"आजोबांचा बटवा-४":
"कोडे- एक कोडेच'! उर्फ कोडे पुराण":
मला विविध विषयांवर माहिती गोळा करून ती डायरीत नोंदवावयाची संवय आहे. आताच्या कोरोनारुपी महासंकटात लाँकडाऊन असल्याने सर्वांना घरातच दिवसाचे २४ तास बसायची वेळ आली आहे. अशावेळी ह्या डायर्या माझ्यासाठी महापर्वणी ठरल्या. गुढी पाडव्याच्या मूहूर्तावर मी अनेक नवीन कल्पना प्रत्यक्षात आणल्या. त्यातीलच एक म्हणजे नवनवी कोडी तयार करून whatsapp वर टाकणे.
प्रथम मी विविध निवडक मनोरंजक कोडी व त्यांची उत्तरे देतो आणि शेवटच्या माझ्या कोड्याच्या उत्तराने मला ह्या कोडेपुराणाने काय धडा दिला ते सांगतो...
१ पुस्तकप्रेमींसाठी कोडे:
पुस्तके वाचल्यावर त्यांचे नांव व लेखक ही माहीती डायरीत होती. त्यावरुन मी हे कोडे बनवले.
"पुस्तकप्रेमींसाठी हे कोडे-१":
पुढील पुस्तकांचे लेखक कोण ते ओळखा:
कोसला, मुंगीचे महाभारत, झिम्मा,
पैस, पोपटी चौकट, बनगरवाडी, म्रुदगंध,
तिसरी घंटा, सोनेरी टोळी,
उजेडाची झाडे, वाँर्ड नंबर ५, धाकटी पाती,
रारंगढाण, व्यासपर्व, रसयात्रा,
उत्तरे:
‼ भालचंद्र नेमाडे,, गंगाधर गाडगीळ,, विजया मेहता,, दुर्गा भागवत,, विद्याधर पुंडलिक,, व्यंकटेश माडगूळकर,, इंदिरा संत,, मधुकर तोरडमल,, नाथ माधव, अनंत काणेकर
डॉ रवी बापट,, सुर्यकांत मांढरे,, प्रभाकर पेंढारकर,, दुर्गा भागवत,, कुसुमाग्रज..‼
------------------------
२ "संगीतप्रेमींसाठी कोडे":
ही जगदीश खेबुडकर यांनी रचिलेली गीते आहेत. त्यांचा चित्रपट, गायक व संगीतकार कोण ते सांगा:
१ आकाशी झेप घे रे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा - आराम हराम आहे, सुधीर फडके, सुधीर फडके,
२ ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे - साधी माणसं, लता, आनंदघन (लता)
३ देव नाही मंदिरी, फुल आहे गंध आहे भाव आहे अंतरी
४ सख्या रे, घायाळ मी हरिणी - सामना, लता, भास्कर चंदावरकर
५ झनन झननन छेडिल्या तारा - हळद कुंकु, सुरेश वाडकर, विश्वनाथ मोरे
६ बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला - साधी माणसं, लता, आनंदघन (लता)
चित्रपट मोहित्यांची मंजुळा
७ वारा गाई गाणे प्रीतीचे तराणे - संसार, लता, ह्रदयनाथ
__________________
३ अ
पुढील शब्दातील काही चित्रपटांची नांवे आहेत, हे उत्तर न देता, ह्या शब्दांचे अर्थ सांगा..
बरखुरदार - clever, धूर्त
दायरा - coverage
फाजील दोस्त - intelligent friend
बंदगी - प्रणाम
कश्मकश - dilemma
जजबात - emotion
जुनुन - Rage
ऐतराज - objection
आनबान - Pratishtha / Prestige
चश्मेबुद्दूर- Buri nazar dur hovude
दीदार - दर्शन
दिल्लगी - betrayal
बाजीगर - Winner/ Magician
फंटूश - joker
कायनात- Universe
______________________
३ब
अनोखे शब्दकोडे-2
उत्तरे:
आन मनीषा, इच्छा, प्रार्थना
रंजिस नाराजी, अप्रसन्नता
तमस अंधार
धुम्मस धुरकट foggy
मंझधार नहर नदीचा प्रवाह
संगदिल कठोर ह्रदयी
कुदरत ईश्वरीय शक्ती निसर्ग
चमन छोटा बगीचा
आहट पदरव
कयामत मोठी बला वा महासंकट
बलामत नसती आफत
एतराज आपत्ती, टीका दोष काढणे
कोहरा धुके
कोहराम गडबडगोंधळ
खुदगर्ज स्वाभीमानी
रजामंद कबूल
कमरकस पळसाचा गोंद
जाल जाळे
अकलमंद हुश्शार
परवरीश संगोपन पालनपोषण
अलबेला असभ्य आपल्याच मस्तीत वागणारा
सीरत सौजन्य स्वभाव
वीरासत वारसा, उत्तराधिकार
ह्या दोन्ही कोड्यांमुळे नेहमी कानावर येणार्या पण अर्थ ठाऊक नसणार्या शब्दांचे अर्थ कळले.
--------------------
४
आता,
Whatsapp group वर पुढे पाठवलेले हे कोडेही स्मरणशक्ती व बुद्धी ह्यांची कसोटी पहाणारे आहे......
पुढील शब्दांना समानार्थी शब्द, ज्यात काना मात्रा वेलांटी अनुस्वार नाही असे शोधा..
शब्द उत्तर
१. हत्ती - गज
२. पंकज- कमळ
३. तोंड - वदन
४. पाणी - जल
५. नमस्कार - नमन
६. बाप - जनक
७. बाण - शर
८. बाग - वन
९. समस्या - अडचण
१० घास - कवळ
११ धाक - जरब
१२ भांडण - कलह
१३ नवरा - वर
१४ पर्वत - अचल
१५ कठीण - टणक
१६ पुरुष - नर
१७ द्रव्य - धन
१८ आवश्यकता - नड
१९ उलगडा- उकल
२० दूध - पय
२१ रूची- चव
२२ गंध - दरवळ
२३ गृह - घर
२४ घोडा - हय
२५ पाऊल - पद
२६ डोळा - अक्ष
२७ तृण - गवत
२८ रस्ता - पथ
२९ हात - कर
३० वारा- पवन
३१ सुवर्ण - कनक
३२ अंबर - ख
३३ खून - वध
३४ रास - चळत
३५ कप्पा - खण
३६ पक्षी - खग
३७ किल्ला - गड
३८ अवचित - नकळत
३९ मृत्यू - मयत
४० अग्नि - अनल
४१ काळ - समय
४२ जंगल - वन
४३ अविरत - सतत
४४ आश्चर्य - अजब
४५ अभिनेता- नट
४६ ढग - जलद
४७ पोट- जठर
४८ अंधार- तम
४९ ध्वनि - रव
५० ओझे -वजन
------------------------
५
"इतिहासावरचे कोडे":
माझ्याकडे असलेल्या माहितीवरून मी हे इतिहासावरचे कोडे तयार केले:
ANSWERS to Sunday Quiz:
1) How long did the Hundred Years War last ?
116 years
2) Which country makes Panama hats ?
Ecuador
3) From which animal do we get cat gut ?
Sheep and Horses
4) In which month do Russians celebrate the October Revolution ?
November
5) What is a camel's hair brush made of ?
Squirrel fur
6) The Canary Islands in the Pacific are named after what animal ?
Dogs
7) What was King George VI's first name ?
Albert
8) What color is a purple finch ?
Crimson
9) Where are Chinese gooseberries from ?
New Zealand
10) What is the color of the black box in a commercial airplane ?
Orange (of course!)
Note:
This happened to be in my Data bank of over a decade back.
------------------------
६
हे एक पुढे पाठवले forworded कोडे:
संगीतमय शब्दांचे कोडे:
"चला मंडळी
आता नवीन कोडं ह्या मध्ये शरिराच्या भागावर मराठी गाणे लिहायचे आहे...
हे शब्द गाण्यात कुठे ही आले तरी चालेल...
डोळे.... डोळ्यात वाच माझ्या
नाक.... नाकावरच्या रागाला औषध काय
गळा.... तुझ्या गळा माझ्या गळा
मान.... मान वेळावूनी धुंद होऊ नको
खांदा.... कुणाच्या खांद्यावर
पोट.... पोटापुरता पसा पाहीजे
हात.... हात तुझा हातात
करंगळी.... बाई माझी करंगळी मोडली
पाऊल.... मराठी पाऊल पडते पुढे
पाय.... कुणीही पाय नका वाजवू
कटी....मेखला कटीवरी किणकिणती
कान.... कानात सांग रानात तू आपले नाते
हृदय.... हृदयी प्रीत जागते
मुख/ मुखी.... रागिणी मुखचंद्रमा"
------------------------
७
माझ्याकडे असलेल्या माहितीवरून मी तयार केलेले हे:
"संगीतप्रेमींसाठी कोडे":
पुढील गीतांचे गीतकार व संगीतकार कोण, ते सांगा:
१ मानसीचा चित्रकार तो तुझे निरंतर चित्र काढतो P Savalaraam, Vasant Prabhu
२ आज कुणीतरी यावे ओळखीचे व्हावे , GaDiMa, Sudhir Phadke
३ प्रेमा होऊ कशी उतराई भाग्य दिले तू मला (something wrong with lyrics)
४ घननीळा लडिवाळा झुलवु नको रे हिंदोळा GaDiMa, Sudhir Phadke
५ ब्रम्हा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसती GaDiMa, Sudhir Phadke
६ देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा उघड दार देवा GaDiMa, Sudhir Phadke

७ धागा धागा अखंड विणू या विठ्ठल विठ्ठल मुखी म्हणूया P Savalaraam, Vasant Prabhu
८ बादशहाच्या अमर प्रितीचे मंदिर एक विशाल —, Gajananrao Watave
९ निरांजनातील वात -, Watave
१० आकाशी झेप घेत असे सोडी सोन्याचा पिंजरा GaDiMa, Sudhir Phadke
११ कुणीही पाय नका वाजवू मालती पांडे गजानन वाटवे
१२ लपविलास तू हिरवा चाफा सुगंध त्याचा लपेल का गदिमा प्रभाकर जोग
१३ मोहुनिया तुजसंगे नयन खेळले जुगार. -, Watave
१४ तुझे गीत गाण्यासाठी सुर लागू दे Mangesh Padgaonkar, Yashwant Dev
१५ मैत्रिणींनो सांगू नका नाव घ्यायला
मनमोहन नातू लता
१६ दोन ध्रुवांवर दोघे आपण तू तिकडे अन मी इकडे राजा बढे, गजानन वाटवे
१७ नरवर कृष्णासमान क्रु प्र खाडीलकर,
मास्तर क्रुष्णा
१८ बहरला पारिजात दारी फुले कां पडती शेजारी
१९ तूं नजरेने हो म्हटले पण वाचेने वदणार कधी?-, Yashwant Dev
२० जिथे सागरा धरती मिळते, तिथे तुझी मी वाट पाहते पी सावळाराम, वसंत प्रभू
------------------------
८
अजून एक मी रचलेले,
"हिंदी चित्रपट संगीतप्रेमींसाठी कोडे":
पुढे दिलेल्या गीतांचे चित्रपट सांगा, ते केव्हा प्रदर्शित झाले हे सांगू शकलात तर बोनस गुण!
१ याद किया दिलने कहा हो तुम - Patita - Hemant Kumar, Lata
२ ये रात भीगी भीगी - Chorizo Chori - Manna Dey, Lata
३ आजा सनम मधुर चांदनी में हम - Chori Chori Manna Dey, Lata
४ ऐ दिल मुझे बता दे - Bhai Bhai Geeta Dutt
५ माना जनाब ने पुकारा नही - Paying Guest - Kishore
७ हम आपकी आखो मे - Pyasa - Rafi Asha
८ ऐ मेहरबान - Howda Bride Asha
९ जाने कहा मेरा जिगर गया जी - Mr and Mrs 55 Rafi, Geeta Dutt
१० दिल की नजर से - Anadi Mukesh Lata
११ तस्वीर तेरी दिल में - Maya Rafi Lata
१२ इतना ना मुझसे तू - chhaya? Talat Lata
१३ तुझे जीवन की डोर से - Asli Nakali Rafi Lata
१४ रुक जा रात ठहर जा- Dil Ek Mandir Lata
------------------------
९
आता अगदी वेगळा अभ्यासाचा विषय..
तर गणिताची चांचणी घेणारे पुढे पाठवल्याने ग्रुपवर आलेले हे कोडे तर महाकठीण:
एक मजेदार कोडे : [ निव्वळ गणिती कोडे. कोणतेही शाब्दिक चातुर्य नाही. ] : विषमासूर नावाच्या राक्षसाच्या समोर 1000 माणसे एका रांगेत उभी आहेत. त्या रांगेमधील विषम क्रमांकावर [ उदा. 1,3,5,7,9 ] उभ्या असलेल्या सर्व लोकांना विषमासूर खावून टाकतो. त्या नंतर उरलेल्या माणसांची रांग शिल्लक राहते. आता त्या रांगेतील विषम क्रमांकाच्या माणसांना विषमासूर खावून टाकतो. असे करत करत रांग लहान होत जाते आणि शेवटी एक माणूस शिल्लक राहतो. तर तो शिल्लक राहिलेला माणूस मूळ 1000 लोकांच्या रांगेत कितव्या क्रमांकावर उभा असेल ? बघा try करून नक्की कितव्या क्रमांकावर ऊभा होता तो माणुस .
🤔😃🤔
उत्तर: ५१२
------------------------
१०
जवळच्या माहीतीवरून मी रचलेले गणिती कोडे
Quiz of Numbers:
1.
12×483=5796
Like in this equation here multiplication shows all 1 to 9 numbers.
Please give at least 3 more such examples of equations....
2.
Which number when multiplied by 9 will show result that has same integers of this number but in reverse order.
1.
Anwser:
in these three multiplication equations, you find all 1 to 9 numbers.
42×138=5796
18×297=5346
27×198=5346
-------------------------
११
मारुतीच्या शेपटासारखी अनेक चित्रविचित्र आणि विविध विषयांवरची असंख्य कोडी आपल्याला विरंगुळा म्हणून पहायला मिळत गेली. त्यामुळे अजून पुष्कळ कोडी येथे देणे शक्य असूनही लेख निष्कारण लांबू नये म्हणून........
आता सरते शेवटी मला कोडे रचणे व सोडविणे ह्या विषयावर अंतर्मुख करुन सखोल विचार करायला लावणारे
आणि
"माझी फजिती करणारे कोडे":
100 रुपयात 100 प्राणी घेऊन दाखवा:
1 रुपयाला 1 घोडा
5 रुपयाला 1 हत्ती आणि
1 रुपयाला 4 उंट
अट- प्रत्येक प्राणी घ्यावाच लागेल. सगळे १०० रूपये खर्च करायचे व १०० प्राणी घ्यायचे.
ह्याची आलेली उत्तरे तपासताना मीच गोंधळलो व चुकलो. एकच उत्तर नसून अनेक उत्तरे आहेत असे माझा सतरा वर्षांच्या नातवानेच पुढील पर्यायी उत्तरे देऊन माझी विकेटच घेतली.
त्याचे उत्तर होते:
Horse Camel Elephant
81 16 3
62 32 6
43 48 9
24 64 12
5 80 15
ह्या सार्या मंथनातून प्राप्त झालेले बोधाम्रुत देऊन हा प्रदीर्घ लेख संपवितो:
"एक निरीक्षण": उर्फ कोडे पुराण":
'कोडे- एक कोडेच' !:
१ कोडे दिल्याबरोबर कुणी अचूक सोडवले, तर कोडे रचणार्याचा पचका !
२ आणि कोडे दिल्यानंतर मर्यादेबाहेर वेळ गेल्यावरही ते सोडवले गेलेच नाही, तर रचणारा दुर्लक्षित राहिल्याचा फटका !
३ कोडे अनेक प्रयत्न होत, होत सुटले नाही तर मात्र सोडविणार्यांना रचणार्याचा धसका !
४ कोड्याचे रचणार्याने दिलेले उत्तरच शेवटी चुकीचे ठरले तर काय? साराच विचका !
५ ह्या व्यतिरिक्त काही पर्याय असू शकतो कां?
हा प्रश्न हेच एक वेगळेच कोडे नाही कां?
५ उत्तर: कोडे रचणे व कोडे सोडवणे, ह्याची एकदा चटक लागली की ती, ते रचणार्याला व सोडवणार्यांना काही केल्या सुचतच नाही.
ह्याला कारण काय?
हेही जणु कोडेच ! बघा उत्तर देता येते कां!
६. उत्तर: कोड्याचे चुकून बरोबर आले तर देणार्याला लागला मटका
७. कोडे वाचताच क्षणी समजले कि “ये अपने बस कि बात नही” तर वाचणार्याची होते पटकन सुटका
८. मात्र हे खरे कि कोडे या प्रकारामूळे होते खूप जणांचे मनोरंजन दोन घटका
९. त्यामुळे लोकहो पाठवतच रहा कोडी अन् द्या आमच्या बुद्धीला जरा झटका.
वाह् क्या बात है....
१० कोडे रचणारा वा सोडवणारा ह्यांच्या बुद्धीला चालना, स्मरणशक्तीला आव्हान त्यामुळे मिळत असते.
समस्येकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्याची आणि त्याप्रमाणे पुढे जाण्याची सवय लागते. 0ut of Box thinking ची ही एक महत्वाची पायरी असते. असे फायदे असले तरी, कोडे एखाद्या कोळ्याच्या जाळ्यात सारखे देखील असते हे ध्यानात ठेवायला हवे. कारण त्याच्यात जर अति गुरफटत राहिलात तर अडकूनही पडू शकता. तेव्हा सावधान, संयम बाळगावा. त्यातच रचणारा आणि सोडवणारे ह्यांच चांगभलं !
इति कोडे पुराणम् संपूर्णम् !
धन्यवाद
सुधाकर नातू
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा