"ह्रदयसंवाद-१८":
"जीवनाचे गूढ व मतितार्थ":
"आपले आरोग्य आपल्याच हातात":
दैवदुर्लभ मानवजन्म मिळणे ही एक भाग्याची सुवर्णसंधी असते. जीवन सुलभतेने दीर्घकाळ जगता येण्यासाठी प्रथम आपले शरीर व मनाचे आरोग्य नीट संभाळणे अत्यावश्यक असते. आपल्याला स्वतःचे आरोग्य नीट राखता येणे सहजशक्य असते, नव्हे ते ज्याचे त्याने स्वतः नीट राखायला हवे.
विशेषतः साठीनंतरचे वय सांगत असते की, आता सावध राहा, तब्येतीकडे बघा, दुसऱ्यावर अवलंबून राहायची वेळ येऊ देऊ नका. ह्याकरता आपण काय काय, किती, केव्हा, व कसे खातो हे जसे ध्यानात ठेवायला हवे. तसेच शरीराच्या तंदुरुस्तीसाठी सध्या घरातच रहाणे आवश्यक असल्याने, तिथेच शक्यतो चालणे, व्यायाम यानिमित्ताने किती हालचाल करतो, ते पहायला हवे. नीट निरोगी रहायलाच हवे, न पेक्षा आपण आपल्याच हाताने आपले नुकसान करून घेत असतो.
कुणाला निवृत्तीमुळे वा इतरांना सध्याच्या कसोटीच्या काळात रोजच जणु रविवार असल्याने, याबाबतीत डोळ्यात तेल घालून प्रत्येकाने आपल्याला योग्य असा, आपल्या बाँडी क्लाँकबरोबर जुळेल, असा दिनक्रम अमलात आणायला हवा. अति TV पहाणे तसेच आवाजाचे प्रदूषण करणारे संगीत ऐकणे टाळावे. नाही तर, त्यापेक्षा वाचन आणि लेखन हे कदाचित उपयुक्त ठरू शकते. थोडक्यात आरोग्य न राखल्यास त्याचे दुष्परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात, हे कायम ध्यानात ठेवावे. तसेच मनाची मशागत करण्यासाठी एखाद्या उपयुक्त छंदामध्ये विरंगुळा शोधावा.
"जीवनाचा मतितार्थ":
प्रत्येक व्यक्तीच्या अंगी कोणता ना कोणता चांगला गुण कला वा कौशल्य असतेच असते. तसेच प्रत्येकाच्या ठायी एखादा तरी वर्मावर बोट ठेवावा असा दुर्गुण वा दुखरी बाजू असतेच असते. चांगल्या गुणांची कलेची, कौशल्याची ज्यांना जेव्हां जाणीव होते व त्याचा ते सातत्याने पाठपुरावा करत राहतात, तेव्हा त्यांना सुख यश व समाधान मिळतेच मिळते. तुम्हाला तुमच्यातील आगळ्यावेगळ्या तुमच्या शक्तीस्थळांची अशी जाण कधी होते ते सांगता येणे कठीण आहे.
पण ती जर कां एकदा झाली तर, तिचा सातत्याने पाठपुरावा करत राहिलात तर तुम्हाला समाधान व यश मिळणार. स्वतंत्र विचार, कल्पना करत राहणे व त्या समजतील अशा तऱ्हेने प्रकटीकरण करण्याचे लेखन कौशल्य माझ्याकडे आहे. दुसरी चांगली कला व कौशल्य म्हणजे मला ज्योतिषाचा अभ्यास करून विवेचन करणे हे आहे असे वाटते. जन्म पत्रिकेवरून समोरच्या व्यक्तीची तसेच तिच्या जीवनाची योग्य ती जाणीव करून घेऊन, तिला योग्य तो दिलासा देणारे मार्गदर्शन करण्याचे कौशल्य माझ्यात आहे, ह्याचीही जाणीव या मूलभूत शाश्वत विचारामुळे झाली आहे.
जी गोष्ट चांगल्या गुणांची कलेची कौशल्याची त्याचबरोबर उलटी बाजू म्हणजे माणसाची व्यसने, वागण्यातील दुर्गुण, अनिष्ट प्रवृत्ती तसेच एखादी अतिरेक करणारी गोष्ट इ.इ. दुखऱ्या गोष्टींमुळेच प्रत्येकाचा ऱ्हास होत जातो. तो कळत नकळत दारू सिगरेट तंबाखू इत्यादी इत्यादी वाईट व्यसनांच्या मागे लागतो, त्यांच्या आधीन होतो. कुणी केवळ पैशाचा हव्यास धरतो व कोणत्याही मार्गाने तो मिळवण्याचा अट्टाहास करतो, तर कुणी दुसऱ्यांच्या भावनांचा विचार न करता आत्मकेंद्री वृत्ती स्वार्थाने आपल्याला वाटेल तसे इतरांना पीडा देत, वागत राहतो.
आपल्यातील शक्तिस्थळे जशी महत्त्वाची आणि ती सहजासहजी जशी सापडत नाहीत, त्याचप्रमाणे आपल्यातील दोष देखील लवकर काही समजत नाहीत. अशा अंतर्मुख करणार्या विचारमंथनातून निरीक्षणातून मानवी जीवनातील मतितार्थ वा गूढ समजू शकते. प्रत्येक व्यक्तीने आपल्या स्वतःच्या कुटुंबाच्या, समाजाच्या व देशाच्या हितासाठी स्वतःच्या शक्तीस्थळांचा शोध घेऊन त्यांच्याद्वारे योग्य तसे वागायला हवे.
"जीवनाचे गूढ":
काय बरोर आणि काय चूक हे ठरवणारे आपण कोण? ते तर काळ-जो कधीच बदलता येतही नाही, वा हातात पकडताच नाही तो काळ आणि तशीच सतत बदलत जाणारी परिस्थिती-जिच्यावर आपले काहीच नियंत्रण नसते ती. त्यांच्याच तर हातात असते, बरोबर वा चूक ठरविण्याचे अन् आपले नशीब घडविण्याचे वा बिघडवण्याचे !
ज्योतिषाच्या नजरेतून हा सारा अभ्यास-जर माणसाच्या जीवनासंबंधी केला, तर एक गोष्ट निश्चित जाणवते, ती म्हणजे माणूस हा कुठल्यातरी गुढ अतर्क्य अशा नियतीच्या हातचे खेळणे असते ही. प्रत्येकाचे भागध्येय वेगळे असते, प्रारब्ध व संचित वेगळे असते. कदाचित त्यानुसार तो जीवनात बरोबर वा चुकीचे निर्णय घेतो, कृती करतो व फळे भोगतो. परिस्थितीवर नियंत्रण मिळवून त्यावर यशस्वी मात करण्याचे भाग्य फारच थोड्यांना प्राप्त होते, तेही त्यांच्या जीवनात अत्यल्प काळात, अनिश्चित रूपातच जमू शकते. बाकीच्या सामान्यांसाठी असतो, पूर आलेल्या नदीच्या प्रवाहात, सापडलेल्या ओंडक्यासारखा प्रवाहपतित त्याचा प्रवास. हे लक्षात घेतले की माणसाच्या जीवनाची अतर्क्यता लक्षात येते.
अखेरीस, जीवनाचे गूढ व मतितार्थ उकलण्यासाठी....
"सर्वश्रेष्ठ शोध"':
माणसाचा सारा जीवनपट चलत् चित्रपटासारखा प्रतिमांचा रूपाने त्याच्या स्मृतीकोषांत साठवला जात असतो. त्याच्या मृत्यूनंतर त्याचे अवशेष पंचतत्वात विलीन करण्यापूर्वी, हा स्मृतीकोष किंवा मेमरी बॉक्स जसाच्या तसा ट्रान्सफर करून सेव्ह करण्याचा शोध, त्या जोडीला म्रुत्युनंतर माणूस कुठे जातो कां, त्याचे काय होते हाही शोध जर कधी कुणी लावलाच तर, ते इतिहासांतच नव्हे तर अनंत भविष्यापर्यंतचा सर्वोत्तम व सर्वश्रेष्ठ शोध असतील.
-----------------------------------------
असेच उत्तमोत्तम शंभराहून अधिक लेख वाचण्यासाठी ही लिंक उघडा....... आपल्या संग्रही ठेवा....... आणि whatsapp grps वर शेअरही करा.... http//moonsungrandson.blogspot.com
धन्यवाद
सुधाकर नातू

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा