"ह्रदयसंवाद-१७" :
"जपून ठेवावे असे !":
आजच्या ह्या ह्रदयसंवादात मी माझ्या मनांत विविध विषयांवर जे जे विचार येतात ते मांडणार आहे.
"मागे वळून पहाताना";
निवृत्तीनंतर काही तशीच भाकड वर्षे गेल्यानंतर गेल्या तीन-चार वर्षात माझा एक नवीनच उद्योग सुरू झाला आणि तो उद्योग म्हणजे
'आपल्या जवळ जे जे चांगलं विचारधन वा अनुभवभांडार आहे जे इतरांना उपयुक्त ठरू शकेल असं योगदान देत रहावं, हा!
पाहता-पाहता त्यामध्ये किती किती नवनव्या कल्पना व भाग निर्माण होत गेले
* ब्लॉगवर लेखन
* यु ट्यूब चँनेलवर विडीओज्
* माझा ब्लाँग
Pl. Open the link.....
Share it too in your whatspp grp....
http//moonsungrandson.blogspot.com
त्यातील लेखनाची विविध सदरेः
* हृदय संवाद,
* आजोबांचा बटवा,
* रंगांची दुनियाः शारदोत्सव, रंगदर्शन चित्रदर्शन टेलिरंजन
*नियतीचा संकेत लेख व संपूर्ण वार्षिक राशी भविष्य
*वाचा आणि फुला फुलवा
*ध्वनिफिती @ मनोरंजन व मार्गदर्शन करणाऱ्या
* सोशल मीडियावर स्वनिर्मित विचार प्रवर्तक संदेश आणि खुसखुशीत अशी स्वनिर्मित कोडी तयार करणे...
(@ लेखाच्या शेवटी पहा व ऐका.)
इतके सारे काही माझ्याकडून होईल असे मला कधीही वाटले नव्हते. पण उत्तरोत्तर मिळत गेलेल्या भरघोस प्रोत्साहनामुळे ते घडून गेले हे खरे आणि घडतच जात, नवी-नवी रुपे घेणार आहे हेही खरे!
ह्या साऱ्या प्रपंचातून मला जो आत्मानंद मिळत आहे, तो आजतागायत पूर्वी कधीही मिळाला नव्हता.
धन्यवाद
---------------------------
"चुका अन् शिका,
घोडचुका अन् दुर्दैव फुका फुका!"
माणसाच्या हातातून पुष्कळदा चुका होतात वा होऊन जातात, मात्र कधी कधी अक्षरशः घोडचूका होतात. चुका सुधारल्या जाऊ शकतात, परंतु घोडचुका सुधारताच येत नाहीत. त्यामुळे माणसाच्या जीवनात होणारे नुकसान, भरून न येणारे वळण लागते. ते ध्यानात येते तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते.
अखेर व्यथित मनाने केलेल्या घोडचुकांच्या आठवणी उगाळत केवळ अरण्यरूदन करणेच फक्त त्याच्या हाती उरते.
----------------------------
।। "जीवन त्यांना कळले हो"।।
माणूस जेव्हा एकांतात स्वतःशी हृदय संवाद करायला बसतो, तेव्हा तो मागे वळून आयुष्याचा लेखाजोखा घेतो. काय चुकले, काय मिळाले, काय गमावले, काय भोगले आणि कुठे आलो, कुठे होतो असा त्याच्या जीवनाचा तो जमाखर्च असतो.
असे करताना कळत नकळत त्याच्या मनात विचार येतो, जीवनाचे प्रयोजन काय, अर्थ काय, हे अहंकार राग लोभ गर्वाचे खेळ, सारे कशासाठी, कुणासाठी?
आणि अशा वेळेला, त्याला अचानकपणे, लहानपणी शाळेमधली ती कविता आठवते, आणि त्यातील ते अविस्मरणीय उद्गार त्याला सांगतात:
"जीवन त्यांना कळले हो।
मीपण, ज्यांचे पक्व फळापरी गळले हो।।
----------------------------
माझी एक वर्षापूर्वीची नोंद:
"इडियट बाँक्सवर 'अच्छे दिन?!":
भरकटणार्या, पाणी घालत लांबवित नेलेल्या मालिकांचे दिवस आता तात्पुरते संपून, अनेक मालिका इडियट बॉक्सवर करमणुकीचा धमाका
उडवत आहेत!
एकमेकांमधील आकर्षक केमिस्ट्री मुळे सर्वांना आपलेसे करणारी समीर प्राजक्ताची जोडी प्रेक्षकांना "साथ देशी, तू मला" अशी साद घालत आहे!
तर चांगुलपणाची कमाल असूनही "जीव झाला वेडा पिसा" मालिका, हृदयाचा ठोका चुकवणारे हा नायक की खलनायक असे नाट्य निर्माण करत आपल्या नावाला सार्थ करत आहे!
सगळ्यात विलक्षण कमाल तर, बघता बघता
कालचा 'नायक', आजचा 'खलनायक', झालेली अत्यंत उत्कंठावर्धक, "तुला पाहते रे" मालिका तर प्रेक्षकांना वेळीच जागे करत आहे!
"वर्तुळ" मध्ये तर नायकाच्या व त्याच्या कुटूंबाच्या डोळ्यात धूळ फेकणारा खलनायक, एकसे बढकर एक कारनामे बिनधास्तपणे करत आहे!
थोडक्यात इडियट बॉक्सवर मनोरंजनाची कमाल धमाल चालू आहे!
ती, किती काळ टिकणार हे मात्र गुलदस्त्यातच आहे!!
इतके दिवस कंटाळलेल्या प्रेक्षकांना तरी कां होईना, "अच्छे दिन" आले आहेत!!"
आणि आज?
चोविस तास घरातच बसावयाची वेळ आल्यामुळे, सध्या कधी नव्हे इतकी खमंग, सकस करमणुकीची गरज आहे, तेव्हा दुर्दैवाने साराच दुष्काळ !
जुनेच उगाळ उगाळले जात आहे !
सध्या कोरोनाच्या संकटामुळे आपले त्यापूर्वीच्या मोकळा संचार करू शकणार्या जीवनपद्धतीची आज म्हणूनच अशी उसासे काढणारी आठवण काही केल्या मनांतून जातच नाहीये!
---------------------------
"सध्याच्या महासंकटातील एक ओयँसिस !":
हे पत्रच बोलके आहे:
# सादर वंंदन.
मी तुमच्यांतीलच एक ज्येष्ठ नागरिक.
प्रथम सध्या सर्वांनाच दररोज अत्यावश्यक अशा भाज्या पुरविण्याचा जो उपक्रम काल अत्यंत नियोजनबद्ध रितीने, संयम व शिस्त बाळगत यशस्वी करणार्या टीमचे मी मनापासून अभिनंदन करतो व आभार मानतो.
ह्या उपक्रमात अनुकरणीय कल्पना-
Ideas संरचना-System व पद्धती-Processes सुसंगत रितीने अवलंबिण्यात आल्या. विशेषतः whatsapp grp ची स्थापना त्यामुळे संवाद व मागण्या नोंदविणे सुलभ आणि सर्वात कौतुकास्पद म्हणजे आपल्या भाज्या घेऊन जाण्यासाठी केवळ चार सभासदांना पाचारण करणे, त्यामुळे social distancing शक्य. इ.इ. म्हणून टीमचे उपकार मानावेत तितके थोडेच होय.
सध्याच्या महासंकटाच्या काळात तर, हा प्रयोग मुंबईतील इतर सहकारी सोसायट्यांनी आदर्श Role Model म्हणून विचारात घेण्याजोगाच ठरावा.
अशा सेवाभावी माणसांच्या सोसायटीत आपले वास्तव्य आहे, ह्याचा आम्हा दोघांना अभिमान वाटतो.
मनःपूर्वक धन्यवाद
---------------------------
"आवर्जून ऐकाव्या, अशा ध्वनीफिती":
ह्या गुढीपाडव्यापासून तुमच्या विरंगुळ्यासाठी आणि मार्गदर्शक विचारांसाठी हा खास नवा उपक्रम मी सुरू केला आहे.
आजपर्यंत मी निर्माण केलेल्या ध्वनिफिती ह्या आहेत:
१ 'वाचा व फुला, फुलवा'
२ 'ऐवज' एक रसास्वाद
३ 'व्यक्तिचित्रे-अनुभवांचा ठेवा'
४ 'घरात बसण्याचे फायदे'
५ 'एक गुरुमंत्र'
६ 'घटका गेली पळे गेली'
७ 'आशा ठेवा, हेही दिवस जातील'
८ 'नवी दिशा नवे मार्ग'
९ 'सेवकाची कदर'
वानगीदाखल ही ध्वनीफित येथे पाठवत आहे. ती जरूर ऐका...
ज्या कुणाला या ध्वनिफिती ऐकाव्याशा वाटत असतील, त्यांनी प्रतिसादामध्ये सर्व किंवा कोणती ध्वनिफीत हवी, तेही लिहू शकता. त्यांच्या whatsapp no वर त्या पाठवल्या जातील.
धन्यवाद.
सुधाकर नातू
Mb 9820632655

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा