शुक्रवार, २० जून, २०२५
" सोशल मीडियावरील अलौकिक अर्थपूर्ण व्हिडिओज
1
👍"सोमि'वरील मुशाफिरी-' मुकी होत चाललेली घरे' !":👌
" अभिवाचन क्रमांक 368 !":
💐"ह्या जीवाळ्याच्या विषयावरील टोपीवाला व्याख्यानमालेत श्री विवेक घळसासी यांनी मांडलेले उद्बोधक विचार प्रवर्तक आणि प्रसंगी धक्कादायक आऊट ऑफ बॉक्स असे विवेचन करणारा हा व्हिडिओ प्रत्येकाने पहावा समजून घ्यावा मनामध्ये विचार करावा असाच आहे.
अधून मधून आपल्या अभिवाचन मंचाला वेगळी दिशा आणि मार्ग मिळण्यासाठी आम्ही आपल्याला असे व्हिडिओ प्रकाशित करण्याची प्रेरणा या व्याख्यानाने आम्हाला दिली आहे....
हे विस्तृत व्याख्यान आपल्यालाही अंतर्मुख करेल असा आम्हाला विश्वास आहे....💐
त्यासाठी पुढील लिंक उघडा...💐
https://youtu.be/She11tNLv_A?si=WUvYFy-gfbB1WMnx*‘मैत्रीमधील मंदी’*
#####÷################################
2
मी अलीकडेच हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूच्या अंकात एक अत्यंत विचारप्रवर्तक लेख वाचला आणि तो थेट हृदयाला जाऊन भिडला.
या लेखात ‘Friendship Recession’ म्हणजेच मैत्रीमधील मंदी कशी आपल्या दैनंदिन व्यवहारात शिरकाव करत आहे, हे अतिशय प्रभावीपणे मांडले आहे.
American Perspectives Survey नुसार, 1990 पासून अमेरिकन प्रौढांमध्ये “एकही जवळचा मित्र नाही” असे सांगणाऱ्यांचे प्रमाण चारपट वाढून १२% वर गेले आहे, तर “१० किंवा अधिक जवळचे मित्र आहेत” असे सांगणाऱ्यांचे प्रमाण एकतृतीयांशाने कमी झाले आहे.
माझं मत आहे की जर भारतातील शहरी भागात असाच एखादा सर्व्हे केला, तर तसाच काहीसा कल दिसून येईल. आपल्याकडे ओळखी वाढत आहेत, पण *खरे ‘मित्र’* कमी होत आहेत.
पूर्वी अशा वेळा होत्या की आपण नवीन शहरात असलो, तरी एखाद्या रेस्टॉरंटमध्ये गेलो , बसलो आणि ओळखीच्या, अनोळखी मित्रांशी सहज गप्पा रंगल्या असं सहज घडलं असतं. पण आजकाल अनेकजण एकटे टेबलवर बसतात, गर्दीकडे पाठ करून.
अमेरिकेतील एका अलीकडच्या सर्व्हेप्रमाणे, एकट्याने जेवणं हे प्रकार मागील दोन वर्षांत २९% ने वाढले आहेत.
Stanford University तर आता विद्यार्थ्यांना सामाजिक जीवन उद्देशपूर्वक रचायला शिकवण्यासाठी ‘Design for Healthy Friendships’ नावाचा अभ्यासक्रम चालवते.
हे सगळं फक्त एक सामाजिक बदल नाही, तर एक सांस्कृतिक संकट आहे. मैत्रीसाठी वेळ काढणं ही केवळ लक्झरी राहिलेली नाही; ती आता एक प्राथमिकता असलीच पाहिजे.
आपण आपला वेळ कुठे घालवतो, कोणामध्ये गुंतवतो, हे सर्व झपाट्याने बदलतंय. एकटेपणा हा आता निवड नाही, तर एक नवा नॉर्म बनत चाललाय.आणि जर योग्य पद्धतीने वापरला गेला नाही, तर हा एकटेपणा मित्र न बनवण्याचीच नाही, तर मैत्री टिकवण्याचीही क्षमता गमावून बसण्याचं कारण बनतो.
जर आपण जागरूकपणे आपल्या प्राधान्यक्रमात मैत्रीला स्थान दिलं नाही, तर “संबंध” – हा आपल्या आनंदाचा आणि आरोग्याचा सर्वात महत्त्वाचा स्रोत – आपल्याला नकळत गमवावा लागेल.
आता आपण आधीपेक्षा अधिक स्वतःमध्ये गुंततोय – सोशल मीडिया, कुटुंबातील जबाबदाऱ्या, पालकत्व, पाळीव प्राणी यांच्यात.
आज मैत्री ही आपल्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग राहिलेली नाही, ती आता इतर सगळ्या जबाबदाऱ्या पार पडल्यानंतर उरलेल्या वेळात जमली तर जमली, अशा स्वरूपात आली आहे.
हे सगळं असूनही, मैत्रीचे महत्व अधोरेखित करणारे भरपूर संशोधन उपलब्ध आहे.
Bonnie Ware या हॉस्पिटल परिचारिकेच्या ‘The Top Five Regrets of the Dying’ या प्रसिद्ध पुस्तकात एक अत्यंत हृदयस्पर्शी विधान आहे –
“I wish I had stayed in touch with my friends.”
*“मला वाटतं, मी माझ्या मित्रांशी संपर्कात राहिलो असतो तर बरं झालं असतं.”*
संशोधन सांगतं की –
“Social isolation म्हणजे सामाजिक एकटेपणा हा हृदयरोग, डिमेन्शिया आणि मृत्यूचा धोका वाढवतो. हे रोज १५ सिगारेट पिण्याइतकं धोकादायक असू शकतं.”
मैत्री ही मानसिक, शारीरिक आणि भावनिक आरोग्य सुधारते.
Harvard University च्या ८० वर्ष चाललेल्या प्रसिद्ध अभ्यासात हे स्पष्ट सांगितलं गेलंय की,
*“आपल्या आयुष्यातील आरोग्य व आनंद याचा सर्वात मोठा भविष्यवक्ता (predictor) म्हणजे तुमचं धन किंवा व्यावसायिक यश नव्हे, तर तुमचे निकटवर्तीय संबंध आणि मैत्री आहे.”*
Survey Centre on American Life च्या अहवालात एक मूलभूत सत्य आहे:
*“More friends equals more life satisfaction.”*
*“अधिक मित्र = आयुष्यात अधिक समाधान.”*
जसं गुंतवणूक वाढण्यासाठी वेळ लागतो, तसंच मैत्रीसुद्धा!
ती एक दिवसात होत नाही – तिच्यासाठी लागतो वेळ, प्रयत्न आणि मनापासूनचा सहभाग.
*आणि ही मैत्री जिथे नैसर्गिकरीत्या फुलते ती जागा म्हणजे BBNG च्या विकली मीटिंग ..* या मीटिंग मध्ये अनेक जिवाभावाचे मित्र मिळतात आणि सोबत मिळते व्यवसाय वाढीची संधी …
*Join BBNG…. Do come to meeting Regularly… Make Friends … Boost Business ..*
शेवटी मिर्झा गालिब यांचा हा शेर खास मित्रांसाठी –
“दोस्तों के साथ जी लेने का मौका दे ऐ खुदा…
तेरे साथ तो , मरने के बाद भी रह लेंगें…”
मित्र व्हा, आणि सदैव आशीर्वादित रहा. 😊🌹
*डॉ. अभिजीत चांदे*
*असोसिएट डायरेक्टर*
*BBNG*
*9822753226*
#########################
🤗 *पुढील वर्षी येणारी नवीन पुस्तके :-*😎
"बारामतीकरांच्या करामती" एक अनुभव
लेखक : छगन भुजबळ
"विश्व कर्जाचे - कर्ज तुमचे सल्ला माझा"
लेखक : विजय मल्ल्या
एक (अधूरी) आत्मकथा -
"मी पंतप्रधान झालो तर...."
लेखक : शरद पवार
एक व्यंगकार - "मुक्त हस्त चित्र"
लेखक - निखिल वागळे
दिवाळी अंक -
"स्वत:ची मोरी तरी - - - - चोरी"
लेखक आणि संपादक - अजित पवार
एक शोकांतिका - "फक्त मी आणि माझं इंजिन"
लेखक - राज ठाकरे
एक रहस्यकथा - "कमळाबाईचे प्रेम की...... गेम"
लेखक - उद्धव ठाकरे
बालगीत - "असावा सुंदर चिक्कीचा बंगला"
कवयित्री - पंकजा मुंडे
"प्रवास वर्णन"-
"सिंधुदुर्ग ते मुंबई व्हाया चेंबूर"
लेखक - नारायण राणे
अजुन एक चमत्कार -
"चाऱ्यापासून वीजनिर्मिती"
लेखक - लालूप्रसाद यादव
"जिवंत रोबोट - एक फसलेलं तंत्रज्ञान"
लेखक - मनमोहन सिंग
बालनाट्य - "मै और मेरी मम्मी"
लेखक - राहुल गांधी
"फोडा आणि जोडा"
लेखक - अमित शहा
"कर्जव्यूहात अडकलेला अभिमन्यू"
लेखक - देवेंद्र फडणवीस (वादग्रस्त पुस्तक)
"शेवटचं स्वप्न - मंगळ दौरा"
लेखक - नरेंद्र मोदी
🤣😀😜😄
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा