शुक्रवार, २० जून, २०२५

सोशल मीडियावरील सर मिसळ

# जीवनाची वाट ही प्रत्येकाची वेगळी असते. त्या वाटेवरच्या प्रवासात आपल्याला साथ देणारे भेटले तर चांगलेच, पण नाही भेटली माणसं तर एकट्याने चालत प्रवास सार्थकी लावायचा असतो !":💐 # कळत नाही आयुष्यात माणसं कशी येतात कळत नाही कोण कधी साथ देईल कोण कधी सोडून देईल कळत नाही कधी हसू तर कधी रडू येईल आयुष्य हा एक प्रवास आहे ज्यात माणसं भेटतात साथ देतात कधीतरी रस्ता खडतर असतो तर कधीतरी सुखद पण माणसं नेहमी सोबत असतात !":💐 # श्री प्रमोद गायकवाड 👍"आकाशातील पाळणे" अभिवाचन मंच!:👌 💐 " दूरदर्शन वरील नक्षत्रांच्या दिवसांचे घबाड !":💐 " अभिवाचन क्रमांक 365 !": 💐 " कालप्रवाहाच्या ओघात अनेक घटना, प्रसंग, परिस्थिती सातत्याने बदलत असते. पण त्यातीलच काही मनमंजुषेत पुन्हा पुन्हा आठवत रहाव्या अशा काही घटना व क्षण असतात 1972 मध्ये दूरदर्शनची सुरुवात मुंबईला झाली आणि तेव्हा तेथे कार्यरत असलेले निर्माते श्री अरुण काकतकर यांच्या 'घबाड' या पुस्तकाचा श्री सुधाकर नातू यांनी घेतलेला हा रसास्वाद, अभिवाचन रूपात श्री उदय पिंगळे येथे सादर करत आहेत. "दूरदर्शनवरील ह्या मनभावन पाऊलखुणा" तुम्हालाही पुन्हा पुन्हा उजळणी कराव्याशा वाटतील !":💐 पुढील ध्वनिफीत उघडून ऐका तर मग.... या साऱ्याकडे चिकित्सक दृष्टीने पहात साक्षेपी शब्दातील "मल्लिनाथी- कुठेतरी काहीतरी चुकतंय !" या श्री सुधाकर नातू लिखित लेखाचे अभिवाचन येथे श्री उदय पिंगळे करत आहेत. ऐकण्यासाठी पुढील ध्वनिफीत उघडा....!":🤣 👍" बोल अमोल वाचता वाचता वेचलेले !":👌 # "जीवनाची वाट ही प्रत्येकाची वेगळी असते. त्या वाटेवरच्या प्रवासात आपल्याला साथ देणारे भेटले तर चांगलेच, पण नाही भेटली माणसं तर एकट्याने चालत प्रवास सार्थकी लावायचा असतो !":💐 ################# 👍" छाप (पड)लेले शब्द !":👌 💐 " काळ बदलतो पण दु श प्रवृत्ती दूरवर्तन तसेच राहते नव्हे ते अधिकाधिक अमानु ष माणुसकीला काळीमा फासणारे राक्षसी होत जाते त्याच्या पाऊलखुळा आज समाज मनाला युद्ध करत असलेल्या पाण्याची साऱ्यांवर वेळ आली आहे त्यावेळी निदान दूरवर्तनाला सामना करणार्या टोप्या तरी होत्या परंतु आज काय परिस्थिती आहे तर अशा तऱ्हेच्या अपप्रवृत्तींना आळा घालणारे अभावानेच आढळत आहेत. साहजिक दिशाहीन हातबल समाज अधिकाधिक चिखला त रुुतत चालला आहे. अशा तऱ्हेची स्पंदने मनात उमटवणारी ही छोटीशी बातमी मूर्ती लहान पण कीर्ती महान अशीच दिशादर्शक म्हणायला हवी. जाता जाता एक नोंद माननीय श्री सुशील कुमार शिंदे आज 84 वर्षे होऊ नये तसेच दिलखुलास हास्य बालगीत मिश्किल टीकाटिपन्या करताना पाहून हेच म्हणावेसे वाटते त्यांच्या वतीने की अभी तो हम जवा है !":💐 ############### 😇 "इकडे तिकडे वाकडे तिडके !":😇 ☺️ "करूया ह्या हृदयीचे त्या हृदयी" जाणिवा विस्तारु या ध्येयामुळे गेली पाच सहा वर्षे मी शब्द, बोल, दृश्य अशा विविध माध्यमांतून वा रूपातून सोशल मीडियावर उपक्रम सादर करत आहे, त्याला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. बदल हा केव्हाही आवश्यक असतो त्यामुळे नवनवीन कल्पना सुचण्याचा मार्ग मोकळा होतो. 🤣 "बोल अमोल" च्या पाठोपाठ "वाचता वाचता, वेचलेले" ही संकल्पना आता चांगले मूळ धरायला लागलेली आहे. परंतु वास्तवतेचे एकंदर अकार्यक्षम यंत्रणेचे, व्यवस्थेचे तसेच मनोवृत्तीचे अनेक अनेक नकारात्मक परिणाम आपल्याला विविध प्रसारमाध्यमातून पहायला लागतात. "कुठेतरी काहीतरी चुकतंय" हे या साऱ्या वरून समजून येते आणि म्हणूनच जागे होणे, आवश्यक सुधारणा करणे तर नितांत गरजेचे, चालसे कल्चर यापुढे टाकले पाहिजे ह्या प्रामाणिक हेतूने "इकडे तिकडे वाकडे तिडके" ही नवीन संकल्पना प्रदर्शित करणे सुरू केले आहे. 😇 "इकडे तिकडे वाकडे तिडके !":😇 ☺️ " 🤣 "वर्तमानपत्रातील पुढील चिंताजनक वृत्तमथळे पहा: अनयंत्रित गर्दी सज्जतेचा अभाव बेंगळुळातील जिल्हा स्वामी स्टेडियम बाहेर गोंधळामुळे दुर्घटना अनधिकृत इमारतीवर कारवाई ठाणे महापालिका प्रशासनाला सात महिन्यानंतर जाग दुर्गाडी किल्ल्याची तटबंदी कोसळली दुरुस्ती वेळी नव्याने बांधलेली भिंत पडल्याने प्रश्नचिन्ह पीडब्ल्यूडी चे पुरातत्त्व खात्याकडे बोट तत्कालीन आयुक्तांची चौकशी एन एम एम टी च्या चार बस गाड्या आगीच्या भक्ष स्थानी ई वाहनातील बॅटरीतील शॉर्ट सर्किटमुळे आग कोरड वायरच्या धक्क्याने मुलाचा मृत्यू सह भंगार गोदामांना आग लोकलच्या टपावर स्टंटबाजी भोवली स्वस्त सोन्याच्या आमिषाने फसवणूक टोळी पोलिसांच्या जाळ्यात प्रदूषणाचे 55 बळी चंद्रपुरात 400095 रुग्ण सहा महिन्यातील धक्कादायक वास्तव # "तरूणही पाठदुखीने बेजार बैठी जीवनशैली व्यसने व्यायामाचा अभाव # मोबाईल हॅक करून खात्यातून पैसे लंपास.. # गल्यांमध्ये हिरवा चिखल छाटणीनंतर पालापाचोळा फांद्या रस्त्यावर पडून... # रेल्वे तिकिटासाठी खासदाराचे बनावट पत्र.... # पोलिसांनी वेषांतर करून आवळल्या मुसक्या 'बहुरूपी' चोराकडे लाखोंचे घबाड. . # अलिबाग जिल्हा रुग्णालय गैरसोयीचे आगार स्वच्छतागृह बंद रुग्णांसह नातेवाईकांचे हाल... # "अकरावी परीक्षेचा घोळ संंपता संपेना... ....... ...... विकासाच्या प्रगतीच्या पराक्रमांच्या वल्गना करता करता पायाखाली काय जळते आहे, याची जाण करून देणारे हे व्रुत्तमथळे... 🤣🤣🤣 ################## # किरकोळ वादातून तरुणाची हत्या... # चौकडीकडून तरुणावर जीवघेणा हल्ला... # ठाण्यात कॅसलमेल नाक्यावर हाणामारी: पूर्व वैमनस्यातून दोघांवर जॉपरणे हल्ला.... षडरिपूंपैकी क्रोध हा अत्यंत घातक असा माणसाचा शत्रू आहे. भौतिक विकास वेगाने होत असताना, माणसाचा मानसिक भावनिक आणि नैतिक र्हास झपाट्याने होत असल्याचेच हे लक्षण आहे. संयम आणि सबुरी विसरली जात आहे. मानसशास्त्रज्ञांनी वैद्यकीय संशोधकांनी या अशा तऱ्हेच्या मनोवृत्ती घडण्याच्या कारणांची सखोल कारणे शोधणे अत्यावश्यक आहे. पर्यावरण मग ते वातावरणाचे असो वा सामाजिक, तसेच जीवघेणी वेगवान जीवनशैली व अपरिहार्य स्पर्धा याचबरोबर खानपानाच्या वेळा सवयी आणि पदार्थ यांचा दर्जा, घटक...अशा विविध कारणामुळे मानवजातीचे हे विपरीत स्खलन होत आहे कां आणि त्यावर उपाय कोणते ? यांचा गांभीर्याने उहापोह व्हावा अशीच अपेक्षा, सुज्ञ सुसंस्कृत माणसे अशा उत्तरोत्तर सगळ्याच माध्यमातून अंगावर येणार्या वृत्तांमुळे करतील !:🤣 ############ 👍" मराठी रंगभूमी आणि नाटके!":👌 💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐 ☺️ "माणसाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा नाद असतो व्यसन असते. त्या गोष्टीचा नादात तो वास्तवता विसरतो त्या अनुभवांची जणू त्याला नशा चढते. त्यामुळे देहभान हरपते. कोणाला दारूचे, अफूचे व्यसन असते, तर कोणाला संगीताचा नाटकाचा शौक असतो. दोन्ही वेळेस परिणामात फरक असला तरी शौकाची दिशा एकच असते. मराठी माणसासाठी नाटक हा एक अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे नाट्यरसिकांना नाटकांचा असाच विलक्षण शौक असतो. नाटक ही एक खरोखर रोमांच निर्माण करणारी चीज आहे. मराठी रंगभूमीवरील नाटकांमध्ये पुष्कळदा धंदा कला विचार या त्रिमूर्तीचा अपूर्व संगम करण्याची कुवत असते. एक अनोखे करामणूक विश्व आहे. कोणत्याही व्यवसायात जी मूलभूत तत्वे असतात त्यांचा इथे समावेश होतो. कस ते सांगतो. रंगमंच हे त्या व्यवसायाचे ठिकाण, काम करणारे कलावंत व्यवसायाकरता भांडवल अर्थात कॅपिटल, तर ग्राहक प्रेक्षक_. व्यवसायाकडून बाहेर पडणाऱ्या फायनल प्रॉडक्टचा नाटकाचा उपभोक्ता म्हणजे कस्टमर असतो. गुंतवलेल्या भांडवलावर अर्थातच जास्तीत जास्त फायदा रिटर्न मिळवणे हा कोणत्याही व्यवसायाचा गाभा येथे उपस्थित असतो. त्या दृष्टीने हा एक धंदा आहे, पण इथे गोष्ट तिथे संपत नाही नाटक हे धंद्यापलीकडे कलेच्या रूपाने एक वेगळे निर्मितीविश्व_ क्रिएटिव्ह वर्ल्ड येथे आविष्कार घडवत असते. जातिवंत कलावंताच्या अद्भुत प्रतिभेचा चमत्कार अनुभवण्याची तिथे संधी मिळू शकते. कलेमध्ये एक अपार असे सौंदर्य असते, तर विचारांची प्रगल्भता बुद्धीचा तरल संवाद नाटक आपल्या उपभोक्त्यांशी भावसंवाद करू शकते. म्हणूनच नाटक धंदा कला विचार त्रीमूर्तीचा अद्भुत संगम करणारी गोष्ट आहे. विविध विषयांवर समाजाच्या मानवाच्या जीवनातील विविध अशा गुंतागुंतीवर समस्यांवर जेव्हा नाटकाच्या रूपातून भाष्य केले जाते, तेव्हा एक नवा विचार देणारेनाटक नवीन दिशा देत असते. त्यामुळे या त्रिवेणी संगमापोटी मिळणारा आनंद खरोखर शब्दातीत असतो. अर्थात प्रत्येक नाटकाला जे जमतेच असं नाही. अत्यंत दुर्मिळ अशी नाटके या ३ गोष्टींचा समायोजित समकल्प करणारी असतात आणि अर्थातच ती रसिक मनाला धुंद आणि अंतर्मुख करत असतात असं मला वाटतं. नाटक रंगभूमी या यावर मला जे वाटलं सुचलं ते इथे मांडलं आणि ते तुम्हाला देखील आवडेल असं मला वाटतं !':👌 धन्यवाद श्री सुधाकर नातू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा