सोमवार, १६ जून, २०२५

"चंद्र राशीच्या षडाष्टकातील दिवसांची अनिष्ट फळे !":

चंद्र राशीच्या षडाष्टकातील दिवसांची अनिष्ट फळे !" भारतीय ज्योतिष चंद्राला महत्व देते तर पाश्च्यात्य ज्योतिष रविला. त्यामुळे, आपल्या जन्मवेळी चंद्र ज्या राशीत असतो, ती आपली जन्मरास मानली जाते. चंद्र सर्वसाधारणपणे एका महिन्यात बाराही राशींचा प्रवास पूर्ण करतो, त्यामुळे आपली जन्मरास ठरविताना, जन्मतारिख महिना वर्ष व जन्मवेळ माहीत असावी लागते. तर रवि प्रत्येक राशीचा प्रवास एका महिन्यात पूर्ण करत असल्याने त्या संपूर्ण महिन्याच्या कालखंडात जन्मलेल्या सर्वांची रास रवि ज्या राशीत असतो ती असते. सहाजिकच जन्मतारिख व महिना माहीत असला की पाश्च्यात्य ज्योतिष पध्दतीत जन्मरास ठरविता येते. जन्मसाल माहीत नसले तरी चालते. ह्या फरकावरून समजते की चंद्रावर आधारित भारतीय ज्योतिष अधिक सूक्ष्मपणे वस्तुनिष्ठ, तसेच व्यक्तिनिष्ठ विचार करते. त्या तुलनेत, रविच्या भ्रमणावर आधारित पाश्च्यात्य ज्योतिष ढोबळ विचार करते. आपले आयुष्य ही विशिष्ठ परिस्थितींत घेतलेले वा न घेतलेले निर्णय आणि त्यानुसार केलेली क्रुती वा न केलेली क्रुती ह्यांच्या परिणामांची अखंडीत श्रुंखला असते. परिस्थितीदेखिल नित्य नव्याने बदलत रहात असते. ह्या सर्व घडामोडींमागे आपले मन एखाद्या सारथ्याची भूमिका बजावत असते. मानवी मनावर चंद्रभ्रमणाचा यथोचित परिणाम होत असतो आणि प्रुथ्वीवरील समुद्राच्या भरती ओहोटीचा संबंध चंद्राच्या दररोजच्या भ्रमणावर अवलंबून असतो हे सर्वश्रुत आहे. आपल्या शरिरात सुमारे सत्तर टक्के पाणी असते. सहाजिकच चंद्रभ्रमण आपले विचार निर्णय व क्रुतीवर प्रभाव पाडत असते, हे ओघाने आले. ह्या विचारमंथनामुळे चंद्रभ्रमणाला केंद्रीभूत मानणार्या भारतीय ज्योतिषाविषयी मला कुतूहल वाटू लागले, त्यात तर्कशास्त्राला पटू शकेल असे तथ्य आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघितले तर चंद्र हा पृथ्वीचे अपत्य आहे आणि आपण सारे देखील या पृथ्वीतलावरील मूलद्रव्यांपासून बनलेली सजीव आहोत. पृथ्वीबरोबर चंद्र जसा फिरतो तसे आपणही अवकाशात फिरत असतो साहजिकच चंद्राची विशिष्ट वेळची अवस्था आणि आपली याला न्यूटनचा तिसरा नियम लागू करून एकमेकांमधला जो ताण अथवा फोर्स पुढील समीकरणावरून समजला जातो G=m1×m2/d square M1=Mass of moon M2=Individual Mas d=distance at a particular time between the moon and an Individual दर महिन्याला 12 ही चंद्रराशींतून चंद्र प्रवास करतो प्रत्येक राशीला साधारणतः दोन दिवस आठ तास लागतात एखाद्याची जी चंद्र राशी असेल त्या राशीला सहाव्या आणि आठव्या स्थानात जेव्हा चंद्र प्रवास करतो अशा साधारण चार दिवस 16 तास षडाष्टक योग त्या त्या व्यक्तीच्या बाबतीत होत असतो. साहजिकच दर महिन्याला प्रत्येकाला अशा अनिष्ट फळे देणाऱ्या षडाष्टकयोगाचा अनुभव घ्यावा लागतो जसे मेष राशीला जेव्हा कन्येत व वृश्चिक त चंद्र जात असेल तेव्हा त्या व्यक्तीला तो षडाष्टक योग होईल या योगाची फळे वादविवाद कुटुंबामध्ये कलह जोडीदाराबरोबर मतभेद मनाजोगत्या गोष्टी न घडणे मानसिक शांती व्यवहारात आपले अंदाज चुकणे नुकसान होणे अशा तऱ्हेची असतात. दर महिन्याचे पंचांग बघून आपल्या चंद्र राशीला कधी असा षडाष्टक योगाचा चंद्राचा प्रवास होतो ते पाहणे गरजेचे असते या कालखंडात शक्यतोवर मनावर संयम ठेवावा प्रतिकूल तेच घडेल अशा मनोभूमीकेतून सामोरे जावे नवीन आव्हानात्मक निर्णय क्रुुती टाळावी. प्रत्येक राशीला षडाष्टक कुठल्या राशीमुळे येतात ते पुढे दाखवले आहे: 1 मेष-कन्या वृश्चिक 2 वृषभ- तुळ धनु 3 मिथुन -वृश्चिक मकर4 कर्क- धनु कुंभ 5 सिंह-मकर मीन 6 कन्या -कुंभ मेष 7 तूळ- मीन वृषभ 8 वृश्चिक- मेष मिथुन 9 धनु-व्रुषभ कर्क 10 मकर-मिथुन सिंह 11 कुंभ-कर्क कन्या 12 मीन- सिंह तूळ त्याचप्रमाणे आपले जन्म लग्न म्हणजे जन्मवेळी सूर्य ज्या राशीत असतो ती रास असलेल्या स्तनाला जन्म लग्न स्थान म्हणतात. जन्म लग्न राशी आणि जन्म चंद्र राशी भविष्य वेगळ्या असतात. षडाष्टक योगाची त्यामानाने सौम्य फळे जन्म राशीला मिळू शकतात मात्र ज्यांचे जन्म चंद्र राशी व लग्न राशी देखील एकच असेल त्याला ती फळे अधिक तीव्र असू शकतात. प्रत्येक दिवस आपल्याला वेगळी मनभावना व परिस्थिती सातत्याने निर्माण करत असतो साहजिकच सगळे दिवस सुखाचे नसतात किंवा दुःखाचे नसतात कुछ खट्टा कुछ मीठा अशा तऱ्हेने आपल्या सर्वांचेच जीवन बनलेले असते. व्यावहारिक जीवनात दरमहा आपल्या चंद्र राशीला षडाष्टक योगाचे कठीण दिवस कधी येतात ते ध्यानात व नोंदवून त्या त्या दिवशी वर सांगितल्याप्रमाणे सुयोग्य काळजी घ्यावी हाच या लेखाचा हेतू धन्यवाद श्री सुधाकर नातू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा