"ह्रदयसंवाद-२०":
"दाद, फिर्याद व प्रतिसाद":
"एक अनुभवी सल्ला":
माझा एक होतकरू लेखक मित्र आहे. त्याला आपले पुस्तक काढावे, अशी इच्छा निर्माण झाली. कधीमधी त्याचे अधून मधून मासिकांमध्ये लेख छापून येत असत, त्यामुळे निवृत्त झाल्यावर चार पैसे हातात असल्यामुळे आपण आपलाच लेखसंग्रह काढावा अशी त्याला इच्छा निर्माण झाली. त्यावेळेला त्याने त्याच्या एका प्रतिष्ठित लेखक मित्राला फोन केला. तेव्हा त्याने जो सल्ला त्याला दिला, तो मला त्याच्याकडूनच समजला.
तो उपयुक्त सल्ला मी अजूनही कधी विसरलो नाही आणि पुढे कधीही बहुधा विसरणार नाही. तो सल्ला असा होता:
"तू पुस्तक काढतोय हे खरं आहे, पण एक लक्षात ठेव की, तुझ्या पुस्तकाला जर तुला अपेक्षित संख्येचे ग्राहक वा वाचक मिळाले नाहीत, तर तुला निश्चितच वाईट वाटेल. एवढंच काय पण नैराश्यही येईल, तेव्हा विचार करून निर्णय घे."
त्यावर त्या होतकरू लेखक मित्राने अजून तरी नवीन पुस्तक काढायचा निर्णय घेतलेला नाही, कारण त्याला खात्री नाही की पुढे काय होईल ! प्रतिभावंत लेखक वा कवी जेव्हा एखादी साहित्यनिर्मिती करतो, ती प्रथम जरी स्वांतसुखाय असली तरी, ती अधिकाधिक व्यक्तींपर्यंत पोहोचली पाहिजे, तिला जास्तीत जास्त अनुकूल प्रतिसाद पाहिजेत असे त्याला वाटणे नैसर्गिक असते. तसे प्रोत्साहन जर मिळाले नाही, तर तो नाराज होऊ शकतो, निराश होऊ शकतो.
"माझी पद्धत":
आज ह्या गोष्टीची मला आठवण अशाकरता झाली की, गेले काही दिवस या लाँकडाऊनच्या काळात मी उत्साहाने काहीना काही नवनवीन निर्माण करत आलो आहे. गेल्या तीन-चार वर्षातल्या माझ्या ब्लॉग वर चॅनेल इत्यादी अनुभवामुळे मी दिवाळी अंक लेखसंग्रह व्हिडिओज प्रदर्शित करून माझा संपर्कसंग्रह-contact list अनेक कल्पना प्रत्यक्षात आणून वाढवत आलो आहे. त्यामुळे जे सुचले ते ते दररोज whatsapp वर अनेकांना पाठवायला लागलो आहे. त्यामुळे मला वाटत राहिले की, माझे निर्मितीचे जे काही कौशल्य आहे हे सर्वदूर पसरत आहे. अशा वेळेला मला प्रोत्साहन निश्चितच अधून-मधून लाईकस् च्या रूपात मिळत होते.
"अचानक धक्का":
परंतु मी हे जे काय करतोय त्याला काल अचानक ब्रेक लागला आणि त्या ब्रेकने मला प्रचंड धक्का बसला. "हेची फळ काय मम तपाला?" असं वाटू लागलं. आतापर्यंत जे काय पाठवत होतो ते पाठवू नका असं काही कोणी मला म्हटलं नव्हतं.
आणि आता हा प्रतिसाद आला होता:
"मला आपण अनाहूतासारखे सातत्याने संदेश पाठवत आहात, हे चूक आहे, अवैध आहे. मला ह्यापुढे कोणतेच संदेश पाठवू नका."
उत्साहाच्या बहरात असलेल्या मला, जणु ही एक सणसणीत चपराकच बसल्यासारखे वाटले.
"माझी घालमेल":
त्यामुळे मला कळेना की आता आपण काय करावं. आपण सारंच सोडून द्यावं कां? काय व कशाला करायचा असा इतरांना मार्गदर्शन करत रहाण्याचा अट्टाहास ! तसंच मला वाटत होतं, आपण अनाहूतपणे कुणालाही संदेश वा लिंक्स ध्वनीफिती कितीही उपयुक्त आपल्याला वाटतात म्हणून पाठवणे बरोबर नाही. आपण त्याकरता काहीतरी सुधारणा केली पाहिजे आणि नंतरच आपण आपला हा जो लेखन-प्रपंच आहे व निर्मिती प्रपंच आहे तो सुरू ठेवला पाहिजे.
कारण केवळ, एक दुःखद प्रतिसाद मिळाला म्हणून, आपल्या जवळ जे आहे ते दुसऱ्यांना देण्यासाठी हा छंद आहे, अशा शुद्ध हेतूने असल्यामुळे व आपण काही गैर वा आक्षेपार्ह पाठवत नसल्याने हे काम चालूच ठेवले पाहिजे.
निराश वा नाराज होऊ नये. हे असं मला वाटायचं कारण मला जाणवलं की, नवनवीन कल्पना आणि सुधारणा अनेक समाजसुधारकांनी गेल्या शतकात जेव्हा प्रत्यक्षात आणल्या, तेव्हा त्यांना प्रचंड विरोध झाला होता, पण त्याची त्यांनी तमा बाळगली नव्हती. अशा मनोभूमिकेमुळे माझं नैराश्य पळाले. मी पुन्हा उत्साहाने काम करायचे ठरवले आणि सोशल मीडियावर व्हाट्सअप वर माझा हा संदेश पाठवला:
"एक नम्र विनंती:
हा संदेश आवर्जून वाचावा.":
मी सुधाकर नातू, एक ज्येष्ठ नागरिक.
जे जे माझ्याजवळ अनुभव व ज्ञान भांडार आहे, ते ते इच्छूकांना विनामूल्य देत रहाणे, हे माझे Mission असल्याने मी आतापर्यंत विविध संदेश, माझ्या ब्लॉगवरील लेखांची लिंक वा चँनेलवरील विडीओच्या लिंक अथवा ध्वनीफिती तुम्हाला अनाहूतासारखा पाठवत आलो आहे.
हा एकप्रकारे तुमच्या वैयक्तिक भवतालांतील कदाचित अडथळा आहे, असे जर आपल्याला वाटत असेल तर प्रतिसादांत क्रुपया जरूर नकार कळवावा, ही विनंती.
धन्यवाद."
--------------------------
हा संदेश whatsapp वर पाठवल्यावर आलेले हे प्रोत्साहनपर निवडक प्रतिसाद:
# नातू साहेब नमस्कार,
आपण पाठवित असलेले लेख, ब्लाॅग सर्व वाचनीय असतातच, ते चांगले मार्गदर्शन, पण करतात. बरेचसे लेख मी इतरांना गृपवर देखील पाठवितो. धन्यवाद.
# नाही, अडथळा नक्कीच वाटत नाही.
कधी कधी कार्याधिक्यामुळे वाचायला उशिर होतो.
पण तुम्ही तुमचे लेख इ. पाठवत रहावेत
# पाठवत रहा. धन्यवाद.
मला वैयक्तिक पाठवा..मी ऐकतोय आपल्याला.
मला आपले अनुभव उपयोगी आहेत.
# पाठवा सर मला वाचायला आवडतं.
# तुम्ही पाठवत रहा लेख, ऑडियो.
छान असतात.
# आपल्या सारख्या एक ज्येष्ठ व्यक्ती कडून मिळालेले ज्ञान आमच्या साठी उत्तम प्रतीचे भांडार आहे. आपण आमच्या वडीलासमान आहात. तरी आपली कृपा व आशिर्वाद आमच्यावर कायम असू द्यावे ही मनापासून विनंती.
# सर... अडचण नाही..विधायक कार्य करतात तुम्ही.
# फार सुंदर निरूपण केलं आहे ज्ञानात भर पडली🙏🏻🙏🏻🙏🏻धन्यवाद
# पाठवत जा, माझी काही हरकत नाही. माझ्या ज्ञानांत भरचं पडणार आहे तेव्हा संकोच नसावा.
# 🏵💫🌸तुम्ही पाठवलेली माहिती खूपच छान आहे ,खरं म्हणजे हे महान कार्य करीत आहेत तेही विनामूल्य you are ग्रेट.
# आपण सुंदर कार्य करत आहात....
आपलं असंच अविरतपणे चालू राहो...
# Tumachya anubhavacha aamhala nakkich fayada hoto. Aamhala kontahi adthala kinva adchan nahi. Pls misunderstanding karun ghevu naka 🙏🙏
# आपले अनूभव खूप ऊपयोगी आहेत मनापासून आभारी आहे👏👏👏👏👏Welcome sir
इ. इ......
---------------------------
अखेरीस एक गोष्ट मात्र मला मान्य करायला हवी की, मी आता संयम व वेळेची कुणाकुणाला पाठवावयाचे ह्याची योग्य शिस्त पाळून माझे संदेश पाठवायला हवेत. सरसकट कुणालाही ते न पाठवता, ज्यांनी आपल्याला प्रोत्साहन दिले आहेत, त्यांनाच शक्यतो काही दिवसांच्या अंतराने ते पाठवणे योग्य ठरेल. माझ्यात योग्य ती सुधारणा करून माझा हा निर्मिती प्रपंच समाजहितासाठी माझ्याजवळ जे आहे ते ज्ञान अनुभव वाटण्यासाठी करतच राहणार आहे. मला खात्री आहे की, त्यात तुमची सर्वांची मला भरगोस साथ मिळणार आहे.
धन्यवाद
सुधाकर नातू
ता.क.
असेच वाचनीय लेख वाचण्यासाठी ही लिंक उघडा......संग्रही ठेवा.....
आपल्या whatsapp grp वर शेअरही करा.....
http//moonsungrandson.blogspot.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा