सोमवार, १६ जून, २०२५
"" सायबर क्राईमचा भस्मासुर !":👌
👍" सायबर क्राईमचा भस्मासुर !":👌
🤗🤗🤗🤗🤗
🤣" रानटी अवस्थेतील माणसाचा उत्तरोत्तर प्रगतीचा प्रवास आज तंत्रज्ञानामुळे प्ररमोच्च बिंदूला पोचला असला, तरी त्याची मूलभूत शिकारीवृत्ती अजूनही कमी झाली नाही, अशाच तऱ्हेचे सध्याचे एकंदर गुन्हेगारी विश्वाचे भयावह चित्र आहे. दुसऱ्याचे ओरबाडून घेण्याची ही प्रवृत्ती भीषणावह आहे. पॉकेटमारी,चोऱ्या दरोडे ही सारी त्याच प्रवृत्तीची अनिष्ट उदाहरणे आहेत.
अशा तऱ्हेच्या गुन्हेगारीमध्ये प्रत्यक्ष शारीरिक हजेरी लावून, संभाव्य पकडले जाऊन मार खाण्याच्या धोक्याला तोंड देण्याची शक्यता गृहीत धरूनही, हे गुन्हे काही केल्या कमी होत नाहीयेेत. हा खरोखर मानवसंस्कृतीला लागलेला हा काळीमा कधी दूर होणार कुणास ठाऊक !
त्यात आता भर पडली आहे, ती सायबर क्राईमस् भस्मासुराची ! सोबतच्या वृत्तामुळे आपल्याला लक्षात येईल की, फसवणुकीद्वारे किती भयानक वेगाने अशा गुन्ह्यांची संख्या वाढत जात आहे आणि त्यामानाने पकडले जाणारे नगण्य आहेत. येथे तंत्रज्ञानाच्या दुरुपयोगाद्वारे रिमोट ठिकाणी हजेरी असूनही, कुठेही कसेही संभाव्य भक्ष हेरून त्यांना भीती दाखवून त्यांचेच पैसे या गुन्हेगारांना बिन दिक्कतपणे धाडले जातात. उत्तरोत्तर वाढत जाणाऱ्या सायबर क्राईमस् मध्ये एकदा फसवणूक झाली की हातात तक्रार करण्याशिवाय काहीच उरत नाही, कारण समोर गुन्हेगार कोण आहे याचाच पत्ताच नसतो.
भौतिक प्रगती जरी झाली तरी नैतिक अध्यपतन इतक्या थराला गेले आहे की, हे असले आधुनिक भामटे गुन्हेगार सहजतेने निरपराध सामान्य जनतेने घामाने मिळवलेल्या संपत्तीवर डल्ला मारत आहेत.
ही मानवी प्रवृत्ती कधी कशी संपणार, त्यासाठी खरोखर काय करायला हवे, प्रामाणिकपणा सचोटी निस्पृहता या गोष्टी समाज कसा कधी अंगीकारणार, याचा विचार करायची गरज कधी नव्हे ती आता निर्माण झाली आहे. मानसशास्त्रज्ञ यासाठी पुढे यायला हवेत. अथक संशोधन करून अगदी बालपणापासून कोणते, कसे संस्कार
करायला हवेत याचे मार्गदर्शन त्यांनी करायला हवे.
सर्वसामान्यांनीही जागृत राहून आपण फसवणुकीला बळी पडणार नाही, अनोळखी अशा कुठल्याच संपर्कात न येण्याची खबरदारी त्यांनी जर घेतली तर कदाचित काहीसा आळा या असल्या चिंताजनक सायबर क्राईमस् वर घालता येईल !":🤣
🤗🤗🤗🤗🤗
श्री सुधाकर नातू
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा