मंगळवार, १७ जून, २०२५
" बोल अमोल !":
👍" बोल अमोल-याला जीवन ऐसे नाव!:👌
😇 "माणसाचे जीवन हे एक गुढ आहे, कोडे आहे, अव्याहत सामना आहे. सामना आहे, तो परिस्थिती आणि ती व्यक्ती या मधला. त्याच्या जोडीला प्रत्यक्ष क्रियेत भाग न घेता अंतिम फळावर परिणाम करणाऱ्या 'कॅटलिस्ट' प्रमाणे प्रारब्ध आणि नियती ही तिसरी अदृश्य शक्ती त्या सामन्यात असतेच असते. म्हणजे सामन्यातील तीन भिडूंपैकी दोन भिडू त्या व्यक्तीच्या हातात नसतात अदृश्य असतात, प्रवाही असतात. अशा वेळी ती व्यक्ती आणि तिचे सामन्यासाठी सामोरे जाणारे निर्णयगुण व कृती हेच वास्तव असते.
अशा अव्याहत एका मागोमाग खेळल्या जाणाऱ्या सामन्यांचे मिळून व्यक्तीचे चित्र विचित्र रंगीबेरंगी आयुष्य घडत जाते, सुखदुःखाचे जाळे कुछ खट्टा कुछ मीठा असे सारे. सामन्यांची ही जत्रा संपते तेव्हाच, जेव्हा ती व्यक्ती या जगाचा निरोप घेते. याला जीवन ऐसे नाव !":😇
#########

############
👍" बोल अमोल- अपेक्षा ठेवू नका !:👌
😃 "दररोजच्या जीवनामध्ये एकमेकांबरोबर संपर्क येत राहतात. आपल्याला जसे एखाद्या व्यक्तीने त्या त्या विशिष्ट प्रसंगात वागावे असे वाटते, तसे ती वागतच नाही. साहजिकच आपल्याला अपेक्षित असलेली परिणामांची फळे विपरीतच होत जातात आणि आपला मनस्ताप होतो. दुर्दैव असे की हे सारे होऊनही ती व्यक्ती मात्र अनभिज्ञ, बेफिकीर असते आणि आपले काही चुकले असे तिला वाटतच नाही. दिलगिरी व्यक्त करणे तर दूरच, पण जर तुम्ही मनातला मनस्ताप दाखवला, तर उलट तुमच्यावरच कुरघोडी करायला भाग असल्यासारखी ती वागते. साहजिकच तुमचा तिळपापड होतो, अक्षरश:
अंगाची लाही लाही होते. अशावेळी ही व्यक्ती सुधारणार कशी, बदलणार कशी, या प्रश्नाचा विचार करणं व्यर्थ असतं. तुमचाच त्रास अधिकाधिक वाढत जाणार असतो. यावर एकच उपाय म्हणजे आपण अपेक्षाच सोडून देणे. ती व्यक्ती तिला पाहिजे तसेच वागेल, आपल्या अपेक्षेप्रमाणे वागणारच नाही, प्रतिकूल तेच होईल असे गृहीत धरून आपण त्या त्या प्रसंगात अलिप्त राहून, कोणत्याच अपेक्षा न ठेवता जो परिणाम होईल तो स्वीकारणं हाच शेवटी शहाणपणा ठरवू शकतो- नव्हे असतोच असतो !":😃
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा