शनिवार, १४ जून, २०२५

"सोशल मीडियावरील मुसाफिरी !":

"सोशल मीडियावरील मुशाफिरी !": सोशल मीडियामुळे जग अगदी जवळ आले आहे. कोणाशीही कधीही कसाही संपर्क साधता येतो साहजिकच सर्विंग करत असताना सोशल मीडियावर आपल्याला चांगले चांगले असेल उपयुक्त मन परिवर्तन करणारे उद्बोधक नवीन माहिती देणारे संदेश पाहायला मिळतात किंवा ऐकायला किंवा बघायला मिळतात. त्यातीलच हे काही मासले.... 1 "आठवणीतल्या साठवणी !": त्यावेळी मुंबईत आमच्या लहानपणी अल्युमिनीयमच्या पातळ पत्र्याची झाकणं बसवलेल्या अर्ध्या लिटरच्या बाटलीत आरेचं दूध मिळायचं. दोन प्रकारचे दूध मिळायचे. होल आणि टोंड.. हे दूध वितरणासाठी मुंबईत जागोजागी आरेची वितरण केंद्रे होती. २/४/६ बाटल्यांचे क्रेट असायचे. त्यात रिकाम्या बाटल्या घेऊन आपल्या घराजवळच्या आरे वितरण केंद्रासमोर भल्या सकाळी रांग लावावी लागत असे. बाटल्या घेऊन घरी आल्यावर, त्यांची झाकणं काढल्यावर झाकणाला लागलेली साय खाण्याची गंमत होती. त्यावेळी दुधाची भेसळ होऊ शकते असं कोणी म्हटलं असतं, तरी त्यावर कोणाचा विश्वास बसला नसता. इतकी काळजी आरे डेअरी घ्यायची. त्या दुधकेंद्रावर जाण्यासाठी लवकर उठावं लागे. म्हणून त्यावेळी ती त्रासदायक बाब वाटायची. दूध घेतलं की बाजूच्या बेकरीतून कडक पावाची एक लादी चहाबरोबर खाण्यासाठी घेणं हा नित्यक्रम असायचा. त्यावेळी बेकरीत खारी, नरम पाव आणि कडक पाव इतक्याच व्हरायटी होत्या आणि माखानियावर प्रयत्न चालू होते. हे आरेचे दूध चवदार असायचं. आजच्या पातळ दुधाला ती चव येत नाही. आज त्या दुधाच्या बाटल्या, ते वायरचे क्रेट ॲल्युमिनियमचे कार्ड या गोष्टी इतिहासजमा झाल्यात. लोकांच्या विस्मृतित गेल्यात. आजच्या पिढीला या दुधाच्या बाटल्यांविषयी काहीही माहिती नसेल. होल,टोल, स्पेशल असे 3 प्रकारे दुध मिळायचे.ही अल्युमिनियम ची झाकणे भांडी घासण्याच्या गुप्ता साबण मध्ये मिक्स करून तवा घासायला उपयोगी यायची😊 पर्यावरणाचे शून्य प्रदूषण करणाऱ्या काचेच्या बाटल्या जाऊन पर्यावरणाला प्रदूषित करणाऱ्या प्लास्टिक पिशव्या आज वापरात आहेत. ही सुधारणा की ही अधोगती.... एक गंमतीचा भाग सांगते ....पूर्वीच लोक असे म्हणायचे लग्नासाठी मुलगी बघायची असेल तर तिला सकाळच्या दुधाच्या लाईन मध्ये बघावी खरे सौंदर्य माहीत पडते .....🤣🤣 ################## 2 *सुंदर कविता* *मुलंही जातात सोडून .....* 🚶🏻‍♂️ मुलांना सासरी पाठवलं जात नाही घरातून, पण मुलंही जातात सोडून ..... आपलं घर, आपली खोली, गल्ली, मित्र अन् गाव ..... शिक्षणासाठी, नोकरीसाठी, पोटापाण्यासाठी ..... रात्रभर कूस बदलत, बिन झोपेचा, कण न् कण घराचा साठवत राहतो उदास डोळ्यात ..... आपलं जग मागे सोडताना, सर्टिफिकेट अन् कपडे सूटकेसमध्ये भरताना ..... भरलेल्या छातीत, मनाचं मेण होताना ..... आपली बाईक, बॅट, अन् भिंतीवर लावलेले आवडत्या नायकांचे पोस्टर डोळे भरून पहात, ओलसर डोळ्यांनी कसंनुसं हसत मुलगा घराबाहेर पडतो ..... मुलांची पाठवणी होत नाही घरातून, पण मुलंही जातात घर सोडून ..... रेल्वेच्या दारात, बसमधल्या खिडकीतून, बंद कारच्या काचेतून, विमानतळावर चेक-इन करताना डोळ्यातलं पाणी लपवत, हसतो मित्रांचा निरोप घेत, दुरावण्याचं दुःख लपवत, हळूहळू चालत्या रेल्वे सोबत, ओला उबर सोबत, बससोबत किंवा चेक-इन करण्याकरिता नाहीसा होतो मुलगा ..... मुलांची पाठवणी होत नाही घरातून, पण मुलंही जातात घर सोडून... आता ऐकू येणार नाहीत मित्रांच्या बोलवण्याच्या हाका ..... आणि वाजणार नाही दाराबाहेर खुणेचे हॉर्न ..... घराच्या गेटवर आता जमणार नाही मित्रांच्या हास्यकल्लोळाचा मेळा ..... उंबरठा ओलांडतांना घराचा, त्यालाही रडावसं वाटतं ..... आईच्या गळ्यात पडून पुन्हा मूल व्हावंसं वाटतं ..... पण जबाबदार्‍यांचा बंधारा अश्रूंची वाट अडवतो, मुलगा मग सार्‍या भावना खोल छातीत दडवतो ..... मुलीच्या पाठवणीच्या कौतुकात, माहेर तुटण्याच्या दुःखावर, शेकडो गीतं लिहिली गेलीत... पण मुलं मात्र घराच्या अंगणातून बॅग घेऊन शांतपणे निघून जातात ..... एका अनोळखी शहरात, जिथे कोणीही त्याची वाट पाहत नाही ..... अशा कुठल्यातरी एका घरात ..... मुलं मुळातून दुरावण्याचं दुःख शांतपणे सहन करतात .... हो, हे खरंच आहे की मुलांची पाठवणी होत नाही घरातून, पण मुलंही घर सोडून जातात..... मुलंही घर सोडून जातात ..... 🩷 99################### 3 👇कोविड-१९ च्या शरीराचे शवविच्छेदन (पोस्टमार्टम) करणारा सिंगापूर हा जगातील पहिला देश ठरला आहे. सखोल तपासणीनंतर असे आढळून आले की कोविड-१९ हे विषाणू म्हणून अस्तित्वात नाही, तर किरणोत्सर्गाच्या संपर्कात आलेल्या जीवाणू म्हणून अस्तित्वात आहे आणि रक्तात गोठून मानवी मृत्यूला कारणीभूत ठरते. असे आढळून आले की कोविड-१९ आजारामुळे रक्ताच्या गुठळ्या होतात, ज्यामुळे मानवांमध्ये रक्त गोठते आणि रक्तवाहिन्यांमध्ये रक्त गोठते, ज्यामुळे व्यक्तीला श्वास घेणे कठीण होते; कारण मेंदू, हृदय आणि फुफ्फुसांना ऑक्सिजन मिळू शकत नाही, ज्यामुळे लोक लवकर मरतात. श्वसन शक्तीच्या कमतरतेचे कारण शोधण्यासाठी, सिंगापूरमधील डॉक्टरांनी WHO प्रोटोकॉल ऐकला नाही आणि कोविड-१९ वर शवविच्छेदन केले. डॉक्टरांनी हात, पाय आणि शरीराचे इतर भाग उघडून काळजीपूर्वक तपासल्यानंतर, त्यांना आढळले की रक्तवाहिन्या पसरल्या आहेत आणि रक्ताच्या गुठळ्यांनी भरल्या आहेत, ज्यामुळे रक्तप्रवाहात अडथळा येतो आणि शरीरातील ऑक्सिजनचा प्रवाह देखील कमी होतो ज्यामुळे रुग्णाचा मृत्यू होतो. या संशोधनाबद्दल कळल्यानंतर, सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाने ताबडतोब कोविड-१९ उपचार पद्धतीत बदल केला आणि त्यांच्या पॉझिटिव्ह रुग्णांना अ‍ॅस्पिरिन दिली. मी १०० मिलीग्राम आणि इम्रोमॅक घेण्यास सुरुवात केली. परिणामी, रुग्ण बरे होऊ लागले आणि त्यांच्या तब्येतीत सुधारणा होऊ लागली. सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाने एका दिवसात १४,००० हून अधिक रुग्णांना बाहेर काढले आणि त्यांना घरी पाठवले. वैज्ञानिक शोधाच्या काही काळानंतर, सिंगापूरमधील डॉक्टरांनी उपचार पद्धती स्पष्ट करून सांगितले की हा रोग एक जागतिक फसवणूक आहे, “हा आजार रक्तवाहिन्यांमधील रक्तसंक्रमण (रक्ताच्या गुठळ्या) आणि उपचार पद्धतीशिवाय दुसरे काहीही नाही. अँटीबायोटिक गोळ्या दाहक-विरोधी आणि अँटीकोआगुलंट्स (अ‍ॅस्पिरिन) घ्या. हे सूचित करते की हा आजार बरा होऊ शकतो. सिंगापूरच्या इतर शास्त्रज्ञांच्या मते, व्हेंटिलेटर आणि अतिदक्षता विभाग (ICU) ची कधीही आवश्यकता नव्हती. या उद्देशासाठीचे प्रोटोकॉल सिंगापूरमध्ये आधीच प्रकाशित झाले आहेत. चीनला हे आधीच माहित आहे, परंतु त्यांनी कधीही त्याचा अहवाल प्रसिद्ध केला नाही. ही माहिती तुमच्या कुटुंबासह, शेजारी, ओळखीच्या व्यक्तींसह, मित्रांसह आणि सहकाऱ्यांसह शेअर करा जेणेकरून ते कोविड-१९ ची भीती दूर करू शकतील आणि हे लक्षात येईल की हा विषाणू नाही तर एक जीवाणू आहे जो केवळ किरणोत्सर्गाच्या संपर्कात आला आहे. फक्त खूप कमी प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांनीच सावधगिरी बाळगली पाहिजे. या किरणोत्सर्गामुळे जळजळ आणि हायपोक्सिया देखील होतो. पीडितांनी एस्पिरिन-१०० मिलीग्राम आणि अप्रोनिक किंवा पॅरासिटामोल ६५० मिलीग्राम घ्यावे. स्रोत: सिंगापूर आरोग्य मंत्रालय ने पाठविले ( नक्की वाचले पाहिजे) *जसे आहे तसे पाठविले ✌️💐⚡️ 4 👍" मुक्तसंवाद- वाचता वाचता, 'वाचलेला'- दिवस !:👌 💐"मोबाईल वापरायचा अतिरेक झाल्यामुळे काही ना काही तरी वेगळे घडणार नवीन मानसिक समस्या निर्माण होणार, असे वाचनात येतात, एक दिवस मोबाईल न वापरण्याचा उपास करायचा प्रयत्न केल्यावर तो वेळ वाचनात घालवल्यामुळे दिवस कसा वाचला ते खुसखुशीत भाषेत सांगणारा हा मुक्तसंवाद पुढील लिंक उघडून आपण जरूर समजून घ्या !":💐 https://youtu.be/D_tWDxhYw7U?si=RHWUN5QUBZWHFyap

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा