधिकच होती. कालौघात बदलणारे देशाचे नेत्रुत्व, देशाच्या भवितव्याला कलाटणी देणारे असते ही जाणीव मला झाली.

तुझ्या उत्तुंग योगदानाबद्दल अभिनंदन व शुभेच्छा.
सुधाकर नातू'

हा संदेश पाठवल्यावर आमची पुन्हा फोनवर गाठ पडली आणि मनसोक्त गप्पा झाल्या. असो.
आता ह्या पुस्तकाकडे येवू.

जीवनाकडे किंवा व्यक्तींकडे प्रसंगांकडे, अनुभवांकडे, तटस्थ व्रतस्थ दृष्टीने बघून, त्यातून अम्रुतमंथनासारखे, काही ना काहीतरी तात्विक आणि शाश्वत असे अम्रुततुल्य विचार मांडण्याचे फक्त निवडक लेखकांनाच जमत असते आणि अशा लेखकांमध्ये डॉ गिरीश दाबके यांचा निश्‍चित समावेश करावा लागेल. त्यादृष्टीने जर तुलना केली तर 'वपुं'चं लेखन देखील नेहमी जीवनाचे काही ना काही तरी शाश्वत तत्त्वज्ञान सांगणारे असेच असे. "आपुल्याच आरशात पहावी, आपुलीच प्रतिमा" असे विश्राम बेडेकरांच्या "एक झाड दोन पक्षी" ह्या आत्मचिंतनाशीही, हे पुस्तक साधर्म्य साधू शकते.

"अंतस्थ कोणी" या पुस्तकाच्या वाचनानंतर, मला जे काही जीवन तत्त्वज्ञान अथवा मौलिक असे विचार मिळाले त्यातील ( जागे अभावी) फक्त निवडकच पुढे मांडतो आहे. त्यावरूनच या पुस्तकाचे वैशिष्ट्य आणि लेखकाची कर्तृत्वाची झेप किती उत्तुंग आहे हे समजावे. त्यामुळे दाबके यांनी कशावर काय लिहिलं आणि कसं लिहिलं यापेक्षा त्यांच्या सार्‍या लेखन प्रक्रियेमध्ये त्यांच्याकडून काय जाणवलं काय मिळालं ते यातून समजावं.

नामवंतांचे चरित्रलेखन हे कदाचित डॉ गिरीश दाबकेंच्या लेखनाचे बलस्थान असावे. कारण त्याने आतापर्यंत डॉक्टर हेगडेवार, श्री नरेंद्र मोदी धीरूभाई अंबानी यांची चरित्रे लिहिली आहेत आणि ती विलक्षण लोकप्रियही झाली आहेत. आमच्या फोनवरच्या भेटीत समजलं की त्याने आता डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे चरित्र, जे कदाचित मराठीमध्ये पहिलेच असावे, ते लिहून पूर्ण केले आहे आणि त्याच्या प्रकाशन समारंभालाही त्याने मला आमंत्रण केले.

योगायोग काय असतो कुणास ठाऊक! दोन माणसं केव्हा कधी किती काळाकरता एकत्र येतात याचे काही गणित नाही हेच खरे! पण या पुस्तकामुळे मला जीवनाकडे बघण्याचा वेगळाच दृष्टिकोन जसा मिळाला आहे, तसाच लेखनकला साधीसुधी कला नसून त्यामागे मुबलक वाचनाची आणि चिंतनाची तसेच अथक परिश्रमाची गरज असते हे त्याच्या चरित्र ग्रंथांमागच्या वेळकाढू, जबरदस्त प्रचंड अशा कष्टांवरून समजले.

"अंतस्थ कोणी" यामध्ये लेखकाने आपल्या भूतकाळाचा मागोवा मनाच्या कोपऱ्यात असलेल्या स्मरणजंत्रीवर भाष्य करीत घेतलेला आहे. तिथे काय काय नाही, तर सगळं काही आहे! आई वडील, दोन जिवलग मित्र, भगवान श्रीराम, संत रामदास, हमो, जीए, शिरवळकर माननीय स्वातंत्र्यवीर सावरकर, श्री नरेंद्र मोदी, एवढेच काय तर कार्ल मार्क्सही आहे व महत्वाचे म्हणजे लेखकाचे साहित्यिक-सांस्कृतिक आणि करमणुकीच्या विश्वातले अनुभव व कर्तृत्व, ज्यात यशापेक्षा अपयशांच्याच दाहक प्रसंगाचा सविस्तर मागोवा इ.इ. नुसतेच वाचावे व बाजूला ठेवावे असे नाही, तर त्यातील तात्विक चिरंतन निरीक्षणांवरील लेखकाची भाष्ये, हेरिटेजसारखी जपून ठेवावीत.
त्यामधीलच ही निवडक भाष्ये:
"अंतस्थ कोणी" पुस्तकातील
"मौलिक विचारमौक्तिके":

# दिवस नेहमीच हरणाच्या चपळाईने काळाच्या आड नाहीसे होतात.

# ललित लेखनात खरं म्हणजे कुठल्याही स्रुजनात फक्त निर्मिती असते आणि नंतर रसिकाने घेतलेला आस्वाद असतो. देवकीने सृजनाच्या कळा भोगायच्या, कारावासात बद्ध करून घ्यायचं आणि मोहनाच्या सगळ्या लीलांचे लाघव यशोदेने अनुभवायचे, हाच सृजनाचा व्यवहार आहे.

# रसिकांची भरभरून मिळणारी दाद हेच लेखकाचं खरं वैभव असते.

# खजुराहोच्या मूर्तींना कुठे वय असते?

# मनोविश्लेषणा शिवाय कोणताही लेखक पुढे सरकू शकत नाही. मनोविश्लेषणाची नुसती पोज लेखकाने घेतली, की सृजनाची माती होते. म्हणजे असं की, अभिनय मी आता करतोय अशी पोज अभिनेत्याने जर घेतली, तर त्या भूमिकेचा चोथा होतो तसं!

# चित्रात्मक कथन हे कोणत्याही शैलीत श्रेष्ठ म्हणायचं आणि परिणाम करण्याचं गमगच म्हणायला हवं. मनःपटलावर दिसलेली नानाविध चित्र लेखक शब्दबद्ध करत असतो. ही चित्र निर्माण करीत असताना लेखक कळत-नकळतपणे अनेक मिश्रणं करत असतो. ही चित्रं म्हटल्यास काल्पनिक असतात, म्हटल्यास ती फार फार खरी देखील असतात. कारण वास्तव, कल्पनेचे बोट धरल्याशिवाय आविष्कृत होऊ शकत नाही, कल्पना वास्तवाच्या फार पलीकडे जाऊ शकत नाही.

# वय जसं वाढत जातं, तसतसं कितीही नाही म्हटलं तरी अंतःकरणातील आर्द्रता कोरडी पडू लागते. वाढीव वयात ओळखी होतात, परिचय होतात, पण इतक्या सहजपणे स्नेह जुळत नाहीत अथवा मैत्री साधत नाही. खूप काही पाहिलेलं असल्यामुळे, व्रुत्तीत एक प्रकारचा कोरडेपणा येतो. यात काय विशेष आहे असा विचार एकदा मनात आला की, मैत्री संभवतच नाही.

# यक्षानं युधिष्ठिराला विचारलं "जगातली सर्वात मोठी विसंगती कोणती?

युधिष्ठिर म्हणाला "सर्वत्र आणि कधीही पेटत्या चिता दिसत असूनही मी आणि माझे आप्तेष्ट चिरंजीव आहोत, असं गृहीत धरूनच माणूस जगत असतो, हीच मोठी विसंगती आहे."

या विसंगतीवर थोडी फार मात करण्याचं सामर्थ्य फक्त शब्दात असतं, निरपेक्ष भावनेने काढलेल्या आठवणींत असतं, म्हणूनच केवळ हा अक्षरप्रपंच!

# मुळातच सृजन ही खूप गुंतागुंतीची आणि तरल अशी घटना असते. "धुक्यात कोरीत बसतो धुक्याच्याच आकृती" अशीच लेखकाची अवस्था असते.

# स्रुजनाबद्दल कोणीही, अगदी कोणीही ठामपणे सांगू नये, प्रत्येक लेखकाने फार तर स्वतः बद्दल बोलावे, तेही अदमासाने बोलावे.

# अनुभवाचा कोणता साठा, कोणत्या रूपात कधी व्यक्त होईल याची गणितं नसतात वा नियम नसतात. स्रुजनांतून मी दूर सारावा असं कितीही म्हटलं तरी, मी दूर किती सारता येतो, याला मर्यादा आहेत. कारण जीवनानुभवाचे आकलन होते तेच मुळी 'मी' च्या माध्यमातून होत असते. त्यामुळे हा 'मी' कधीही टाळता येत नाही.

# खरं म्हणजे हे सगळं जग म्हणजेच 'मी' चा व्यापार असतो, 'मी' या स्थानकावरच जीवनाची घडी सुरू होते आणि शेवटी 'मी' ह्या स्थानकावरच थांबते. मधली सगळी स्थानकंही या 'मी'ला शोषणारे, तोषविणारे वा अन्य अशी असतात. तेव्हा 'मी' दूर होत नाही, होऊ शकत नाही, तसेच केवळ 'मी' चा अनुभव हा काही लेखनयोग्य विषय होऊ शकत नाही.

# ललित साहित्याच्या दृष्टीने सत्य आणि कल्पित असं काही वेगळं नसतच मुळी.

# ललित सृजनाच्या अंगणात कधी कधी सत्य कल्पनेहूनही खरं असतं आणि कल्पना सत्याचं रूप घेऊन 'मी आहे हो' अशी दवंडी पिटत असते.

# सृजनाच्या प्रदेशात काळालाही फारसा अर्थ नसतो कारण काल हा त्या वेळचा आजच असतो आणि आज हा उद्याचा काल असतो! तेव्हा काळ आणि सत्य या दोन गोष्टींचा तारतम्याने उपयोग करूनच सकस सृजनाची निर्मिती होत असते.

# ह्या सृजनाला ओढ असते ती माणूस नावाच्या प्राण्याची, त्याच्या मर्यादांची, त्याच्या अमर्याद अभिलाषेची, त्याच्या अदम वासनेची आणि मूलतः त्याच्या वेदनेची....

# मी सदाचारी असावं, कारण सदाचार देवाला प्रिय आहे. मी दुराचारी नसावं, कारण दुराचार त्याला अप्रिय आहे. जर सूक्ष्म दृष्टीने पाहिलं तर असे लक्षात येईल की, देव ही संकल्पना निर्माण करून आम्ही सृजनशीलतेचा अविस्मरणीय चमत्कार घडवून आणला आहे. आम्हाला जे-जे उदात्त उन्नत महन्मधुर वाटते तोच देव आहे. ही आमची धारणा आहे आणि तो आमचा संकलित आदर्श आमच्यावर नजर ठेवून आहे. आमच्यावरचा वचक आहे आणि तोच आमचा दिलासा आहे.
होय मी आस्तिक आहे.

# मार्क्सने 'अर्थ' प्रमाण मानून जीवनाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, तर फ्रॉइड यांनी 'कामा'ची मुलभुत म्हणून स्थापना केली. पण आपल्या पूर्वजांनी चार पुरुषार्थ, त्यांचा विचार केला 'अर्था'चे महात्म्यही आम्हाला ज्ञात होते आणि 'कामा'ची विलक्षण व्यापक गुंतागुंत देखील आम्ही नजरेआड केली नव्हती. आपल्या पूर्वजांनी पाहिला चतुरंगी पुरुषार्थ. पुन्हा ह्या देशी, तो रूजो, समृद्ध होवो हीच आपली आशा....

मुद्दामून गोळा करावी, अशी जणु अनंत मौलिक विचारमौक्तिके या पुस्तकांत मला सापडली. त्यातील फक्त निवडकच इथे मी नोंदविण्याचे कष्ट घेतले आहेत.

माझे स्नेही डॉक्टर गिरीश दाबके यांचे लेखन 'वपुं'च्या मानवी भावभावना व जीवनशैली बद्दलच्या चिंतनात्मक भाष्यासारखे आहे, असे जे मी म्हणतो, ते ह्याच करता.

अशा प्रकारचे लक्षात ठेवावेत, जपून ठेवावेत असे शब्दब्रम्ह मला तरी अजून कुठल्याच पुस्तकात सापडलेले नाही आणि म्हणूनच प्रत्येकाने आवर्जून वाचावे, असे "अंतस्थ कोणी" हे पुस्तक आहे, असे मला वाटते. त्याकरता माझा स्नेही डॉक्टर गिरीश दाबके ह्यांचे मनापासून अभिनंदन आणि पुढील लेखन वाटचालीसाठी शुभेच्छा.

सुधाकर नातू

रविवार, ९ फेब्रुवारी, २०२०

"नियतीचा संकेत-४": "राशीनिहाय संक्षिप्त राशीभविष्य": "नशिबाची गटवारी":

"नियतीचा संकेत-४":
"राशीनिहाय संक्षिप्त राशीभविष्य":
"नशिबाची गटवारी":

आगामी १४ महिन्यांच्या कालखंडात वरील महत्वाच्या ग्रहांच्या विविध राशीप्रवेशानुसार ह्या नियमांचे आधारे ते किती दिवस शुभ आहेत, ते आजमावून माहवार शुभदिवस अर्थात अनुकूल गुण देऊन, त्याप्रमाणे राशीनिहाय अनुकूल गुण कोष्टक पुढे दिलेले आहे. तशीच एकूण संपूर्ण कालखंडातील गुणांच्या बेरजेवरून पुढील पाच सुलभ गटात त्यांची विभागणी केली आहे:

१.उत्तम पहिला गट: व्रुश्चिक, मीन व सिंह राशी.
२.उजवा दुसरा गट: कुंभ, मेष राशी.
३.मध्यम तिसरा गट: व्रुषभ व मकर मिथून राशी.
४.डावा चौथा गट: कन्या तूळ राशी
५.त्रासदायक पाचवा गट: कर्क व धनु राशी

"राशीनिहाय संक्षिप्त राशीभविष्य":

मागील व यंदाच्या एकूण अनुकूल गुणांचा विचार करता, राशीनिहाय नशिबाचा चढ उतार हा असा असेल:

१मेष रास: मागील वर्षीच्या ११व्या क्रमांकावरून प्रगती करत ५ वा क्रमांक मिळवून उजव्या गटात प्रवेश केला आहे.

२.व्रुषभ राशीने थोडीशी घसरत ५व्या स्थानावरून ६ व्या क्रमांक मिळवून समतोल साधेल.

३.मिथून राशीच्या नशिबी मागील ७ व्या स्थानावरुन थोडे कमी होत ८ व्या क्रमांक आहे.

४. कर्क राशीचे नशीब बिघडून मागच्या दुसर्या स्थानावरून चक्क तळाच्या गटात ११ व्या क्रमांकावर राहील.

५ सिंह मंडळी नशीबवान असून मागच्या ९ क्रमांकावरून ते ३ क्रमांक अशी भाग्यवान उडी घेतील.

६ कन्या रास दहाव्या स्थानावरून किंचीत पुढे सरकत आता ९ स्थानी जाईल.

७ तुळा राशीने मागच्या वर्षी विक्रमी गुण मिळवून पहिला क्रमांक पटकावला होता. पण आता फेरे उलटे होउन ते १० व्या क्रमांकावर ढकलले जातील.

८ व्रुश्चिक रास अक्षरश: कमाल करून मागच्या बाराव्या स्थानावरुन चक्क नशिब फळफळवत १ ल्या सर्वोत्तम स्थानी विराजमान होई.

९ धनु राशीच्या गुणांमध्ये खूप घसरण झाल्यामुळे आता ५व्या क्रमांकावरुन कटकटी वाढविणार्या तळाच्या १२ व्या स्थानी फेकली जाईल.

१० मकर राशीचे नशीब ठीक नसेल कारण मागच्या सुखदायी ४ थे स्थान सोडावे लागून ७ क्रमांक मिळवेल.

११ कुंभ राशीच्या नशीबात थोडी घसरण आहे, तिसर्या स्थानावरुन चौथ्या क्रमांक आहे.

१२  मीन रास खरोखर नशीबवान आहे मागच्या सहाव्या स्थानावरुन पहिल्या गटात दुसरा क्रमांक मिळवेल.

वाचकांना अधिक सोयीचे व उपयुक्त असेल, ह्याद्रुष्टिने, मी हे वर्ष व मागील वर्ष ह्यांची तुलना राशीनिहाय एकूण गुण व क्रमांकानुसार मांडणारे कोष्टक सोबत देत आहे. त्याप्रमाणे प्रयत्न व अपेक्षांची यथोचित सांगड घालून जीवन अधिक समजूतीने जगत समाधान मिळवा.

"संक्षिप्त वार्षिक अनुकूल गुणकोष्टक"-२०१९/'२० :
TLT y=गुण ह्या वर्षी,
TLLy= गुण मागील वर्षी.
Difference = वार्षिक फरक.
Ty Rank= बारा राशींत ह्या वर्षीचा क्रमांक
Ly Rank= बारा राशींत मागील वर्षीचा क्रमांक

विरंगुळा व जिज्ञासा ह्यासाठी.....
आपल्या राशीचे संपूर्ण वार्षिक राशीभविष्य
व राहू केतूच्या राश्यंतराचे परिणाम जाणण्यासाठी.......
You tube वर जा. सर्चमध्ये लिहा:
माझ्या चँनेलचे नांव:

moonsun grandsun

आणि विडीओज् पहा:
चँनेल subscribe करा......

शंभराहून अधिक वाचनीय लेखांसाठी माझ्या ब्लॉगची
ही लिंक उघडा......

wapp grp वर शेअरही करा......

http//moonsungrandson.blogspot.com

धन्यवाद
सुधाकर नातू
Mb 9820632655


""नियतीचा संकेत-३": " स्थान महत्व-ग्रह पत्रिकेतली फळे:


 "नियतीचा संकेत-३":
"स्थान महत्व-ग्रह पत्रिकेतली फळे:

पत्रिकेत एकूण बारा स्थाने असतात: चार चौकोन व आठ त्रिकोण. ह्या विविध स्थानांची उपयुक्त विभागणी अशा प्रकारे गटांमध्ये केली जाते. त्या स्थानांतील ग्रह व स्थानेशांची पत्रिकेतील स्थिती ह्यावरुन कोणत्या फळांचा विचार केला जातो, ते येथे दर्शविले आहे. ढोबळ मानाने ह्या मार्गदर्शनाखाली आपआपल्या पत्रिकेचा अभ्यास करुन निष्कर्ष काढणे सुलभ होऊ शकेल:

१ ४ ७ १० ही केंद्र स्थाने कर्तृत्व यश व प्रसिद्धि

५ व ९ ही सर्वात महत्वाची त्रिकोण स्थाने-सहाय्य दैव नशीब

६ ८ व १२ ही त्रिक स्थाने दुःस्थाने मानली जातात नाश कटकटी चिंता

१ ३ ९ ही बुद्धी कला संस्कार

३ ६ १० ११ ही उपचय स्थाने, उत्कर्ष भरभराट

१ २ ४ ५ ७ ८ ९ १२ ही अनुपचय स्थाने अशुभ ग्रह र्हास पीडा

२ ७ ही मारक स्थाने देहपीडा पैसा भोग मारकेशाची दशा अशुभ फळे

२ ५ ८ ११ ही पणफर स्थाने परावलंबित्व आयुष्यातली गती

३ ६ ९ १२ अपोक्लीम स्थाने मित्रपरिवार सामाजिक बांधिलकी

३ व ८ ही स्थाने आयुष्य दर्शक पीडा शारिरीक कष्ट कमनशिब

४ व ८ जीवनातील संकटे

चार त्रिकोण: धर्म त्रिकोण:१ ५ ९
अर्थ त्रिकोण: २ ६ १०
काम त्रिकोण: ३ ७ ११
मोक्ष त्रिकोण: ४ ८ १२

केंद्र त्रिकोणाचा अधिपती एकच ग्रह असेल तर त्या पत्रिकेत शुभफलदायी राजयोग होतो. सहा जन्मलग्नाच्या पत्रिका राजयोगाच्या तर उरलेल्या सहा लग्नाच्या पत्रिकेत राजयोग नसतो.

१. राजयोगकारक लग्न:
कर्क व सिंह: मंगळाचा राजयोग.

२. राजयोगकारक लग्न:
मकर व कुंभ: शुक्राचा राजयोग

३. राजयोगकारक लग्न:
व्रुषभ व तुळा: शनीचा राजयोग

विरंगुळा व जिज्ञासा ह्यासाठी.....
आपल्या राशीचे संपूर्ण वार्षिक राशीभविष्य
व राहू केतूच्या राश्यंतराचे परिणाम जाणण्यासाठी.......

You tube वर जा. सर्चमध्ये लिहा:
माझ्या चँनेलचे नांव:

moonsun grandsun

आणि विडीओज् पहा:
चँनेल subscribe करा......

शंभराहून अधिक वाचनीय लेखांसाठी माझ्या ब्लॉगची
ही लिंक उघडा.....
wapp grp वर शेअरही करा......

http//moonsungrandson.blogspot.com

धन्यवाद
सुधाकर नातू

"ह्रदयसंवाद-८": " मनांतले जनांत":


 "ह्रदयसंवाद-८":
" मनांतले जनांत":

सोशल मिडिया हे लेखनाला प्रेरणा देणारा अत्यंत उपयुक्त माध्यम असल्याचा मी आनंदाने अनुभव घेत आहे. दररोज मनातले जनात पोहचविण्यासाठी ह्यासारखे दुसरे साधन नाही. माझ्या संग्रहातून निवडक वाचनीय विचार मौक्तिके येथे मांडत आहे:

# "निखळ वास्तवाची जाणीव करून देणारं, अचूक उत्तर मिळविण्यासाठी,
अचूक प्रश्न विचारता येण्याची कला आवश्यक असते."

# "चवीने जीवन कसे जगत रहावे व मन अधिकाधिक समाधानाने सम्रुद्ध कसे करावे",
हे चांगल्या पुस्तकाच्या वाचनामुळे उमजते!

# "समाधानाची सप्तपदी": लिंक उघडा:

https://youtu.be/g_OqskZbfxg

व मिळवा ताणतणावापासून मुक्ती:
१. डोके वापरा
२. दृष्टी बदला.
३. जीभेला आवरा
४. हाताने नेहमी देत रहा.
५. ह्रदयापासून प्रेम करा.
६. मन काबूत ठेवा.
७. पायाने चालत रहा.

"मागले पान, ज्ञानाची खाण!":
# दिनदर्शिकेची पुढची पाने बघायची वेळ ही, केव्हां सुट्टी वा सण आहे, ते जाणून घेण्यापुरतीच मर्यादित असते. सहाजिकच मागील पानांचे दर्शन, केवळ महिना संपल्यावर पान उलटताना होते एवढेच.

पण नुकतेच वर्ष संपल्यावर, जुनी दिनदर्शिका गुंडाळी करून बाजूला ठेवताना, तिच्या मागील पानांकडे लक्ष गेले अन् कळत न कळत ठिय्या मांडून, एका बैठकीत बाराही पानांवरील विविध विषयांवरील, उपयुक्त माहितीपूर्ण असे सर्व लेख वाचून काढले.

आपण इतके दिवस जाणीवा विस्तारणार्या कोणत्या मौल्यवान खजिन्याला मुकलो होतो, ते मला उमजले. आपणही दिनदर्शिकांची मागील पाने अशीच जरूर नजरेखालून घालावी.

# "यक्षप्रश्न":
" काळाच्या घड्याळाचे कांटे उलटे फिरवून
जे घडून गेलंय,
ते कधी बदलता येते कां?"

# °असा 'हा' रोजचा "जमा'खर्च"!:
दररोजचा "जमा'खर्च", रूपयांत मांडायचे दिवस पहाता पहाता सरून जातात अन् निव्रुत्तीनंतर दररोजचा "जमा'खर्च" हा, रोज काय 'पाहिले', काय 'वाचले', काय 'ऐकले' वा 'बोलले', ह्यासोबतच (काही भाग्यवंतांसाठी) काय लिहीले असा बनत, त्या 'उलाढाली'मधून आपण काय 'मिळविले, काय 'घालवले' तसेच आपण इतरांना काय 'दिले' असा बनून जातो. हे असे, ज्यांना लौकर भान येते, ते अन् तेच खरोखर धन्य होत!

# "नियतीचे खेळ!":
गरज ही शोधाची जननी, तशी वेदना ही नवनिर्मितीची, प्रतिक्षा ही फळाची, मीमांसा ही टीकेची, अन्याय वा उपेक्षा प्रतिशोधाची, बंधने ही मुक्ततेची, स्फूर्ती ही प्रतिभेची माता होय. देणे-घेणे, सोसणे-पुसणे, करणे-भरणे, रूसणे-हसणे, उमलणे-फुलणे-कोमेजणे असे नियतीचे खेळ हे सारे चालती अव्याहत!

# "आत्मसमाधानाचे रहस्य":

जे आपल्याला आवडते, जे आपण चांगले करू शकतो, ते करायला मिळणे हे भाग्यच. अशा भाग्यामुळे, जे आत्मसमाधान लाभते ते अद्भुतरम्यच!

"पसंद अपनी अपनी" प्रमाणे ज्याने त्याने वरीलप्रमाणे आत्मपरीक्षण करून
आपआपला मार्ग निवडावा, म्हणजे श्रेयस व प्रेयस एका समयीच लाभते.

# "शब्दांचे अर्थ, एक चिन्ह बदलू शकते.
शब्दांचे अर्थ फसवे असतात,
गर्भितार्थ पूर्ण वेगळाच असू शकतो."

# "शहाणपण':
"जे नापसंत, ते करावे बेदखल."

# "टीका करण्यापूर्वी, दुसर्याच्या नजरेतून बघावे, तसेच संभाव्य परिणाम प्रथम आजमाववावे."

# "संभवामी युगे युगे"!:
"आगळे वेगळे, हे सगळे"!!:

पुराणातले दशावतार आपल्याला माहीत आहेत आणि आपण ह्या संकल्पनेची तुलना, डार्विनच्या 'सजीवांच्या उत्क्रांती सिद्धांता'सारख्या अत्यंत महत्त्वाच्या व जगमान्य गोष्टीशी करू शकतो.

"संभवामि युगे युगे" हे सूत्र आपल्याला गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात. ह्याचाच अर्थ एका जन्मानंतर दुसरा जन्म शक्य आहे हे ध्वनित होते. पुनर्जन्मावर विश्वास ठेवावा असे हे सारे आपले संचित आहे.

जर पुनर्जन्म असेल तर एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायला हवी, ती म्हणजे जी व्यक्ती आपल्या आई-वडिलांच्या अगोदरच मृत्यू पावते, तिला पुनर्जन्म मिळण्यासाठी जेवढा वेळ लागेल, त्या तुलनेत ज्या व्यक्तीच्या आई-वडिलांचा मृत्यू तिच्या हयातीतच होतो, त्या व्यक्तीला
पुनर्जन्मासाठी लागणाऱ्या वेळेपेक्षा खूप जास्त असणार हे उघड आहे.

आपण येथे "डी एन ए" ह्या मूलभूत सूत्राची कामगिरी लक्षात ठेवली पाहिजे. कारण कुणीही त्याच आई-वडिलांच्या पदरी जन्माला येऊ शकणार हे सत्य यामागे आहे. कदाचित म्हणूनच आपल्या परंपरेमध्ये स्त्रिया जन्मोजन्मी हाच पती लाभो असं तर म्हणत नसतील?

पुनर्जन्माची अशी ही एक जगावेगळी कहाणी!

# "सारीपाट":
माणसाच्या जाणीवांचे विश्व विस्तारत सम्रुद्ध होत असते ते प्रामुख्याने तीन गोष्टींमुळे: एक वाचलेली पुस्तके, दोन आयुष्यात येणारी माणसे आणि तिसरी गोष्ट अवघडलेपणाचे प्रसंग! शेवटी जीवन म्हणजे आंबट गोड अनुभवांचा सारीपाटच तर असते!!

# मागे गेलेले
हे वर्ष: २०१९:
२+१+९=१२=१+२=३
कुणाचे तीन तेरा झाले?

# "भूतकाळातील गौरवात रमण्यापेक्षा, वर्तमानात पिछेहाट कां होते आहे आणि पुनश्च आपले भूषणावह स्थान कसे होईल, ते पहाणे अत्यावश्यक.

# "बिंब-प्रतिबिंब"-विचारमंथन":
एका नाण्याला जशा दोन बाजू असतात, त्याचप्रमाणे कोणत्याही विषयाच्याही उलट वा सुलट बाजू असणे स्वाभाविकच असते. ज्या चष्म्यातून आपण जगाकडे, घटनांकडे पहातो, त्याच्या कांचांच्या रंगासारखे जग वा घटना दिसत असते. अमूकच बाजू बरोबर वा चूक असे म्हणता येणे बहुतेकदा कठीण असते.

विव़िध जिव्हाळ्याच्या विषयांवर ह्याप्रमाणे सर्व दिशांनी अभ्यासपूर्ण विचार मांडणे कौशल्याचे काम असते.

धन्यवाद
सुधाकर नातू

"ह्रदयसंवाद-७": "ह्रदयी धरा, हा बोध खरा":


 "ह्रदयसंवाद-७":
"ह्रदयी धरा, हा बोध खरा":

सोशल मिडिया हे लेखनाला प्रेरणा देणारा अत्यंत उपयुक्त माध्यम असल्याचा मी आनंदाने अनुभव घेत आहे. दररोज मनातले जनात पोहचविण्यासाठी ह्यासारखे दुसरे साधन नाही. माझ्या संग्रहातून निवडक वाचनीय विचार मौक्तिके येथे मांडत आहे:


# "आजचे मुद्दे व गुद्दे!":


स्वातंत्र्यपूर्व काळात, समाज व देशहित सापेक्ष राजकारण, हे प्रामुख्याने त्याग व सेवाभावी व्रुत्ती असे होते. तर स्वातंत्र्यानंतर ते उत्तरोत्तर अधिकाधिक व्यक्तिहित, व्यक्तिपूजा सापेक्ष असे स्वार्थाने सर्वांगीण भ्रष्टाचाराने माखलेले आपण पहात आहोत. जणु सारेच इथून तिथून सारखेच भ्रष्टाचाराने बरबटलेले!


अशा वेळी स्वातंत्र्यपूर्व काळात सामाजिक सुधारणा विरुद्ध राजकीय सुधारणा ह्या द्वंदात राजकीय सुधारणावाद्यांचा झालेला उदय व विजय आता कमालीचा महाग पडतो आहे. माणूस म्हणून, समाज म्हणून नितीमत्तेला प्राधान्य देत सुधारणा प्रथम पूर्ण होणे गरजेचे होते, असेच सध्याचा दिशाहीन, अर्थहीन भरकटत चाललेला भयावह भवताल पाहून वाटते.


एका न परतीच्या अंध:कारमय वाटेवर आपण आता फरफटत तर चाललो नाहीत?..............


# "गेले ते दिन, गेले!":

ही "ईडीयट बाँक्स नव्हती, तेव्हां किती शांती, सामंजस्य अन् जिव्हाळा होता!

# "एक कटू सत्य":

"गुन्हेगारी विश्वात जशी प्रवेश केल्यावर बाहेरची वाट नाही,
तसंच काहींसाठी,
सोशल मिडीयांत
एकदा प्रवेश केल्यानंतर परतीची वाट नसते!"

# "जे 'सोशल मिडीया' वर दिवसेंदिवस

गैरहजर राहू शकतात,
ते
आजच्या युगाचे जणु "मर्यादा पुरुषोत्तम"!
"वास्तव":

# "पोट संभाळता आलं,

तर अर्धी लढाई जिंकली, अन् मनं संभाळता आली, तर जीवनात सार्थकता आलीच, आली!"

# "यश व प्रसिद्धी कायम टिकतीलच असे नाही. अंगभूत दोष पहाता, पहाता रंग दाखवतात, ध्यानात येतातच, येतात.

सर्वगुणसंपन्न कोणीही नसतो."

# 'आजचा दिवस,

कालच्यापेक्षा चांगला होता,
असे उद्या वाटायला हवें.'

# "हवे, कर्तव्याचे उत्तरदायित्व":


"सद्दस्थिती चिंताजनक अशीच झाली आहे. एकीकडे नित्य वाढत्या अपेक्षा, दुसरीकडे संधींचा दुष्काळ आणि त्यांत भर म्हणून मतलबी स्वार्थी राजकारण, हेही पुरेसे नाही म्हणून की काय, अनियंत्रित नोकरशाही, ढासळती प्रशासकीय गुणवत्ता व कारभार अशा चक्रव्यूहात शास्वत, सर्वसमावेशक विकास पुरता अडकला आहे.


जो पर्यंत सर्वच क्षेत्रात, समस्त स्थरांवर विहीत कर्तव्ये आणि त्यासाठीचे प्रत्येकाचे उत्तरदायित्व समाधानकारकरित्या पूर्ण करण्याची ईर्षा निर्माण होत नाही, तोपर्यंत उत्तरोत्तर भवितव्य अंध:कारमय होत जाणार हे निश्चित.


# गुणवंत व निष्ठावंत कार्यक्षम प्रामाणिक माणसांची कमतरता

हे पिछेहाटीचे
आणि
अनागोंदी कारभाराचे महत्वाचे कारण असते.

# "मुखवटे आणि चेहेरे"!:
विचार, उच्चार आणि आचार ह्यामध्ये, एकवाक्यता ठेवणे, सगळ्यांना जमतेच असं नाही. ते जमण्यासाठी प्रामाणिकपणा, निष्ठा आणि निस्पृहता असे मूल्याधिष्ठित गुण अंगी असावे लागतात.

# चंगळवाद आणि "अर्थ हाच सर्वार्थ" मानणाऱ्या आजच्या युगात, सहाजिकच हे सारे गुण दुर्मिळ होत चालले आहेत.


सहाजिकच आपल्याला सभोवताली दिसतात, वावरतात, ते मुखवटे आणि चेहेरे, चित्रविचित्र अन् विश्वास न ठेवण्या जोगे!


"कालाय तस्मै नमः" दुसरं काय?!


धन्यवाद

सुधाकर नातू

गुरुवार, ६ फेब्रुवारी, २०२०

"रंगांची दुनिया-७": "शारदोत्सव-४": "तारांगण" दिवाळी अंक'१९  रसास्वाद: "फिल्मी ब्लफस् साठी पर्वणी!"


"रंगांची दुनिया-७":
"शारदोत्सव-४":
"तारांगण" दिवाळी अंक'१९
रसास्वाद: "फिल्मी ब्लफस् साठी पर्वणी!":

जे खरोखर चित्रपट किंवा चित्रपट संगीत वा ह्या विश्वात तत्सम बाजू ज्या असतात त्यामध्ये खूप रस असणारे म्हणजेच फिल्मी ब्लफ असणाऱ्यांसाठी, हा तारांगण दिवाळी अंक म्हणजे खरोखर एक माहितीचा खजिना आहे. विविध विषयांवर आणि व्यक्तींवर-चित्रपट विश्वातील, इथे समग्र अशी भरपूर माहिती आपल्याला मिळते. तशाच त्यांच्या जडणघडणीच्या देखील आठवणी अतिशय रंजक अशा आहेत.

सगळ्या प्रकारची जर का माहिती आपण सखोल दृष्टीने निरीक्षण करून संशोधित केली, तर कदाचित मी अतिशयोक्तीने म्हणत असेल, पण या अंकामध्ये जवळजवळ पाचशेहून अधिक श्रवणीय गीते व पन्नासहून अधिक चित्रपटांची यादी तुम्हाला शोधून काढता येईल. अशा पद्धतीचा एक प्रकारचा प्रयोग, मी रवींद्र पिंगे यांचे साहित्य संचार हे पुस्तक वाचल्यावर केला होता व त्यात मला तीसाहून अधिक लेखकांची पुस्तके नोंदता आली होती...

आता ह्या अंकाचा रसास्वाद घेताना लेखक आणि त्यांचे लेख यांच्या वैशिष्ट्यांचा थोडक्यात परामर्श घेऊ:

# आशिष निंदगुरकर:
विक्रमी चित्रपट 'शोले' मधील "कितने आदमी थे" हा चिरस्मरणीय डायलॉग फेम विजू काका अर्थात् विजू खोटे ह्यांचे ह्रद्य व्यक्तीविशेष व कलाकीर्दीची उजळणी ह्या लेखामुळे होते.

# डॉ. अपर्णा मयेकर:
लेखामध्ये आपल्या सहजीवनातील जोडीदाराचे अर्थात जगप्रसिद्ध सतारवादक अरविंद मयेकर ह्यांचे ह्रद्य व्यक्तीविशेष जिव्हाळ्याच्या उमाळ्याने मांडलेले आहेत.
त्यांच्या लेखाबद्दल माझा प्रतिसाद मी व्हाट्सअप वर पाठवल्यानंतर त्यांचा जो संदेश आला तोच येथे पुन्हा देण्याचा मोह आवरत नाही. कारण त्यावरून डॉक्टर मयेकर यांच्या कर्तृत्वाची कल्पना वाचकांना येऊ शकेल:

"Mi pan atta 72wya varshi belly dancing shikat ahe. Shows karate upcoming singers sathi musical workshops ghete. Spiritual lectures dete... HYALA JEEVAN AISE NAAV.. Ani Doctor ahe..."

# अशोक मानकर:
चित्रपटातील climax विषयी सोदाहरण केलेला चिकित्सक अभ्यास लेखात आढळतो. त्यामुळे आपलीही स्म्रुतीची पाने आपोआप उलगडत जातात. असाच अनुभव अंकातील अनेक लेखांमुळे येतो.

# धनंजय कुलकर्णी:
johny mera naam 50yrs
चित्रपट सृष्टीतील अभिमानमूर्ती ठरलेल्या अशा गीत, संगीत, अभिनय आदी क्षेत्रातील लोकप्रिय दिग्गजांच्या असामान्य योगदानाचे संग्राह्य चित्रण या लेखात केलेले आहे. त्यामध्ये विजय आनंद ह्यांच्या असामान्य कलागुणांना पूर्ण वाव मिळालेला "स्टाईलीश जाँनी" देव आनंद व हेमा मालिनी आदिंच्या गाजलेल्या ह्या लोकप्रिय चित्रपटाची ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल कौतुक कहाणी जागवत खूप रंजक माहिती लेखाद्वारे दिली आहे.

# क्षेमकल्याणी सुवर्णा:
"मोरूची मावशी" मधले "टांग टिंग टिंगा" हे विलक्षण गाजलेले गीत असो, वा "आभाळमाया" मालिकेचे शीर्षकगीत असो, वा "मिले सुर मेरा तुम्हारा" हे देशभक्तीचे असे समूह गीत असो, आपल्या चाळीस वर्षांच्या कारकिर्दीत संगीताच्या विश्वात तसेच अपघाताने का होईना गीतकार म्हणून काही न विसरण्याजोगी गीते देणाऱ्या पंच्याहत्तरी पूर्ण केलेल्या, श्री. अशोक पत्कींची मुलाखत, आम्ही प्रत्यक्ष ह्याची देही ह्याची डोळा हा दादर-माटुंगा कल्चरल सेंटर येथे एका कार्यक्रमात अनुभवली होती. सहजता, शालीनता आणि खरोखरची विनयशीलता यांचे अप्रतिम चित्र, आम्हाला अशोक पत्की यांच्या रुपात दिसले होते. "तारांगण" मधील लेखात त्याच आठवणींची उजळणी मुलाखतीद्वारे वाचायला मिळाली व हा एक पुनःप्रत्ययाचा आनंद होता.

# शशिकांत कोनकर:
"संगीताचा महासागर" ह्या लेखात पंडित वसंतराव देशपांडे यांच्या जीवनातील अनेक अपरिचित अशा घटनांचा उहापोह, त्यात केलेला आढळला. तसेच त्यांचे व्यक्तिविशेष ह्रद्य स्वरूपात मांडलेले आहेत.

# विवेक पुणतांबेकर
16 mm to 35mm to 70mm
film change
"स्म्रुतीची चाळता पाने" अर्थात चित्रपटविषयक 16mm ते 70 mm film हा तांत्रिक संक्रमणाचा अभ्यासपूर्ण उहापोह लेखाद्वारे केला आहे. एकविसाव्या शतकात आता प्रचंड सुधारणा होऊन, डिजिटल फिल्म प्रक्षेपणाची सोय झाल्यामुळे, इकडून तिकडे फिल्मची रिळे न्यायची कटकट तर दूर झालीच आहे, शिवाय एकाच वेळी शेकडो नव्हे हजारो चित्रपटग्रुहात चित्रपट प्रदर्शित करता येऊ लागला आहे आणि त्यामुळे रू.100 कोटींचा पल्ला गाठणारे अनेक चित्रपट गेल्या काही वर्षात निर्माण झालेले आपल्याला दिसतात. हे जरी झाले तरी, जमिनीवर बसून समोर पांढऱ्या स्क्रीनवर प्रक्षेपित केलेला सोळा एम एम वा 30 एम एम वरच्या चित्रपट पाहण्याची गंमत औरत होती, त्याची आठवण होते.

# प्रदीप देसाई:
"आनंदयात्री" ह्या लेखात, महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व, पुल देशपांडे यांच्या जीवनातील अनेक अपरिचित अशा घटनांचा तपशील दिलेला आहे. तसेच त्यांचे व्यक्तिविशेष ह्रद्य स्वरूपात मांडलेले आहेत.

# शशिकांत चौधरी:
प्रखर तेजाचा आविष्कार असलेल्या "लोकशाहीर अण्णाभाऊ साठे" यांच्या कादंबऱ्यांवर आधारलेल्या सात आठ लोकप्रिय चित्रपटांची ओळख येथे विस्तृत स्वरूपात मांडली आहे. त्यामानाने अण्णभाऊ साठे, हा जातिवंत प्रतिभावंत तसा दुर्लक्षितच राहिला हे केवढे दुर्दैव.

# मधु पोतदार:
"पंचपक्वान्नी लेखक" अण्णासाहेब देऊळगावकर यांच्या लोकप्रिय कलाकृतींची व व्यक्तिविशेषांची लेखाद्वारे ओळख करून दिली आहे.

# जयंत राळेरासकर:
सोप्या आणि अर्थपूर्ण गीतांचा शायर राजेंद्रक्रुष्ण ह्यांच्या रचनांचा रसिकतेने अगदी विस्तृत आढावा लेखाद्वारे केला आहे.

# जी. के. देसाई:
'oskar outdated'
चित्रफटांच्या मनोहारी जगामध्ये ऑस्कर पुरस्कार मिळणे हा अद्वितीय व सर्वोच्च मान समजला जातो. मराठी बोलपटांची शान तेथे "श्वास" या चित्रपटाने गाजवल्यानंतर, काहीच विशेष घडलेले नाही. ह्या पार्श्वभूमीवर आज ऑस्कर पुरस्कार कालबाह्य झाला आहे, असा विचार लेखात मांडला आहे.

ह्या व्यतिरिक्त सर्वश्री युधामन्यू गद्रे,* उदय सप्रे*
आदिंचेही यथोचित योगदान ह्या दिवाळी विशेषांकात आहे.

सातत्याने फक्त मासिक वाचनीय तसेच 'प्रेक्षणीय'
मासिक "तारांगण" अंक न काढता, नेहमी त्याला पूरक असा अभ्यासपूर्ण व संग्राह्य "तारांगण" दिवाळी अंक काढणाऱ्या श्री मंदार जोशी यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच.
त्यांचे अभिनंदन व शुभेच्छा.

धन्यवाद
सुधाकर नातू

शनिवार, १ फेब्रुवारी, २०२०

"रंगांची दुनिया-६": "चित्रदर्शन-१": "द गुड न्यूज": "रोमहर्षक धुमाकूळ":


 "रंगांची दुनिया-६":
"चित्रदर्शन-१":
"द गुड न्यूज":
"रोमहर्षक धुमाकूळ":

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात अनेक समाज सेवकांनी उंबरठ्याच्या आत अडकलेल्या स्त्रीला बाहेर काढून शिक्षण प्रसाराचा जो घाट घातला. त्यानंतर पुढील शतकामध्ये सामाजिक शैक्षणिक वैचारिक व सांस्कृतिक उलथापालथ झाली. त्यामध्ये स्त्री, पुरुषाच्या बरोबरीने जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात आपली कामगिरी उत्तम रीतीने करू लागली. त्याच बरोबर विसाव्या शतकातील तंत्रज्ञानाच्या झपाट्याच्या गरुडझेपीमुळे व जागतिकीकरणामुळे, एकंदर मानवाच्या जीवनशैलीत आमूलाग्र बदल झाला आणि आता एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी, तर संपूर्ण क्रांती झाल्यासारखे मोकळे पुढारलेले पाश्च्यात्यांचे अनुकरण करणारे वातावरण आपल्याला समाजामध्ये आढळते.

त्यामुळे परंपरागत कल्पना, त्याचप्रमाणे समजुती व स्त्री-पुरुषांमधील संबंधांच्या बाबतीत बघण्याचा दृष्टिकोन देखील आमुलाग्र बदललेला आढळतो. सध्याच्या युगामध्ये पूर्वी कधी स्वप्नातही वाटले नसतील, इतके बदल आपल्याला झालेले आढळतात. त्यामुळे विवाहपूर्वी स्त्रीला दिवस जाणे, ही जी तोबा तोबा मानली जाणारी गोष्ट, आता कशी स्वीकारली जाऊ शकते, त्याचे चित्र "दादा एक गूड न्यूज आहे" ह्या नाटकामध्ये मराठी रंगभूमीवर सध्या गाजत आहे. आपल्या अविवाहित बहिणीला प्रेम प्रकरणातून विवाहापूर्वी दिवस जाऊनही, तिचा भाऊ तिला कसं स्वीकारतो, त्याचे चित्रण या नाटकांमध्ये आहे.

मानवामध्ये पुनर्निर्मितीचा जो अनुभव असतो, तो सर्वात आनंददायी असतो. त्यातून स्त्रीला तर मातृ पद मिळणं ही एक अत्यंत स्वर्गसुखाची, सन्मानाची गोष्ट मानली जाते. ज्या काही अभागी स्त्रिया यापासून मुकतात, त्यांची अजूनही अवहेलना समाजात वावरताना होताना दिसते, त्यांना अपमान अवहेलना सहन कराव्या लागतात.

तंत्रज्ञानाची कमाल अशी की, आयव्हीएफ सारख्या आधुनिक पद्धतीने मूल न होऊ शकणार्‍या, दांपत्यांना देखील आता संततीसुख मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज काल दोन तीन दिवसाआड आयव्हीएफ वरील मोठमोठ्या जाहिरातीही वर्तमानपत्रांत आपण बघतो. कदाचित विवाह मर्यादा वाढल्यामुळे अथवा गतिमान जीवनामुळे तंत्रज्ञानाचा झपाटा त्यामुळे मानवाची पुनरुत्पादन शक्ती थोडी थोडी कमी होऊ लागलेली असू शकते. पूर्वी जी मंडळी गुपचूप राहायची आणि आपले दुःख सहन करायची, ती आता ह्या नवीन तंत्रज्ञानाचा आधार घेऊन आपल्याला मूल होण्याचे भाग्य अनुभवत आहेत.

तर याच तंत्रज्ञानावर आधारित एक धमाल हिंदी चित्रपट "गुड न्यूज" आम्हाला नुकताच पाहायला मिळाला. मराठी रंगभूमीवर जशी विषयप्रधान नाटके येत असतात, ते लोण अशा आशयघन हिंदी चित्रपटात येत आहे, ही चांगली बाब आहे. या चित्रपटातमध्ये सध्याचे असे एक आधुनिक दाम्पत्य, आपल्याला मूल न झाल्यामुळे व्यथित आहे आणि त्यातील स्त्री तर जणू झपाटल्यासारखी आपल्या नवऱ्या मागे, मूल होण्यासाठी लागली आहे. कुणीतरी सुचवल्याप्रमाणे ही दोघे आयव्हीएफ तंत्राचा आधार घेऊन संततीची स्वप्ने बघत असतात आणि त्याच वेळी चंदीगडचं अगदी याच नावाचं एक निःसंतान जोडपं, त्याच हॉस्पिटलमध्ये मूल व्हावं आयव्हीएफचाच आधार घेत असते.

त्या दोघांनाही संतती होण्यासंबंधी यश मिळाल्याची वार्ता देताना जे काही सांगितले जाते, ते खरोखरच दोघांसाठी धक्कादायक असते: गर्भधारणेसाठी, दोन्ही दांपत्यांमधील पुरुषांच्या दिलेल्या वीर्यांची अदलाबदल झाल्याचे वृत्त ते असते! त्यामुळे पुढे चित्रपटांमध्ये, आता काय करावे हे न सुचणे, अगदी गर्भपात करुन घ्यावा ह्या टोकापर्यंत येणे, दुसर्या दांपत्याचा संशय, राग राग इ.इ.. जो काही हलकल्लोळ आणि धूम धमाल होते, ती खरोखर पडद्यावरच पाहण्यासारखी आहे. एका महत्वाच्या आगळ्यावेगळ्या आधुनिक विषयावर, अशा तर्‍हेचा तोही निखळ विनोदी चित्रपट, निर्माण करणे, हे धाडसाचे जसे होते, तसेच ते अतिशय कौशल्याचे कठीण काम होते. यामध्ये एकापाठोपाठ एक, अशा नाट्यमय व भावनाप्रधान प्रसंगांमुळे खरोखर चित्रपट कधी संपतो, ते न कळता, प्रेक्षक वर्ग अक्षरशः अचंबित होऊन बाहेर पडतो.

अक्षयकुमार करीना कपूर, दिलजीत दुसांज आणि कियारा अडवानी या कलाकारांनी आपापल्या वाट्याला आलेल्या भूमिका, खरोखर समरसून केल्यामुळे चित्रपटाची रंगत कमालीची शिगेला पोहोचते. दोन अगदी वेगळ्या सामाजिक वास्तववादी सामाजिक स्थितीच्या "तरुण आहे रात्र अजुनी" व "हरवलेल्या पत्यांचा बंगला" नाटकांनंतर आम्हाला हा तसाच चाकोरीबाहेरचा "गुड न्यूज" हा चित्रपट बघायला मिळणे, ही निश्चितच या नव्या वर्षारंभाची एक उत्साहवर्धक योगायोगाची गोष्ट होती. आता हिंदी चित्रपट त्याच त्या, घिशा पिट्या मनोरंजनाच्या फाँर्मुल्यांमधून बाहेर पडून, अधिक प्रगल्भ होत, वयात आल्याचे हे सुचिन्ह आहे. प्रेक्षकवर्गही झपाट्याने कात टाकत, अशा चित्रपटांचे भरभरून स्वागत करत आहे, हेसुद्धा नवलच!

सुधाकर नातू